Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आभारी आहे गं सख्यांनो. मी
आभारी आहे गं सख्यांनो. मी वाचताना विचार केला कि प्रत्येकीचं नाव घेवुन आभार मानुयात. पण नंतर बघत गेले कि सुचनांचा पाऊस पडला आहे. कोणाकोणाचा नाव घेवु. सगळ्यांचे आभार.
इतक्या रेसिपीज आल्या आहे कि आता प्रश्न डाळ कशी संपवु असा नाहीच. आता अजुन खरेदी करावी लागणार बहुतेक. आज खिचडी आणि पकोडे नक्की.
.
.
मसूरीच्या डाळीचे साम्बार व
मसूरीच्या डाळीचे साम्बार व रस्सम छान होते.
इतक्या सगळ्या मसूर रेसिपी
इतक्या सगळ्या मसूर रेसिपी करायच्या झाल्या तर मनिमाऊला अजून २-३ वेळा तरी नवर्याला बाजारी पाठवावे लागेल.
सिंडरेला, अगं आता काय
सिंडरेला,
अगं आता काय बिशाद तो चुकीची डाळ आणेल परत.
इतकं डोकं खाल्लं त्याचं.
आणि मी इतकी कटकट केल्यावर आता माझी तरी काय बिशाद कि मी त्याला परत ती डाळ आणायला सांगेन ( आता खरंच जरी हवी असेल तरी) .
मनिमाऊ, या बाफच्या हेडरमधले
मनिमाऊ, या बाफच्या हेडरमधले बोल्ड केलेले वाक्य कृपया वाचा आणि त्याप्रमाणे कृती करा
मृण्मयी तू सांगितल्याप्रमाणे
मृण्मयी तू सांगितल्याप्रमाणे काल वाटान्याची धिरडी केली. निव्वळ अप्रतिम. आता अगदी फक्त दिरड्यांसाठी भिजवुनही केला जाईल. धन्स ग
मंजू, उप्स ! सॉरी, मी
मंजू, उप्स ! सॉरी, मी विसरलेच होते. डिलिट करते.
प्लिज .. रंगीत कंरज्या (लेयर
प्लिज .. रंगीत कंरज्या (लेयर वाली )याचि रेसिपी देवु शकेल.. मी या आधी माबो वर पाहिली होती पण मिळत नाही.
दीपा चव्हाण, या पानाच्या वर
दीपा चव्हाण, या पानाच्या वर उजव्या बाजूला दिसणाऱ्या 'आहारशास्त्र आणि पाककृती' या ग्रुपावर क्लिक करून विषयवार यादी > पाककृती प्रकार > गोड पदार्थ या ग्रुपामध्ये तिसऱ्या पानावर 'इंद्रधनुषी करंज्या' मिळतील.
धन्यवाद मंजूडी मी कधी पासुन
धन्यवाद मंजूडी मी कधी पासुन शोधतेय.. सगळे प्रकार पाहिले.. मला वाटत मी हेच मिसल...:)
माझ्याकडे मटकीची डाळ आली आहे
माझ्याकडे मटकीची डाळ आली आहे चुकुन्...त्याचे काय करता येईल?
शंकरपाळ्या ह्या नुसत्या मैदा
शंकरपाळ्या ह्या नुसत्या मैदा + थोडासा रवा ऐवजी मैदा रवा आणि गव्हाच पीठ किंवा नुसतच गव्हाच पीठ याच्या बनवल्या तर चांगल्या होतील का ?
सुमेधाव्ही, नुकतीच
सुमेधाव्ही, नुकतीच http://www.maayboli.com/node/29979 इथे पपरिया ची कृती आली आहे ती करुन बघा. किंवा सर्च मध्ये मटकी डाळ शब्द घालून माबोवर त्यापासून बनवलेल्या पाकृ सापडतात का हे शोधा.
मटकीची डाळीचा डाळ-कांदा पण
मटकीची डाळीचा डाळ-कांदा पण मस्त लागतो. फोडणीत भरपुर कांदा घालुन परत्ल्यावर लसुन कोथिंबीर, मीट।, काळा मसाला घालुन १० मिनीट भिजवलेली मटकी डाळ घालुन शिजवणे.
