Submitted by पुरंदरे शशांक on 30 January, 2011 - 22:47
झाड तर प्रेमदिवाणे.......
खांद्यावर पाखरांसंगे
ते मंजुळसे किलबिलते
वार्याच्या झुळकीसरसे
ते गीत अनामिक गाते
झेलताना पाऊसगाणे
ते होते अल्ल्डवाणे
वार्याची कुजबुज पानी
पानांच्या ओठी गाणे
शिशिराच्या साथीने ते
पान पान फेकून देते
कात का टाके जर्जर
नवतरुणपणाते ल्याते
ऋतुराज येता जवळी
अभिसारिका जशी ते खुलते
होउनिया बेधुंद
उरी शिरी कसे ते फुलते
ग्रीष्मी का होई चातक
कोकिळ वसंती झाले
मल्हार आळविताना
पानोपान सुखावलेले
झाडाच्या ओठी गाणे
मोहरणे अन सळसळणे
झाडाचे असणे गाणे
झाड तर प्रेम दिवाणे
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
’चेतनागुणोक्ति’ च्या
’चेतनागुणोक्ति’ च्या सहाय्याने
झाडाचे वर्णन करायचा प्रयत्न चांगला जमलाय.
सुंदर.. वारंवार वाचत रहावी
सुंदर.. वारंवार वाचत रहावी अशी कविता..!
मला,
<<
झेलीत पाऊसगाणे
ते होते अल्ल्डवाणे
वार्याची कुजबुज पानी
पानांच्या ओठी गाणे
>> हे कडवे खूपच आवड्ले
खूपच आल्हाददायक कविता ....
खूपच आल्हाददायक कविता .... refreshing!
मनापासून आवडली.
मनापासून आवडली.
व्वा! शशांक, बोरकर पुन्हा
व्वा! शशांक, बोरकर पुन्हा दिसायला लागलेत! कीप इट अप.
सर्वांना मनापासून
सर्वांना मनापासून धन्यवाद..........असेच प्रेम राहू द्या......सुधारणा सुचवायची असल्यास मोकळेपणाने सांगा.
सुंदर
सुंदर
खरंच आल्हाददायक
खरंच आल्हाददायक
ग्रीष्मी का होई चातक कोकिळ
ग्रीष्मी का होई चातक
कोकिळ वसंती झाले
मल्हार आळविताना
पानोपान सुखावलेले
झाडाच्या ओठी गाणे
मोहरणे अन सळसळणे
झाडाचे असणे गाणे
झाड तर प्रेम दिवाणे>>>सुंदर ..सुंदर्...आणि सुंदर..!
गिरिश, दक्षिणा,
गिरिश, दक्षिणा, चातक्......आभार मनःपूर्वक.
अफलातुन कविता,निसर्गावरचं
अफलातुन कविता,निसर्गावरचं प्रेम तूमच्या कवितांतुन जाणवते.खुप आवडली कविता.
सुंदर कविता, शशांकजी..
सुंदर कविता, शशांकजी..
खुप छान
खुप छान
फारच छान.
फारच छान.
'झाडाच्या ओठी गाणे मोहरणे अन
'झाडाच्या ओठी गाणे
मोहरणे अन सळसळणे'
फारच सुन्दर.
'झाडाच्या ओठी गाणे मोहरणे अन
'झाडाच्या ओठी गाणे
मोहरणे अन सळसळणे'
फारच सुन्दर.
झाडाच्या ओठी गाणे मोहरणे अन
झाडाच्या ओठी गाणे
मोहरणे अन सळसळणे
झाडाचे असणे गाणे
झाड तर प्रेम दिवाणे>>>>म्हणुनच तर बेसुराना सुद्धा निसर्गाच्या सानिद्यात सुर सापडतो,सुंदर कविता.
खूप सुंदर..........
खूप सुंदर..........