निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित
"चिऊताई, चिऊताई, दार उघड",
"चिऊताई, चिऊताई, दार उघड", असं विनवणार्या काऊला चिऊताईनं "थांब माझ्या बाळाला...." असं बजावत तिष्ठत उभं ठेवलं होतं. या चिमण्या बाळांच्या गोष्टीमध्ये "खूप मोठा पाऊस" आला होता. काऊचं उघड्यावरचं शेणाचं घर पावसात विरघळून गेलं. चिऊच वळचणीतलं मेणाचं घर मात्र सुखरूप राहिलं. पण नंतर काय झालं माहीत आहे? खूप मोठ्ठा पूर आला, "माणसांचा"! त्या पुरात वाडे, अंगण, पडव्या, ओसर्या, बखळी, परस, सगळं काही वाहून गेलं. शेवगे, चाफे, जाईजुई, पारिजातक, सिताफळी, आवळे, सगळे गेले. चिऊचं घर मेणाचं असूनही माणसांच्या महापुरात वाहून गेलं.
गावाताल्या चौका-चौकात लावलेली प्रदूषण मोजणारी घड्याळं इथल्या माणसांना वाचता येत नाहीत, पण चिमण्या-कावळ्यांना ती नीट वाचता येतात आणि समजतात. म्हणून इथले चिमण्या केव्हाच गावाबाहेर गेलेत, शुद्ध मोकळ्या वातावरणामध्ये!!!
"या चिमण्यांनो, परत फिरा रे घराकडे अपुल्या" असं म्हणायची तिन्हीसांज केंव्हाच सरली आहे.
— श्रीकांत इंगळहळीकर (आसमंत)
मी वेडा झालोय हे पुस्तक वाचून. पुस्तक वाचायला घेतलं आणि अवघ्या दिडतासातच संपवून खाली ठेवलं. हॅट्स ऑफ टु श्रीकांत इंगळहळीकर आणि थॅंक्स टु बित्तुबंगा हे पुस्तक सुचवल्याबद्दल.
लिखाणात काव्य पेरून लिहिण्याची पद्धत मला आवडते आणि त्याच पद्धतीने या पुस्तकात लिहिले आहे त्यामुळे अजुनच भावले. अवश्य संग्रही ठेवावे असे पुस्तक.
"आसमंत दाराशी सुरू होतो" - श्रीकांत इंगळहळीकर. क्या बात है!!!!!!
शशांक, निसर्गपूर्ण मधल्याच
शशांक, निसर्गपूर्ण मधल्याच एका लेखात, मघुमेह हि शारिरीक अवस्था नसून,
मानसिक अवस्था आहे, असे एक विधान आहे. नेमके कुणाच्या लेखात आहे ते शोधावे लागेल. पण या दूष्टीकोनातून पुढे काही लिहिले गेलेय का ते बघायला पाहिजे.
माझ्या घरी उदाहरण आहेत. आई अगदी काटेकोरपणे व्यायाम, आहार आणि औषधे
संभाळतेय. गेली १२ वर्षे. आजही पुर्णपणे कार्यक्षम आहे. आणि वडीलांनी हे सत्य,
स्वीकारलेच नाही, आणि ते वारले.
जिप्सी, त्या पुस्तकाचे
जिप्सी, त्या पुस्तकाचे मुखपृष्ठही लाजबाब आहे.
जिप्सी, त्या पुस्तकाचे
जिप्सी, त्या पुस्तकाचे मुखपृष्ठही लाजबाब आहे.>>>>>अगदी अगदी दिनेशदा. मुख्यपृष्ठापासुन मलपृष्ठापर्यंत अख्खं पुस्तकच देखणं आहे.
जिप्सी, आमच्या अगदी मनातली
जिप्सी, आमच्या अगदी मनातली गोष्ट केलीस रे! मी आणि अंजू असंच म्हणत होतो की अशा पुस्तकातले काही उतारे इथे द्यावेत. या पुस्तकातच काय पण इतरही पुस्तकांत असे खूप छान छान परिच्छेद आहेत ते इथे द्यावेत असे मनात आहे.
खूप चांगली सुरुवात केलीस.
या पुस्तकातच काय पण इतरही
या पुस्तकातच काय पण इतरही पुस्तकांत असे खूप छान छान परिच्छेद आहेत ते इथे द्यावेत असे मनात आहे.
