निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित
शशांक, निसर्गपूर्ण मधल्याच
शशांक, निसर्गपूर्ण मधल्याच एका लेखात, मघुमेह हि शारिरीक अवस्था नसून,
मानसिक अवस्था आहे, असे एक विधान आहे. नेमके कुणाच्या लेखात आहे ते शोधावे लागेल. पण या दूष्टीकोनातून पुढे काही लिहिले गेलेय का ते बघायला पाहिजे.>>>>>>>> दिनेशदा - टाईप २ मधुमेहाला अनेक कारणे आहेत त्यात मानसिक अवस्था हे नक्कीच एक कारण आहे.
दुसरे असे की - आपले मन म्हणजे सूक्ष्म शरीर तर शरीर म्हणजे स्थूळ मन असे म्हणतात - हे अगदी खरे वाटते.
माझ्या घरी उदाहरण आहेत. आई अगदी काटेकोरपणे व्यायाम, आहार आणि औषधे
संभाळतेय. गेली १२ वर्षे. आजही पुर्णपणे कार्यक्षम आहे. आणि वडीलांनी हे सत्य,
स्वीकारलेच नाही, आणि ते वारले.>>> मधुमेहाचा राग राग न करता त्याला नीट सांभाळले किंवा मित्र म्हणून स्वीकारले तर जीवन खूपच सुखकर होते. टाईप १ मधे तर हे खूप म्हणजे खूपच महत्वाचे व दोन्ही मधुमेहात हे सगळ्यात महत्वाचे व प्रॅक्टिकल हिंट म्हणता येईल.
मला एक मजा वाटतेय. मी, साधना
मला एक मजा वाटतेय. मी, साधना आणि मामी सोडलो, तर बाकी इथले कुणीही टिव्ही आणि सिनेमा बघत नाही का ? जागू तर मला वाटतं, अजिबात सिरियल्स वगैरे बघत नाही.
ते वेड नसून हे वेड तूम्हा सगळ्यांना आहे, हे किती छान !!
सुदैवाने आमच्या घरातही टी
सुदैवाने आमच्या घरातही टी व्ही वरील सिरियल्स कोणीच पहात नाही, पण मला इंग्रजी / इतर भाषेतील (सब टायटल्स असलेले) चित्रपट पहायला प्रचंड आवडतात - कालच "ब्युटिफुल माईंड" (कितव्यांदा हे मोजत नाही) परत पाहिला - वन ऑफ माय फेव्हरिट्स. अंजूने खूप सांगूनही माझ्यात काही फरक पडत नाहीये....
मी आठवड्याला ३/४ चित्रपट
मी आठवड्याला ३/४ चित्रपट बघतो. पण त्यातही निसर्गच शोधत असतो.
काईट रनर मधे पण अफगाणिस्तानातला निसर्ग छान टिपलाय. काल
बघितलेल्या, ह्यूगो मधे मात्र, एक फुलवाली सोडली तर काहीच नैसर्गिक नाही.
(तरीही तो चित्रपट अतिसुंदर आहे.)
आज, न्यू झीलंडमधल्या फोटोतला शेवटचा टप्पा एडीट केला. अगदी काटेकोर
छाननी केली, तरी जवळजवळ २००, नुसते फुलांचे फोटो अपलोड केलेत.
त्यातले निदान निम्मे तरी इथे टाकीनच. उद्यापासून सुरवात करतो.
दिनेश, जे जे सुंदर, ते माझे
दिनेश, जे जे सुंदर, ते माझे घर यावर माझा विश्वास आहे... टिवी आता सुंदर वाटत नाही, अतिपरिचयात अवज्ञा, दुसरे काय? पण मी मात्र टिवी, सिनेमा इ.इ. च्या प्रेमात होते, आहे नी राहणार. मध्ये काही काळ गॅप घेतलेला एवढेच...
मला मुंबईबाहेर शुट केलेल्या चित्रपटातला निसर्ग शोधायला खुप आवडतो. हल्ली आलेला जिंदगी ना मिले दोबारा केवळ त्यातले निसर्गसौंदर्य मोठ्ठ्या पडद्यावर पाहायला मिळावे म्हणुन दोनदा थेटरात जाऊन बघितला.
