Submitted by सानी on 13 March, 2012 - 05:59
ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया.
अरुणा ढेर्यांनी रमाबाई
अरुणा ढेर्यांनी रमाबाई रानड्यांबद्दल बरंच लिहिलं आहे. जमल्यास तेही वाचा.
स्त्री आत्मचरित्रे : रमाबाई
स्त्री आत्मचरित्रे : रमाबाई रानडे आणि लक्ष्मीबाई टिळक
: डॉ उज्ज्वला करंडे
या मालिकेचे पुन:प्रक्षेपण कधी
या मालिकेचे पुन:प्रक्षेपण कधी असते रात्री?
मी घरी पोचतेच ८.३० ला त्यामुळे ईच्छा असूनही नाही पाहता येत.
@दक्षिणा.. रविवारी सकाळी सर्व
@दक्षिणा.. रविवारी सकाळी सर्व भाग दाखवतात त्या आठवड्यातले.. रोज रात्री कधी असते ते मात्र माहित नाही..मी रविवारीच पाहिले पण बहुदा प्रमोशनल असेल हे काही दिवसांनी बंद होईल.
शिर्षकामधे "बालविवाह" या ऐवजी
शिर्षकामधे "बालविवाह" या ऐवजी "रमाबाई रानडे" असा बदल केलात तर योग्य ठरेल असे वाटते.
कोणाकडे ह्याची 'आमच्या
कोणाकडे ह्याची 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी' PDF आहे का?
दक्षिणा, dailymotion.com वर
दक्षिणा, dailymotion.com वर बघता येइल तुला. पहिल्या भागाच्या लिंक देतेय. बाकीच्या लिंक त्या साईटवर मिळतील.
http://www.dailymotion.com/video/xp8f6l_uncha-maza-zoka-5th-march-2012-v...
http://www.dailymotion.com/video/xp8flk_uncha-maza-zoka-5th-march-2012-v...
कोणाकडे ह्याची 'आमच्या
कोणाकडे ह्याची 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी' PDF आहे का?>>> मलाही वाचायला आवडेल.
महेश, शीर्षकात बदल केला आहे.
मोहन की मीरा + १ आणखी एक
मोहन की मीरा + १
आणखी एक महत्वाचं म्हणजे अशा प्रकारचे विषय असलेल्या मालिका लोकप्रिय झाल्यावर त्यासंदर्भातल्या पुस्तकांचा खप वाढल्याची अनेक उदाहरणे आहेत.
उदा. पडघवली.
मला माहित नव्हते की रानडे
मला माहित नव्हते की रानडे यांच्या पत्नी पण प्रसिद्ध आहेत.
आनंदी जोशी, पंडिता रमाबाई, सावित्रीबाई फुले, लक्ष्मीबाई टिळक, इ. स्त्रियांबद्दल ऐकून होतो.
खरेच ती मुलगी जाम गोड आहे.
खरेच ती मुलगी जाम गोड आहे. जुने वातावरण बघून छान वाटते. मुलीची आई जी पूर्वी मेजवानी परिपूर्ण किचन ची होस्ट होती ती आहे ना? ती मला फार आवड्ते - म्हणजे छान दिसते. अगदी प्रसन्न. जुने दागिने, खोपा इत्यादी ग्रेट.
लाल आलवणाची शेड बरोबर नाही. ती थोडीशी काळपट पाहिजे. सध्याची शेड मॅरिड लेडीज च्या कुंकवाशी एकदम मॅचिन्ग आहे. (यात टीका करायचा उद्देश आजिबात नाही. मी रंगसल्लागार म्हणून काम करत होते तेव्हा करेक्ट शेड वर फार तासंतास घालवले आहेत. उदा. स्लाइसची लेटेस्ट कॅ. कैफची जाहिरात बघा. तो आंब्याचा रस नसून पपईचा गर वाटतो!)
तसेच सर्व विडोज पण अगदी फ्रेश अॅज डेझी, गोर्यापान दाखविल्या आहेत. चेहर्यावर एक
अवकळा येते, डोळ्याखाली काळे इत्यादी ते मेकप ने झाकून टाकले आहे. सर्व कलादिग्दर्शन अग्दी नवे कोरे आहे. जुन्या पान्या वस्तू, वापरलेले कपडे, स्वयंपाक घरात धुराने काळवंडलेली भिंत असे दाखवले तर जास्त ऑथेंटिसिटी येइल. However these things can be improved. story seems interesting.
