Submitted by सानी on 13 March, 2012 - 05:59
ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया.
अश्विनीमामी, बटबटीतपणाला १००%
अश्विनीमामी,
बटबटीतपणाला १००% अनुमोदन. हा प्रकार हिंदी सिनेमातही आढळून येतो. दिग्दर्शकांच्या मते सर्वसामान्य हिंदी प्रेक्षकाचं सरासरी वय १२ वर्षे आहे असं कुठेतरी वाचल्याचं आठवतं!
आ.न.,
-गा.पै.
त्याकाळच्या मराठी भाषेवर तर
त्याकाळच्या मराठी भाषेवर तर मी बेहद्द खूष !
माझ्या आजीच्या बोलीत त्याकाळचे बरेच शब्द असत.
मी तर आता घरात बोलायला सुरुवात पण केली.
'आज अंमळ उशीरच झाला म्हणायचा हापिसातुन यायला '
इकडून घटकाभर विश्रांती घेण्याचे करावे.रात्री काशाच्या वाटीने तळपायांस गाईचे तूप लाऊन देईन हो
स्वारींना उकडीचे मोदक आवडतात, म्हणून मोदकांचा घाट घातला आहे.
ऊन ऊन स्वयंपाक तयार आहे. इकडून सांजसंध्या करणे झाले की ताईस पाटपाणी करावयास सांगते आणि पानेच वाढावयास घेते..........
नवरा म्हणतोय......ही मालिका निरंतर चालू राहूदेत
अवनी तरीच अनिकेत हल्ली उपरण
अवनी तरीच अनिकेत हल्ली उपरण आणि पगडीत दिसतो.
राँग नं.... आमचा अनिकेत नाय
राँग नं.... आमचा अनिकेत नाय काय..
राँग नंबर अवनी, मस्त जमते की
राँग नंबर
अवनी, मस्त जमते की तुला त्या काळची मराठी.
अमा, एकेकाळी हिंदीतपण दर्जेदार मालिका होत्या. 'क्योंकी सास..' पासून हा दर्जा घसरला असं मला वाटतं. ती एक मालिका काहीतरी बदल म्हणून लोकांना आवडली काय आणि मग तसल्याच मालिकांचं पीक आलं काय... मराठीत पण अर्ध्याच्यावर मालिका तसल्याच तर आहेत हल्ली.
काल रानड्यांनी 'माझ्यासमोर
काल रानड्यांनी 'माझ्यासमोर डायलेमा' आहे असं म्हटलं की
शरद पोंक्षे बेस्ट ! गोविंदराव
शरद पोंक्षे बेस्ट !
गोविंदराव आणि त्यांच्या सौ यांच्यातला वयातला फरक जाणवतो
पण उमा आणि अण्णासाहेब यांच्यातला नाही
असो... तरीही पात्रयोजना उत्तम आणि अभिनय दर्जेदार हे नक्कीच.
मला गोपाळचे पात्र पण आवडले.
मावशीचे येजमान कुठे दाखवले नाहीत ते...
पुढच्या नाट्यात नीना कुलकर्णी महत्वाचा रोल निभावणार असे वाटते..
त्या काळात अशा कितीतरी दुर्गाक्कांनी विहीर जवळ केली आहे.
रानडेंचे काम केलेला नट कोण
रानडेंचे काम केलेला नट कोण आहे?.... बघितल्यासारखा वाटतोय चेहरा... आणि तो यमीचा भाऊ पण आहे मला वाटत कोणच्यातरी मालिकेत
>काल रानड्यांनी 'माझ्यासमोर
>काल रानड्यांनी 'माझ्यासमोर डायलेमा' आहे असं म्हटलं की अ ओ, आता काय करायचं
हो! पण त्यातून ते उच्चशिक्षित होते, असं दाखवायचं असावं.
बालगंधर्व मधेही 'वन्समोर' ऐकून 'च्यामायलाबंड्या!' वाटलं होतंच पहिल्यांदा.
