एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या आत्याबाई इंदूरच्या आहेत म्हणून बढिया बढिया .
होणार्‍या जावयाला पिठलं भात जेवायला करते असं म्हणाल्या ना आत्याबाई? ते मजेत असेल असंही वाटलं नाही. इंदूरच्या लोकांनी ऐकलं तर परत इंदूरात पाय ठेवायला देणार नाहीत.

ईथे ह बाफ वचुन सुरु केलं मालिका पाहणं. मजा येतेय.
बाकि इकडच्य ओवर-अ‍ॅकटिन्ग मुक्ताचा वाइत मेक-अप, चान्गला अभिनय, गोड गोड सासु, जाडा (पण सुसह्य) स्वपनील ई. मतान्शी सहमत.
सुकन्या मोने - टमाटम हवा भरलेला फुगा दिसते.
लाइट हार्टेड मालिका छान वाटतेय बघायला. यू-टयुबवर भागही येताहेत लगेच म्हणून बरय!
पण कालचं विनय आपटेने आनन्द जरा जस्त्च लुटला असं वाटलं. घना पहिल्यान्दाच घरी आलेला दिसला, तेव्हा कुठ्ल्या मुलीचे वडील असं वागतील हे पटलं नाही. "काळजाचा तुकडा" हाच मेसेज अजुन छन देता आला असता असं वाटलं.
आणि आत्या पण काय खाउ घालतेय पिठलं???
>>>ते मजेत असेल असंही वाटलं नाही. इंदूरच्या लोकांनी ऐकलं तर परत इंदूरात पाय ठेवायला देणार नाहीत.>>>अगदी...
असो, ओवरॉल मज्जा येतेय. एन्जॉइन्ग इट!

भरत,
भाटेकाकू मटार का सोलतात सारख्या? (पण त्या गोड आहेत)

सुमेधा,
तुमचे म्हणणे पटले. माझे चुकलेच. कितीतरी बेढब आणि उपवर लोकं असतात की.

लग्न झाल्यावर दिसेल सुंदर....

नाही दिसली तरी काय बिघडणार.....अभिनय तेवढा छान कर फक्त... Happy

सुकन्या कुलकर्णी "वाढता वाढता वाढे" मोड मध्ये गेलीये तिने डोळे मोठ्ठे केले की भीतीच वाटतेय >>>> अग ती कुठल्या त्या सिरीअलमध्ये मांत्रिक की काय झाली होती ना गळ्यात कवड्यांची माळ घातलेली त्या मोडमधून बाहेर नाही आली वाटतं Proud

विनय आपटे एकदम सही होता काल आणि आज. मुक्ताची काय ती केस रुमालाने बांधण्याची स्टाईल...श्या नाही आवडली. सुप्रिया काकु बदलल्या वाटतं Happy कधी कधी ती जास्तच तोंड गोल गोल करून बोलते.

इला भाटेला जबरी धक्का बसला मुलगा रात्रभर राधाबरोबरच होता कळल्यावर. खरंच फारच भाबडी बाई आहे Proud

-खरंच फारच भाबडी बाई आहे --- मला तर ते ईला भाटे चे पात्र अतिशय इरीटेटींग वाटतेय. आज्जी बाई पण तशाच.

सुकन्या एका अपघातानंतर जाड झाली..त्याआधी ती चवळीची शेंग होती. वजनाबद्दल काय बोलणार आता? ज्याचे दु:ख त्याला ठाऊक. नसेल होत कमी, तर काय करणार आता? अभिनय करायचा नाही की काय तिने? वजन राहुदे, पण डोळे तरी थोडे बारीक कर म्हणाव. भिती वाटते बघताना.

>भाटेकाकू मटार का सोलतात सारख्या?

असंभवमध्येही त्या तेच करायच्या. तरी त्या मानाने इथे स्वयंपाकघरात बहुधा कमी दिसतात. २ जावा असल्याने असेल कदाचित. Proud

घनाच्या आईच्या हिर्‍याच्या अंगठीबद्दलच्या कमेन्टचा आत्या वाकडा अर्थ घेते आणि राधा त्यावरून घनाला झापते हे अगदी स्वाभाविक वाटलं. ठरवून लग्न करताना अनेक बरे-वाईट अनुभव येतात आणि त्यावरून माणसं एखाद्या गोष्टीला कशी रिअ‍ॅक्ट होतात ते ठरतं. घनाने राधाच्या घरी येउन समजूतदारपणाच दाखवला.

