Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्याकडे ज्वारि च्या लाह्या
माझ्याकडे ज्वारि च्या लाह्या आहेत, दुधातुन जास्त छान नाहि लागत, काय करु त्याच?
dj14 <<<< पिठ करा त्याच आणि
dj14 <<<< पिठ करा त्याच आणि मस्त थोडीशी जिरेपुड , बारीक चिरलेली हिरवी मिरची , मीठ आणि ताक घालुन खा.
झक्कास आणि पोटभराऊ -पौष्टीक खाणं होतं.
फोडणीच्या लाह्या कर. मस्त
फोडणीच्या लाह्या कर. मस्त लागतात दाणे घालून
चालेल, ते करुन बघते.
चालेल, ते करुन बघते.
ज्वारीच्या लाह्या.. थोडं ताक,
ज्वारीच्या लाह्या.. थोडं ताक, दही, अर्धा चमचा लोणी घाला आणि कालवा... त्यात आंब्याचे लोणचे थोडे घाला, मीठ घालुन कालवा... गोपाळकाला तयार... थोडी कोथिंबीर घातली तरी चालेल. एक दोन मिरच्या वाटून घाला.
आहार आणि पाककृती विभागाकरता
आहार आणि पाककृती विभागाकरता एक वेगळा सर्च ठेवायला हवाय.>>>>
इथे लिहिलेली पाककृती सार्वजनिक असेल तर आणि पाककृतीच्या शब्दखुणांमध्ये योग्य शब्द लिहिलेले असतील तरच ती पाककृती सर्चमधे येते. योग्यप्रकारे सर्च केल्यावर पाककृती मिळतेच, पण न मिळणारी पाककृती इथे विचारायला काहीच हरकत नाही, बरेच जण शोधायला मदत करतात.
यापुढे तुम्ही सगळेच जेव्हा नवीन पाककृती वाचाल तेव्हा पाककृती लेखकाने ती सार्वजनिक केली आहे की नाही आणि शब्दखुणा योग्य आहेत की नाही हे तपासा, तसे नसल्यास लेखकाला याविषयी नक्की कळवा, म्हणजे भविष्यात ती पाककृती सर्चमधे सहज मिळेल.
शब्दखुणा योग्य आहेत की नाही>>> उदा. 'दही वडा' हा पदार्थ 'दही वडा', 'दहीवडा', 'दहीवडे', 'दही वडे' इतक्या विविध पद्धतींनी लिहिला जाऊ शकतो. त्यामुळे त्या पाककृतीसाठी सर्वसाधारणपणे प्रचलित असलेले शब्द शब्दखुणांमधे आहेत ना हे नक्की तपासा.
- मदत समिती
इडलीच पीठ करताना उन्हाळ्यात
इडलीच पीठ करताना उन्हाळ्यात आनि हिवाळ्यात नक्की किती तास आंबव्ण्यासाठी ठेवाव ????
अनुसया, उन्हाळ्यात सहा तास
अनुसया, उन्हाळ्यात सहा तास आणि हिवाळ्यात दहा ते बारा तास लागतात. अर्थात
या मुंबईच्या वेळा.
आदल्या रात्री पिठ भिजवून ठेवल्यावर भांडे किती भरलेय ते लक्षात ठेवायचे. त्या
पातळीत किमान ५० % वाढ व्हायला हवी.
दिनेश म्हणजे आत्ताचा हा सिझन
दिनेश म्हणजे आत्ताचा हा सिझन परफेक्ट आहे इडल्या डोसे खायला
दिनेशदा, तुम्ही हिवाळ्याच्या
दिनेशदा, तुम्ही हिवाळ्याच्या ऐवजी उन्हाळाच चुकुन लिहीलेत. ते जरा दुरुस्त करा.
पिठ आंबवण्याबद्दल मी पुस्तकात वाचलेल कि पिठावर सुकी लाल मिरची ठेवायची.. मी त्याप्रमाणे ठेवली आणि बापरे... दुसर्यादिवशी पिठ जे फसफसुन बाहेर आले कि पुर्ण ओव्हन भर पिठच पिठ झाले..... कृपया तसा प्रयत्न कुणि करु नका.
नाही दक्षिणा, तिकडचे तपमान
नाही दक्षिणा,
तिकडचे तपमान बघता हे दिवस, पाणीपुरी, खमंग काकडी, कलिंगड, पन्हे, भेळपुरी, दडपे पोहे, नारळपोहे,
कांजी वडे, रसम वडे, नाचणीचा शिरा, आमरस खांडवी, फणसाचे सांदण, काकडीचे धोंडस, फालुदा, दहिबुत्ती या पदार्थांचे.
मंजूडी थॅन्क्स. लक्षात ठेवते
मंजूडी थॅन्क्स. लक्षात ठेवते आता नक्की हे.
मी उडीदडाळ २ वाट्या, चणाडाळ आणि मूगडाळ मिळून एक वाटी असं भिजत घालून नंतर त्यात आलं, मिरच्या घालून वाटलं आणि ऐन वेळी त्यात थोडं इनो सॉल्ट घालून इडली पात्रात वड्यांच्या आकाराइतकं घट्टसर पीठ घालून वाफवलं. नंतर पातळ ताकात जरा वेळ भिजत ठेवून सर्व्ह करताना नेहमीच्या दहीवड्यांसारखं दही करुन त्यावर घातलं. यम्मी झाले होते, हेल्दी आणि उन्हाळ्यात तळत बसावे लागले नाहीत हा मुख्य फायदा.
शोध प्रश्न - (माफ करा पण
शोध प्रश्न - (माफ करा पण सापडत्च नाहीये.. :-(.)
इथे मागे एक माय्क्रोवेव सुरळीच्या वड्यांची रेसीपी दिली होती - ती माला सापडत्च नाहीये.....कोणाला सापडली तर इथे लिंक द्याल...
