पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओल्या तुरीच्या दाण्याची उसळ करतात. बारीक कांदा आणि खोबर घालुन. पावट्याच्या उसळीसारखी.दाणे अगोदर शिजवून घ्यायचे. तसच मिक्स भाजी , गाजर्,वांगी आणि बटाटा मिक्स पण चांगले लागतात.
पण गुजराती टाईपच्या असंख्य भाज्या ,कचोरी वगैरे ओली तुर वापरुन करता येतात. मेथी ,बटाटा,तुर वगैरे वापरुन गुजराती करी पण करता येईल.
खुप जास्त असतील तर फ्रोजन करुन ठेवा.

तूर म्हणजे पांढरे दाणे असतील तर भिजवून उसळ / आमटी करता येते.
वर सुचवलेला कुठलाही मसाला वापरता येतो.

सुलेखा, सीमा .... कसले मस्त पदार्थ .... तोंपासु... पण ओल्या तुरीचे दाणे नाहीयेत ... कडधान्या सारखे दिसतायत.
दिनेशदा म्हणतायत तशी भिजवुन उसळ होईल असं वाटतंय ...

चमकी,वाळवलेले तुरदाणे असतील तर ते भिजवुन त्याची उसळ करता येणार नाही.शिजल्यावर तूर शिजते पण तूरीची साले वेगळी होतात व तोंडात चोथा होतो.

म्हणजे सोलावे लागणार ते दाणे. केनयात तूरीचे भरपूर पिक येते. बाजारात ते
ओले दाणे सोललेलेच मिळतात. मग भारतीय लोकांसाठी डाळ करतात आणि
स्थानिक लोक तसेच दाणे शिजवून खातात. मोड वगैरे काढायची पद्धत नाही,
त्यांच्याकडे.

नलिनी, बिब्ब्याबद्दल उलटसुलट ऐकलेय खुप.>> मी पण ऐकलेय काही लोकांना बिब्बे उभरल्याबद्दल. >> हो हो बिब्बे उततात : लहानपणी स.न्क्रातीच्या वाणात आलेले खाल्लेत . छान लागतात Happy

वाळवलेले तुरदाणे असतील तर ते भिजवुन त्याची उसळ करता येणार नाही.शिजल्यावर तूर शिजते पण तूरीची साले वेगळी होतात व तोंडात चोथा होतो. >> नाही होत असे. मी नेहमी करते. जागुही करते Happy

नाही होत असे. मी नेहमी करते. जागुही करते >>>वर्षा_म +१.
आमच्याकडे पण अश्या भिजवलेल्या तुरीची उसळ नेहमी असते.

हिरव्या मिरच्या ३-४ (आवडीप्रमाणे कमी जास्त), खोबर्‍याचा तुकडा, लसुण, जिरे, मिठ, भाजुन सोललेले शेंगदाणे हे हवे तर जरासे तेलावर परतून घ्यावेत किंवा तसेच मीठ, हळद, कोथिंबीर, पाणी घालुन बारीक वाटून घ्यावे. फोडणीला परत जरासे जिरे , मोहरी घालावी. वाटलेला मसाला परतून घ्यावा व शिजलेल्या तुरी घालाव्यात. मस्त उकळी आणावी.

हिरवी मिरची आवडत नसेन तर लाल मिरची (लाल तिखट) वापरली तरी चालते.

तुरीची उसळ आणि बाजरीची भाकरी मस्त लागते.

मला मशरुम सूपची कृती हवी आहे. क्रीमी सूप्स (मशरुम सूप, मिक्स वेज, चिकन सूप) जसे हॉटेल मध्ये मिळतात तसे बनवायचे आहेत. कुणाला माहिती आहे का? इथे असल्यास लिंक दिली तरी चालेल.

धन्यवाद अकु Happy

अग मला क्रीमी सूप हवय. मला वाटते ज्यात दूध किंवा क्रीम वापरतात (नक्की माहिती नाही)

धन्यवाद अकु Happy

अग मला क्रीमी सूप हवय. मला वाटते ज्यात दूध किंवा क्रीम वापरतात (नक्की माहिती नाही)

प्रिंसेस, http://www.maayboli.com/node/33253 इथे मैत्रेयीने 'चिकन न्योकी सूप'ची पाकृ दिली आहे त्यात चिकन ऐवजी मश्रुम्स आणि इतर भाज्या घालुन तु सूप बनवु श्कतेस.

