Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वेळकाढू, तब्येतीचा विचार करता
वेळकाढू, तब्येतीचा विचार करता साबुदाण्याची खिचडी अगदीच कुचकामी आहे, त्यात
असणार्या दाण्याच्या कूटापासून काय मिळतील ती प्रथिने. बाकी सगळा स्टार्च आणि
चरबी.
दलियाची, वर्याच्या तांदळाची अगदी तशीच खिचडी होते. दोन्ही आरोग्यदायी
आहेत.
पाकातल्या पुर्यांची रेसिपी
पाकातल्या पुर्यांची रेसिपी नव्या मायबोलीवर आहे का कुठे, किंवा कोणी सांगाल का प्लीज?
बेसन च दिनेशदा... मला सॅशे ची
बेसन च दिनेशदा... मला सॅशे ची क्वान्टीटी थोडी जास्त वाट्त. होती...
बेसन भिजवून थोडे फुगते ना
बेसन भिजवून थोडे फुगते ना म्हणून. हवे तर सॅशेमधला इनो एका टिस्पून मधे घेऊन
बघा. सपाट टिस्पून पुरतो.
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93035.html?1204129867
रावी, पाकातल्या पुर्यां
अमेरिकन चोप सुएची रेसिपी
अमेरिकन चोप सुएची रेसिपी महिती आहे का कुणाला? प्लीज मला सांगा. धन्यवाद.
दिनेशदा, खरंय या बाबतीत नवरा
दिनेशदा, खरंय या बाबतीत नवरा नेहमी तक्रार करतो की जिभेला जे आवडतं ते नेहमीच अनहेल्दी का असतं...:)
असो..साबुदाण्याची खिचडी हा खरं तर बाहेरून काहीतरी अनहेल्दी मागवायचा कंटाळा आला की चं खाणं म्हणूनच केली जाते आणि जिभेचे चोचले...बाकी वरीची खिचडी मी जास्त केली नाही..अमेरीकेत वरीला काय म्हणतात?? भारतातून आणलेली सध्यातरी संपलीय..
आणि दलियाची खिचडी माझी प्रचंड आवडती आहे..त्यात एक-दोन मोड आलेली कडधान्ये प्रथिनांसाठी आणि फ़्लॉवर, हिरव्या शेंगा, गाजर असा बराच मालमसाला घालुन ती वन-डीश मील म्हणून सहज खपते.....आभार...:)
सायो, धागा टाकलाय....थोडाच वेळ काढलाय म्हणून छोटं काहीतरी लिहिलंय...:ड
..अमेरीकेत वरीला काय
..अमेरीकेत वरीला काय म्हणतात?? >>>> ' Semo Rice' असे मी इंग्रोमधून आणलेल्या वरीच्या पाकिटावर लिहिले होते.
गुजराथी मधे सोमा म्हणतात.
गुजराथी मधे सोमा म्हणतात. किन्वाची पण खिचडी करता येते, इथे आहे कृती.
वरीचे तांदूळ लालसर होईपर्यंत भाजायचे. मग ते भरपूर कोमट पाण्यात भिजत घालायचे व अधून मधून ढवळायचे. असे केल्यावर ते फुलतात.
मग निथळून घ्यायचे, आणि नेहमीप्रमाणे खिचडी करायची.
दलिया थोडासा तेलावर भाजून, कूकरच्या डब्यात उकडायचा. मग जरा थंड करुन
हाताने मोकळा करायचा. त्याचीही साबुदाण्याप्रमाणेच खिचडी करायची.
या दोन्ही खिचड्या चवीला आणि दिसायलाही साबुदाण्याच्या खिचडीप्रमाणेच असतात.
मी कुकीज करायचे ३-४ प्रयत्न
मी कुकीज करायचे ३-४ प्रयत्न केले, चव चान्गली आली पण crumbly होत नाहीत.
तश्या होण्यासाठी टीप्स सान्गा ना
घरी टोस्ट (चहात घालून खायचे)
घरी टोस्ट (चहात घालून खायचे) बनवता येतात का ? केक टोस्ट / टोस्ट असं खूप शोधलं मी माबोवर पण वेगवेगळे रिझल्ट येतायतं.
अन्जलि , थँक्स!
अन्जलि , थँक्स!
प्राजक्ता_शिरीन :
प्राजक्ता_शिरीन : http://www.youtube.com/watch?v=bh-5mNp1Cd8 हे बघ.
बटाटे जास्त चिकट असणे आणि
बटाटे जास्त चिकट असणे आणि साबुदाण्यात पाणी राहणे, टाळायचे.
सुरुवातीला आधी तुकडे च पडत होते.मग मी साच्या मध्ये भरताना थोड हातान मळुन घेतल..मग मस्त झाल्या... thanks 
बटाटे मीठ घातलेल्या पाण्यात उकडले आणि साबुदाणा नेहमीच्या सवयीचा
वापरला तर चांगले. थोड्या साबुदाण्याचे, किंचीत भाजून पिठ करुन ठेवायचे.