अननोईंगली एखादा इंग्रजी शब्द वापरला जाणं तेव्हाही असू शकेल ना??
रच्याकः परवा आमच्या बिल्डींगमधली(कोल्हापूर) ४ वर्षांची पोरगी माझ्या आईला म्हणे, "काकूऽऽऽ, मी कन्फ्युज झालीये."
दर्जेदार वगैरे म्हणायची घाई
दर्जेदार वगैरे म्हणायची घाई करताय अस नाही वाटत तुम्हाला कारण दिग्दर्शक भाग्यलक्ष्मी फेम विरेन प्रधान आहे.
परवा कुणाला तरी कविता लाड "काकी.." म्हणाली ह्याचा निषेध शरद पोंक्ष्यांकडे नोंदवला आहे.
त्याने थोडे स्वातंत्र घेतलाय अस अधिच सांगितलय
रमाला छळायला आधिच त्याने चार आलवणवालींची सोय केलेय.
आता लवकरच न्यायमुर्ती रानड्यांची स्मृती जाईल मग पंडीता रमाबाई काशीबाई कानीटकरांसमवेत रमाबाई कुठल्याश्या कुलटामाईच व्रत करेल. मग एक नाग रानड्यांना डसून....
पुढे लिहीण्याचा हक्क स्वप्नाचा का तिने तो अगोदरच बजावलाय.
मंदार जोशी >> पडघवली वर कोणती
मंदार जोशी >> पडघवली वर कोणती मालिका आधारित होती? . . .
पडघवली वर कोणती मालिका आधारित
पडघवली वर कोणती मालिका आधारित होती? . . >> कुछ खोया कुछ पाया.
रोहिणी हट्टंगडी आणि प्रदीप वेलणकर होते ना त्यात?
राँग नं.... आमचा अनिकेत नाय
राँग नं.... आमचा अनिकेत नाय काय..>>>>
मनिषा, पोस्टीबरोबर आयडी पण नीट वाचत जा गं.. नाहीतर नसते गैरसमज व्हायचे तुला जी अवनी वाटतेय ती avani1405 आहे गं, ही 'अवनी' नाही
परवा कुणाला तरी कविता लाड
परवा कुणाला तरी कविता लाड "काकी.." म्हणाली ह्याचा निषेध शरद पोंक्ष्यांकडे नोंदवला आहे.>>>>
कोकणात काकी च म्हणतात. अगदी ब्राम्हण ही. माझ्या आई च्या घरी आम्ही "काकु"म्हणत असु. पण सासर्यांच्या साइड ला आणि सासु बाईंच्या साइडला ही ( एक कोकणास्थ एक कर्हाडे) "काकीच" म्हणतात. अगदी गावाला शेजारचे ही "काकीच" म्हणतात. त्यात सासरे राजपुर कडले आहेत. साबा दापोली कडल्या आहेत. मी माहेरुन कर्हाडे पण "काकु" च म्हणायचे आमच्या कडे. पण आम्ही रायगड तालुक्यातले.
मलाही आधी आश्चर्य वाटलं होतं. पण जेंव्हा ८० वर्षांच्या पणजी पण तेच म्हणतात म्हंटल्यावर नक्कीच तो शब्द त्या काळातल्या ब्राम्हण (म्हणजे दे+को+क) मध्ये प्रचलित असणार.
दर्जेदार वगैरे म्हणायची घाई
दर्जेदार वगैरे म्हणायची घाई करताय अस नाही वाटत तुम्हाला >>>>>
काय आहे आजकालच्या सगळ्या मालिकांच्या भयानक कथानकात हीच उजवी आहे. नीदान विषय तर वेगळा आहे. त्या मुळे त्या वेगळे पणाच आणि आजकालच्या जगात अशी जुन्या विचारांचा उद्घघोश करणारी मालिका आली हेच अप्रुप. कालच्या भागात पाहिलच असेल... स्वतः रानडे ह्या कुमारी विवाहाला अजीबात तयार नाहीत. त्यांना तर विधवेशी लग्न करुन समाजात उदाहरण घालायचे आहे. आर्थात ते कुटुंबा विरुध्ध जाउ शकत नाहीत. आणि त्या वरुन आयुष्यभर लोकांची कुजकी बोलणी खातात. कुटुंबा विरुध्ध जायचे धाडस आजकालच्या तरुणांनाही जड जाते हे तर १५० वर्षांपुर्वीचं!!!!