नवलकोलाच्या भाजीची नेहमीपेक्षा वेगळी काही कृती आहे का?
नेहमीची म्हणजे दुध्यासारखीच गोडा मसाला, आलं आणि भिजवलेली डाळ घालून.. थोडी सरसरीत पण फार पाणथळ नाही अशी. यापेक्षा वेगळी काही असल्यास प्लीज सांगा.

नवलकोलचे दोन तूकडे करुन, ते खवणीवर खवणायचे. (ओले खोबरे खवणतो तसे.)
मग त्याची डाळ वगैरे घालून भाजी करायची. आणखी ओले खोबरे घालायचे.

किंवा तो किसून, पिठ पेरून करायची. दोन्ही चांगल्या लागतात.

कामाच्या मावशींना ऑफिसमधुन फोन करुन - वाटीभर हिरवे मुग भिजत टाकायला सांगितले. त्या कोणत्या धुनमधे होत्या कोणास ठावुक, त्यांनी बाटलीभर ऐकले आणि पाव किलो पेक्षा जास्त मुग भिजत टाकले. भिजल्यावर तर ते हे एवढे झालेत. दररोज सॅलड खाल्लं, एक दिवस खिचडीमधे मुग डाळीऐवजी हे मोड आलेले हिरवे मुगच घातले. आता अजुनही बर्‍यापैकी उरले आहेत. त्याचं काय करु? पोळीबरोबर खाता येइल असा पदार्थ सुचवा ना प्लीज. कारण या आठ्वड्यात अलरेडी डोसे झाल्यामुळे पुन्हा त्याचे हिरवे दोसे खायचे नाहीत. सॅलड सोडुन दुसरं काहीच सुचत नाहीए.

उसळ कर की.

एक तर चिंगूनाल आणि गो म घालून कर. किंवा मग कां टो तेलावर परतून ग म घालून कर.

कांदा, लसूण मसाला वगैरे घालून उसळ करायची आणि मिसळीसारखं वरून शेव, कांदा घालून संपवता येईल.
पोळीबरोबर हव असेल तर आमटी, उसळ किंवा इथे मेधाने दिलेली एक रेसिपी आहे. त्या पद्धतीने करता येईल. दुधी बरोबर मूग घालून रसभाजी चांगली होईल.

थँक्स ! आता नी च्या रेसिपीप्रमाणे उरलेल्या सगळ्याच मुगांची भरपुरशी उसळ करायला सांगते. दुपारी लंचला पोळीबरोबर आणि मग उरलेली संध्याकाळी बिल्वानी सांगितलं तसं कांदा-टोमॅटो, शेव घालुन मिसळ. हुश्श झालं. संपतील उद्या नक्की.

मेधाने माबोवरच मुगा घशीची कृती लिहीली आहे. तेही मस्त लागते.
किंवा मिक्सरमधून वाटून घेऊन हिमि-आले वाटण मीठ घालून ढोकळा कर.

प्राची, पुर्ण सांग ना ढोकळ्याची कृती. का नेहमीसारखाच, फक्त डाळीच्या पीठाऐवजी मुगाचं बॅटर? हे मुगा घशी काय आहे, शोधतेच. अर्ध्याची उसळ आणि अर्धे दुसर्‍या पाकृसाठी वापरता येतील.

पहिल्या दिवशी उसळ केली असती तर पुर्ण बिल्डिंगला पुरली असती, एवढे मुग भिजवले होते. Sad आता बरेच आटोक्यात आणले आहेत. Happy

का नेहमीसारखाच, फक्त डाळीच्या पीठाऐवजी मुगाचं बॅटर? >>>> हो. बाकी सोडा/इनो वगैरे नेहमीसारखेच घालायचे.

भिजलेले मुग ,लसुण, आले, मिरचि, धणे, जिरे, मिठ, कांदा वाटुन डब्ब्यात भरुन फ्रिज मधे ठेव. वाटेल तेंव्हा मुगाचे डोसे करुन खा. २ आठवडे तरि रहाते चांगले.

क्रंची ब्रेड कसा भाजायचा? मुर्ख वाटेल प्रश्न पण पडलाय मला...लेकाला क्रन्चीच ब्रेड हवाय, तव्यावर भाजून, टोस्टर वरून काढून तो जरा चिवट मऊसर होतो. बाहेर हॉटेलात किंवा कॉफीशॉपात मस्त मिळतो कुरकुरीत.

Pages