Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साक्शि, आग्री लोकांचे माहित
साक्शि, आग्री लोकांचे माहित नाही पण आमच्या कडे कांदा -सुके खोबरे तपकिरी रंगावर तळून त्याची अगदी स्मूद पेस्ट बनवतात आणि ती या उसळीसाठी वापरतात.
मी अमि - मी ही अशीच करते पण
मी अमि - मी ही अशीच करते पण कांदा-सुके-ओले खोबरे याचे वाटप वापरुन, तरीही नाही जमत तशी चव :(..
बेक केलेली कारल्याची भाजी कशी
बेक केलेली कारल्याची भाजी कशी करायची कोणि सांगू शकेल का प्लीज?
रोडगे म्हणजे काय असते? आणि ते
रोडगे म्हणजे काय असते? आणि ते कसे करायचे असतात? आज भरीत रोडगा करायचे असते ना म्हणून विचारले.
निर्मयी, मागे बी ने इथे
निर्मयी, मागे बी ने इथे रोडग्यांबद्दल लिहिले होते. जाड थरांचे गोळे करुन थेट निखार्यावर भाजायचे असतात.
साक्षी, ओले खोबरे नाही
साक्षी, ओले खोबरे नाही वाटायचे .... फक्त किंचित तपकिरी परतलेला कांदा आणि सुके खोबरे कीस वापरायचा.
दिनेशदा, गावा चीजची पाकृ
दिनेशदा, गावा चीजची पाकृ द्याना प्लीज.
सत्वर पाव गे मला.. भवानीआई
सत्वर पाव गे मला.. भवानीआई रोडगा वाहीन तुला...... तेच का?
चिन्नु मी लिहिली होती बहुतेक.
चिन्नु मी लिहिली होती बहुतेक. इथे थोडक्यात लिहितो. पेरु उकडून ते फडक्यावर झारून घ्यायचे. त्यात एक किलो पेरुला ८०० ग्रॅम साखर व एक लिंबाचा रस घालून घट्टसर होईपर्यंत आटवायचे आणि मग त्याच्या वड्या पाडायच्या. यात बाकिचे काहीच घालत नाही. साखरेचे प्रमाण मात्र बघावे लागेल मला !
थांकु!
थांकु!
दिनेशदा मला prawns koliwada
दिनेशदा मला prawns koliwada चि पाकृ द्याना प्लीज.
मनुरुची, वर्षू नील ने लिहिली
मनुरुची, वर्षू नील ने लिहिली होती इथे.
सेट डोसा कसा करायचा?
सेट डोसा कसा करायचा?
वरीचा भात, खीर कशी करतात,
वरीचा भात, खीर कशी करतात, पाण्याचे प्रमाण इ.?? पहिल्यांदाच आणलेत उपवासासाठी. सर्च केले पण नाही मिळाले
साक्षी, भगर साधारण
साक्षी, भगर साधारण उपम्यासारखीच करायची. इकडे पहा - http://www.maayboli.com/node/13985
किंवा http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/94278.html?1210873247
उपासाच्या पदार्थांसाठी - http://www.maayboli.com/node/2548/by_subject/11/255 आणि http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/94272.html?1218142162
धन्स मंजुडी, वाचते... भगर नाव
धन्स मंजुडी, वाचते...
भगर नाव माहित नव्हते आणि 'वरीचा भात' असे सर्च करत होते, त्यामुळे मिळत नव्हते.
दीपाकुल, मागे भरत मयेकरांनी
दीपाकुल, मागे भरत मयेकरांनी दिलेली लिंक : http://ruchii-madhu.blogspot.com/2006/11/set-dosa-and-sagu.html
http://www.awesomecuisine.com/recipes/173/1/Set-Dosa/Page1.html
दलिया/ लापशी रवा घरी फूड
दलिया/ लापशी रवा घरी फूड प्रोसेसर मध्ये बनवता येतो का? येत असल्यास कोणत्या प्रकारचे गहू आणावेत?
बनवता येते. मिलमधे त्यासाठी
बनवता येते. मिलमधे त्यासाठी हार्ड रेड विंटर नावाचा गहू वापरतात.
मला वाटतं खपली गहू चालेल.
