पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईथे मावे मधल्या सुरळीच्या वड्यांची पाक्रु होती त्याची लिंक देणार का? मला सापडत नाहिय आता Sad

रसिका, करंजीचे सारण ओलसर असले, वरचे कव्हरचे पिठ सैल भिजवले गेले, करंज्या तळताना कच्च्या राहिल्या, किंवा वाफ न जिरवता एकावर एक ठेवल्या, तर करंज्या मऊ पडायची शक्यता असते.

Which is better? घरी केलेले overnight left-over food का विकतचे ताज अन्न?

इथे छोटे बटाटे असतात त्याची रेसिपी होती पण नाव माहित नाही.
प्लिज कोणाला माहित असेल तर लिंक द्या ना.
धन्यवाद.

स्प्राउट्स मध्ये मिळतात तसे रोस्टेड सॉल्टेड ग्रीन बीन्स चे चिप्स घरी कसे करतात कोणाला माहित आहे का?

द्राक्षे-बटाटा भाजीसाठी मोहरीचे तेल आणले होते. अर्धा लिटारची बाटली. त्याचा कशा कशात वापर करता येइल ?

काकडी, टॉमेटो, कांदा, गाजर, छोटे लाल मुळे, फुग्यामिरच्या यातले जे असेल ते बारीक चिरून त्यात लिंबाचा रस, मीठ, एखादी हिरवी मिरची अन मोहरीचे तेल मिसळून कालवावे . वाढायच्या आधी १०-१५ मिनिटे. मोहरीच्या तेलाने एक मस्त झणझणीत चव येते कोशिंबीरीला.

पंजाबी पद्धतीच्या डाळी/ भाज्यांमध्ये फोडण्यांसाठी मोहरीचे तेल (त्याचा वास - चव चालणार असेल तर) वापरता येते, लोणच्यात वापरता येते. आंतरजालावर सरसोंका तेल, किंवा मस्टर्ड ऑईल नावाने गूगलल्यास चिक्कार रेसिपीच मिळतील.

इथे ह्या गाजराच्या लोणच्याच्या रेसिपीत आहे मोहरीचे तेल : http://www.maayboli.com/node/22921
आणि http://www.maayboli.com/node/16847, http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/94118.html?1136688515
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/102312.html?1132191393

थंडीच्या दिवसांत हे तेल खोबरेल तेलात मिसळून / नुसते आंघोळीअगोदर अंगाला, सांध्यांना लावायचा प्रघात उत्तर भारतात आहे. तसेच थंडीमुळे सर्दी झाल्यास त्याचे काही थेंबही लावतात डोक्याला व तळपायांना. (इति एक पंजाबी स्नेही)
इथेही जास्त माहिती मिळेल : http://www.maayboli.com/node/1477

Pages