एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टिळा वाकडा झालाय, सरळ कर म्हणून का? तिच्या खाणाखुणा तशाच होत्या.... आता इतक्यावेळा सांगण्यासारखं तेही खुणेने- असं काय होतं त्यात?

टिळा म्हणजे काय टिकली आहे, सरळ करायला??? आईचे पण काहीतरीच... Happy

अंगठी छान आहे मुक्ताची. तिच्या आशिकने पायाखाली लपवली होती तेव्हा छान दिसली. आजींना ओरडायला काय झाले होते अचानक? Uhoh 'आता आपला साखरपुडा झाला की' ही जाणीव मस्त दाखवली दोघांनी चेहर्‍यावर.
मध्ये एकदा आजींचा वडापाव सीन आणि सुनांनी साडी आणली तो सीन पाहिला. चांगल्या बेरकी आहेत की Lol रेखा हीरॉइन असताना अगदी सोज्ज्वळ भूमिका करत असत. आता त्यांना अशी भूमिका करताना पाहणं म्हणजे मजा वाटते Happy

मोठ्या थाटामाटात साखरपुडा करायचा होता ना? कुठे होता थाटमाट. सगळे घरचेच लोक होते. आत्याबाईचा एक्स नवरा सोडला तर. घनश्यामने आपल्या ऑफिसातल्या लोकांनाही बोलावले नाही? राधाच्या आत्याच्या घरचे लोक दाखवणे परवडत नाहीत की काय निर्मात्याना?

घनश्यामने आपल्या ऑफिसातल्या लोकांनाही बोलावले नाही? >> तो ऑफिसला जातोच कुठे?? सतत आपला घरात बसलेला असतो....

राधाच्या आत्याच्या घरचे लोक दाखवणे परवडत नाहीत की काय निर्मात्याना?>> इंदोर ते मुंबै खर्च झेपत नसेल बै.... Happy त्या एकट्याच पुरेश्या आहेत....

कालच्या एपिसोड मध्ये पण सुमो (सुकन्या मोने) ने डोळे हे मोठ्ठे केले. शेवटी मुक्ता तिला म्हणाली "रागवू नकोस!" ...
आजी मध्ये नेमकं अंगठी घालण्याच्या वेळेस "श्यामराव" असे का ओरडते काही कळायला वाव नाही. पण जाम हसायला आले. Happy
एडिटिंग आणि सीन्स ची जोडणी जाम वाईट केले होते कालच्या भागाचे! राधाच्या बाबांचा मान जेव्हा घनाचे बाबा करतात तेव्हा त्यांच्या कपाळाला टिळा लावला होता. नंतर मध्येच तो टिळा त्यांच्या कपाळावरून गायब होता. परत अंगठी घालण्याच्या सीन मध्ये टिळा अवतरला आहे. घनाचे कुंकू मध्ये वाकडे झाले म्हणून भाटेबाई खाणा-खुणा करून सरळ करायचे सुचवतात. नंतर कोण जाऊन सरळ करते माहीत नाही , पण कुंकु अचानक जरा लहान होते. Uhoh

एक गोष्ट मात्र आवडली. मुलीला ५ सवाष्णी ओवाळण्याचा एक विधी असतो. तेव्हा आधी घनाची आत्या यायला कबूल होत नाही, तर घनाचे बाबा तिला हक्काने यायला सांगतात. टिपीकल सास-बहु टाईप सीरीयलींसारखे विधवा किंवा घटस्फोटित स्त्रियांना असे अधिकार देऊ केल्यानंतर जो गहजब व तमाशा दाखवतात त्याला फाटा दिला आहे, हे पाहून बरे वाटले.