मायक्रोवेव्हमधल्या सुरळीच्या
मायक्रोवेव्हमधल्या सुरळीच्या वड्या इथे आहेतः http://www.maayboli.com/node/30803
'सुरळीच्या वड्या' एवढं शोधलं तरी बरेच (योग्य) धागे मिळतील.
म्रु.....धन्स गं - सापडत्च
म्रु.....धन्स गं - सापडत्च न्हव्ती.....
I am blind :-).....
कुचि ने इतरत्र विचारलेल्या
कुचि ने इतरत्र विचारलेल्या प्रश्नाला इथे उत्तर देतोय.
रायाआवळे खाताना बिया दाताखाली येतात. तशा त्या खाल्या तरी चालतात.
पण काढायच्या असतील तर चाकूने आवळे कापण्यापेक्षा ठेचून बिया काढल्या तर चांगल्या.
लोणच्याचा एक प्रकार देतोय.
असे आवळे दोन वाट्या, लोणच्याचा मसाला दोन टेबलस्पून (किंवा मोहरीडाळ, तिखट, हिंग, हळद यांचे मिश्रण ), मीठ पाव वाटी, तेल पाव वाटी, गूळ अर्धी वाटी.
तेल तापवून त्यात आवळे टाकायचे. झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची, जरा
शिजल्यासारखे वाटले कि मीठ, मसाला टाकायचा. गूळ टाकायचा. अर्धी वाटी पाणी
टाकायचे. गूळ विरघळला कि एकदोन कढ आणायचे. तिखट, मीठ आवडीप्रमाणे कमी जास्त करता येईल.
(असेच करवंदाचेही करतात.)
आमच्याकडे हे आवळे मिळत नाहीत. (जागूकडे मिळतात !)
काजू करीची रेसिपी कुणाला
काजू करीची रेसिपी कुणाला महिती असल्यास सांगा.
कोणीतरी आम्रखंड कसे करायचे ते
कोणीतरी आम्रखंड कसे करायचे ते सांगेल का? ईथे पाकातले पाहीले. मला साधेच हवे आहे. त्यात जायफळ वेलची घालतो का? साखर कीती घालायची?
मी आम्रखंड पहील्यांदाच करते आहे.
झी, कृपया तुमची विचारपूस बघा.
झी, कृपया तुमची विचारपूस बघा.
दुकानात खूप छान मांडले होते
दुकानात खूप छान मांडले होते म्हणुन हेअरलुम पटेटो (तीन चार रंगाचे छोटे बटाटे) पहिल्यांदीच आणले आहेत... नेहमीचे बटाटा पदार्थ सोडुन काय स्पेशल करता येईल?
काल मी हेवी व्हिपींग
काल मी हेवी व्हिपींग क्रिमपासून तुप बनवले पण त्याची बेरी खूप आलीये. या बेरीचा कणीक घालून मस्त खरपूस केक बनवतात, त्याची पाकृ कुणाला माहीत आहे कां?
त्याची बेरी खूप आलीये. या
त्याची बेरी खूप आलीये. या बेरीचा कणीक घालून मस्त खरपूस केक बनवतात, त्याची पाकृ कुणाला माहीत आहे कां?>>>>> maze pan lonyache tup banvatana beri yete....asi recp. asel tar mala pan upyogi padel ..kona kade asel tar naki dya....
केकचं माहित नाही, पण त्यात
केकचं माहित नाही, पण त्यात भाजलेली कणीक व पीठीसाखर घालून मस्त लाडू वळता येतील.
रंग व गंध जरा वेगळा असेल इतकेच!
पंजाबी लोक या बेरीत चवीपुरती
पंजाबी लोक या बेरीत चवीपुरती पिठीसाखर्/लोणच्याचा मसाला घालतात व याचे पराठे करतात्.त्यासाठी एका लाटलेल्या फुलक्यावर अशी बेरी पसरायची .त्यावर दुसरा फुलका ठेवायचा.पाण्याचा हात लावुन दोन्ही फुलक्यांच्या कडा व्यवस्थीत दाबुन घ्यायच्या .असा हा पराठा तुपावर्,बटर घालुन खरपुस भाजुन खायचा.असा एक पराठा "पुरेसा "होतो
पण त्यात भाजलेली कणीक व
पण त्यात भाजलेली कणीक व पीठीसाखर घालून मस्त लाडू वळता येतील. >>> पौर्णिमाने टाकली होती बेरीच्या लाडवांची कृती इकडे. शोधावी लागेल.
बेरीचे लाडू
बेरीचे लाडू
मनी ते तूप कसं बनवलंत ते
मनी ते तूप कसं बनवलंत ते सांगणार का? मला फक्त बटर वापरुन तूप बनवायचं माहिते.....:)
धन्यवाद, हे लाडू बनवून
धन्यवाद, हे लाडू बनवून बघेन...
बेरीचे लाडू चवदार लागतील या
बेरीचे लाडू चवदार लागतील या शंकाच नाही. पण त्यात काहिही पोषक नाही. तसेच ज्या अर्थी बेरी जास्त निघाली, त्या अर्थी त्या क्रीममधे बरीच मिल्क सॉलिड्स होती, ती जळून वाया गेली.
तूप करण्यासाठी अनसॉल्टेड बटर वापरणेच जास्त चांगले. त्याची बेरी खुपच कमी, किंवा कदाचित अजिबात निघणार नाही.
मोनॅको बिस्किटांच्या टोपिंग्ज
मोनॅको बिस्किटांच्या टोपिंग्ज कोणत्या वेगवेगळ्या पद्धती हव्या आहेत पार्टी साठी स्टार्टर म्हणून.सुचवाल का?
Pages