Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28
कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या नाखूष काकूंची भूमिका
त्या नाखूष काकूंची भूमिका लीना भागवत करतेय.
इला भाटे रंगवत असलेले कॅरॅक्टरच अघळपघळ असल्याचे दाखवलेय. कालच्या भागात साखरेचा डबा फ्रीजात ठेवला होता. तेव्हा आता 'त्या' कपड्यांच्या घड्या बदल्या.
राधाच्या बॉसचा टोन ती फुलराणीतल्या अविनाश नारकर टाइप वाटला.
या मालिकेत विक्षिप्त पात्रांची दाटी आहे. सतत काव्याळणारी (विव्हळणारीच्या चालीवर वाचावे) तरुणी, समाजसुधारक कॉलेजयुवक, शब्दकोड्यात पडलेले वडील,
आजीबाई, राधाचे वडील (तो सायकलचोरीचा प्रसंग 'आज आपण वेडा वेडा खेळुया' वाटला..) त्यात आता राधाच्या आत्याबाईंची भर पडेल. मालिका हलकीफुलकी, खुसखुशीत करण्याच्या नादात खायचा सोडा जास्त पडलाय.
घनश्याम अमेरिकेला जायचेच म्हणून लग्नाला नाही म्हणतो यापेक्षा चांगले कारण हवे होते. लग्नाचे वय उलटायला आले तरी अमेरिका काही त्याला बोलवत नाही आहे.
स्वप्निल जोशी त्या जिन्स मधे
स्वप्निल जोशी त्या जिन्स मधे कोंबून भरलाय असं वाटत होतं. कसा काय होकार झालाय दोघांमधे?
>>>>>>>>>>>>>>>>>>>>
कारण मुक्ता पण कोंबूनच भरल्यासारखी वाटते......
भरलेलं वांगं आणि भरलेली भोपळी मिरची
भरलेलं वांगं आणि भरलेली भोपळी
भरलेलं वांगं आणि भरलेली भोपळी मिरची >>. खरं आहे. तो तीन मुलांचा मध्यमवयीन बाप अन ही दोन मुलांची थोडीशी तरुण आई वाटते. फिजिक / पोश्चर बद्दल थोडेही का नाही वाटत ह्या नट नट्यांना? असो. मुक्ता मला अभिनयामुळे आवडते त्यामुळे काही पार्ट बघितले इथली चर्चा बघून. पण सगळी गंमतच वाटतेय.
>>सायकल चोरीला गेली हे झेपलं
>>सायकल चोरीला गेली हे झेपलं नाही. एवढ्या मोठ्या घरात सायकल [नीट मावली असती] ठेवता आली नसती?
अगदी, अगदी, पण चोर चांगला घराबाहेर होता ना? त्याला घरात बोलावून चहा द्यायला दरवा़जा उघडला का ह्या लोकांनी? कैच्या कैच प्रसंग होता तो.
>>तो परवाचा भाग होता. राधा(मुक्ता)चे वडिल(विनय) त्या आधीच्या भागात राधाच्या बॉसला ऑफिसमध्ये येऊन भेटतात आणि लेक मुलगा पहायला तयार नाही, म्हणून तुम्ही तरी काहीतरी समजवा, असं सांगतात ना?
अरे बापरे! वडिलही महान आणि तो बॉसही महान.
>>त्या जिन्यावरच्या प्रसंगात मुक्ताचा अभिनय आवडला. एकुलत्या एक मुलीची व्यथा कि आपलं लग्न झाल्यावर बाबांचं कसं होणार हे नीट कळतंय तिच्या वागण्यातून
मला तर तो पूर्ण संवाद जाम आवडला. फक्त 'आपलं लग्न झाल्यावर तुमचं कसं होणार' हे लॉजिक आई-वडिलांसमोर कधीही वापरू नये. कारण ह्यावर 'आम्ही काय, आज आहोत, उद्या नाही' हे वाक्य वेगवेगळ्या चालीवर ऐकावं लागतं. त्याऐवजी असं सांगावं 'ह्या मुलाबरोबर मी अख्खं आयुष्य काढू शकेन असं मला वाटत नाही. एक साधी साडी घेताना तू दहा दुकानं फिरतेस, नाही आवड्ली तर दुकानदारने किती साड्या दाखवल्या ह्याची पर्वा न करता तिथून उठतेस. उठतेस की नाही? मग हा तर माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. बरं, घेतलेली साडी आवडली नाही तर बोवारणीला देता येते. नवर्याचं तसं करता येतं का तूच सांग" ह्या मुद्द्यावर १०० तले ९९ टक्के काहीही उत्तर येत नाही
माझे बुध-गुरु दोन्ही भाग चुकले. आई-वडिलांनी आणखी स्थळं पाहू नये म्हणून त्यांनी आपण लग्नाला तयार असल्याचं सांगितलंय का ते खरंच लग्न करणार आहेत?