शशांक, मी मॅजेस्टिकमध्ये
शशांक, मी मॅजेस्टिकमध्ये चौकशी केली (फोनवरून) पण त्यांच्याकडे डॉ. डहाणुकरांचे "हिरवाई" आणि "फुलवा" हि दोन्ही पुस्तके नाहीत. (दोही ग्रंथाली प्रकाशनाची आहेत ना?)
टि. व्ही. आणि सिनेमा, नाटक,
टि. व्ही. आणि सिनेमा, नाटक, सगळं काही खूप आवडतं. पुण्यात असताना दिवसात थोडा वेळ मराठी चॅनल्स बघायचे घरच्यांसोबत. मुळात सिरीअल्स जास्त आवडत नाहीत. पण सध्या अटेन्बरो (David Attenborough) चे सगळे कार्यक्रम दाखवताय्त EDEN चॅनल वर (यु.के. मधे लागतो हा चॅनल.) ते न चुकता बघते. काही एपिसोड इतके छान आहेत की परत लागले तरी बघताना कंटाळा येत नाही. निसर्गातल्या अद्भुत गोष्टींचं नवल करावं तेवढं कमी आहे.
हो, ही दोन्ही पुस्तके
हो, ही दोन्ही पुस्तके ग्रंथाली प्रकाशनाची आहेत. मला वाटतं अंजूने ग्रंथालीशी या पुस्तकाबद्दल बोलणी केली होती, पण बहुधा त्यांनी काही दाद लागून दिली नाही.
हिरवाई आमच्याकडे आहे. पुण्यात
हिरवाई आमच्याकडे आहे. पुण्यात कधी आलास तर त्याची झेरॉक्स नक्की देईन.
हिरवाई आमच्याकडे आहे. पुण्यात
हिरवाई आमच्याकडे आहे. पुण्यात कधी आलास तर त्याची झेरॉक्स नक्की देईन.>>>>धन्स
काल जेवल्यानंतर हाफिसात फिरत
काल जेवल्यानंतर हाफिसात फिरत असताना एका ठिकाणी भरपुर पांढरी फुले दिसली, जवळ जाऊन पाहिले तर एडेनियम फुललेला आणि त्याला एक पिकलेली शेंगही होती. हळूच शेंग काढुन घेतली पण बीया फळतील असे वाटत नाही.
आज फिरत असताना अचानक मान खाली टाकलेले एक एडेनियम दिसले. एकाच फांदीवर किती फुले आलीत असे म्हणत फांदी वर केली आणि धक्काच बसला.
केवळ चारपाचच फुले होती पण त्या फुलांना एवढ्या पाकळ्या होत्या की फांदीला भार सहन होत नव्हता.
ह्या प्रकारच्या पाकळ्या असलेल्या फुलांची पण दोनचार एडेनियम होती.
दुपारी दोनचे अतिशय प्रखर उन आणि माझा दिव्य मोबाईल यामुळे फोटो अगदी बेकार आलेत पण एडेनियममध्ये हे प्रकारही आता आलेत हे दाखवण्यासाठी इथे टाकतेय.
साधना, किती सुंदर दिसतायत ही
साधना, किती सुंदर दिसतायत ही फुलं. शकुन, हिरवं हिरवं झाड मस्तच.
हळूच शेंग काढुन घेतली पण बीया
हळूच शेंग काढुन घेतली पण बीया फळतील असे वाटत नाही.>>>> मग एडेनियमची लागवड कशी करतात ? तुमच्या तेथील माळ्याला विचारुन बघ.
काही काही झाडांच्या बिया या पक्ष्यांच्या पोटात जाऊन बाहेर आल्यावरच रुजतात हे खरे आहे - पक्ष्याच्या पोटातील काही एन्झाईम्सची गरज असते - त्या बियांचे आवरण निघून जाण्याकरता.