अमा, मुलीची आई म्हणजे कविता
अमा, मुलीची आई म्हणजे कविता लाड. माझी पण आवडती अभिनेत्री आहे ती. जाम गोड आहे. 'एका लग्नाची गोष्ट' ह्या नाटकामुळे तिला प्रत्यक्ष स्टेजवर पाहण्याची संधी मिळाली होती...
आणि त्या चिमुकल्या यमूचे खरे नाव आहे, तेजश्री वालावलकर. पहिल्या पानावर तिच्या मुलाखतीची लिंक दिलीये मी.:)
बाकी रंगसंगतीविषयी बर्याच बारिक-सारिक गोष्टी तुझ्यामुळे समजल्या.
आजचा भाग छान होता. यमू
आजचा भाग छान होता. यमू वधूपरिक्षेत पास झाली. खरं म्हणजे सत्त्वपरिक्षाच होती ती. पण मस्त उत्तरं दिली तिने बाळंभटजींच्या सर्व प्रश्नांना. हजरजबाबी, हुशार अशा यमुनेचं कौतुक वाटलं. इतक्या लहान वयात एवढी समज!
तिच्या सासरची मंडळी मागच्या दोन भागात पाहिली. शरद पोंक्षे, नीना कुलकर्णी इ. आवडते कलाकार आहेत.. पण ती एकदा सासरी गेली की तिच्या माहेरच्या मंडळींचं दर्शन विरळच होईल की होणारच नाही? कविता लाड आणि इतरांना मुकणार की काय आपण?
बाकी रंगसंगतीविषयी बर्याच
बाकी रंगसंगतीविषयी बर्याच बारिक-सारिक गोष्टी तुझ्यामुळे समजल्या. >>> +१. लाल आलवणाच्या रंगाचा मुद्दा तर पटलाच अगदी. (अर्थात, मी मालिका अजून सविस्तर पहायला सुरूवात केलेली नाही. घरकामाचा बोर्या वाजतो त्या पायी )
माझ्या आठवणीप्रमाणे,
पंडिता रमाबाईंच्या चरित्रात्मक पुस्तकात रानडे दांपत्याचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. पंडिता रमाबाई परदेशी जायला निघाल्यावर चहूबाजूंनी त्यांच्यावर टिकेचं मोहोळ उठलं होतं. तेव्हा रानडे दांपत्य त्यांच्यामागे खंबीरपणे उभं राहिलं.
पंडिता रमाबाई या रमाबाई रानडे यांच्यापेक्षा काही वर्षांनी लहान होत्या. या मालिकेत पुढे त्यांचा संदर्भ येतो किंवा कसं ते पहायचं.
त्या पुस्तकातही ते 'स्वत:' आणि 'जवळ'चे उल्लेख आहेत. त्या काळाच्या संदर्भात ते वाचायला फार छान वाटतात.
साने, हा धागा बघितलाच
साने, हा धागा बघितलाच नव्हता.
मी ही फॉलो करतीये ही सिरिअल आणि नवरोबा तर फार आवडीने पहातोय- त्याचे मत- त्या घिस्यपिट्या सास बहू सिरिअल्स पेक्षा कैक पटीने सुंदर मालिका आहे
आणि मला ती खास वाटाते आहे कारण सगळ्यांची अॅक्टींग सटल आहे अगदी, कुणीही लाऊड अॅक्ट करत नाही आहे
आधी मला ही सिरीअल "आनंदी- गोपाळ" आहे की काय असे वाटाले होते
तसेच सर्व विडोज पण अगदी फ्रेश
तसेच सर्व विडोज पण अगदी फ्रेश अॅज डेझी, गोर्यापान दाखविल्या आहेत. चेहर्यावर एक
अवकळा येते, डोळ्याखाली काळे इत्यादी ते मेकप ने झाकून टाकले आहे. सर्व कलादिग्दर्शन अग्दी नवे कोरे आहे. जुन्या पान्या वस्तू, वापरलेले कपडे, स्वयंपाक घरात धुराने काळवंडलेली भिंत असे दाखवले तर जास्त ऑथेंटिसिटी येइल. >> अमा अगदी माझ्या मनातले.