पण मिक्सरवर करणे तितकेसे किफ़ायतशीर होत नाही, कारण
तुकडे एकसमान आकाराचे होत नाहीत. तसेच ते बाजारात मिळतात
तसे कोरडे होत नाहीत, त्याला पिठ चिकटते.
खिरीसाठी, लापशीसाठी थोडेसे हवे असतील तर गव्हाला पाण्याचा
हात लावून सावलीत जरा वाळवायचे आणि मिक्सरमधून काढायचे.
कोंडा नकोच असेल तर पाखडून टाकायचा.
धन्स दिनेशदा
धन्स दिनेशदा
मला कोणी तरी सांगा की एकंदरीत
मला कोणी तरी सांगा की एकंदरीत लहान मोठ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले दुध कोणते गायीचे की म्हशीचे? तुलनात्मक दृष्ट्या चांगले कोणते? कॅल्शिअम्साठी? पण मग तुपही कोणते चांगले गायीच्या दुधापासुन केलेले की म्हशीच्या? मला अजुन तरी गायीच चांगल्या प्रतीच(घट्ट्,जाड अस) दुध मिळाले नाहीये अगदी गोठ्यातुन आणले तरी पातळच असते. साय पण जास्त येत नाही त्यावर त्यामुळे तुपही नाही करता येत. पण म्हशीच्या दुधाची साय चांगली येते नी मग तुपही. पण सगळीकडे गायीच्याच दुधाचा-तुपाचा बोलबाला दिसतो डाएट्साठी. फक्त पचायले हलके म्हणुन चांगले का? तुलनेसाठी गुगलुन पाहिले तर हे मिळाल हे कितपत योग्या आहे?
http://www.buffalomilk.co.uk/id20.htm
यावर आधी चर्चा झाली असेल तर लिंक देणे करावे..
मला सर्च केल्यावर ऑरगॅनिक दुधाबद्द्लची चर्चा मिळाली पण स्पेसिफिकली गायी-म्हशीच्या दुधाचे तुलनात्मक माहिती नाही मिळाली.
http://www.indiadairy.com/inf
http://www.indiadairy.com/info_buffalo_milk_vs.html
साक्षीमी, गायीचे दुध चांगले,
साक्षीमी, गायीचे दुध चांगले, लहान मुलांसाठी आणि गायीचे तूप खूप औषधि आहे.

म्हशीचे दूध पचायला जड असते.
तुमच नशिब चांगल असेल तर तुम्हाला चांगल्या गायीचे दूध मिळू शकते.
बेंगलोरमध्ये असताना मी चोंगल्या गायीचे गोठ्यातून दुध आणत होते. मी १लि. दूध रोज घेत होती आणि महिना, दोन किलो तूप बनवत होती.
आता ईकडे माझेपण दूधाचे प्रोब्लेम चालू आहेत. एका ठिकाणि म्ह्शीच दूध मिळत आहे, पण चार दिवसापूर्वि दूध आणल्यावर लगेच गरम करायचे राहिले आणि डबा उघडला तर दूध लालसर दिसल, त्या दिवशि दूध आणायला उशिरा गेली आणि मी ज्या म्ह्शीच दूध घेते तीच दूध काढून झाल होत म्ह्णून त्याने मला दुसर्या म्ह्शीच दूध दिल आणि माझ्या समोरच ईंजेक्क्शन दिल होत, पण तेव्हा मी दुर्लक्ष केल, कारण घरात अजिबात दूध शिलक नव्हत आणि पाकिटच दूध मी नाहि पित.
गोठ्यातून दूध घेत असाल तर सांभाळून घ्या. आणि गवळि जर दूध घरी आणून देत असेल तर ते अजिबात घेवू नका. त्यात काय काय मिक्स केल असेल ते फक्त देवाला ठाऊक.
गोठ्यातून दुध आणत असाल तर काही टीप्स लक्षात ठेवा.
१. दूध काढताना समोर उभ राहून काढून घ्या.
२. गवळि, दूध ज्यात काढणार ते भांड रोज चेक करा, कारण त्यात अगोदरच पाणी ओतून ठेवतात.
३. दूध एकदा गर्म केल्यावर लगेच साय येत नाही सायिसाठि चार ते पाच वेळा दूध गरम करा. रात्रि थंड करुन फ्रिजमध्ये ठेवा, आणि सकाळी तुम्हाला भाकरीसारखि साय दिसेल.