खूप चांगली सुरुवात केलीस.>>>>शशांकजी ते सगळे परिच्छेद या धाग्यावर आपण एकत्र करू शकतो.
त्यांच्याच आसमंत पुस्तकातली
त्यांच्याच आसमंत पुस्तकातली एक गमतीशीर घटना..ते सिंहगडाखालच्या दरीत त्यांची आवडती 'इजिनेशिया' वनस्पती शोधत हिंडत होते. पुढची घटना त्यांच्याच शब्दांत...
'जंगलाच्या कडेला एका घाणेरीच्या झुडपामध्ये एक निळं जांभळं लहान फूल मला दिसलं. दुरून ते फूल मला 'ब्लेफॅरिस' या डिसेंबर महिन्यात फुलणार्या वनस्पतीचं वाटलं. दोन महिने आधीच फुललेलं एकटं फूल पाहून मला आश्चर्य वाटलं. शिवाय नेहमी जमिनीलगत दिसणारं हे फूल झुडपात उंचावर कसं पोचलं याचा तर्क लढवत मी त्याच्याजवळ पोचलो. भिंगातून फूल निरखून पाहेपर्यंत फूल असलेली काडी आडवी हलली आणि मी किंचाळून मागे फेकला गेलो. कारण ते फूल नव्हतंच! फुलाचं चित्र छातीवर रंगवलेला एक भयानक दिसणारा किडा घाणेरीच्या काडीखाली लोंबत होता. त्याचं लांब शरीर घणेरीच्या काडीसारखं पिवळसर तपकिरी होतं. मान,छाती आणि पुढचे पाय यांच्या पेरातून निळं फूल उमललं आहे असं दृष्य दिसत होतं. पारदर्शक पंखांवरची तपकिरी जाळी सागाच्या वाळलेल्या पानाची हुबेहूब नक्कल करत होती. तोंड त्रिकोणी निमुळते, डोळे बटबटीत आणि कपाळावर तपकिरी पिसांसारखी लांब मिशांची जोडी! त्यामुळे त्या कीटकाचा चेहरा परग्रहावरच्या प्राण्यासारखा विचित्र दिसत होता. मी तो जवळून पाहिला म्हणून मला भितीनं घाम फुटला.
पुढच्या पायाची कोपराप्रमाणे घडी घालून नमस्कार करण्याचा पवित्रा घेणार्या या किड्याला 'प्रेइंग मँटिस' हे नाव आहे. मराठीमधे याला 'खंडोबाचा घोडा' किंवा शब्दश: भाषांतरातून 'प्रार्थना-कीटक' असं ओळखतात.'
जिप्सी, नुसते आसमंतच नाही तर
जिप्सी, नुसते आसमंतच नाही तर वृक्षगान, हिरवाई, चितमपल्लींची सर्व पुस्तकं वाचलीस तर असाच वेडा होशील.
शशांकजी, खरंच या पुस्तकाने
शशांकजी, खरंच या पुस्तकाने मोहिनी घातलीय. जर यातील परिच्छेद लिहायला घेतले तर अख्ख पुस्तकच टाईप करायला लागेल.
हिरवाई सुद्धा घ्यायला गेलो
हिरवाई सुद्धा घ्यायला गेलो होतो पण मॅजेस्टिकमध्ये नव्हते. वृक्षगान आहे.
असं आहे खरं!
असं आहे खरं!
वृक्षगानची प्रस्तावनासुद्धा
वृक्षगानची प्रस्तावनासुद्धा खूप मस्त आहे. पुस्तक घेतलं असशील तर वाचशीलच म्हणा!
पुस्तक घेतलं असशील तर वाचशीलच
पुस्तक घेतलं असशील तर वाचशीलच म्हणा!>>>>येस्स्स
मला वाटतं हिरवाई out of print
मला वाटतं हिरवाई out of print असेल. (so refer to Dineshdaa...) कारण डॉ. रवी बापट (डॉ. डहाणूकरांचे सहकारी) कदाचित दिनेशदांच्या ओळखीचे असू शकतात. आणि त्यांच्याकडे त्याच्या कॉपीज मिळू शकतील.