स्मृतिचित्रे हा विजयाबाईंनी
स्मृतिचित्रे हा विजयाबाईंनी दूरदर्शनसाठी केलेला चित्रपट पाहिला होता का कोणी?
आधी मला ही सिरीअल "आनंदी-
आधी मला ही सिरीअल "आनंदी- गोपाळ" आहे की काय असे वाटाले होते>>>>
आनंदी गोपाळ... ही उत्तम सहजीवनाची आदर्श कहाणी नाही. दबलेल्या आनंदीची कहाणी आहे. नवरेशाहीत चेपलेल्या स्वाभीमानी, हुशार स्त्रीची कहाणी आहे. एकच साम्य आहे की गोपाळराव ही बायकोला शीकवायचेच ह्या ध्यासाने वेडा झाला होता. पण त्याचा द्रुष्टीकोन एकादम निराळा होता. त्याला बायको शीकायला हवीच होती पण त्या बरोबर स्वतःचाही टेंभा मिरवायला हवा होता. पण पहिली भारतीय डॉक्टर स्त्री बनवण्याचे ८०% श्रेय त्यालाच जाते. "आनंदी बाई- काळ व कर्तुत्व" हे अंजली किर्तने ह्यांनी लिहिलेले संशोधनात्मक पुस्तक जरुर वाचावे. अंजली किर्तने नी त्यावर एक शोर्ट फिल्म पण बनवली आहे. अप्रतिम आहे. फीलाडेल्फीयाला आनंदीचे स्मारक आहे. ते बघायचे आहे. बघु कधी योग येतो.
श्री.ज. जोश्यांनी हा विषय आपल्या "आनंदी-गोपाळ" ह्या अतिलोकप्रिय कादंबरीतुन प्रथम मांडला. त्यांनी त्यांच्या एका लेखात लिहिले आहे, की ते दिवसच वेगळे होते. झपाटल्या सारखे ते सांगत गेले आणि त्यांची पत्नी, जी त्यांची लेखनिक ही होती, ती लिहित गेली. त्यांनी त्या काळात त्यांनी वेगळेच सहजीवन उपभोगले.
विषयांतर केल्या बद्दल क्षमस्व. रहावलं नाही म्हणुन लिहिलं.
धन्यवाद भरत. वाचल तो
धन्यवाद भरत. वाचल तो लेख.
अगदी अगदी अश्विनीमामी. अलवणातल्या विधवांना इतका मेकप. तेच तर होतय. खुपशा गोष्टींमध्ये authentic feel येत नाही अजिबात या सिरीयलमध्ये. रसभंग होतो आहे त्यामुळे.
स्मृतिचित्रे हा विजयाबाईंनी
स्मृतिचित्रे हा विजयाबाईंनी दूरदर्शनसाठी केलेला चित्रपट पाहिला होता का कोणी?>>>>
हो. त्यात सुहास जोशी आणि रविंद्र मंकणी ने काम केले आहे. रेव्हरंड टिळक आणि त्यांच्या पत्नी ह्यांच्या सहजीवनाबद्दल आहे. ते चरित्र पण वाचले आहे. लक्षुमीबाई टिळकांनी अगदी मार्मिक शब्दात लिहिले आहे. नवर्याची ख्रीस्ती होतानची घालमेल आणि प्रवास सुरेख दिला आहे.
ह्या चित्रपटात एक मजेशीर द्रुष्य आहे. बाईंना टिळक काहितरी वाचावयास देतात. वाचता वाचता त्यांना अडखळायला होते आणि सारखे हसु येवु लागते. टिळक एक दोन दा कानाडोळा करतात. त्यांचे म्हणणे सुधारुन देतात. हे चालु असते तेंव्हा त्या माडी वर अगदी जीन्या लगत बसलेल्या असतात. एका क्षणी टिळकांचं डोक इतकं फिरतं, त्यांना हे अभ्यास टाळणं वाटत. ते सरळ बाईंना खाली ढकलुन देतात.
हा प्रसंग चित्रपटामध्ये इतका सुंदर चितारला आहे, की २५-३० (कदाचित जास्त) वर्षांपुर्वी पाहिलेला आजही जसाच्या तसा आठवतो.
सुवासिनीचे निर्मितीमूल्य उंच
सुवासिनीचे निर्मितीमूल्य उंच मझा झोका पेक्षा अधिक अभ्यासू आहे असे जाणवते.