४. गाय किंवा म्ह्शी आजारी असतील तर दुध कमी देतात किंवा देत नाहि, अशावेळेस गाय किंवा म्ह्शींना इंजेक्शन देवून दूध काढले जाते. (असे दूध चुकूनहि घेऊ नका.)
५. गाय किंवा म्ह्शीने नुकतच वासरु दिल असेल तर दूध पातळ मिळ्त.
६. कधी कधी गाय आणि म्ह्शीच दूध मिक्स करुन दिल जात.
एवढे नियम पाळायचे..
एवढे नियम पाळायचे.. त्यापेक्षा गाय पाळलेली काय वाईट?
जागोमोहनप्यारे, हे नियम नाही
जागोमोहनप्यारे, हे नियम नाही आहेत, पण गोठ्यातील दूध घेताना काहि गोष्टी माहित असाव्यात, जस फळ, भाज्या घेताना आपण पारखून घेतो.
गाय पाळायला मलापण आवडेल, पण बदलिचि नोकरी असल्यामूळे सध्या शक्य नाहि.
भविष्यात नक्कि विचार करेन,
मायबोली वर लहान मुलाना (माझी
मायबोली वर लहान मुलाना (माझी मुलगी १८ महिन्याची आहे) देता येतील/आवडतील अशा पाकक्रुती चा विभाग आहे का कुठे? घरी जेवायच् असेल; तर प्रश्न नसतो तेव्हडा,पण माझी मुलगी डे-केअर ला जाते,तिथे तीला तीच्या हाताने उचलऊन खाता येइल अशा काहि पाक् क्रुती कोणी सुचवू श् केल का? these days we have a rotation of pasta salads with different veggie combos/grilled cheese sandwich/ tofu stir fry/pita-bread with hummus. If anyone has any other ideas I would appreciate them greatly. Thank you.
माझ्या ५ वर्षाच्या लेकाचा
माझ्या ५ वर्षाच्या लेकाचा वाढदिवस बागेत हिरवळीवर (कोवळ्या उन्हात, सकाळी १० ते १२) करायचा आहे. काय काय ठेऊ शकेन ? तयारीला मी एकटीच आहे. मदत फारशी कोणाची नाही. त्यामुळे आधी करून ठेवण्याजोगे, विकत आणण्यासारखे सोपे पदार्थ सुचवाल का ? मी भारतात आहे.
बाळांचा खाऊ असा एक लेख मी
बाळांचा खाऊ असा एक लेख मी लिहिला होता. त्यात आणि प्रतिसादात पण बर्याच नव्या कल्पना आहेत. पुर्वी लहान मुलांचा आहार, असा पण एक बीबी होता, तिथेही बरेच खाऊ सापडतील.
दीपा_एस, इडली चटणी (घरी) /
दीपा_एस, इडली चटणी (घरी) / ढोकळा (विकत) / सँडविचेस (गोड/ तिखट) - घरी असे करता येईल. किंवा ऑर्डर देऊन पदार्थांची डिलिव्हरी बागेतच मिळाली तर बघा. गोडात विकतचे गुलाबजाम / बंगाली मिठाई आणू शकता. घरी गोड करायचे असेल तर सोपा गोडाचा पदार्थ, उदा सत्यनारायण शिरा इ. या व्यतिरिक्त चिप्स किंवा छोटे तळलेले बटाटा पापड आयते मिळतात ते ठेवू शकता. केक असेलच. मुख्य म्हणजे घरून बागेत जायचे असेल व तुम्ही एकट्या सारी ने-आण करणार असाल तर तुम्हाला कमीत कमी व्याप होईल असे पहा.
क्षमा, तूझी लिस्ट छान आहे.
क्षमा,
तूझी लिस्ट छान आहे. माझी मुलगी लहान असताना मी हे पदार्थ देत होते डब्यात.
१. छोट्या इड्ली चा stand वापरून पिटुकल्या इडल्या + केचप
२. teeter tots +cheese pieces+ grapes
3. mini penne pasta +red sauce थोडा कोरडा होइ पर्यंत परतून caserol/thermos च्या डब्यात. डेकेअर वाले ताट्लीत ऊतुन द्यायचे
-शिरीन
Pages