स्वप्ना, __/\__ आधीच भेटली
स्वप्ना, __/\__ आधीच भेटली असतीस तर तुझाच सल्ला घेतला असता. वेळ गेली गं.
भरलेलं वांगं आणि भरलेली भोपळी
भरलेलं वांगं आणि भरलेली भोपळी मिरची
विनय आपटेंची रिअॅक्शन सहीच होती ना या दोघांचा होकार ऐकल्यावर
स्वप्ना ग्रेट आहेस. नुकतीच यातून गेलेली दिसतेस
भुंग्या, मुक्ताला ढोबळी
भुंग्या, मुक्ताला ढोबळी मिर्ची म्हणालास त्यामुळे तुझा जाहीर निषेध. पुढच्या गटगच्या वेळेस आवाजी मतदानाने तुझं डिपोजिट जप्त करण्यात येईल.
स्वप्ना_राज >>>मस्त्च
स्वप्ना_राज >>>मस्त्च
काय लोक आहेत! इतकी ढोली आहे
काय लोक आहेत! इतकी ढोली आहे का मुक्ता? तुम्हाला काय फक्त झिरो फिगरच्या मरतुकड्या हिरविणीच आवडतात की काय?
सानी, ये गं माझ्या आणि
सानी, ये गं माझ्या आणि कौतुकच्या कंपुत. जsरा कुठे खात्यापित्या घरची आहे पोरगी तर बघवत नाही या लोकांना. त्या टेडी बेअर सारख्या ठासुन भरलेल्या स्वप्निलला काहीही म्हणा. मुक्ता गोड आहे.
भुंग्या, कौशिला तुझी पोस्ट दाखवुन काडी लावण्याचं काम माझंच.
मग काय तर मने!
मग काय तर मने!
>>त्या टेडी बेअर सारख्या
>>त्या टेडी बेअर सारख्या ठासुन भरलेल्या स्वप्निलला काहीही म्हणा.
अरे त्या टेडी बेअरला कशाला रे मध्ये आणताय? ते निदान क्यूट तरी दिसतं. स्वप्नील जोशी सालं काढलेला नारळ कलिंगडावर ठेवावा तसा दिसतो
भुंग्या त्या वाक्याबद्दल तूझा
भुंग्या त्या वाक्याबद्दल तूझा डब्बल निषेध..
मला मुक्ता बर्वेचा अभिनय आवडतो आणि भरल वांग ही..
स्वप्नील आणी मुक्ता इतके कही
स्वप्नील आणी मुक्ता इतके कही घाण जाड़े दिसत नाहीत. सीरियल एकदम मस्त आहे.... अनेक दिवसांनी त्या टुकार कुंकू, सासु...प्रकारापेक्षा काहीतरी नोर्मल बघयेला मिलते...माला आवडली आहे ही सीरियल
ए तो समाजसुधारक मुलगा म्हणजे
ए तो समाजसुधारक मुलगा म्हणजे स्मिता तळवलकरच्या 'कळत नकळत' चित्रपटातला तो छोटा मुलगा आहे का?
आजीचं कॅरॅक्टर फार इरीटेटींग आहे. शीर्षकगीत फ्लॉप आहे. प्रपंचचा जवळपासही जात नाही ही मालिका कुठल्याच बाबतीत.
आसावरी जोशी अभिनय चांगला करते. पण तिला तिचा नेहमीचा स्टेपकटच चांगला दिसतो.
स्वप्नील आणी मुक्ता इतके कही
स्वप्नील आणी मुक्ता इतके कही घाण जाड़े दिसत नाहीत.
>>>>>>>>>>>>>>>>>
मीही तेच म्हणतोय ..... भरलं वांगं आणि भरली भोपळी मिरची सुध्दा "इतके काही गाण जाडे" नसतातच
मने, तू कौशीला काडी लावलीस.... म्हणजे कौशीचं नेहाबरोबर वाजलेलं दिसतेय
स्वप्नील आणी मुक्ता इतके कही
स्वप्नील आणी मुक्ता इतके कही घाण जाड़े दिसत नाहीत.
