Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केळ्याची साले तासून काढावी
केळ्याची साले तासून काढावी लागतात. (तेच जरा कठीण जाते.) मग त्याचे तूकडे
करुन हिरवी मिरची, खोबरे, जिरे यांचे वाटण लावून उपवासाची भाजी करता येते.
किंवा कुठल्याही उसळीत खास करुन चणे किंवा काळे वाटाणे, यांच्या उसळीत टाकतात. किंवा कारवारी पद्धतीने (ओले खोबरे, लाल मिरच्या, धणे वाटण) करतात.
अगदी सोपा प्रकार म्हणजे त्याचे उभे तिरके काप काढायचे (सालीसकट) आणि मग
त्यांना तिखट, मीठ व थोडा चिंचेचा कोळ लावून, तव्यावर शॅलो फ्राय करायच्या.
अगदी माश्याच्या तूकड्यांसारख्या दिसतात. (आणि काटे नसतात !!)
केळ्याच्या चोकोनी फोडी कापून
केळ्याच्या चोकोनी फोडी कापून पाण्यात घालून ठेवा. तेलात हिरवी मिरची, ह्ळ्द, मोहरी ची फोडणी द्यायची, त्यात ह्या फोडी घाला, मीठ, पाणी घालून झाकण ठेवून शिजवा. शिजत आल्या की वरून ओल खोबर घालून ढवळा.
आंबिल बद्दल खुप ऐकलं होतं! ते
आंबिल बद्दल खुप ऐकलं होतं! ते कसं बनवतात? सांगेल का कुणी किंवा लिंक द्या प्लिज!
दिनेशदा, आता लगेच भाजी
दिनेशदा, आता लगेच भाजी करायचीये म्हणुन इथे पोस्ट टाकली. मला अगदी वाटलेलंच तुमचा तरी रीप्लाय येइलच.. धन्यवाद.
आर. धन्यवाद. लगेच रीप्लाय दिल्याबद्दल.
ओलं खोबरं घालुन करुन बघते आणि कशी झालेली ते लिहीते.
दिनेशदा, आम्ही तिखट, मीठ, आणि
दिनेशदा, आम्ही तिखट, मीठ, आणि तांदूळाच पीठ मिक्स करून त्यात केळ्याचे /बटाट्याचे /सुरणाचे काप घोळ्वून फ्राय करतो. फक्त सुरणाच्या कापांना चिंच किंवा कोकम लावतात.
खूप चविष्ट पदार्थ. दिनेदा आठवण काढून तों.पा.सु.
आर्या, विपु केलीय.
आर्या, विपु केलीय.
मेथिला मोड़ काढून ठेवलेत
मेथिला मोड़ काढून ठेवलेत ....पण अता पुढे काय करायच ते माहितच नाही
मोड़ आलेल्या मेथीची उसल किंवा आमटी कशी करायची ...
गीतू, १) लोणच - मेथीत मीठ,
गीतू,
१) लोणच - मेथीत मीठ, साखर, लिंबाचा रस, तिखात हिंगाची फोडणी . कमी प्रमाणात खावे, उष्ण असतं.
२) डाळमेथी - तुरीची डाळीच्या अर्धी वाटी मोड आलेल्या मेथ्या कुकुरमध्ये कमी शिजवाव्या. खूप गाळ नको. डाळ्,मेथी दिसायला हवी. चिंचगूळ किंवा आमसूल गूळ, ओलं खोबरं घालून उसळ करावी.
नेहमी प्रमाणे उसळ करता येईल
नेहमी प्रमाणे उसळ करता येईल किंवा बाकि कुठल्याही उसळीत टाकता येतील.
किंवा नुसती कांद्यावर परतलेली भाजी करता येईल.
गीतू, .....याची खिचडी मस्त
गीतू, .....याची खिचडी मस्त होईल. जीर्याच्या फोडणीवर कांदा परतुन घेउन, त्यात मसाला, गोडामसाला, गुळ, मीठ्,खोबरे ,मोड आलेली मेथी,तांदुळ पाणी घालुन खिचडी करावी.
मॅगी मघ्ये जो पॅक्ट मसाला
मॅगी मघ्ये जो पॅक्ट मसाला असतो त्याची कृती कोणी देईल काय? मला तो मसाला खुप आवातो.
झरबेरा, त्या पाकिटावर घटक
झरबेरा, त्या पाकिटावर घटक लिहिलेले असतात.
अनायासे आता तिकडे उन्हाळा आहेच. कांदा , लसूण पातळ चिरून वाळवून ठेव.
टोमॅटो पण चार तूकडे करुन वाळवून ठेव. हे घटक त्यात लागतील.