राधाचा तो आशिक जाम बोर करतोय. Sad
घनाच्या घरातल्या सर्व लोकांबद्दल माझ्या आईचे उद्गार "सोंगं आहेत एक एक!" Lol

कालच्या भागातला मुक्ताचा ड्रेस असा काय होता? करड्या रंगाचा टॉप, जांभळी ओढणी , पिवळट - केशरी सलवार (की पटियाला)!!! बेक्कार काँबी Uhoh

घनाची आत्या यायला कबूल होत नाही, तर घनाचे बाबा तिला हक्काने यायला सांगतात. >>> खरेतर आत्याचा रोल पाहता, तिथे ताट घेऊन मीच प्रथम करणार असा तिला शोभलसा पवित्रा घ्यायला पाहिजे. इथे दिग्दर्शक गंडला की काय? Happy
सुमो - लोल

अय्या निंबुडा! या मालिकेत मुक्ताचे कपडे एकदम मस्त आहेत असं मी सकाळीच इकडे लिहिणार होते. पण राहून गेलं आणि मग विसरून गेले ती थेट तुझी पोस्ट वाचून आत्ता आठवलं. Happy

मला कॉटन/ पेस्टल रंग/ फ्लॉरल प्रिंट आवडतात म्हणून कदाचित मला तिचे कपडे भावले असतील. मुंबई-पुणे-मुंबईमधला तिचा स्कर्टही मला आवडला होता Happy

या मालिकेत मुक्ताचे कपडे एकदम मस्त आहेत असं मी सकाळीच इकडे लिहिणार होते. >> मला पण आवडले. मराठी सिरियलमधल्या टिपिकल सलवार-कुर्त्यांपेक्षा वेगळं ड्रेसिंग आहे तिचं. मेकअप गंडतो बर्‍याचवेळा, पण ड्रेसेस छान आहेत. ( गुंतता.... पाहिल्यावर जास्तच जाणवतं.) Costumes कोणी केलेत बघायला हवं.

निंबूडा , अगदी १०० % अनुमोदन Happy .

Mukta_0.jpg
हा ड्रेस बघून मी चक्रावलेच होते , क्षणभर वाटलं जोगवाच्या सेटवरून मुक्ता इकडे आली की काय Uhoh . मी पर्सनल कमेंट्स करत नाहीये , पण तिचा ह्या सिरीयलचा वेशभूषाकार बदलायला हवाय , तिचं केसाला रूमाल बांधणं सुद्धा बंद करा असं सांगेन मी . तिची अ‍ॅक्टिंग इतकी सुंदर आहे , त्याला साजेसे कपडे दिले तर काय हरकत आहे . ह्या उलट सुकन्याच्या साड्या मला आवडतात , मंजूषा दातार सुद्धा स्वतःला मस्त कॅरी करते Happy .

कुर्त्याचा कलर जांभळा आणि ओढणीचा काळा आहे. मी रंगांची गल्लत केली का मागच्या पोस्ट मध्ये. Sad पण हे दृश्य कालच्या एपिसोडचे वाटत नाहीये. Uhoh ती मागची निळी कार मागे ते एकत्र खरेदीला जातात तेव्हा होती ना? पण तरीही हे ही विचित्रच काँबी आहे.

संपदा गं संपदा अगं संपदा गं संपदा
अश्या कश्या विरोधी ह्या पोस्टी आहेत आपुल्या गं आपुल्या Proud

अग्गं हाच सध्याचा ट्रेंड आहे - मिक्स न् मॅच Happy आणि मुक्ताच्या फिगरला हे असे कपडे मस्त दिसतात. Happy

'फॅब' 'बॉम्बे स्टोअर' आणि 'इदर ऑर्'च्या डिसप्ले मधे डोकावा. सध्या अशी भलभलती कॉम्बिनेशन इन आहेत.

मिक्स न् मॅच >>> हे असलं??? मिक्स न् मॅच मध्ये पण निदान एका रंगाची थीम तरी कॉमन ठेवतात ना. पन इथे तिन टोटल ३ वेगवेगळे रंग... एकमेकांसोबत मिसफिट वाटतील असे. Uhoh

निंबे , वरचा फोटो लास्ट वीकमधला आहे , हा बघ कालचा Happy

Mukta1.jpg

मंजू गं मंजू गं मंजू मंजू मंजू गं , काय मी करु Wink , ह्या फॅशन ला मी वाईट म्हणत नाहीये , तिचे जे काँबोज आहेत , ते फार विचित्र वाटताहेत . काय आहे ना , की मला आता भारताबाहेर राहून असं बघायची सवय राहिली नाहीये Wink . कुछ तो लोग कहेंगे मधल्या निधीचे कुर्तीज कसे व्हायब्रंट असतात , बघूनच मस्त फ्रेश वाटते . इथे मुक्ताकडे बघितलं की ढेपाळल्यासारखं वाटतं . तिची अ‍ॅक्टिंग आपल्याला खिळवून ठेवते ती गोष्ट वेगळी Proud

