एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए भुंग्या, तिला भरल वांग म्हणायच काम नाही. तिचं 'कब्बडी कब्बडी' किंवा 'फायनल ड्राफ्ट' बघ.
सगळ्याच चवळीच्या शेंगा काय कामाच्या नसतात Wink

शुभे मुक्ता बर्वे आवडणार्‍यांच्या रांगेत मी पण बराच पुढे उभा आहे........ Wink

आणि मी तिला भरली भोपळी मिरची म्हणालोय.... लोकांना वांगं का वाटतेय बर Rofl Biggrin

कोणीतरी वर स्वप्नीलला भरलं वांगं म्हणालं म्हणुन्न मी मुक्ताला भरली भोपळी मिरची म्हणालो. Proud

>> लोकांना वांगं का वाटतेय बर

अरे, भोपळी मिरची, भरलं वांगं या भकारांत 'भुंगा'चीही भर पडत असल्याने भौतेक लोक भैसटलेत! Wink

मुक्ता त्या घरच्यांना भेटण्याच्या प्रसंगात छान दिसत होती (नोज रिंग काढुन टाकली वाटते)

लग्न मोडल तरी घरी माहीत नाही..?

आत्या ही आसावरी जोशी आहे?

काय भयानक दिसते..

कालचा मुक्ताचा अभिनय कसला सुपर्ब होता . इला भाटे तिला हळदी कुंकवाला नेण्यासाठी म्हणून घरी येते . विनय आपटेने ती येणार हे मुक्ताला सांगितलेले नसते . तिच्या चेहर्‍यावरचे भाव प्रत्येक वाक्याला झरझर बदलत होते . ( मी मुक्ताची जब्बरदस्त फॅन आहे Proud )

<< वेडी होशील! डब्बल पंखा होशील.

है शाब्बास !! तू ऑलरेडी वेडा झालेला दिसतोयस Wink Proud ( दिवा घे हं Happy )

ह्म्म्म नाही. साडीत भारी दिसली आज. [आता इथं साडीच भारी असा भारी ड्वायलॉग कुणी मारू नये! जो मारेल तो येडा] कलिजा खल्लास झाला.

त.टी. आता साडीत कुणीही भारी दिसेल म्हणा पण म्हणून लग्गेच उद्या पुश्कर श्रोत्रीला आणू नका मालिकेत Wink

Light 1

>> साडीत अशक्यभारी अप्रतिमसुंदर दिसल्ये मुक्ता आज

उत्सुकता वाढलिये. Happy

मी तर तिचा 'हम तो तेरे आशिक है' पासूनच फ्यान आहे. "खुपते तिथे गुप्ते" मध्ये ती आली होती तेव्हापासून डब्बल ट्रिपल फ्यान झालोय!

आजच्या एपिसोडातली मुक्ता बर्वे मस्त्...विनय आपटेही मस्त्...एका लग्नाची दुसरी गोष्ट मस्त....बर्‍याच दिवसांनी एक निखळ व हलकी फुलकी सिरिअल पाहिल्यासारखे वाटले.

बर्‍याच दिवसांनी एक वेगळी मालिका बघायला मिळते आहे. कदाचीत त्यामुळेच आवडली पण आहे. रहस्य नसल्यामुळे राजवाडे साहेबांना वाटोळे करायला वाव पण नाहीये त्यामुळे बघायचा धीर होतोय.

एकंदरीत मालिका स्टारवरच्या 'ससुराल गेंदा फुल' च्या वाटेने जाणार असा रंग दिसतोय.

दिपका, तुझा कलेजा खल्लास झाला पण तिकडे त्या गोलगप्प्याच्या तोंडात चार माश्या गेल्या मुक्ताला अप्रतिमसुंदर साडीत आणि तेही त्याच्याच घरात बघुन Lol
मुक्ता रॉक्स. तिचा चेहराच ८०% अभिनय करतो. तो स्वप्नील मात्र कैच्याकै, कृष्णाच्या नंतर त्याला कुठल्याही रोलमधे बघताच येत नाही मला

कृष्णाच्या नंतर त्याला कुठल्याही रोलमधे बघताच येत नाही >> कृष्णाची भूमिका केल्यानंतर आपण खरोखरीचे कृष्ण आहोत असा त्याला भ्रम झालाय.

प्रमुख पात्रांबाबत केदार आणि भुंगा +१.
दोघेही बेढब वाटतात आणि त्या भूमिकेच्या वयापेक्षा जास्त प्रौढ.

