एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केतकी माटेगावकर. सुवर्णा व पराग माटेगावकर यांची मुलगी.>>>.ही पिक्चर मधली आहे हो...मी नाट्कातली म्ह्ण्त आहे..गमभन मधली ????

<< ह्या सिरीयल मधेली कुहु

तिचं नांव स्पृहा जोशी . आधी कशात होती माहीत नाही , पण अभिनयक्षेत्रात काही वर्षं आहे . पण तिचे कवितासंग्रह प्रकाशित झालेत , पुरस्कार मिळालेत , ती बहुतेक चाईल्ड आर्टिस्ट सुद्धा असावी ( गूगलवरील फोटोत तसं दिसतंय )

ता.क. :- अजून तरी ती माझ्या डोक्यात जातेय Proud ती आली मी तो पार्ट की सरळ फॉर्वर्ड करते Proud

ओह सॉरी मी घाईत वाचले. मला वाटले मुव्ही बद्दल बोलताय. मी नाटक पाहिले नाही, कल्पना नाही.

ही मालिका कथानकासाठी बघून उपयोग नाही. त्यातल्या एकेक व्यक्तिरेखांमध्ये रंग भरणे आता चालू झाले आहे. राधा आणि घनश्याम यांनी एकमेकांबद्दल आडाखे बांधायला सुरुवात केली आहे.
काल टेलिफोन संभाषणादरम्यानचा मुक्ताचा अभिनय मस्त.

भरत, अगदी अगदी. मघाशी तुमच्या एका ओळित कथानक सांगण्यावर मी जरा रागावलेच होते; की असं एका वाक्यात नाही बुवा सगळं आटपायचं म्हणून अन तुम्ही तेच लिहिलत की Happy

बागे, एकदम मस्त, मजेशीर होता कालचा भाग. कालच्या भागातः
प्रसंग १. सुप्रिया काकू भजी तळत असते आणि त्या सुमुखीला दिलासा देत सांगते, हे लग्न ठरेलच असं नाही, केंव्हाही मोडेल, तेंव्हा तू देवकी वहिनींच्या डोळ्यासमोर एक प्रपोजल म्हणून रहा. त्यांना इम्प्रेस करायला भजी तिनेच बनवलीये असं सांगायला लावते. (मला एक कळत नाही, एवढ्या मुली स्थळ ,म्हणून पाहिल्या, त्यात हिला पण का दाखवलं नाहीये त्यांनी? हे असं आडून आडून का सगळं सुरु आहे? Uhoh )
प्रसंग २. इला भाटे आणि विनय आपटे फोनवर बोलत असतात, साखरपुडा मिशन फत्ते झाल्याबद्दल. विनय आपटे हिंदी सिनेमा छाप साखरपुडा आमच्याच घरी वगैरे डायलॉग मारतो. ह्या दोघी भजी घेऊन येतात तर इला भाटे खुश होऊन म्हणते, आपल्या राधालाही तूच भजी शिकव. थोडक्यात फ्लॉप शो होतो भजी प्रकरणाचा... Lol
प्रसंग ३.मुक्ता/राधा साखरपुड्याचं बजेट तयार करत असते. किती खर्च वगैरे. खर्च मीच करणार म्हणते. वडलांचा धाक काय असतो, याचं प्रात्यक्षिक देत विनय आपटे जरबेने तिला साखरपुड्याचा खर्च मीच करणार असं सांगतो. तो प्रसंग मस्तय... राधाला वडलांचं हे असं धाक दाखवणं छान वाटलं, असं दिसतंय...
प्रसंग ४. इला भाटे आणि मोहन जोशीपण साखरपुड्याच्या खर्चाचं गणित मांडत बसलेत. इला भाटे फारच खर्चिक प्रकरण दिसतंय... सूनेला हिर्‍याची अंगठी पासून तर साड्या वगैरे असं बरंच महागडं सुचवत आहेत आणि मोहन जोशीला खर्चाचं दडपण आलंय..
प्रसंग ५.कुहूला दादाच्या लग्नात मोरपंखी रंगाची साडी नेसायचीये आणि हे ती तिच्या आईला नेहमीप्रमाणे काव्यरसात बुडवून सांगतेय.. आईला ती कोणाच्या प्रेमात तर नाही ना? अशी शंका येते आणि ती ती बोलून दाखवते, तर कुहू लटक्या रागात ती उडवून लावते.
प्रसंग ६.मोहन जोशी साखरपुड्याच्या मुहूर्ताविषयी गुरुजींशी फोनवर बोलतात. गुरुजी एकदम जवळची तारिख सुचवतात.
प्रसंग ७.स्वप्नील मुक्ताला फोन करुन साखरपुड्याविषयी तिचं अभिनंदन करतो. त्या वेळेचे दोघांचे डायलॉग्ज एकदम मस्त! एकमेकांना ते थोडे थोडे समजायला लागलेत... अशा स्वरुपाचे संभाषण आहे. Happy

भुंग्या, मी तुझ्याच प्रतिसादाची वाट बघत होते! अपेक्षेप्रमाणे तो आलाच! Wink

अजून तरी ती माझ्या डोक्यात जातेय >>>> संपदा, अनुमोदन. मी नियमीत नाही बघत सिरियल, पण जेव्हा पाहिली तेव्हा मलाही हे 'पात्रं' बिलकुल आवडलं नाही. स्पृहा जोशी बद्दल खुप ऐकलं, पण मलाही काही अपिल झाली नाही ही बाई.