पण कालचं विनय आपटेने आनन्द जरा जस्त्च लुटला असं वाटलं. घना पहिल्यान्दाच घरी आलेला दिसला, तेव्हा कुठ्ल्या मुलीचे वडील असं वागतील हे पटलं नाही. >>
अगदी अगदी!

बाय द वे, लोकहो, तुमच्यामुळे मी ही मालिका बघायला सुरुवात केली आहे!

मला ही मालिका फारच आवडायला लागलीये. Happy खरच हलकीफुलकी, डोक्याला ताप न देणारी आणि उत्तम पध्दतीने सादर केली आहे. काही ठिकाणी आहे थोडी ओव्हर अ‍ॅक्टींग पण चलता है. Happy
मुक्ता बर्वे - हॅट्स ऑफ. कमालीचा सहज सुंदर अभिनय.
स्वप्नील - ओके आहे अलिकडे जरा जरा आवडतोय. पण जाडी कमी झालीच पाहिजे.
ईला भाटे - पात्र थोड ओव्हर आहे पण काम आवडत त्यांच.
विनय आपटे - परत एकदा हॅट्स ऑफ. सोल्लीड काम.
बाकीची सगळीच पात्र पर्फेक्ट!!! आणि प्रत्येकजण खरच "पात्र" आहे. Happy

मलाही सिरिअल खूप आवडतीय. विनय आपटे बेस्ट!! म्हातारा झाल्यावर तो प्रेमळ दिसायला लागला बहुतेक..
स्वप्नील सुद्धा आवडला.. एरव्ही डोक्यात जायचा! इथे नाही जाते..
मुक्ता सुद्धा छान. केसांचे काहीतरी बदलले पाहिजे. थोडेसे विचित्र वाटतात..

बाकी आज्जी जाम म्हणजे जाम डोक्यात जातात.. Angry भाटेकाकू ठिक.. नेहेमी त्याच का बोलतात फोनवर महेशरावांशी?? आय मिन, बोलूदे, पण मोहन जोशी कद्धीच बोलला नाहीये! निदान तिचं बोलून झाल्यावर हाय हॅलो तरी करावं ना? Happy

बस्के, मोहन जोशी त्यांना पण शब्दकोड्यातला शब्द विचारेल म्हणून देत नसतील भाटेकाकू फोन. Proud
मला त्या वल्ली काकूचं काम आवडतं. मस्त करते ती. पण घरात साड्या एवढ्या कडक स्टार्च आणि इस्त्रीच्या आणि फिक्या आणि सकाळपासून रात्रीपर्यंत एकही चुरगळी न पडलेल्या आणि.. ? भाटेकाकूंनी एकदम लॉट का माल साड्या घेतल्यात, पॅटर्न तोच रंग वेगळे. घरात तीच,तीच हळदीकुंकवाला, तीच स्वयंपाकघरात तीच साड्या आणायला जाताना.. Uhoh आता पुरे. Lol

मी पण बघायला सुरूवात केली ही मालिका. मस्तयं एकदम हलकी फुलकी. माझ्या लेकाला पण भयंकर मजा येते बघताना Happy
मला आवडलं स्वप्नीलचं काम. मुक्ता, विनय आपटे नेहमीप्रमाणेच उत्तम. भाटे काकूंचा तोच तोच पणा झालाय आता. आजींना माफ करा लोकहो. त्या एवढ्या वयात काम करताहेत हे किती छान आहे. त्यांची जुनी ओव्हरअ‍ॅक्टींग किंग आणि क्वीन्सची पिढी आहे Proud

आणि प्लीज कलाकारांच्या मालिकेतील पात्र, त्यांच्या अभिनयावर कॉमेंट करा. पर्सनल कॉमेंटस कशाला Sad

