उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद स्वाती. Happy

एकदा क्लिन्सिंग केलं तरी खूप चांगला फरक जाणवतोय. सगळंच जरा नियमितपणे केलं तर उन्हाळा सुसह्य जाईल.

एक उपाय जायफळ (किसून /सहाणेवर उगाळून) + नीरस दूध , हे रात्री चेहेर धुवुन लावयच सकाळी धुवायचे, याने पण फोड जातात, हे नक्कि खर आहे का

मल पन उपय सान्गा ना माझे वय २१ येअर्स आहे माझ्या चेह्र्यवर खुप पिम्पल्स आहेत त्यामुले मला खुप त्रास होत आहे प्लिझ रेप्लय द्य

पूजा, अगदी अघोरी उपाय आहे. झालं काय कि मी कॉलेजमधे असताना माझ्या चेहर्‍यावर प्रचंड पिम्पल्स होते. त्यातही वाईट म्हणजे मी वाचायला लागले कि ते कुरतडत रहायचे. (यक्क ! ) मला आणि माझ्या आईला खात्री होती कि आता जन्मभर डाग आणि खड्डे तर रहाणारच. पण मग तिने कुठल्या फेमिना/माहेर टाइप मासिकात हा डेडली नुस्का वाचला.

एक चमचा मस्टर्ड सीड्स थोड्या पाण्यात रात्रभर भिजत टाकायच्या, मग सकाळी त्या दुधामधे वाटुन त्यात थोडीशी हळद घालुन ती पेस्ट तोंडाला लावायची. चेहर्‍याची आग आणि डोळ्यातुन घळघळ पाणी, मग दोघींची भांडणं वगैरे. पण त्याचा रिझल्ट तु आता पहायला हवास. माझी स्कीन क्लीन अ‍ॅज एवर आहे. तेव्हाच्या कोणी मला आता पाहिलं तर त्यांना माझी स्मुथ स्कीन बघुन धक्का बसतो. आता हे मस्टर्ड सीड्सचे गुण आहेत का टीनएज मधुन बाहेर आल्यावर ते आपोआप बरं झालं ते माहित नाही. करने का तो करो, अपने जबाबदारी पे. Happy

मनिमाऊ हा उपाय किती दिवस केलास तू? पेस्ट किती वेळानं धुवायची? एका भाचीला याचा उपयोग होऊ शकेल.

फार कटकट करुन आणि आईने बाहेर जावु देणार नाही इ इ धमक्या दिल्यामुळे मी जेमतेम आठवड्यातुन १-२ वेळा असं १/१.५ महिना केलं. पेस्ट वाळल्यावर धुवायची, पण अगदीच सहन झालं नाही तर ८-१० मिनिटानी धुवु देत. माझ्या एका कलिगच्या मुलीला पण उपयोग झाला आहे म्हणे. फार जळतं, त्यामुळे नंतर चंदन पावडर थंड दुधातुन लावायची लक्षात ठेव.

हा तेच. फोडणीमधली मोहरी. डाग नक्की जातात. खड्डे लेझर ट्रीटमेंटनेच जातात फक्त.

चिऊ, मुलांना चालावं. पण त्यांना सहनशक्ती कमी असते. ( आणि सुंदर दिसण्याची इच्छा पण. त्यामुळे तो एवढा त्रास नाही सहन करणार. Happy )

मी काल भिजवुन आज सकाळी लावले थोडी आग झाली, मिक्सरमधे केले तर खुप झाले {फ्रिज मधे ठेवलेत तर चालेल का?}

मोहरीच्या पेस्टने तोंडाची आग होते तर चेहर्‍यावर किती होइल ह्या विचारात?

खातानाच इतका झणका लागतो..
सुंदर दिखने के लिये न जाने लोग क्या जालिम नुस्का करते है. हाये! कब सुधरेंगे. Proud

पण खरे सांगू, हा उपाय करण्याआधी पॅच टेस्ट करा.. सल्फर असते त्यात.

नुसता त्वचेला लागला तरी जळते इतकी हिट असते त्यात.... थोडे चंदन मिक्स करा आधीच.

नाहीतर मोहरीचे तेल लावा चंदनात मिक्स करून. कमी जाळ होतो.

कमी त्रासाचा उपाय, माझ्या आयुर्वेदिक डॉक मॅम ने दिलेला, मला तरी फार उपयोगी पडलाय.

चंदन पावडर-२ चमचे
आंबेहळद-१ चमचा
धन्याची पूड-२ चमचे

हे मिश्रण मिक्स करुन ठेवायचं आणि दररोज (शक्यतः रात्री झोपण्याआधी) अर्धा चमचा हे मिश्रण पाण्यात (किंवा दुधात उत्तम) पेस्ट करून चेहर्‍यावर लावावं-फेस पॅक- वाळेपर्यंत ठेवावा व नंतर गरम पाण्याने चेहरा धूवावा (वाळालेला पॅक रगडून काढू नये, पाण्याचे हबके मारावेत चेहर्‍यावर)- ४ दिवसांत फरक जाणवला मला!

ट्राय करके देखो Happy

बागु, उन्हाळ्यात छान थंड वाटेल हा पॅक.

प्रीती, नुसती धने पावडर पण मिळते ना. केप्रची पाहिली आहे.

प्रिती
जिरे नाही, धनेच! (धान्यक)
एवरेस्ट ची पूड मिळते बघ तुला करण्यास सवड नसेल तर

पण आंबेहळद सगळ्यांना नाही सुट होत, म्हणजे मला तरी नाही होत्....आंबेहळद लावली की बारीक बारीक पुरळ येतात माझ्या चेहरयावर Sad

प्रीती, मी एक्स्पर्ट नाही गं या विषयातली. पिंपल्स म्हटलं कि मला तेच आठवतं, म्हणुन सांगितलं. Happy फ्रीजमधे ठेवलं तर हरकत नसावी. ( पण ते झंपीने सांगितलेलं पॅच टेस्ट वगैरे बघुन घे हं. )

़कुंकुमादी तैलम भारी आहे. कोणत्याहि आयुर्वेदिक दुकानात मिळेल.

भारतातुन बाकिचा खाऊ पण पाठव हं. >>> कोनो गाव है तुम्हरा छोरी? >>>>>>>> मनिमाऊ, हे मी वाचलच नाहि गं . हम बर्लिनमा हूं. Happy

माझ्या मोठ्या बहिणीच लग्न आहे. मी करवली. मी बाकी दिसायला ठीक्ठाक आहे. गव्हाळ वर्ण. पण दोन्ही हातांच्या कोपर आणि त्याच्या आसपासचा भाग काळा आहे. उसको ठीक करनेका उपाय बताओ लोक्स... एका महिना आहे माझ्या हातात exact.

Pages