विकांताला पुन्हा प्रयत्न केला
विकांताला पुन्हा प्रयत्न केला आहे....आणि सुचरीताच्या म्हणण्याप्रमाणे मुठशेके भाजून सायोने सांगितल्याप्रमाणे भिजवल्यावर फ़ुलून आलेले हे साबुदाणे.....
I dont know why my photo upload is just failing...:(
आईने सांगितल्याप्रमाणे खिचडी करताना दुधाचा हबका पण मारला पण माहीत नाहीये बहुतेक काही पदार्थ करताना हाताला यश नसावं..फ़क्त त्यातल्यात त्यात प्रगती म्हणजे थोडी कमी चिकटली...पण ती सुटी सुटी जी मला आवडते तशी झाली नाही...असो...पुन्हा एकदा सगळ्यांचे मदतीसाठी आभार....(खिचडी मी तसंही चार-पाच महिन्यांतून एकदा कधीतरी करते...) त्यामुळे लक्ष्मी ब्रॅंडचा अनुभव घ्यायला प्रचंड वेळ लागेल....आहे तो साबुदाणा संपायला अवकाश आहे....
कच्च्या टोमॅटोची चटणी कशी
कच्च्या टोमॅटोची चटणी कशी करतात?
पुणेरी गोल भजी कशी करतात हे
पुणेरी गोल भजी कशी करतात हे कुणी सांग़ू शकेल का?
सोनाली कच्चे टोमॅटो बारिक
सोनाली कच्चे टोमॅटो बारिक चिरायचे.
फोडणीत मोहरी, हळद हिंग घालून आवडत असल्यास कांदा घालून परतायचा... मग टोमॅटो घालून परतायचा... झाकण घालून एक वाफ काढायची.. मग तिखट,मीठ गुळ घालायचा... शेवटी थोडं शेंगदाण्याचं कुट. वाढताना कोथिंबीर.. झाली क टो ची च
कच्च्या टोमॅटोची चटणी कशी
कच्च्या टोमॅटोची चटणी कशी करतात? >>> दुसरा प्रकार - कच्चे टो. चमचाभर तेलावर परतून घ्यावेत. त्याच कढईत मिरच्या (४-५ अथवा तिखटाच्या आवडीप्रमाणे जास्त) परतून घ्या व्यात. दोन्ही घटक मीठ, भाजलेले अर्धबोबडे तीळ घालून खलबत्त्यात कुटा. अथवा मिक्सरवर कमी वाटा.
लाल माठाची भाजी चविष्ट
लाल माठाची भाजी चविष्ट होण्यासाठी काय करता येईल?
मी साबांच्या पद्धतीने करते त्यात भाजीची पाने चिरून घ्यायची. नेहेमीच्या फोडणीवर कांदा परतून लाल माठाची पाने पाणी घालून परतायची. मग भाजी आळली की शेवटी मीठ व तिखट घालायचे. पण कितीही शिजवली तरीही नुसता पाला खाल्याचा फील येतो. गरम / गोडा/ काळा मसाला घालून पाहिलाय. पण आलू पालक वगळता इतर कुठल्याही पालेभाजीला गरम मसाल्याने विशेष चव येत नाही हेमावैम.
जरा सुचवा प्लीज.
पालेभाजी थोड्या तेलाच्या
पालेभाजी थोड्या तेलाच्या फोडणीवर परतून घेऊन शिजली की त्यात शिजवलेल्या वरणाचा गोळा घालून छान परतून घ्यायची. चवीप्रमाणे मीठ घालायचम. घट्ट/ पातळ हवं असेल त्याप्रमाणे पाणी घालायचं. ओलं खोबरं घालून उकळी येऊ द्यायची. आणि मग त्यात लसणीची चरचरीत फोडणी द्यायची. लाल तिखट/ हिरवी मिरची/ आमसूल/ गूळ इत्यादी मालमसाला आवडीप्रमाणे...
निंबुडा, लाल
निंबुडा, लाल माठाची/चाकवत्/चवळीची पालेभाजी करताना फोडणीत भाजीबरोबर तांदुळाच्या कण्या व लसुण बारीक चिरुन घाला.थोडेसे परतुन थोडे पाणी घालायचे वाफेवर शिजु द्यावी.मुठभर तांदुळ २दा धुवुन पाणी निथळु द्यायचे नंतर एकदा मिक्सरमधे फिरवले कि कणी तयार होईल.
पालेभाजीला कांदा नाही घातला
पालेभाजीला कांदा नाही घातला तरी चालतो. नुसता लसूण फोडणीत खमंग परतून त्यावर बारीक चिरलेली भाजी घालून फक्त तिखट मीठ घालायचे. छान चव येते. तिखटाऐवजी मिरची पण चालते. पण कुठलाही मसाला नाही वापरायचा. अगदीच हवे तर ओले खोबरे. अशी मेथी, करडई, माठ, तांदळी,पोकळा कोणतीही भाजी छान लागते.
