Submitted by मनीषा- on 13 February, 2012 - 09:34
नुकतेच पिटर ब्रूक यांचे 'महाभारत' बघायचा योग आला. त्यातील परिणामकारक दिग्दर्शन, संवाद, पटकथा व अभिनय यामुळे प्रभावित होऊन मी हा धागा काढला आहे हे मला उघड आहे.
तर काथ्याकुटाचा मुद्दा असा की आपल्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या कलाकारामधून हे महाभारत साकारायचे असल्यास कुणाची निवड कराल ?
माझ्या मते खालील पर्याय योग्य आहेत
दुर्योधन - शाहरुख खान - तो आढ्यता व असमाधान चांगले दाखवू शकतो.
कर्ण - आमीर खान - तो डोळ्यांचा वापर चांगला करू शकेल
युधिष्टिर - मनोज वाजपेयी
भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व भक्कम व्यक्तिमत्व
अर्जुन - अक्षय खन्ना
कुंती - शबाना आझमी
ध्रुतराष्ट्र - मिथुन चक्रवर्ती
ता. का. हे निव्वळ कल्पनारंजन असल्यामुळे कल्पनाविलासाच्या बाबतीत कंजूसी करू नये ही विनंती
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वप्निल जोशी कोणीतरी
स्वप्निल जोशी कोणीतरी (नंद्याने?) म्हंटल्या प्रमाणे 'झपाटलेला' मधला 'मंतरलेला तात्या विंचु बाहुला' शोभेल फक्त <<<<
आम्हाला बांधेसुद कृष्ण
आम्हाला बांधेसुद कृष्ण हवा............ धान्याचे पोते नको
चिटींग....चिटींग....चिटींग...
चिटींग....चिटींग....चिटींग....चिटींग....चिटींग....चिटींग....चिटींग....चिटींग....चिटींग....चिटींग....चिटींग....चिटींग....चिटींग....चिटींग....चिटींग....चिटींग....
सगळेच जण करण जोहरला.., आपलं काय म्हणतात ते शिखंडीला का विसरताहेत? ये न्नॉय चॉलबे
सगळेच जण करण जोहरला.., आपलं
सगळेच जण करण जोहरला.., आपलं काय म्हणतात ते शिखंडीला का विसरताहेत >>>>>>>> त्या जागे साठी स्पर्धानाही आहे म्हणुन
बॉबी डार्लिन आहे लाईन मधे
बॉबी डार्लिन आहे लाईन मधे त्या पात्रासाठी
भीष्म अमिताभ बच्चन.
भीष्म अमिताभ बच्चन.
अश्वत्थामा अभिषेक बच्चन.
द्रौपदी विद्या बालन.
अर्जुन म्हणून ह्रिथिक रोशन.
युधिष्ठीर अजय देवगण
भीम : रजनीकांत (हा काहीही करू शकतो. त्यामुळे भीमाचाच रोल फिट होइल)
नकुल सहदेव : (हे महाभारतात काहीच करत नाहीत म्हणून इथे त्याना कॉमिक रोल्देण्यात येइल.) रणबीर इम्रान.
कुंती : माधुरी. (तितकी म्हातारी दिसते आताऑ
गांधारी: करिष्मा चालेल का? नाहीतरी अॅक्टिंग करायचीच नाही.
धृतराष्ट्र : संजय दत्त. (एरवीच त्याचे डोळे तारवटलेले असतात)
कृष्ण: सलमान खान.
राधा: कतरीना. (काही नाही तर सलमान आणि तिचे एक गाणे तरी असेलच)
कर्ण म्हणून आमिर खान चांगला वाटेल. उंचीचा थोडा प्रॉब्लेम होइल. पण कॅमेरामन सांभाळून घेइल.
कास्टिंग चालू द्यात. जरा टेक्निकल बाबी पण ठरवून टाकूयाच.
सेट डीझाईन नितीन देसाई.
संगीत प्रीतम. (ढ्याण ढ्याण टँ डँ.)
कॉस्चुम्स: करन जोहर, नीता लुल्ला
दिग्दर्शनः दुसरे कुणीही चालेले पण गोवारीकर नको. पिक्चर संपता संपायचा नाही.
निर्माते: मायबोलीकर प्रॉडक्शन प्रा. लि.