ती स्पाईकी केशरचना कसली बकवास दिसते. स्वप्नील नुसता बरा दिसेल की त्या स्पाईक्सशिवाय..
आणि त्याच्या खोलीत तो यशचोप्राकॉपीराईट लाल बॉल आणि सायकल का होती म्हणे? किती फनी होते ते.

काळी साडी आणि मुक्ता Sad तिला ती 'जुल्फें' केशरचना सूट नाही होत.

तिच्यापेक्षा भाटेकाकु जास्त परिणामकारक वाटल्या. विनय आपटे कमाल नाटकी तरीही तो 'त्या भाबड्या बाईला मी दुखावणार नाही' वाला डायलॉग मारतो ते मस्त वाटले.

विनय आपटे... अतीच सहजसुंदर अभिनय Happy
कटाक्षाने फॉलो करते आहे मी ही सिरिअल.. कित्येक वर्षांनी टिव्ही वर अशी एखादी सिरिअल फॉलो करते आहे
अजून पर्यंत तरी धमाल सुरू आहे

स्वप्नीलच्या आईचा रोल फारसा आवडत नाही आहे (आय मीन अ‍ॅक्टींग Sad )

ती स्पाईकी केशरचना कसली बकवास दिसते. स्वप्नील नुसता बरा दिसेल की त्या स्पाईक्सशिवाय..
>>>>>>>>>>>>>>>>>>>>

रैना,

तुला "स्पाईकीकेशरचना नुसती बरी दिसेल स्वप्नीलशिवाय" असं तर म्हणायचं नाही ना Proud Biggrin

स्वप्नील मुक्ता घोड-नवरा व घोड-नवरी म्हणून शोभतात ना....कमनीय नसले तरी नॉर्मल नक्कीच वाटतात. आजुबाजूला असे अनेक जण सापडतील की आजकाल....लग्नाचे वय उलटून गेलेले, करिअर मधे रमलेले व स्वत:च्या दिसण्याबाबत बर्‍यापैकी बेफिकीर असेच पात्र आहे त्यांचे ...त्यामुळे मिसफिट नाही वाटले. मुक्ता मुळात सुंदर नसली तरी तिच्या अभिनयामुळे सुंदर वाटायला लागते हळूहळू.....अतिशय सहज अभिनय करते ती.

काळी साडी आणि मुक्ता तिला ती 'जुल्फें' केशरचना सूट नाही होत.>>> ह्म्म्म खरे आहे! + ती चट्टेरी बॅगही यक्क एकदम Sad आणि 'साडी सावरणं कठिण' ह्या डायलॉग नंतर कसा काय जातो तोल?

दोघेही बेढब वाटतात आणि त्या भूमिकेच्या वयापेक्षा जास्त प्रौढ>> आता लग्नाचं वय उलटून गेलेले कॅरॅक्टर रंगवायचं म्हणजे असं दिसायला नको का? + ७२ / ६५ का काय ते जोडीदार रिजेक्ट केलेले म्हणजे वय व्हायचंच की... की लग्नाचं असं वय नसतंच?

Proud

आज मुक्ता अभिनय मस्त झाला... वडीलांशी बोलताना चा तर भारीच होता...सहज रोज बोलावे अश्या पध्दतीने अभिनय केला आहे...

झोका आणि प्रपंच नंतर ची पहीली मराठी मालिका आवडली...

कालचे संवाद मस्त होते. मुक्ता - विनय आपटे यांची जुगलबंदी बघायला मजा येतेय.
काल मोहन जोशी पहिल्यांदाच जाणवले.

आजचा भाग पाहिलात का? ग्लोबल वॉर्मिंग आणि काळी मुंगी पाहून मला माप्रांची खूप आठवण आली. Biggrin पसं ओळखा सोडवायला भाटेबाई हव्या होत्या इथे. Proud

घनश्याम आणि राधा यांना एकमेकांबद्दल काहीच वाटत नाही आहे. लग्न हा त्यांच्यासाठी एक नावडता, जबरदस्तीने करायचा प्रोजेक्ट आहे आणि दोघे एकमेकांचे टीममेट्स.
पण काल जसा साखरपुडा दोघांच्या गळी उतरवला; तशीच जर मालिकेची थीम असेल तर मज्जा नाही. दोघांचा मनमोहन सिंग होऊन जाईल.

Pages