पण काही झाडांच्या बिया या पक्ष्यांच्या पोटात जाऊन बाहेर आल्यावरच रुजतात हे तेवढे खरे नाही असे काही मंडळींनी सिद्ध केले आहे - उदा. बहुतेक सोनचाफ्याबाबत कोकणातल्या एका व्यक्तिने असे संशोधनाअंती सिद्ध केले की त्या बिया ३७ डि. से. काही काळ ठेवल्यास त्यातून येणार्या चाफ्याला फुले येतात, ती व्यक्ति अशी भरपूर रोपे तयार करुन अनेक लोकांना फुकट देत होती.
या अशा वेगवेगळ्या बिया रुजण्याबाबत वा लागवडीच्या इतर स्त्रोतांबाबत कोणाला माहिती असल्यास ती इथे एकत्रित केल्यास बरे होईल - नाही का ?
उदा. - बेल वृक्षाच्या मुळापाशी त्याची अनेक रोपे (पिल्ले) असतात - ती नीट मुळासकट उपटून दुसरीकडे लावली तर दुसरा बेल वृक्ष तयार होतो.
जाणकार मंडळींना आवाहन करतो की अशीच माहिती एकत्र करुन एका तक्त्यात ती मुख्य पानावर देऊ या - अजून कोणाला काही जास्त चांगले सुचत असेल तर जरुर सांगा.
इंग्लंडमधील फुल झाडांसंबंधीत
इंग्लंडमधील फुल झाडांसंबंधीत एक अतिशय उत्कृष्ठ (आयडिअल) साईट बघण्यास मिळाली - मी तर या साईटच्या प्रेमातच पडलो - फुलाबरोबर त्याचे पान, फळ/ शेंग याचे सुंदर फोटो - फुलाचे / झाडाचे जवळून व लांबून फोटो हे इतके छान टिपले आहे की अगदी सर्वसामान्य (बॉटनीविषयी अनभिज्ञ) व्यक्तिला (या साईट्मुळे) ते फुल /झाड चटकन ओळखता येईल.
जास्त उत्सुकता ताणत नाही - अनुभवच घ्या ना - www.british-wild-flowers.co.uk
शशांक मस्त आहे साईट. तुमचा
शशांक मस्त आहे साईट.
तुमचा वरिल उपक्रमाचा विचार पण मस्त. नक्कीच अशी माहिती लिहीता येईल. (अर्थात मी काय लिहिणार म्हणा, येथील नि. ग. तज्ञ लोकांना असे काय माहित नसेल जे मला माहित असेल :डोमा:)
हल्ली आलेला जिंदगी ना मिले
हल्ली आलेला जिंदगी ना मिले दोबारा केवळ त्यातले निसर्गसौंदर्य मोठ्ठ्या पडद्यावर पाहायला मिळावे म्हणुन दोनदा थेटरात जाऊन बघितला. >
त्यातल 'ख्वाबोंके परींदे' गाण्याच चित्रीकरण मी तर वेड्यासारख बघत रहाते.
शशांक, काही बिया पक्षी गिळत
शशांक,
काही बिया पक्षी गिळत नाहीत, पण चिकट गरामूळे त्या त्यांच्या चोचीला चिकटतात.
पक्षी जेव्हा चोची साफ करतात, त्यावेळी त्या पडतात.
अर्थात करोडो बियांपैकी, केवळ काहिच बिया रुजाव्यात अशीच निसर्गाची अपेक्षा असते. ज्यावेळी आपण हस्तक्षेप करतो, त्यावेळी त्याचे रान माजते.
प्रा. घाणेकर ज्यावेळी लेख लिहितात, त्या प्रत्येक लेखाच्या शेवटी लागवड कशी करावी, याबद्दल दोन ओळी असतातच.
साधना डेझर्ट रोझचा बीजप्रसार
साधना डेझर्ट रोझचा बीजप्रसार बहुतेक निसर्गात वार्याने किंवा पावसाने होत असावा. कारण ज्या ठिकाणी मी याचे रान बघितले, त्या ठिकाणी बाकी काही असणे शक्यच नव्हते.
शिवाय शेंगात, खाण्याजोगा गरही नसतो.
ज्या अर्थी फुले लालभडक रंगाची आहेत, त्या अर्थी परागीभवन मात्र पक्षी किंवा किटक
करत असावेत.