मी मॅजेस्टिकमध्ये चौकशी केली,
मी मॅजेस्टिकमध्ये चौकशी केली, त्यांनी १-२ आठवड्यात येईल म्हणुन सांगितले आहे.
जिप्स्या, तू या वेळेला रोज
जिप्स्या, तू या वेळेला रोज ऑनलाईन असतोस का?
नाही, आजच आहे. आज तब्येत ठिक
नाही, आजच आहे. आज तब्येत ठिक नसल्याने ऑफिसला गेलो नव्हतो.
मॅजेस्टिक मधे डॉ. डहाणूकरांचे
मॅजेस्टिक मधे डॉ. डहाणूकरांचे फुलवा पुस्तक आहे का किंवा मिळेल का हे विचारशील का? आम्हाला ते काहीही करून पाहिजेच आहे.
मॅजेस्टिक मधे डॉ. डहाणूकरांचे
मॅजेस्टिक मधे डॉ. डहाणूकरांचे फुलवा पुस्तक आहे का किंवा मिळेल का हे विचारशील का?>>>>नक्कीच. मी उद्याच चौकशी करतो आणि कळवतो.
तब्येत ठीक झाल्यावर गेलास तरी
तब्येत ठीक झाल्यावर गेलास तरी चालेल. काळजी घे.
नक्कीच
नक्कीच
आठवडाभर मी येथे येवु शकले
आठवडाभर मी येथे येवु शकले नाही, तर आज मला किती वाचावे लागले? पण सगळं वाचून काढलं.
नेहमीप्रमाणेच सर्वांचेच फोटो, माहिती फार छान !
कमाल आहे हा धागा. किती छान
कमाल आहे हा धागा. किती छान आणि नवीन नवीन माहिती मिळत राहते..
जागू, स_सा, दिनेशदा, साधना, चिमुरी, पुरंदरे शशांक, जिप्सी, शोभा १२३ : धन्स !!! (पान नं १२ च्या फुलांवरच्या कमेंट्स बद्दल ) हे फोटो मी माझ्या sony ericsson मोबाईल वर काढले आहेत. छान आहे ना क्वालिटी त्यामानानी ?
@पुरंदरे शशांक : हे फोटो मी लंडन च्या 'Croydon' नावाच्या सब अर्ब मधे काढले आहेत. 'South Norwood Lake' जवळ.
अजून एक छान रोपटं दिसलं Tower Bridge (Central London मधे) च्या रस्त्यावर. हिरवं देठ, हिरवी पानं आणि हिरवी च फुलं
आणि ही फुललेली फुलं :
शकुन हिरवं झाड मस्तच
शकुन हिरवं झाड मस्तच
जिप्सी, शशांक दोन्ही उतारे
जिप्सी, शशांक
दोन्ही उतारे मस्तच आहेत. धंन्यवाद
शकुन
Tower Bridge पासच फुल छानच
सुधीर
शकुन, खुप सुंदर आहेत फुले हि.
शकुन, खुप सुंदर आहेत फुले हि. हिरवा रंग निवडलेली फुले फारच कमी. पाकळ्या
म्हणजे, आकार आणि रंग बदललेली पाने असे म्हणतात. पण इथे रंग बदललेला दिसत नाही. भारतात म्हणजे उष्ण हवामानात जर हे झाड असते, तर यांना नक्कीच
सुगंध असता. (उदा. हिरवा चाफा )
दोन्ही उतारे सुंदर आहेत!
दोन्ही उतारे सुंदर आहेत! शकुन, हिरवी फुलं मस्तच!
शकुन काय मस्त फुले आहेत. आणि
शकुन काय मस्त फुले आहेत. आणि कॅमेराही
जिस्पी मलाही घ्यायचीत ही पुस्तके. माझ्याकडे आसमंत, ऋतुरंग आणि सह्याद्रीवरचे एक पुस्तक आहे. पण इतर नाहीयेत. शिवाजी पार्कच्या मॅजेस्टिकमध्ये मिळाली ना तुला? आता मलाही एक फेरी मारायला पाहिजे.
जिप्सी, सुरेख उतारा आहे.
जिप्सी, सुरेख उतारा आहे. पुस्तक वाचायलाच हवं आता .
हिरवी फुलं मस्तच !
किती गप्पा झाल्या बापरे.
किती गप्पा झाल्या बापरे. सावकाश वाचेन.
Pages