मी पाहिले काही एपिसोडस. मालिका इतर मराठी मालिकांच्या मानाने वेगळी वाटली. संवादपण चांगले आहेत. अभिनयाच्या बाबतीत मला सगळ्यांचे अभिनय लाउड वाटत आहेत. एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे सगळ्यांचे मेकअप इतके भडक का आहेत? फाउंडेशनचे थर च्या थर लावलेत. ती वल्ली काकू घरात दिवसभर इतक्या मेकप मधे असते? आसावरी जोशीचा विग आणि कृत्रिम अभिनय विथ भडक मेकप. मुक्ताची ओठाचा चंबू करून बोलण्याची स्टाईल इरीटेट करतेय. कधी कधी संवाद बोलताना उच्चार सदोष वाटतात. (एक डाव धोबीपछाड मधे सुरेख काम केलय). विनय आपटेचा जावयाबरोबर 'आनंद लुटण्याचा' प्रसंग विक्रम गोखलेच्या एका नाटकात पण आहे. नाव विसरले त्या नाटकाचं. (त्या नाटकातला हा प्रसंग 'फादर ऑफ द ब्राईड' मधल्या एका प्रसंगावरून घेतलाय. सिनेमात स्टीव्ह मार्टीन जावयाबरोबर ड्रींक्स घ्यायला बारमधे जातो. लेकीचं आणि जावयाचं भांडण झालेलं असतं तेव्हा जावयाबरोबर बोलावं म्हणून पण झिंगून येत नाही). ती आत्या इंदूरहून आलेली असते. मुक्ता आत्याचं सगळं सामान बघते आणि तरीही विचारते, 'तू संध्याकाळपर्यंत आहेस ना? मग मी घरी आल्यावर बोलू' Uhoh लोक इंदूरहून मुंबईला सकाळी येऊन संध्याकाळी जातात? वर एवढं सगळं सामान घेऊन एका दिवसासाठी येतात? संवाद लेखकाला 'आता रहाणार आहेस ना काही दिवस? मग निवांत बोलू' असे संवाद देता आले असते.
पण या सगळ्या गोष्टी खटकत असूनही मालिका पकड घेतेय. होपफुली या मालीकेची दुसरी 'गुंतता हृदय हे' होणार नाही.

खटकणार्‍या गोष्टी खटकतातच. Happy पण तरीही मालिका रोज बघावीशी वाटते हे खरं.....अजून तरी. Happy
ती सुप्रिया काकू सुध्दा एकच हिरवा ब्लाऊज ठेवते आणि २ साड्या बदलते.

कालचा खरेदीला जाताना भेटायचा सीन मस्त होता...... मुक्ता आणि स्वप्नीलचे संवाद पण मस्त.... मुंपूमुं ची आठवण करून देणारे......

त्या सीनमध्ये मुक्ता, "सचिन (तेंडल्या) पीचवर येऊन स्टान्स घेण्याआधी अ‍ॅडजेस्ट्मेंटसाठी जसा गुढग्यात वाकतो नेहमी" तसं गुढघ्यात वाकताना किमान चार पाच वेळा दाखवलय...... आता रिपिट टेलिकास्ट पण घरात असल्याने बघावा लागलाय.... (लिहिण्याआधी खातरजमा करून घेतली :स्मित:).....
लकब म्हणून दाखवायचं असेल बहूतेक, पण किती वेळा ते Light 1
आवरा......

बाकी झकास चाललय Wink

इंदूरच्या आत्याचा.. काहिच्या काही.. रोल आहे.. संवाद तर ऐकवत नाहित.. कुलकर्णींना हिंदी जमत नाही.. पिठलं भात काय.. आमच्या शेजारचे बोर्हाडे काय... आणि सर्व्हात भयानक म्हणजे सुकन्याचे डोळे मोठे करणे.. आत्ता डोळे बाहेर पडतील की काय असं वाटलं Happy
मला ती कुहु पण आवडली नाही.

आत्यांचं हिंदी मराठमोळं आहे त्याला इंदूरी हिंदीचा लहेजा नाही. माझ्या जयपूरच्या मावशीकडे नाशकातून आलेल्या मामी शेजार्‍यांशी जसं हिंदी बोलायच्या त्या कॅटेगरीतलं हिंदी वाटतं ते Proud
काल का कुणास ठाऊक, रसिकाने हा रोल मस्त केला असं वाटलं Sad सुकन्या मोन्यांनी बाकी चांगलंच केलंय काम पण हिंदीचं तेवढं बघायला हवं.
मुक्ता, स्वप्निल आवडले. भाबड्या इला भाटे पण आवडल्या. विनय आपट्यांचे प्रेमळ, हळवे बाबा बेस्ट. Happy
टायटल साँग आणि आजी जे सांगू पाहतात ... 'अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल ... रानोरानी भटकत शोधत मी तेच फूल' आणि 'का उगाच शोधित बसशी, जे असे तुझे तुजपाशी' त्यावरुन एकंदर कथानकाची कल्पना आली. त्यामुळे काही दिवसांनी बोअर होणार बघायला असं आत्ता तरी वाटतंय. प्रत्यक्ष बघण्यापेक्षा ऑनलाईन FF करत बघणं सोयीचं वाटतंय.