प्लेन फ्लोवर म्हणजे मैदा च
प्लेन फ्लोवर म्हणजे मैदा च असतो का ? कारण अहों नि आणलाय. all purpose floor ani plain floor मध्ये काय फरक आहे. जर मी ते पीठ शंकरपाळ्या आणी कंरज्या ला वापरले तर पदार्थ बिघडणार नाहि ना ? प्लिज कोणि सांगाल का
डायबेटिस लोकांसाठी लाडू,
डायबेटिस लोकांसाठी लाडू, करंज्या इ. च्या रेसिपी आहेत का कुठे? ईथे मधुमेही लोकांचा बीबी आहे पण तिथे काही माहिती नाही.
मला या वर्षी दिवाळी फराळासाठी काही sugarless/low sugar/low carbs रेसिपी हव्या आहेत. मिळतील का इथे?
बिनसाखरेचे खजुर-बदाम रोल करता
बिनसाखरेचे खजुर-बदाम रोल करता येतील. थंडीच्या दिवसात चांगले खायला. पण हे रोल कमी कॅलरीजचे नाहीत.
juyee, नुसत्या कणकेच्या
juyee, नुसत्या कणकेच्या शंकरपाळ्या चांगल्या होतात. मी नेहमी करते.
कणिक आणि मैदा निम्मा निम्मा घेऊन पण छान होतात.
कणकेच्या शंकरपाळी साठी दुध्-तुप्-साखर १-१-१ घेऊन मावेल तेवढी कणिक आणि (१-२ चमचे मैदा) घालुन मी नेहमी करते. छान खुसखुशीत होतात.
धन्स सोनपरी. पण खजूरामधे खूप
धन्स सोनपरी. पण खजूरामधे खूप साखर असतेच. मी कमी कॅलरीजचे पदार्थ नाही शोधत आहे. फक्त कमी साखर, कमी कार्ब्स पाहिजेत. तूप, तळणं अस चालेल. नट्स सगळ्या प्रकरचे चालतील पण साखर्/गूळ खूप कमी हवा. आहेत का असे काही पदार्थ?
धनश्री, बाजारात डायेट चिवडा
धनश्री, बाजारात डायेट चिवडा मिळतो, तो वापरुन (तो पाकात टाकून) लाडू करता येतात. राजगिरा/लाह्या/डाळं यांच्या पिठाचे लाडू करता येतात. बेक करुन शंकरपाळ्या, चकल्या, करंज्या करता येतात.
साखरेला पर्याय म्हणून खजूर वापरू नये त्यात भरपूर साखर असते. स्पार्टेम सारखे स्वीटनर्स चांगले.
प्लेन फ्लोअर म्हणजे मैदाच. तरीपण नूसत्या नजरेने त्याची पारख करता येईल. जर तो शुभ्र असला तर मैदाच. त्याच्या शंकरपाळ्या, करंज्या करता येतील.
अनु ३ धन्यवाद ग...
अनु ३ धन्यवाद ग...
या बीबीवर डोकावणार्या सर्व
या बीबीवर डोकावणार्या सर्व मंड़ळींना आवडेल असे ...
काल मी Julie & Julia असा एक मस्त सिनेमा बघितला.
अमेरिकेत फ्रेंच कुकिंग सामान्यापर्यंत पोहोचवणारी ज्यूलिया चाईल्ड आणि तिच्या पुस्तकातील रेसिपीज करायचा प्रयत्न करणारी एक ब्लॉग लेखिका, या दोघींची हि कथा. पहिली ज्यूलिया १९४९ सालातली तर ज्यूली, २००२ सालातली. अर्थातच दोघी कधी भेटल्या नाहीत.
या दोन्ही कथा पडद्यावर समांतर येत राहतात. कुकिंग बाबत असणारी पॅशन सोडल्यास, दोघींमधे तसे काही कॉमन नाही. दोघींच्याही आयूष्यात काही सनसनाटी घटना नाहीत. साधारण चढऊतार असणारी दोघींची आयुष्यं. पण पडद्यावरचे त्याचे सादरीकरण अप्रतिम आहे.