अर्थात करोडो बियांपैकी, केवळ
अर्थात करोडो बियांपैकी, केवळ काहिच बिया रुजाव्यात अशीच निसर्गाची अपेक्षा असते. ज्यावेळी आपण हस्तक्षेप करतो, त्यावेळी त्याचे रान माजते.>>>> एकदम मान्य, पण आपल्या अंगणात, कुंडीत, फार्म हाऊसमधे जेव्हा झाडे, वृक्ष, वेली, झुडपे, पालेभाज्या लावायची असतात त्यासंबंधी जर अशी (मी वर म्हटले आहे अशी) माहिती गोळा करता आली तर अनेकांना फायदा होईल व कधी कधी आपण झाडांची छाटणी करतो त्यातील - फांदी लावून लागवड - अशा स्वरुपाचे असेल तर कोणा गरजू व्यक्तिची सोयच होईल ना ? अशा प्रकारे त्या लागवडीच्या वर्गिकरणाचा फायदा करुन घेता येईल असे वाटते.
यात (लागवडीच्या वर्गिकरण) आपल्या माहितीत वाढ व प्रत्यक्ष लागवडीचा फायदा अशा दोन्ही गोष्टी गृहीत आहेत.
ज्यावेळी आपण हस्तक्षेप करतो,
ज्यावेळी आपण हस्तक्षेप करतो, त्यावेळी त्याचे रान माजते.>>>> +१
पण झाडे तोडुन मानवाने आधीच हस्तक्षेप केलाय ना. त्यामुळे चांगल्या हस्तक्षेपाची गरज भासत आहे
असो माहिती असणे चांगले. कशी, किती , केव्हा, कुठे अमलात आणायची, आणायची का नाही हा नंतरचा भाग.
हळूच शेंग काढुन घेतली पण बीया
हळूच शेंग काढुन घेतली पण बीया फळतील असे वाटत नाही
एडेनियमची लागवड शेंगातल्या बीयांनी केली जाते. पण मला जी शेंग मिळाली ती खुरटलेली होती. आतल्या बीया नीट जोपासलेल्या नव्हत्या. मी आज पेरल्या कुंडीत पण नीट तयार नसल्याने फळतील असे वाटत नाही.
तुटलेली फांदी रोवुनही एडेनियम वाढवता येते. पण तिचा बुंधा बीयांपासुन वाढवलेल्या एडेनियमसारखा फुगत नाही. खोड थोडे जाड होते पण ते तेवढेच.
माझ्याकडे मी अशीच एक तुटलेली फांदी रोवली होती. तिला फुले, शेंगा सगळे आले. ते एडेनियमही मी हल्ली एका मैत्रिणीला दिले. इथे ज्या एडेनियमचे फोटो मी मिरवत असते त्याच्याकडे मी बराच काळ दुर्लक्ष केले त्यामुळे बिचा-याची वाट लागली. हल्लीच एक मोठ्ठी पसरट कुंडी आणुन त्यात बिचा-याला नीट लावले. आता त्याला परत पाने नी फुले यायला लागलीत. शेंगा आल्या की नीट काढुन रोपे तयार करायला हवीत.
हे एडेनियम नी दादरच्या एका लहान नर्सरीतुन आणलेले. विकत घेतले तेव्हा ते औषधाच्या बाटलीच्या बुचात लावले होते इतके लहान होते
वा साधना - खूपच मस्त माहिती
वा साधना - खूपच मस्त माहिती दिलीस.
मोनालिप - असो माहिती असणे चांगले. कशी, किती , केव्हा, कुठे अमलात आणायची, आणायची का नाही हा नंतरचा भाग.>>>> अगदी मनातले.....
साधना डेझर्ट रोझचा बीजप्रसार
साधना डेझर्ट रोझचा बीजप्रसार बहुतेक निसर्गात वार्याने किंवा पावसाने होत असावा
वा-याने होतो कारण मध्ये दांड्यासारखी बी आणि दोन्ही बाजुला म्हाता-या असतात. शेंगा आल्या की त्या म्हाता-यांना उडवण्याचे काम मी आअणि ऐशु आवडीने करतो
शशांक, मी अगदी शाळेत असताना
शशांक, मी अगदी शाळेत असताना वाचले होते कि कापलेल्या झाडाच्या फांदिला
जर एक खास कल्चर लावले तर मूळे हमखास फुटतात. त्याचे नाव वगैरे आता
आठवत नाही.
