उंच माझा झोका

Submitted by सानी on 13 March, 2012 - 05:59

ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया. Happy

Uncha Maza Zoka-Promo.jpgUncha Maza Zoka-News.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रीजंची कादंबरी अतिरंजित काहीशी असे नाही वाटत?>>>

आहेना!! म्हणुन तर मी अंजली किर्तन्यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला. ते अगदी वाचलच पाहिजे कॅटेगरीत आहे. श्रीजंची शेवटी कादंबरी आहे. किर्तनेंचा हा प्रबंध कम चरित्र आहे.

धाग्यावरिल विषयापेक्षा अवांतर-

रैना,
शाळा कॉलेजटाइम्स मध्ये जितके वेळेस वाचली छानच वाटली- शाळेत असताना वाचली तेव्हा लहानग्या यमूवर जीव जडला, कॉलेजात वाचताना- आनंदीचे जगणे, गोपाळांचे वागणे आणि तिचा मृत्यू डोक्यात घोळत असे.

खरं-तर गेल्या काही वर्षांत वाचली नाही आहे ती, वयानुसार ह्या सगळ्या साहित्यकृतीचे संदर्भही बदलत असावेत बहुधा, एकदा वाचून मग कमेंट करेन Happy

आता सिरिअल बद्दल-
सध्या जी लहानगी दाखवत आहेत, ती ही बदलेलच की लवकर ना? संपूर्ण जीवनपट दाखवणार असतील म्हणून म्हणातीये

डेलि सोपवाले त्याच्या आठपट काम एका दिवसात उडवतात >> पण सेट, कपडे एकदा डिझाईन केले की परत परत वापरता येत असतील ना? मग एकदा थोडे कष्ट घ्यायला काय हरकत आहे? तपशीलांसाठी लागणारे डोके वापरणारे लोक इतके प्रचंड महाग असतात का?

कारणे क्रमांक २ आणि ४ जास्त पटताहेत.

बाप रे Sad

नको तितके भारी कपडे, चकाचक सेट अशा अनावश्यक बाबींवरचा खर्च निर्मात्याने / दिग्दर्शकाने कमी करून या कलाकारांना ते पैसे दिले तर खूप चांगले काम होइल त्यांच्याकडून आणि मालिकाही बर्‍याचशा वास्तव दिसतील - त्यातल्या वातावरण निर्मिती बाबत तरी.

नी मला पडलेला एक प्रश्ण आहे. एवढे सगळे कपडे टिव्ही सिरीयल / फिल्म मध्ये वापरतात. वापरल्या नंतर करतात तरी त्याच करतात तरी काय?

माधव, बरंच काय काय केलं तर बरंच काही होऊ शकेल. पण अ‍ॅटिट्यूडचं काय करायचं हो? असो..
फारच विषयांतर झालं.
रिमा मी कुठेतरी तपशीलात लिहिलंय हे. लिंक देईन सापडली की विपुमधे.

एवढे सगळे कपडे टिव्ही सिरीयल / फिल्म मध्ये वापरतात. वापरल्या नंतर करतात तरी त्याच करतात तरी काय?>>>>>

साड्या फॉल बीडींग न करता वापरतात. त्या मुळे परत त्या विकता येतात, किंवा इतर कुठल्या सीरीयल साठी वापरता येतात. माझ्या कलीग च्या बहिणी कडे एका हिंदी सीरीयल चे ब्लाउज शिवायला येतात. आत मध्ये खुप मार्जीन ठेवुन शीवतात. म्हणजे नंतर वापरताना कोणालाही फिट होवु शकतात. अगदी अम्रुता सुभाष ते रोहिणी हट्टंगडी.....

मराठीत पाहिलत तर तीन चार रंगाचे ब्लाउज शीवुन मग त्याला मॅचींग मिक्स अ‍ॅन्ड मॅच करायचं.....आहे काय नी नाही काय.....