माध्यम प्रायोजक: मायबोली.कॉम
>>> धान्याचे पोते नको <<<
>>> धान्याचे पोते नको <<<
चेंबूरला एका फोटो
चेंबूरला एका फोटो स्टुडियोमधे, विद्याचा शाळकरी वयातला एक फोटो आहे. खुपच गोड आहे तो फोटो (अजूनही तशीच दिसते म्हणा ती.)
संजय दत्तला हनुमान करा, भीमाच्या गर्वहरण प्रसंगातला.
कृष्ण = मकरंद
कृष्ण = मकरंद अनासपुरे
युधिष्ठर = अक्षय कुमार
कर्ण = अंकुश चौधरी
अर्जुन = जितेंद्र जोशी
भीम = विलास रकटे
नकुल = अनिकेत विश्वासराव
सहदेव = मराठी सीरीयलमधला रोमँटिक हिरो , कोण तो ?
भीष्म = अशोक सराफ
द्रोणाचार्य = मोहन जोशी
धुतराष्ट्र = श्रीराम लागू
गांधारी = उषा नाडकर्णी
कुंती = रीमा लागू
पांचाली = अमृता खानविलकर
दुर्योधन = भरत जाधव
दु:शासन = सिद्धार्थ जाधव
एकलव्य = अतुल कुलकर्णी
अभिमन्यु = पुष्कर जोग
शकुनी = वैभव मांगले
शुक्राचार्य = आनंद इंगळे
कानफाट्या +१
कानफाट्या
+१
दु:शासन- इम्रान हाश्मी!!!
दु:शासन- इम्रान हाश्मी!!!
शिर्षक वाचुन वाटलं की कुणी
शिर्षक वाचुन वाटलं की कुणी प्रोड्युसर आपल्या फिल्मसाठी कलाकार शोधतोय आणि या भुमिकांसाठी काही मायबोलिकरांची नावं डोक्यात आली.
भीष्म अमिताभ
भीष्म अमिताभ बच्चन.
अश्वत्थामा अभिषेक बच्चन. >> फिट्ट.
द्रौपदी विद्या बालन>> ही थोडी सुंदरही नको का? म्हणजे ५ - ५ जण वेडे होतात म्हणुन म्हटल.
अमीर खाननी आपला ड्रीम रोल
अमीर खाननी आपला ड्रीम रोल महाभारतातला कर्ण असल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते.
Speaking about his dream role, Aamir said he would love to play the character Karna from the epic Mahabharata.
Aamir said, and we quote him: "I read the Mahabharata which was really fascinating. My dream role is probably the role of Karna...I don't know whether I can play Karna because he is a warrior and is meant to be six-and-half-foot ideally. But the mind of the character really fascinates me."
http://www.apunkachoice.com/scoop/bollywood/20050406-0.html
अमीर खाननी आपला ड्रीम रोल
अमीर खाननी आपला ड्रीम रोल महाभारतातला कर्ण असल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते. >>>>>>>>
आपकी अदालत मधे तर तो कृष्ण म्हणाला होता........
भिष्म : झक्कीकाका युधिष्ठीर :
भिष्म : झक्कीकाका
युधिष्ठीर : दिनेशदा
भीम : गामा पैलवान (केवळ पैलवान आहेत म्हणून)
अर्जुन : बेफ़िकीर चालतील (२४ ज्ञात, अर्जुनाबद्दल माहिती नाही)
नकुल-सहदेव : राजेश्वर - मुक्तेश्वर
श्रीकृष्ण - आगाऊ (काड्या लावणे या कामात हातखंडा)
संजय : मंदार जोशी (मायबोलीच्या कानाकोपर्यावर नजर ठेवुन असतात हे)
श्रीकृष्ण - आगाऊ (काड्या
श्रीकृष्ण - आगाऊ (काड्या लावणे या कामात हातखंडा)>>>
(No subject)
विशाल, नाही रे बॉ, मी इतका
विशाल, नाही रे बॉ, मी इतका सत्यवचनी नाही.
माझ्यापेक्षा इथले एक निरागस व्यक्तीमत्व योग्य ठरेल. (पण जाऊ दे.)
आणि स्त्री भुमिका ?