मोहन की मीरा +१ <<<आता लवकरच
मोहन की मीरा +१
<<<आता लवकरच न्यायमुर्ती रानड्यांची स्मृती जाईल मग पंडीता रमाबाई काशीबाई कानीटकरांसमवेत रमाबाई कुठल्याश्या कुलटामाईच व्रत करेल. मग एक नाग रानड्यांना डसून....>>> गुगु, ही काही काल्पनिक कथा नाहीये, जिला हवे तसे वाढवता येईल. भरत मयेकरांनी दिलेल्या (लेटेस्ट) लेखाची लिंक बघा आणि तो वाचा. मूळ कथानकच (सत्यकथाच) बरंच मोठं आणि नाट्यमय आहे. पाणी घालून वाढवायची वेळ येणार नाही, असं वाटतं.
हो ,खरेच छान आहे ही मालिका...
हो ,खरेच छान आहे ही मालिका...
साने मालिका मस्त! पात्र
साने
मालिका मस्त! पात्र अभिनय मस्त वठवत आहेत!
कालची यमीची उत्तरं, निरागसता आणि निर्भयतेची उत्तम सांगड घालणारा अभिनय, वा वा
ह्या धाग्याशी निगडीत
ह्या धाग्याशी निगडीत लिंक
ह्या मालिकेचे शीर्षकगीत ज्यांनी लिहीले त्यांचा धागा
http://www.misalpav.com/node/21069
मीच ओलांडले मला सोबतीस
मीच ओलांडले मला
सोबतीस माझा सखा
येई कवेत आकाश
झुले उंच माझा झोका !
अशा संसार गाण्याला
त्याचा माझा एक ठेका
त्याच्या कृतार्थ डोळ्यात
झुले उंच माझा झोका !
क्या बात है I
हाती अमृताचा वसा, साथ देई
हाती अमृताचा वसा,
साथ देई माझा सखा,
त्याच्या कृतार्थ डोळ्यात.. झुले उंच माझा झोका......... शीर्षकगीतातले हे शब्द खुप सुंदर.....
धन्स गो बागे! अरुण म्हात्रे,
धन्स गो बागे!
अरुण म्हात्रे, तुस्सी ग्रेट हो ___/\____ रोजच्या रोज हेच गाणे ओठांवर असते. अप्रतिम शब्द, चाल, संगीत आणि आवाज तर... अहाहा.
थबकले उंबऱ्यात मी ..पाहुनी नवी पहाट
जणू जन्मले नव्याने ..भरता हा मळवट ह्या शब्दांच्यावेळी जुन्या चाली कशा असायच्या याची सही सही नक्कल केलीये.. हे पण शब्द मला फार फार आवडतात...
(शीर्षकगीताची लिंक.)
मोहन की मीरा >>>दबलेल्या
मोहन की मीरा >>>दबलेल्या आनंदीची कहाणी आहे ... त्याला बायको शीकायला हवीच होती पण त्या बरोबर स्वतःचाही टेंभा मिरवायला हवा होता. <<< आपण एकदा 'विश्रब्ध शारदा' मधील गोपाळराव आणि आनंदीबाई या दोघांची पत्रे मूळातून वाचाल का ? गोपाळराव हे विक्षिप्त होते हे मान्य पण त्यांना 'टेंभा मिरवायचा होता' हे जरा खटकलं. मी सहसा इतिहासावर लिहायला जात नाही . कारण मग फार टोकाचे वादविवाद होऊ शकतात. पण काही वेळेस राहावत नाही म्हणून... क्षमस्व !