आयत्यावेळी पिठ सैल झाले तर वापरता येते.
गोल चकल्या टाकताना, तूकडे पडत असतील, तर तसे तूकडेच वाळवायचे.>>>>>>>>>>>>>>>>ध्न्स दिनेशदा
मला अगदी कोवळ्या शेवग्याच्या
मला अगदी कोवळ्या शेवग्याच्या शेंगा मिळाल्या आहेत. त्याच काय काय करता येइल ? मी त्याची बटाटा घालून भाजी केली आहे. अजून काय करता येइल ?
आमटी, पिठल्यात , सांबार मधे
आमटी, पिठल्यात , सांबार मधे घालता येतील. वांगं बटाटा शेवग्याच्या शेंगा मटार किंवा हरबर्याचे कोवळे दाणे ह्या सर्वाची एकत्र गोडा मसाला घालून भाजी छान लागते.
सिंडरेला, राजगिरा रोळणे
सिंडरेला, राजगिरा रोळणे म्हणजे काय? मला नाही येत.
पटेल मधे ते पाकिट मिळते हल्ली नवीन राजगारो असे काहीतरी नाव आहे. दिसायला भगर्/वरी सारखेच दिसतेय.
दीपा, कोवळ्या शेंगांचे लोणचे
दीपा,
कोवळ्या शेंगांचे लोणचे चांगले होते. कृती आहे इथे.
भाजी आमटीत फार शिजवल्या तर त्या विरघळतात.
गवारीच्या शेन्गा वाळवतात
गवारीच्या शेन्गा वाळवतात तश्या या वाळ्वल्या तर चालतील का ? बर्याच आहेत. खाणारी मी एकटीच. वाळवताना त्याला काही लावू का ?
लोणचं करून बघते.
वाळवून मग शिजवल्या / तळल्या
वाळवून मग शिजवल्या / तळल्या तर चोथा लागतील.
लोणचे करताना जर व्हीनीगर वापरले तर मुरल्यावर त्या मऊ होतील.
मला अगदी कोवळ्या शेवग्याच्या
मला अगदी कोवळ्या शेवग्याच्या शेंगा मिळाल्या आहेत. त्याच काय काय करता येइल >> भजी करता येतील.
http://www.maayboli.com/node/33784
माझ्या कडे खारी आणि टोस्ट चा
माझ्या कडे खारी आणि टोस्ट चा चुरा उरला आहे खुप काय करता येईल
टोस्ट्च्या चुर्याचे पुडींग
टोस्ट्च्या चुर्याचे पुडींग किंवा तत्सम डेझर्ट करता येईल (पावाच्या चुर्याप्रमाणे वापरायचा. ) पण टोस्ट गोड असल्याने, तिखट पदार्थात चांगला लागणार नाही.
पुडींग किंवा तत्सम डेझर्ट
पुडींग किंवा तत्सम डेझर्ट करता येईल >> रेसिपि आहे का?
तो चुरा किंचीत गरम करायचा. मग
तो चुरा किंचीत गरम करायचा. मग कोमट दूधात भिजवायचा.
हवी तर साखर आणि सुका मेवा घालायचा. मिश्रण इडलीच्या पिठाएवढे
सैल असावे. आणि मंद आचेवर गरम करुन सेट होऊ द्यायचा.
गरम किंवा गार कसेही खाता येईल. याला जाळी पडणार नाही,
म्हणून फार जाड नसावा.
असं पुडींग मग मस्त आयस्क्रिम
असं पुडींग मग मस्त आयस्क्रिम बरोबर खाऊन टाकायचं
हवच तर वरतून चॉक सॉस 
माझ्या कडे खारी आणि टोस्ट चा
माझ्या कडे खारी आणि टोस्ट चा चुरा उरला आहे खुप काय करता येईल>> खारीच माहित नाही, पण टोस्ट चा चुरा ब्रेड क्रम म्हनुन वापरता येतो.
चुरा खुप असेल तर पुडिंग मधे
चुरा खुप असेल तर पुडिंग मधे वापरु नकोस्..त्याने पुडिंगला ब्राउन रंग येतो. तो चुरा तुला थालीपिठ, बनाना ब्रेड, केळ्याचे घावण, टोमॅटो आम्लेट, चण्याच्या पिठाचा पोळा, भज्याचे पिठ, कुठ्लीही पिठ पेरलेली भाजी ...यात वापरता येइल. अगदीच काहि नाही तर दुधाबरोबर कुठलेही सिरीअल खातांना थोडे थोडे टाकुन संपवावा.
चुरा सिरीअल खातांना थोडे थोडे
चुरा सिरीअल खातांना थोडे थोडे टाकुन संपवावा भन्नाट्....मस्त.......:)
विद्याक, केळ्याचे घावणची
विद्याक, केळ्याचे घावणची रेसिपी सान्ग ना
Pages