विशल्या>> कवितेच्या भळभळत्या
विशल्या>>
कवितेच्या भळभळत्या जखमेने अस्वस्थ अश्वत्थामा- विशाल कुलकर्णी!!!!
कवितेच्या भळभळत्या जखमेने
कवितेच्या भळभळत्या जखमेने अस्वस्थ अश्वत्थामा- विशाल कुलकर्णी!!!!>>>>
आणि स्त्री भुमिका ?>>>.
आणि स्त्री भुमिका ?>>>. स्त्री भुमिकेवर अनुभवी व्यक्तींना बोलु देत ना दिनेशदा.
आगावाने आत्त्ताच मला अश्वत्थामा ठरवलेय. त्यावर मी भाष्य करणे कसे योग्य ठरेल
कवितेच्या भळभळत्या जखमेने
कवितेच्या भळभळत्या जखमेने अस्वस्थ अश्वत्थामा- विशाल कुलकर्णी!!!!>>>>>
आगावाने आत्त्ताच मला अश्वत्थामा ठरवलेय. त्यावर मी भाष्य करणे कसे योग्य ठरेल>>>>>> त्या वरच्या पोस्टीतल्या स्मायली पण योग्य ठरणार नाहित अश्वत्थाम्याला
चिमुरे, अगं क्षणभर अशी कल्पना
चिमुरे, अगं क्षणभर अशी कल्पना करुन घे की तो हास्यातिरेकाने नाही तर कवितेच्या भळभळत्या जखमेने अस्वस्थ होवून लोळतोय
कवितेच्या भळभळत्या जखमेने
कवितेच्या भळभळत्या जखमेने अस्वस्थ होवून लोळतोय >>>>>>> अशी कल्पना केल्यावर खरंच त्या स्मायलीच्या चेहर्यावरचे भाव पालटले... आपण अफाट आहात गुरुमित्र (??) __/\__
युधिष्ठीर : दिनेशदा भीम :
युधिष्ठीर : दिनेशदा
भीम : गामा पैलवान (केवळ पैलवान आहेत म्हणून)
अर्जुन : बेफ़िकीर चालतील (२४ ज्ञात, अर्जुनाबद्दल माहिती नाही)
नकुल-सहदेव : राजेश्वर - मुक्तेश्वर
श्रीकृष्ण - आगाऊ (काड्या लावणे या कामात हातखंडा)
संजय : मंदार जोशी (मायबोलीच्या कानाकोपर्यावर नजर ठेवुन असतात हे)
>>>>>>>>>>>>>>>>>>>
विसूभाऊ....... काय पण चॉईस हाय वो तुमचा :डोमा:भिष्म : झक्कीकाका
(No subject)
स्वप्निल जोशी कोणीतरी
स्वप्निल जोशी कोणीतरी (नंद्याने?) म्हंटल्या प्रमाणे 'झपाटलेला' मधला 'मंतरलेला तात्या विंचु बाहुला' शोभेल फक्त >>> माझे बाबा तर स्वप्निल जोशीला बोलका बाहुलाच म्हणतात.
माझ्यापेक्षा इथले एक निरागस
माझ्यापेक्षा इथले एक निरागस व्यक्तीमत्व योग्य ठरेल. (पण जाऊ दे.)
>>
'बी' का?
कैकेयी मात्र एकमताने निवडली जाईल माबोवर
भिष्माच्या रोलला बिग बी
भिष्माच्या रोलला बिग बी सर्वात फिट - खर्जातला आवाज, लांबसडक बांधा आणि एकूणच सर्वच्या सर्व बाबी परफेक्ट....
द्रौपदीसाठी विद्या बालन नाही. तिच्यापेक्षा मग नंदिता दास किंवा चित्रांगदा सेन. अस्सल भारतीय सावळे सौंदर्य...मोठे काळे डोळे...भेदक नजर आणि उत्तम अभिनय..या रोलचे सोने करण्याची क्षमता दोघींकडे आहे. विद्या फारच फिल्मी वाटते.
शकुनीच्या रोलसाठी - मनोज बाजपेयी
आणि कर्ण म्हणाल तर नील नितिन मुकेश...उंचापुरा, भक्कम आणि थोडा निगेटीव्हीटीकडे झुकणारा चेहरा
Pages