खरेदीला निघायच्या आधी राधा- घनश्याममधले संवाद :
घ : खरेदीसाठी तू माझ्याबरोबर ये कारण माझा चॉइस चांगला नाही. तुझा चॉइस चांगला आहे
रा : थँक्यू...
घ : (कारण) तुझा चॉइस मी आहे.

याचा अर्थ 'माझा चॉइस असलेली तू काही चांगली नाहीस' असा निघत असतानाही राधाने फुल्टॉसवर चौकार मारायची संधी सोडली. आधीच्या भागात यॉर्कर्स आणि बाउंसरने जायबंदी झाल्याने आत्मविश्वास गमवल्याचे स्पष्ट लक्षण.

राधाच्या आत्याबाई घनश्यामच्या काकांना : मैं अभी चाय बनाके आती हूं. म्हणजे चाय बनाउंगी पर लाउंगी के नही ये आप देखिए!
त्या इंदूरच्या आहेत की xxxच्या Wink

ए.... लिसन ना............सुप्रिया काकू राधाबद्दल नाराज आहेत अस दाखवत होते... एक भाची खपवायचा बेत फसला म्हणून...
त्यामुळे लग्नानंतर राधा विरुद्ध सुप्रिया असं युद्ध असेल असं वाटत होतं. पण सुप्रिया आता हे सगळं खुल्या दिलानी स्वीकारते आणि खरेदीत सामील होते असं दाखवलय......हा बहुदा आफ्टर थॉट असावा ....तरीही स्वागतार्ह !

नवर्‍याचे म्हणणे लिसन केल्यावर सुप्रिया काकूंचा अ‍ॅप्रोच बदलला. त्यांच्या भाचीच्या लग्नाची जबाबदारी घेतली नवर्‍यानी. (आणखी कोणी नाही का तिला?)

सुप्रिया काकू राधाबद्दल नाराज आहेत अस दाखवत होते... एक भाची खपवायचा बेत फसला म्हणून...
त्यामुळे लग्नानंतर राधा विरुद्ध सुप्रिया असं युद्ध असेल असं वाटत होतं.

त्या फक्त थोड्याफार नाराज आहेत, टिपिकल मालिका टाईप सुडाने पेटलेल्या नाहीत. Happy

आणि तसेही या मालिकेत युद्ध वगैरे काही होईल असे वाटत नाही. कोणी आग लावली तरी दुसरा चुकून नेमका त्या आगीवरच पाणी ओतेल अशी परिस्थिती आहे.

चार दिवसापुर्वीच्या एका भागात वल्लरी भाटेकाकुंना 'लग्नाने घरातले सगळे आनंदले पण सुप्रिया मात्र नाराज आहे, असे का असावे बरे????' हे सांगायचा प्रयत्न करत असते तर नेमके काकूंना 'घनाला हिरा चालत नाही' हे आठवते आणि वल्लरीला जे बोलायचे ते तिथेच राहुन जाते Happy

काल राधाच्या आत्याबाई पण मटारच सोलत होत्या ना? किती शेंगा उकलल्या? नंतर तशाच उकडल्या असतील का? Lol

मटार स्वस्त आहेत त्यामुळे मालिकेत आणायला परवडते. शिवाय नंतर घरी नेऊन लगे हात भाजीही करता येते. Happy

मला आवडली सिरियल. सगेफुसारखी वाटतेय, हलकी फुलकी, ताण न देणारी.
टिपिकल चांगले-वाईट यांच्यातील युद्ध-बिद्ध, एकमेकांवर कुरघोडी, कट -कारस्थाने दाखवणारी नाहीये. त्यामुळे आवडली.
सगेफुही आधी याचसाठी आवडली होती, आता त्याचेही भरीत झाले आहे. Sad तसे, याचे होऊ नये म्हणजे मिळवली. Happy

अभिनयाबाबत बोलायचे तर जरा फार्सिकल टच देण्याचा प्रयत्न असावा असे वाटते. तसे असेल तर सगळ्यांचे अभिनय उत्तम आहेत. विनय आपटे मस्त. मुक्ता-स्वप्नील यांचे कामही आवडले. Happy

एकंदर, ३.५ तारे माझ्याकडून Happy

काल सतीश तारे आणि भाटे काकूंचा सीन सही झाला. आवाज भरुन येण्याचा अभिनय अवघड असेल नाही! वल्ली आणि वल्लभकाकांचा सीन Lol

Pages