मला ही सगळी पुस्तकं वाचायची
मला ही सगळी पुस्तकं वाचायची आहेत. तुमच्या चर्चेत सहभागी न होऊ शकत असल्याचे वाईट वाटते.
असो. रानडेंनी घातलेली अट त्यांच्या अंगाशी आली. कुलीन मुलगी मिळणं इतकं दुरापास्त खरंच होतं का? एवढे मोठे समाजसुधारक, जे इतरांचे प्रेरणास्थान होते, ते वडलांसमोर इतके गुळमुळीत बोलतांना पाहणे आवडले नाही.
तसेच ज्या मुलाला अजून पाहिलेही नाही, ज्याचे लग्नाविषयीचे विचार इतके अनिश्चित आहेत, त्याच्याशी दोनच दिवसानंतरच्या मुहुर्तावर लग्नाची तयारी दाखवण्याचा यमूच्या वडलांचा निर्णयही नाही पटला. मुलीकडची बाजू उजवी असूनही फारच पडते घेतल्याचे जाणवले.
नाही आवडला हा भाग.
सानी, फक्त हा धागा वाचुन मी
सानी, फक्त हा धागा वाचुन मी पहिले सगळे भाग बघितले नी मस्त आहेत.. धन्यवाद धागा सुरु केल्याबद्द्ल
पण १८ मार्चचा भाग अजुन अपलोड झाला नाहीये
कुणीतरी लिंक द्या जिथे नियमीत भाग येतात...
गुढीपाडव्याला यमूतै आम्ही
गुढीपाडव्याला यमूतै आम्ही सारे खवय्ये मध्ये येणार आहे. बघा जरूर.
कालचा भाग मिस झाला माझा.. काय
कालचा भाग मिस झाला माझा..
काय दाखवलं रे काल?
नक्की बघेन मामी, धन्यवाद
नक्की बघेन मामी, धन्यवाद
बागुले, २१ तारखेच्या भागात यमुचे वडिल नवर्यामुलाला- माधवला भेटायला जातात आणि माधव त्यांना सांगतो की लग्न सहा महिन्यांनी व्हावे. यमुचे वडिल म्हणतात, तुझ्या वडलांना जे मान्य असेल ते आम्हाला मान्य असेल. माधवराव वडलांशी हे बोलतात आणि ते अर्थातच त्याला नकार देतात.
यमुची आई तारेची वाट बघत असते पण तार काही येत नाही.
कालचा भाग पाहिलास का? हळदीचा कार्यक्रम पार पडला. यमुच्या आईला अजूनही तार मिळालेली नाहीच. यमू आईच्या वाटेकडे डोळे लावून बसलीये आणि दु:खी यमूची समजूत तिची मावशी कशीबशी काढते. माधवरावही दु:खी मनाने हळदीच्या कार्यक्रमात भाग घेतांना दिसले. त्यांची (सावत्र) आई त्यांना म्हणते, लग्नाला तयार झाला आहात, तर मनापासून आणि आनंदाने विधींमध्ये सहभाग घ्या.
बस इतकंच झालं कालपर्यंत.....
आईशिवायच यमूचं लग्न पार पडणार की काय? भलतीच घाई बुवा लग्नाची.... जरा विचित्रच वाटतंय हे एकंदरीत...
माझापण कालचा भाग मिस झाला.
माझापण कालचा भाग मिस झाला. खरंतर परत दुसरे दिवशी दुपारी ११.४५ किंवा १२.०० वाजता हा भाग असतो, पण आज गुढी पाडव्यामुळे नाही बघता अला.
खुप हळुहळु चालु आहे सिरीयल
खुप हळुहळु चालु आहे सिरीयल
असे वाटटे पुस्तक घेवुन सरळ पटापट वाचुन काढावे
Pages