स्मृतिचित्रे (पुस्तकात तरी)
स्मृतिचित्रे (पुस्तकात तरी) तो प्रसंग अभ्यास करताना नसून सोंगट्या खेळतानाचा आहे. पुन्हा त्या प्रसंगाच्या वेळी लक्ष्मीबाई ७ महिन्यांच्या गरोदर होत्या!
त्या चित्रपटातला एक प्रसंग माझ्या लक्षात आहे : लक्ष्मीबाईंना रात्री उठून विहिरीवरून पाणी भरायचे भय वाटायचे, तेव्हा टिळक त्यांना गुपचूप पाणी आणून देत आणि लक्ष्मीबाई सासर्यांसमोरून नेऊन घरात भरीत.
सुवासिनीचे निर्मितीमूल्य उंच
सुवासिनीचे निर्मितीमूल्य उंच मझा झोका पेक्षा अधिक अभ्यासू आहे असे जाणवते. >> बित्तु अगदी अगदी.
स्मृतिचित्रे (पुस्तकात तरी)
स्मृतिचित्रे (पुस्तकात तरी) तो प्रसंग अभ्यास करताना नसून सोंगट्या खेळतानाचा आहे. पुन्हा त्या प्रसंगाच्या वेळी लक्ष्मीबाई ७ महिन्यांच्या गरोदर होत्या!>>>
बरोबर!! बरोबर!!! इतकी वर्ष झाल्या मुळे नीट आठवत न्हवते... धन्स. चुक सुधारल्या बद्दल.
दक्षिणा, रात्री अडीच वाजता ही
दक्षिणा, रात्री अडीच वाजता ही येते. रेकॉर्ड करण्याची सोय असल्यास वीकांताला सर्व भाग एकदम बघता येतील आरामात.
हो मोहन की मीरा... श्री ज
हो मोहन की मीरा... श्री ज जोश्यांनी लिहीलेली कादंबरी अनेकदा वाचून झालीये, त्यातलीच यमी आलीये की काय वाटत होतं अगोदर
असो... ही रमाबाई रानडे आहे, हे मला नंतर समजले आणि आनंदी गोपाळ मनातून थोडेसे बाजूला केले... (पण आता पुन्हा एकदा ही कादंबरी वाचणारच आहे :))
अमा, रैना आणि बाकीचे १. डेली
अमा, रैना आणि बाकीचे
१. डेली सोपसाठी एका दिवसात एक एपिसोड उडवायचा असतो
२. कथा आणि माहौल काहीही असलं तरी सिरीयल दिसताना नॉन-ग्लॅमरस दिसणे हे दिग्दर्शक-निर्मात्याला मान्य नसते
३. तपशीलांसाठी लागणारे डोके वापरणारे लोक परवडत नाहीत.
४. नटमंडळींना आपली 'सुंदर आणि अपिलिंग' इमेज सोडायची नसते. कारण त्यापलिकडे अनेकदा काही नसतं किंवा डेली आहे.. एवढं काय त्याचं.. चालतंय असा विचार केला जातो..
अशी काही कारणं असतात
फारच compelling कारणं आहेत
फारच compelling कारणं आहेत नीरजा.
तात्पर्य कशातही सुसूत्रता शोधून डोक्यास शीण देऊ नये. श्या.
रंग येवढे भक्कं अंगावर येतात ना.
कविता लाडच्या नथीचे आणि कुड्यांचे सुद्धा रंग सुद्धा वेगवेगळे दिसतात.
भरत, स्मृतीचित्रे
भरत,
स्मृतीचित्रे चित्रपटाबद्दल माहित नव्हते. धन्यवाद हो.
बागेश्री, मीरातै
श्रीजंची कादंबरी अतिरंजित काहीशी असे नाही वाटत?
रैना, ही वस्तुस्थिती आहे. एका
रैना, ही वस्तुस्थिती आहे. एका दिवसात २३ मिनिटाचा एपिसोड शूट करून पूर्ण करायचा म्हणजे अनेक तपशीलांना तिलांजली द्यावीच लागते.
इथे आम्ही फिल्मला दिवसाला ४ मिनिटाचे काम हा स्पीड सगळ्यात जास्त मानतो. डेलि सोपवाले त्याच्या आठपट काम एका दिवसात उडवतात.....
Pages