संपदा Wink

ती घरी एक पांढरा लखनवी कुर्ता घालते, तो तर एकदम क्लास आहे. कपड्यांबरोबर तिच्या अ‍ॅक्सेसरीजही मला आवडल्यात. साडीत ती चांगली नाही दिसणार असं मला वाटत होतं, पण एकदम मस्त दिसत होती. Happy

आत्तापर्यंत ती सर्वात क्लास साडीत दिसलीये Happy , आय अग्री Proud . पण घरी तो एकच पांढरा लखनवी कुर्ता घालतेय Wink

घ्या. मीपण माझी पिंक टाकुच का? Proud
संपदाला अनुमोदन. ती जुल्फे आवरा अरे काय हे. साधी किती छान दिसते ती. रुमाल काय त्या साठोत्तरी नायिकांसारखा. सुकन्याच्या साड्या सु रे ख आहेत. कलकत्ता कॉटन ? आणि त्यांचा साईज पाहुनसुद्धा कॉटनच्या साड्या काय सुंदर दिसतात. क्लासी.

पण मंजू म्हणिंग राईट. भारतात हल्ली फार चित्रविचित्र कपडे घालतात.

मटार फार बोर. जरा दुसर्‍या भाज्या निवडा की राव. साधना म्हणते तसेच असणार. निव्वळ मटार स्वस्त म्हणून.

अरे लोक्स!!!!!! मी हेच लिहायला आले होते, की मुक्ताचे ड्रेस कॉम्बोज पाहून अगदी अस्वस्थ व्हायला होते वरचे दोन्ही ड्रेसेस अज्जिबात आवडले नाहीत... असा जर ट्रेन्ड हल्ली आलेला असेल तर वाईट्ट आहे तो आणि कालचा स्वप्निलचा शर्ट जिन्स (मुक्ता सोबतचा) पण नाही आवडला. इला भाटेची ती साडी तिला छान दिसते, पण कितीवेळा दाखवणारेत तिच ती? Uhoh

आणि मटार हे पण सिरियलमधलं एक पात्रच असावं इतका अविभाज्य घटक होऊन बसलंय... Lol

आणि त्या एवढ्या मोठ्या किचनमध्ये गॅस का म्हणून असा मध्यभागी अरुंद ओट्यावर ठेवलेला असतो कायम? मान्य आहे, की स्वयंपाक करणारी लोकं आणि डायनिंग टेबलवर बसून गप्पा मारणारी लोकं दाखवायला बरं पडतं... पण खरं नाही वाटत ते. अशी गॅसची पोझिशन ठेवून स्वयंपाक करणं किती जिकिरीचं काम आहे. तो प्रसंग पाहतांना माझं डायलॉग्जकडे लक्षच नव्हतं काल Proud
ELDG.jpg

एकूण कालचा एपिसोड महाबोर!

आणि एक... परवाच्या(की त्या आधीच्या) एपिसोडमध्ये स्वप्निल मुक्ताशी आयफोन/ एचटीसी- तत्सम मोबाईलवरुन बोलत असतो. तो सीन एका शॉटमध्ये पूर्ण नसेल झाला बहुतेक... कारण पहिल्या सीनमध्ये तो बोलत असतांना मोबाईल स्क्रिनवरचे आयकॉन्स स्पष्ट दिसत होते, नंतर फोनवर बोलतांना दिसते तशी नॉर्मल निळी स्क्रिन आणि एकदा ब्लॅन्क स्क्रिन असे वेगवेगळे डिस्प्ले दिसले. Lol

आईशप्पथ किती बारीक बारीक गोष्टींचं अ‍ॅनॅलिसिस! मुक्ताचे ड्रेसेस काय, गॅसची पोझिशन काय, फोनचा डिस्प्ले काय! तुम्हा सर्वांना दं आणि ड आणि व आणि त!
स्वप्नीलच्या शर्टच्या पाठीवर ते प्रिंट पाहून मलाही क्षणभर वाटलं खरं की असा काय टपोरी शर्ट घातलाय यानं!