आजकाल हे स्टेज शो पण खुप होतात. बहुतेक वेळा चमक दमक चे कपडे असतात, शीवाय डांस चे अगणित कार्येक्रम्.....किती हा अपव्यय!!!

परवाच एका शाळेच्या वार्षिक कार्येक्रमाला गेले होते. नीदान ६०० मुलांना घेवुन ३-४ नाटके-म्युझीकल्स बसवली होती. सगळे राजा,राणी, चीनी कपडे, अरेबीयन नाईट्स सारखे कपडे.... ज्यांचा नंतर काहीही उपयोग नाही. एक ड्रेस नीदान १५०० रुपयाचा कारण चांगलं सॅटीन, व्हेलवेट वापरलेलं... म्हणजेच ९ लाख रुपये फुकट गेले एका क्षणा साठी. कारण प्रत्येक मुल फक्त २ किंवा ३ मिनीटे स्टेजवर दिसत होत. शाळा श्रीमंत होती. म्हणुन काय झालं. पण तरी देखील हा जो टीव्ही च्या चमक दमक चा अट्टाहास आहे तो आता सर्व सामान्यां पर्यंत झीरपला आहे.

आजकाल लग्नातही त्याच चमक दमक साड्या दिसतात. झीरझीरीत पदर त्याला मोठ्ठे मोठ्ठे ब्रोकेड, नाहीतर हे येवढे अ‍ॅप्लिक लावलेले. तेच सगळी कडे..... डोळ्यांना त्रास होतो.

मोहन की मीरा, मला मराठी सिरियल्स पाहतांना नेहमी वाटायचे, की हे लोक आपले स्वतःचेच कपडे, साड्या वापरत असावेत. कारण काही लोकांच्या कपड्यांमध्ये एकदम वैविध्य आणि काहींचे अगदीच तेच तेच. हे फार जाणवतं. एका लग्नाची दुसरी गोष्ट सिरियल बघतांना तर फारच. पण एक नवीन माहिती आज तुमच्यामुळे समजली. Happy

असो, लोक्स, सिरियल पाहताय की नाही? खुपच मस्त चाललीये. महादेवराव रानडेंची आज एन्ट्री झाली. त्यांचे विधवा विवाह विषयक विचार त्यांच्या घरी काम करणार्‍या अशिक्षित गरीबांना पटले, विधवांचे दु:ख त्यांना जाणवले, पण बाकी कोणालाही नाही, खुद्द विधवांनाही नाही, याचे आश्चर्य वाटले. विधूर दुसरे लग्न करु शकतात, पण विधवा नाही ही गोष्ट बायकांनाही खटकू नये, याचे नवल वाटते. ही तर साधी माणूसकी झाली ना! दुर्दैवाने अजूनही आपल्या समाजात याहून फार काही वेगळी परिस्थिती आहे असं दिसत नाही. विधूर मुलांचे लग्न पटकन लावून देणारी घरची मंडळी विधवा मुलीच्या लग्नाचे नावही काढतांना दिसत नाहीत. अर्थात बर्‍याचशा मुली आता स्वावलंबी झालेल्या असल्याने आपले निर्णय घेऊ शकतात ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब!

हो हो आज रानडेंची एंट्री झाली. हा बघ नवरामुलगा असे मुलीस सांगितल्यावर ती ( लॅप्टॉप वर आणि हेडफोन्स लावून ९०२१० चा दुसरा सीझन बघत होती) म्हणे, " सर्व कोकणस्थ लोकांचे डोळे लाइट असतात का माझ्यासारखेच? " मेजॉरिटी लोकांचे असतात. असे उत्तर देण्या पलिकडे पर्याय नव्हता.
यमू ची मावशी पण फार गोड दिसते. ती तारका पण ओळखीची वाटते. रानडे गोड दिसले पण इतका
कडक इस्त्रीचे उपरणे? मी एकदा ओढणी तशी घेउन बघणार आहे.