माझ्या अनुभवाप्रमाणे, लावलेली फांदी (पावसाळ्यात) हमखास जगते ते झाड म्हणजे
खुरचाफा. वडाची फांदी, शेवग्याची फांदी पण जगते.
खाऊच्या पानाची वेल, रताळ्याची वेल, मनिप्लांटची वेल पण अशी हमखास जगते.
आपल्याकडे टिश्यू कल्चर बद्दल फार का वाचायला मिळत नाही ? मी आमची माती
आमची माणसं, मधे बघितले होते ते !
देव तारे त्यास कोण
देव तारे त्यास कोण मारे......
मुळात टोमॅटोला रेताड जमीन लागते हे मान्य. तरी.....वाळु, उन आणि AC चे पाणी या रोपाला जगवत आहे...परिणाम आश्चर्य कारक दिसत आहे.फळाने लगडलेले हे रोप पाहुन निदान मला तरी.
(टोमॅटो जात>हॉलंड)
कापलेल्या झाडाच्या फांदिला जर
कापलेल्या झाडाच्या फांदिला जर एक खास कल्चर लावले तर मूळे हमखास फुटतात
ते कसलेतरी हार्मोन्स असतात. मी बघितलेय आधी.
चातकभौ, होता कुठे इतके दिवस????
चातक, दुबईच्या आसपास थोडीफार
चातक, दुबईच्या आसपास थोडीफार शेती पण दिसते.
सौदी मधे फॉसिल वॉटर वापरून ( अनेक युगांपुर्वी जमिनीखाली खडकात अडकलेले
पाणी ) गव्हाची शेती केलेली दिसते, विमानातून.
अगदी गोलाकार शेते असतात. मध्यभागी हि विहिर. पण हे पाणी काही परत परत
निर्माण होत नाही. त्यामूळे पाणी संपले कि शेत सोडून देतात. तशी शेते पण दिसतात.
साधना, दोघी मिळून बिया उडवता
साधना, दोघी मिळून बिया उडवता काय. ! जिथे पडतील तिथे रुजतील ना.
मग अनेक वर्षांनी, तूमच्या कॉलनीत त्याचे जंगल वाढेल ( रानटी अवस्थेत २ फूट
व्यासाचा बुंधा बघितलाय मी !) भारताच्या हवामानात तग धरण्यासाठी ते झाड आपल्यात काही बदल करेल. मग इतिहासात तूमचे नाव होईल. मग कदाचित
लेडी अॅमहर्स्टीया सारखे तूमचे नाव त्या नव्या झाडाला देतील.
आणि त्यावेळी, नि.ग. चा ८७७९१३५९७१६६४९८७१३३३७८९६ वा भाग सुरु असेल.
साधुतै.... कामातच होतो....आता
साधुतै.... कामातच होतो....आता थोडा वेळ आहे.....म्हणजे तेही २-३ दिवसच.अरेरे.
दुबईच्या आसपास थोडीफार शेती पण दिसते. >> अर्थातच.....
प्रामुख्याने कोबी,वांगे,काकडी,टमाटर,पालक्,कोथिंबीर्,लालमाठ,पार्सले,कांदेपात (आणखीही असावेत) या भाज्यांची मुबलक प्रमाणात लागवड केली जाते.
शेतीला पाणी पुरवठा बहुतेक ठिकाणी सध्या म्युंसिपालिटी कडुन होत आहे.......तेही भरपुर अगदी २४ तास. कारण समुद्रातले पाणी शुध्दीकरण करुन पुन्हा वापरले जात आहे.... उच्चकोटीचे बियाणे तसेच अत्याधुनिक खतांचा वापर करुन पुरेपुर फायदा करुन घेत आहेत इथे.
दिनेश अजुन तरी कुठे रुजुन
दिनेश
अजुन तरी कुठे रुजुन आलेल्या दिसल्या नाहीत
Pages