>>>>>>>>>>>>>>>>>
मीही तेच म्हणतोय ..... भरलं वांगं आणि भरली भोपळी मिरची सुध्दा "इतके काही घाण जाडे" नसतातच
मने, तू कौशीला काडी लावलीस.... म्हणजे कौशीचं नेहाबरोबर वाजलेलं दिसतेय
<<ए तो समाजसुधारक मुलगा
<<ए तो समाजसुधारक मुलगा म्हणजे स्मिता तळवलकरच्या 'कळत नकळत' चित्रपटातला तो छोटा मुलगा आहे का<<>नाही. तो ओमेय आंब्रे होता.
ए तो समाजसुधारक मुलगा म्हणजे
ए तो समाजसुधारक मुलगा म्हणजे स्मिता तळवलकरच्या 'कळत नकळत' चित्रपटातला तो छोटा मुलगा आहे का<<>>
बाप्रे. 'कळत नकळत' हा किती जुना सिनेमा आहे. त्यातला तो मुलगा एव्हाना मोठा होऊन त्यालाही मुले झाली असतील.
<<ए तो समाजसुधारक मुलगा
<<ए तो समाजसुधारक मुलगा म्हणजे स्मिता तळवलकरच्या 'कळत नकळत' चित्रपटातला तो छोटा मुलगा आहे का<<> मला तो हचिफॅ मधला बाबाराय वाटतो
आजींचा डायलॉग काय वाईट होता.
आजींचा डायलॉग काय वाईट होता. खड्यातून पांढरा शुभ्र टपोरा तांदूळ काय? काहीही...
लगन मोडल.....
लगन मोडल.....
आजचा घनश्यामची आई आणि
आजचा घनश्यामची आई आणि राधामधला संवाद छान होता. इला भाटेचा अभिनय आवडला. सासूने आशिर्वाद म्हणून दिलेलं कडं आपल्याला कोणाला देता येणारच नाही की काय अशी भीती वाटत होती हे कबूल करताना गहिवरून आलेलं त्यांनी छान दाखवलं. राधाचं अवघडलेपण सुध्दा सहज वाटलं. पण सून घरात यायच्या आधी तिच्याशी एव्हढं मनमोकळेपणी बोलणारी सासू का कोणास ठाऊक काल्पनिक वाटली. हेमावैम. तिला मुलगी नसेल म्हणून असेल कदाचित. सासूला मुलगी असेल तर सासू-सुनेत एव्हढी भावनिक जवळीक होऊ शकत नाही ही माझी एक पेट थिअरी आहे. राधा लग्न मोडलं असं वडिलांना सांगते तेव्हाचा संवाद उपवर मुलगी असलेल्या बर्याच घरात होत असावा असा मला संशय आहे.
याचे ऑनलाईन भाग कुठे पहाता
याचे ऑनलाईन भाग कुठे पहाता येतील. माझे २-३ भाग चुकलेत.
http://www.dailymotion.com/re
http://www.dailymotion.com/relevance/search/eka+lagnachi+doosri+goshta+/...
इथे बघा
तो तत्वज्ञानी मोडमध्ये जाणारा
तो तत्वज्ञानी मोडमध्ये जाणारा मुलगा हरिश्चंद्राची फॅक्टरीमधला फाळकेंचा मोठा मुलगा.........
अंजली धन्यवाद!!
अंजली धन्यवाद!!
तो तत्वज्ञानी मोडमध्ये जाणारा
तो तत्वज्ञानी मोडमध्ये जाणारा मुलगा हरिश्चंद्राची फॅक्टरीमधला फाळकेंचा मोठा मुलगा.........
बरोबर...आणि तो त्या कळत नकळत मध्येहि होता.. तिचा अपंग भाउ म्हणून..
कळत नकळत सीरीयलबद्दल बोलताय
कळत नकळत सीरीयलबद्दल बोलताय का ?
भुंग्या त्या वाक्याबद्दल तूझा
भुंग्या त्या वाक्याबद्दल तूझा डब्बल निषेध..
मला मुक्ता बर्वेचा अभिनय आवडतो आणि भरल वांग ही..
मी अजून बराच मागे आहे पण अजूनतरी सीरियल आवडते आहे.
Pages