यमू " माझी आई म्हण्ते... अशी सुरुवात करून काहीतरी सुभाषित टाइप बोलते. ह्या बाळाला त्या वाक्याचा अर्थ कळत तरी असेल का अशीच शंका येते. ही मालिका बघून बालविवाह अतिशय टू़कार पद्धत आहे असे मत घरी तयार झाले आहे.

यमूच्या माहेरी एक थोरला भाऊ आहे का? आज त्याला तुम्ही तुमचे बघितलेत तर बरे अशी तंबी मिळाली तो? कोण आहे तो कथानकात?

कविता लाड परवा ब्लू साडी व हलका ब्लू आयलायनर.( हे उगीच खुसपट काढायचे म्हणून. )

अमा, यमूची मावशी शिल्पा तुळसकर.
यमूच्या वडिलांच्या भूमिकेतील शैलेश दातार आमच्या कॉलेजात (४ वर्षे सिनियर) होता.

आजच्या लोकसत्ता चतुरंगमधून, रमाबाई रानडे यांच्यावरील लेख

मालिकेची जाहिरात असली, तरी रमाबाईंवरील माहिती मिळते.

सुंदर आहे मालिका Happy
सध्या आवड्त्या मालिकांपैकी एक. रमाबाई उद्धट वा आगाऊ का वाटावी कुणाला?? मालिकेच्या जाहिरातीमध्येच तिची निरागसता दिसून येते, ती जे काही वागते/बोलते ते तिच्या वयास अनुरूप आहे असे वाटते. मिळालेला प्रसाद एकटीने न खाता सर्वांना वाटून खावा, आईने सांगितल्याप्रमाणे संस्कारांची जाण ठेवून वागणारी यमी मलातरी आगाऊ वाटत नै .या मालिकेत वापरलेली भाषा, हे मराठी भाषेचे शुद्ध स्वरूप असल्याचे दिसून येते.

यमूच्या माहेरी एक थोरला भाऊ आहे का? आज त्याला तुम्ही तुमचे बघितलेत तर बरे अशी तंबी मिळाली तो? कोण आहे तो कथानकात?>>>>

यमुला एक मोठा सावत्र भाऊ दाखवला आहे. त्याची बायको तिचा राग राग करताना दाखवली आहे.

ही मालिका बघून बालविवाह अतिशय टू़कार पद्धत आहे असे मत घरी तयार झाले आहे. >>> +१

खेळण्याचे होते वय
उंबर्‍याची होती सय

माप मी ओलांडले अन
दूर गेली भातुकली Sad

कित्ती वाईट्ट प्रथा आहे. यमूची लग्नाअधीच पाठवणी झाली सुद्धा... केवढी झटपट प्रक्रिया... Sad

यमूच्या माहेरी एक थोरला भाऊ आहे का? आज त्याला तुम्ही तुमचे बघितलेत तर बरे अशी तंबी मिळाली तो? कोण आहे तो कथानकात?>>> हा प्रसंग लक्षात नाही. पण यमूला एक (सावत्र) भाऊ आहेच ना? पण ते यमुच्या काकांविषयी बोलत असावेत...

मालिकेत सगळ्याच कुटुंबांत दुसरेच लग्न दाखवलेय बर्‍याच जणांचे. यमुच्या वडिलांचे दुसरे लग्न, माधवरावांच्या वडलांचे दुसरे लग्न... आणि आता माधवचेही दुसरेच लग्न असणार आहे ना हे! आणि सगळ्याच घरांमध्ये केवढ्या त्या लाल साडीवाल्या बायका! ही सगळी पुरुषप्रधान संस्कृती अगदी सहन होत नाही.

भरत, मी यमूच्या वडलांचे नावच आठवायचा प्रयत्न करत होते. फारच मस्त अभिनेता आहे तो.