>> आणि मटार हे पण सिरियलमधलं एक पात्रच असावं इतका अविभाज्य घटक होऊन बसलंय.. >> Rofl खरंय! आळीपाळीने मटार सोलताहेत! आणि काल तर अगदी त्या मटारावर तत्त्वज्ञानही! कालचा एपिसोड खरंच बोअर होता. कथा कणभरच पुढे सरकली! राजवाडेको ये क्या हुई?

पळून जायचा बाँब टाकला ना शेवटी? फुटतो का बघायचं.
वर्‍हाडी आणि वाजंत्री या चित्रपटार विक्रम गोखले आणि इंदूमती पैंगणकर हे वरवधू (कानडीने केला मराठी भ्रतार) वरपक्ष वि वधूपक्ष अशा लग्नातल्या तुंबळ युद्धाला कंटाळून लग्नाआधी पळून गेले होते. गदिमा कानडी वधुपित्याच्या भूमिकेत होते. कोंकणी वरपिता राजा परांजपे असणार.

कालच्या सिरियलमधला एकच सीन पाहिला. त्यात घनाची आई अगदी लाडेलाडे राधाच्या वडिलांना 'आम्ही जाहिर करू हा की तुम्ही आमच्या मुलाला हुंडा देताय' असं काहीसं म्हणत होती. मी मातृदैवताकडे पाहिलं तेव्हा तिच्या चेहेर्‍यावर 'कुठल्या ग्रहावरून आलीये ही बाई' टाईप्स भाव होते.

तुम्ही रामसे बंधूंचे पिक्चर्स पाहिले आहेत का? (नसतील तर अवश्य पहा - पुराना मंदिर, तहखाना, विराना, बंद दरवाजा वगैरे वगैरे). त्यात चिक्कार मेकअप थापलेल्या आणि सांधे आखडले असावेत अशी शंका उत्पन्न करत चालणार्‍या भूत्/सैतान आदी प्रकारांमुळे लोक घाबरून थेटरात बेशुध्द पडतील अशी कल्पना करून घेऊन मध्येमध्ये कॉमिक रिलिफ पेरलेला असायचा. तो ओव्हर-द-टॉप असायचा. मला 'एका लग्नाची गोष्ट' पहाताना अशी शंका येते की झीवरच्या बाकी सास-बहू टाईप्स सिरियलवर जालीम उतारा हवा म्हणून किंवा त्यापेक्षा आमची सिरियल वेगळी आहे असं दाखवायच्या नादात एपिसोडसमध्ये थोडा अतिविनोद होतोय किंवा कॅरॅक्टर्स/सिच्युएशन्स ओव्हर-द-टॉप होताहेत.

स्वप्ना, तुझी विश्लेषणं भारी असतात बुवा. वरची पोस्ट अगदी मनापासुन पटली. Happy तो रामसे बंधुंचा पॅरा तर कहर. कसलं अचुक मांडलं आहेस. Lol

मेकअप मात्र खरंच जास्त होतोय.
सगळ्यांना ओव्हर अ‍ॅक्टींग करायला सांगितलंय असं वाटतंय. विनय आपटे जरा नॉर्मल वाटतो....बाकी सगळे विनोद करण्याच्या नादात नुसते सुटले आहेत.

मला पण नाही आवडली मुक्ताची स्टाइल, साड्या पण नाही आवडल्या अत्ता पर्यंत दाखवलेल्या Sad
विग लावल्या सारखे केस आणि चमकी + विचित्रं आकाराचे कुर्ते+ विचित्रं काँबोज.
ब्राइट कलर्स मधे व्हॅरिएशन मला आवडतं अ‍ॅक्चुअली म्हणजे केशरी + गुल्बाक्षी+हिरवा वगैरे.
पण पेस्टल मधले ३ ऑड कलर्स मला नाही आवडले बघताना.
घरात ती कायम एकच व्हाइट लखनवी टॉप का घालते Uhoh

Pages