झाड तर प्रेमदिवाणे.....

Submitted by पुरंदरे शशांक on 30 January, 2011 - 22:47

झाड तर प्रेमदिवाणे.......

खांद्यावर पाखरांसंगे
ते मंजुळसे किलबिलते
वार्‍याच्या झुळकीसरसे
ते गीत अनामिक गाते

झेलताना पाऊसगाणे
ते होते अल्ल्डवाणे
वार्‍याची कुजबुज पानी
पानांच्या ओठी गाणे

शिशिराच्या साथीने ते
पान पान फेकून देते
कात का टाके जर्जर
नवतरुणपणाते ल्याते

ऋतुराज येता जवळी
अभिसारिका जशी ते खुलते
होउनिया बेधुंद
उरी शिरी कसे ते फुलते

ग्रीष्मी का होई चातक
कोकिळ वसंती झाले
मल्हार आळविताना
पानोपान सुखावलेले

झाडाच्या ओठी गाणे
मोहरणे अन सळसळणे
झाडाचे असणे गाणे
झाड तर प्रेम दिवाणे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुंदर.. वारंवार वाचत रहावी अशी कविता..!

मला,
<<
झेलीत पाऊसगाणे
ते होते अल्ल्डवाणे
वार्‍याची कुजबुज पानी
पानांच्या ओठी गाणे
>> हे कडवे खूपच आवड्ले Happy

सर्वांना मनापासून धन्यवाद..........असेच प्रेम राहू द्या......सुधारणा सुचवायची असल्यास मोकळेपणाने सांगा.

सुंदर Happy

ग्रीष्मी का होई चातक
कोकिळ वसंती झाले
मल्हार आळविताना
पानोपान सुखावलेले

झाडाच्या ओठी गाणे
मोहरणे अन सळसळणे
झाडाचे असणे गाणे
झाड तर प्रेम दिवाणे>>>सुंदर ..सुंदर्...आणि सुंदर..!

झाडाच्या ओठी गाणे
मोहरणे अन सळसळणे
झाडाचे असणे गाणे
झाड तर प्रेम दिवाणे>>>>म्हणुनच तर बेसुराना सुद्धा निसर्गाच्या सानिद्यात सुर सापडतो,सुंदर कविता.

Back to top