मेरील स्ट्रीप, ज्यूलिया चाईल्ड च्या भुमिकेत आहे. तिला या (किंवा कुठल्याही) भुमिकेत बघणे म्हणजे एक पर्वणीच आहे. पॅरिसमधे नवर्याच्या नोकरीमूळे आलेली ज्यूलिया, फ्रेंच कुकरीच्या प्रेमातच पडते. पुढे ते प्रकार शिकणे त्यावर लिहिणे आणि मग त्याचे पुस्तक काढणे, हे ओघाने येतेच. तिला पदार्थ शिजवताना बघणे हीसुद्धा एक पर्वणीच आहे. एखाद्या तज्ञ शेफप्रमाणेच तिने हे सर्व सादर केलेय.
शिवाय फ्रेंच लोकांच्या लकबी, त्यांचे उच्चार जबरदस्त सादर केलेय. (खास करुन ब्री चीजचे तिने केलेले वर्णन) तिच्या आयूष्यातला एक हळवा कोपरा दुखावल्याचे दोन प्रसंग तिने अप्रतिम सादर केलेत. प्रकाशकाकडून आलेले पत्र फोडताना केलेला अभिनय.. ग्रेटच.
ज्यूलीच्या भुमिकेत अॅमी अॅडम्स आहे. नोकरीत थोडीफार मागे पडलेली ज्यूली, एक ब्लॉग लिहायला सुरु करते. एका वर्षात ५७४ रेसिपीज ट्राय करायचा संकल्प करते. आणि त्या करताना आलेले अनुभव ब्लॉगवर लिहित जाते. हा संकल्प पूर्ण करण्यात तिला तिचा नवरा साथ देतो. पण या दरम्यान कधी तिची फजिती होते तर कधी ती रेसिपी जमते. पण आपला संकल्प मात्र ती पूर्ण करतेच.
या दोन्ही वास्तविक व्यक्तीरेखा. दोन वेगवेगळ्या पुस्तकांवर हा चित्रपट बेतलेला आहे. तरीही कुठेही सांधेजोड केलीय असे वाटत नाही. ज्यांना ज्यांना कुकिंग आवडते त्यांनी अवश्य बघावा.
धन्यवाद दिनेशदा. काल मी आगावे
धन्यवाद दिनेशदा.
काल मी आगावे नेक्टर आणि स्पेंडा साखरेचा प्रयोग करुन रव्याचे लाडू बनवले. जरा चिकट झाले पण सुक्या खोबर्याच्या चुर्यात जरा घोळले मग खुट्खुटीत झाले.
आज बेसनाचे लाडू करणार आहे. ते सोपे जातील कारण साखर कोरडीच मिसळायची असते ना.
मला वाटतय की ७-कप वड्यांमधे पण प्रयोग करता येइल.
आईकडे एका समारंभानिमित्ताने
आईकडे एका समारंभानिमित्ताने १०-१२ नारळ आले आहेत. खोबर्याचा कीस करून मायक्रोवेव्हमध्ये सुकवता येतो असे वाचल्यासारखे वाटते. याची कृती सांगाल का?
अमि, सध्या चांगले उन असेल ना?
अमि, सध्या चांगले उन असेल ना? मग नारळ फोडून वाळवून सुक्या खोबर्याच्या
वाट्या करता येतील. आतून किंचीत मीठाचे बोट लावायचे. १०-१२ नारळ कुठे खवत
बसणार?
साताठ दिवसात वाळतील?
खवलेला नारळ, सेल्फ सिलींग
खवलेला नारळ, सेल्फ सिलींग बॅग्ज मधे भरून फ्रिझ करता येइल.
वापरताना थोडा थोडा काढुन बॅग परत सील करायची. चव अजिब्बात खरब होत नाही.
धन्स दिनेशदा, लाजो
धन्स दिनेशदा, लाजो
काहीच न करता आहेत तसेच ठेवले
काहीच न करता आहेत तसेच ठेवले तरी जोवर पाणी आहे तोवर लागेल तसा ओला नारळ म्हणुन वापरता येईल. पाणी सुकले की नारळ पण सुकत जातो आणि मग सुकलेला नारळ म्हणून वापरता येईल. मस्त गोटे निघतात.
नलिनी, मुंबईच्या हवेत नाही
नलिनी, मुंबईच्या हवेत नाही टिकत. आणि थंडी पडली कि तडे जातात.
Pages