एम्बी. अनुमोदन. मला स्वतःला
एम्बी. अनुमोदन.
मला स्वतःला सहसा भाज्यामधे अति मसाले घालून त्यांची मूळ चव घालवावीशी वाटत नाही. प्रत्येक भाजीला विशिष्ट अशी चव असते. पालेभाज्या तर अति शिजवू पण नयेत. कच्चट असल्यातरी छान लागतात. लोखंडी कढईत पालेभाज्या केल्या की एकदम खमंग लागतात. शक्यतो पाणी घालावे लाग्त नाही. कारण मीठ घातले की पालेभाजीला पाणी सुटतेच. लाल माठाच्या भाजीमधे देठ पण चिरून घालायचे.
मंजुडीने सांगितल्याप्रमाणे पातळ भाजी मी मेथी आणि पालकची करते. दुसरा अजून एक प्रकार म्हणजे ताकामधे बेसन घालून पातळ भाजी. हे कधीतरी आमटीला पर्याय म्हणून.
पालेभाजीत एखादे कंदमूळ (रताळे
पालेभाजीत एखादे कंदमूळ (रताळे वगैरे, नसलेच तर बटाटा) चांगले लागते. सोबत
एखादे कडधान्य. (मका, मटार, तूर) लाल भोपळाही चांगला लागतो.
किंवा अनेक भाज्या एकत्र करुन ऋषिपंचमीच्या भाजीसारखे शिजवायचे.
लसणीच्या फोडणीची आयडीया
लसणीच्या फोडणीची आयडीया आवडली.
मंजुडीने दिलेली रेसिपी पण आवडलीये. ठांकु ठांकु
मी साबांच्या पद्धतीने करते
मी साबांच्या पद्धतीने करते त्यात भाजीची पाने चिरून घ्यायची. नेहेमीच्या फोडणीवर कांदा परतून लाल माठाची पाने पाणी घालून परतायची.>>
निंबुडा पाणी अज्जीबात घालु नकोस. भाजी घेताना कोवळी - गोल पानाची शोधुन घे. आमच्याकडे फोडणीला फक्त लासुण - हिरवी मिरची - कांदा घालतात वर चिरलेला लाल माठ. झाकण घालुन ठेवुन दे मंद आचेवर. भाजीलाच पाणी सुटत आणि मस्त शिजते. शेवटी खोबर तर आहेच.
आमच्याकडे शेतावर कामगार तर चुलीवर कढइत नुसती भाजी, त्यत वरुन मीरची कांदा, मिठ, लसुण ठेचुन घालतात. बस. भाकरिच्या मध्ये ठेउन खातात.
एम्बी रिमा अनुमोदन मी पण
एम्बी रिमा अनुमोदन
मी पण माठाची भाजी सेम अशीच करते. फक्त लसूण चिरून न घालता ठेचून घातला तर भाजीला स्वाद जास्ती छान येतो.
मला कांदा खरपूस परतून त्यावर
मला कांदा खरपूस परतून त्यावर परतलेली माठाची नुसती लाल तिखट/ हिरवी मिरची आणि मीठ घातलेली भाजी जाम आवडते. मात्र भाजी शिजवायला पाणी घ्यायचे नाही. फारतर हबका मारायचा. भाजीमधे असलेल्या पाण्यावरच ती शिजली पाहिजे. वरती झाकणात पाणी ठेवायचे.
माझी टोमॅटो चटणी - इथे वाचलेल्या रेसिपीज मिक्स करून केली. एकदम साल्साची टेस्ट येते.
उडदाची चमचाभर डाळ कढल्यात किंचित तेलावर परतून घ्यायची. ती परतलेली डाळ, फोडी केलेले टो., हिरवी मिरची, आलं, लसूण, भरपूर कोथिंबीर, किंचित साखर, मीठ हे सगळं मिक्सरमधून काढायचं. तय्यार.
रीमा, मी नव्हे ती.. निंबूडा
रीमा, मी नव्हे ती.. निंबूडा घालते पाणी वगैरे.
मी शक्यतो दिवसाआड आणि हिवाळ्यात वगैरे तर दररोज पालेभाज्या करते. मला कुठल्याच भाजीला अथवा उसळी वगैरेना मसाला घालायची गरज पडत नाही. वाटण वगैरे तर महिन्यातून एकदा. ओलं खोबरंपण मी जास्त वापरत नाही.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/15526
या पद्धतीने पण लाल माठाची भाजी मस्त होते. लसूण किसून व शेवटी घातल्याने वेगळी चव येते. शक्य असल्यास तिखटाऐवजी मालवणी मसाला घातला तरी छान लागते भाजी.
दक्षिणा, अनघा_मीरा, नीधप
दक्षिणा, अनघा_मीरा, नीधप धन्यवाद पाकृ बद्दल
Pages