साने, कसली गोड आहेस.!!
कित्ती डिटेल आणि छान लिहीलंस, संपूर्ण भाग त्या पात्रांच्या अ‍ॅक्टींसकट कळाला मला... Lol
थँक्स अ लॉट स्विटी Happy

आणि कालच्या भागात पाहिलं, मुक्ता अक्षरशः झापल्यागत बोलते आहे घनाला... मुक्ताची आत्या काडी बाज!!

माझा आजचा नि उद्याचा भागही मिस होणार आहे.. Sad

मने- काही पात्र आहेत गो डोक्यात जाणारी पण ओव्हरॉल सिरिअल "डोक्याला ताप" प्रकारातील नसल्याने पहायला मजा येत आहे. स्पेशली दिवसभराच्या कामाच्या व्यापानंतर ही लाईट हार्टेड सिरिअल मस्त वाटतीये पहायला Happy

आत्याबाई ढालगज दिसतायत Happy

इला भाटे फारच गोड सासू आहे बाबा.. डायबेटिस होईल इतकं गोड गोड बोलते Proud

हो गं बागे. ती कुहु आणि आजी सोडली तर एकुण सिरियल छान आहे. आज आवर्जुन लक्षात ठेवुन पाहिली सिरियल. मुक्ता मस्तच काम करते. आज स्वप्निल पण बरा वाटला.

( मुक्ता आणि स्वप्निल सोडता, एकुणात या सिरियलमधे सगळेच फार लाउड अ‍ॅक्टिंग करताहेत. राजवाडेंना काय झालं काय? )

कालच्या भागात स्वप्नील जोशीची अ‍ॅक्टींग आवडली. तसाही या सिरियलमधे त्याच्या खुळचटपणावर बर्‍यापैकी चेक आहे असं दिसतय. चक्क आवडतोय काही वेळा.

आजी का इतक्या लाडात आहेत कळत नाही. फार बोर करतात.

मुक्ता आणि स्वप्निल सोडता, एकुणात या सिरियलमधे सगळेच फार लाउड अ‍ॅक्टिंग करताहेत. राजवाडेंना काय झालं काय?

मालिकाच तशी बनवलीय बहुतेक. फार्समध्ये नाही का सगळे लाऊड असते पण त्यातही एक गंमत असते तसे या मालिकेचे आहे. भरतशी सहमत. मालिका कथेसाठी पाहायची नाहीय तर ती आधीच माहित असलेली कथा रोज कशी घडतेय ते पाहायचे.

कालचा भाग फक्त शेवटी ५ मिनिटे पाहता आला. छान होता. आनंद लुटण्याची गोष्ट लै भारी Happy

तिची शेंबडी गुपीतं वडिलांनी जावयाला सांगितल्यामुळे Lol पण काल विनय आपटे एक्दम भारी. अंगावर प्रकरण आल्यावर आत्याबाईंची पलटी एक्दम. मुक्ताच चुक उमगल्यामुळे आलेलं अपराधीपण मस्तच

सुकन्या कुलकर्णी "वाढता वाढता वाढे" मोड मध्ये गेलीये Uhoh तिने डोळे मोठ्ठे केले की भीतीच वाटतेय Sad आणि काल मध्येच "बढिया, बढिया" वगैरे हिंदी भाषाप्रयोग का म्हणे? Uhoh

कालच्या भागातला स्वप्नील आवडला. मोदकने त्याला पर्वत नाव ठवून दिलंय Wink सीरीयलचे प्रोमोज पूर्वी दाकहव्त असत ज्यात ती दोघं हॉटेलमध्ये बसून "करून टाकूया का लग्न?" असं एकमेकांना विचारतात. तो प्रोमो बघून "हा बघा पर्वत!" असे उद्गार काढले मोदकने! Lol त्यामुळे स्वप्नील चा भाग आला की पर्वत शिवाय दुसरी कुठली उपमा आठवत नाहीये सध्या. Proud

खरेच कालचा भाग छान होता....पण मला मुक्ताचा मेकअप अजिबात आवडला नाही...अजिबात शोभत नाही तिला

Pages