टोकू, मालिकेतली भाषा मला फार फार आवडतेय. मालिका बघून भाषा सुधरेल बहुतेक आपली. Happy

सानी सर्वप्रथम मी तुझे शतशः आभार मानते, कारण तू जर ह्या मालिकेविषयी लिहिले नसतेस, तर मी एका चांगल्या मालिकेला मुकले असते. कारण सध्या मी एकही सिरियल पाहात नाही. (सा.बा. ना दुसरा टी.व्ही. घेऊन दिलाय. त्यामुळे त्यांचा अखंड चालू असतो. Happy जाता- येता ते रटाळ डायलॉग कानावर पडून कंटाळा येतो. Uhoh ) . परवा तुझा हा लेख वाचून तुला प्रतिसाद देण्याआधि मी सर्व भाग यु.ट्युब. वर पाहून घेतले, आणि आता रोज टि.व्ही. वर बघते.
खूप छान मालिका आहे. वातावरण निर्मिती सुंदर आहे. पण ........... भिती एकच वाटते, काही भाग झाल्यानंतर ह्या चांगल्या मालिकासुद्धा परत मुळपदावर येतात, तसे होउ नये.

प्रज्ञा Happy Happy

झी मराठीवर एका वेळी एकच दर्जेदार मालिका का येते? हा मला नेहमी प्रश्न पडतो. ७-८ टुकार मालिका असल्यामुळे झी मराठीलाच कंटाळलेले प्रेक्षक अशा दर्जेदार मालिकांना मुकतात आणि झी मराठीपण दर्जाच्या बाबतीत आग्रही असणार्‍या प्रेक्षकवर्गाला मुकते. पण दुर्दैवाने टुकार मालिका आनंदाने बघणारा प्रेक्षकवर्ग मोठा असल्याने ह्या मुठभर वर्गाने पाठ फिरवली तरी त्यांचं विशेष नुकसान होत नसावं. ह्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मालिका सुरु केली, हे आपलं भाग्यच म्हणायचं.. Happy

भरत, खरोखर मस्त लेख आहे. एवढ्या ग्रेट रमाबाईंची काहीच विशेष माहिती मलाही नव्हती. झी मराठीचे शतशः आभार. आपले जीवन सुखकर बनवण्यासाठी झटणार्‍या अशा सर्व महान लोकांचे जीवनपट त्यांनी काढावे अशी त्यांना विनंती.

मयेकर, सुरेख आहे लेख Happy
मलापण आवडते ही मालिका ..
यमु चं काम करणारी ती छोटी मुलगी तेजश्री वालावलकर सध्या पुण्याच्या हुजुरपागेत पाचवी मध्ये शिकत आहे Happy .

झी मराठीवर एका वेळी एकच दर्जेदार मालिका का येते? >>> Lol

सध्या २ आहेत. उं.मा.झो. आणि ए.ल.दु.गो.

सध्या २ आहेत. उं.मा.झो. आणि ए.ल.दु.गो.>>> बरोबर ललिता. ह्या वेळी हा एक अपवाद आहे पण त्याने नियमच सिद्ध झालाय ना? Wink Lol

आईची साडी गुंडाळून यमू गणपतीबाप्पासमोर बोलते ना, की आईची कितीही आठवण आली आणि रडू आले, तरीही ते मनातच ठेवेन... त्या प्रसंगाने डोळ्यात पाणी आले.

रानडे एन्ट्रीच्या भागात नव्हते आवडले. मात्र काल आवडले. हॅन्डसम मॅन! Happy

गोड आहेत रानडे.

हिंदी मालिकांच्या मानाने आपल्या मराठी मालिकातले प्रसंग खरेच हृदयस्पर्शी असतात. त्यामानाने उत्तरेकडील मालिकांमध्ये फार बट्बटीत पणा असतो. मराठी आहोत ते किती छान असेच वाट्ते मजला.

मयेकर, धन्यवाद लिंकबद्दल!!!

>> त्यामानाने उत्तरेकडील मालिकांमध्ये फार बट्बटीत पणा असतो. मराठी आहोत ते किती छान असेच वाट्ते मजला.
Happy खरंच आहे

Pages