आपले साहित्य सवडीनुसार पूर्ण करुन एकत्रितपणे प्रकाशित करणे आता नवीन मायबोलीवर शक्य आहे. लेखक वा लेखिकेला आपले साहित्य जोपर्यंत प्रकाशित करायचे नसेल तोपर्यंत ते "अपूर्ण" अवस्थेत ठेवता येईल. असे साहित्य इतर वाचकांना दिसणार नाही. जेव्हा आपले साहित्य प्रकाशित करण्यायोग्य होईल तेव्हा त्याची स्थिती "संपूर्ण" अशी करावी.
"अपूर्ण" साहित्यात काही बदल करायचे असल्यास आपल्या सभासद खात्यात जाऊन "माझे सदस्यत्व" या विभागांतर्गत असलेल्या "पाऊलखुणां" मध्ये आपला अप्रकाशित लेख दिसेल. तिथे लेखक वा लेखिकेला आपल्या साहित्याचे संपादन करून त्यात आवश्यक ते बदल करता येतील.
कृपया लक्षात ठेवा: नवीन लेखाची मूळ स्थिती "संपूर्ण" असेल. त्यामुळे ज्यांना पूर्ण लेख लिहून लगेच प्रकाशित करायचा आहे, त्यांना काहीही करण्याची आवश्यकता नाही. परंतु ज्यांना लेख लगेच प्रकाशित करायचा नाही, त्यांना लेखाची स्थिती "अपूर्ण" अशी बदलावी लागेल.
१. माझे सदस्यत्व मधे पाऊलखुणा अंतर्गत नवीन विभाग केला आहे. जुन्या विभागाला लेखन+प्रतिक्रिया असे नवे नाव दिले आहे. नवीन "लेखन" विभागात फक्त त्या सभासदाने केलेले लेखन दाखवले जाते.
२. अप्रकाशित लेखन वेगळे ओळखता यावे म्हणून त्याला वेगळ्या रंगाची पार्श्वभूमी आणि ठिपक्यांची सीमारेषा दिली आहे.
वर दिलेल्या दोन्ही सुविधा वापरून अप्रकाशित लिखाण शोधणे व ओळखणे सोपे झाले आहे.
अपूर्ण लेखनाबद्दल अधिक माहिती इथे वाचा.
नमस्कार.
नमस्कार. हे अपूर्ण लेखन save कसे करायचे नक्की ? हे कृपया तपशिलवार सांगाल का?
मी आता रंगीबेरंगीवर गेलो. तिथे शीर्षक, विषय, प्रकार हे रकाने भरले. मग खाली साहित्य लेखन मध्ये 'अपूर्ण' निवडले. आता लेखन 'साहित्य लेखन' मध्ये केले व preview मागितला की 'मजकूर field is required' असा गुलाबी संदेश येतो. म्हणजे, जरी मला 'अपूर्ण' लेखन करायचे असले तरी मी 'मजकूर' भागातच लिहीणे अपेक्षित आहे का ? शिवाय, शीर्षक, विषय वगैरे कुठलेच रकाने न भरता जर 'साहित्य लेखन' मध्ये लेखन केले व preview मागितला तर 'xyz field is required' असे संदेश येतात. म्हणजे, अपूर्ण लेखन करायचे असले तरी हे रकाने आधीच भरणे आवश्यक आहे का ?
आता मजकूर भागात काही लिहून व लेखनस्थिती 'अपूर्ण' ठेऊन preview मागितला तर तो येतो आणि खाली preview submit असे दोन पर्यायही दिसतात. आता या पायरीवर मला जर हे लिखाण प्रकाशित न करता save करायचे असले तर काय करावे ? या संपूर्ण प्रक्रियेत लेखनस्थिती 'अपूर्ण' अशीच ठेवली आहे तरीही submit म्हटले की ते प्रकाशित होते. प्रकाशित न करता खिडकी बंद केली तर ते पाऊलखुणांमध्ये दिसत नाही.
मी नक्की कुठे चुकत आहे हे कृपया सांगू शकाल का ? धन्यवाद.
This signature was written entirely with recycled electrons.
नेमस्तक,
नेमस्तक, लेखनासाठी जेव्हा 'अपूर्ण' हा पर्याय निवडला जातो, तेव्हा त्या लेखकाव्यतिरिक्त ते कोणाला दिसत नाही. पण त्या लेखकाला हे अप्रकाशित लेखन इतर प्रकाशित लेखनाप्रमाणेच दिसते. त्यामुळे बर्याचदा हे अर्धवट (अवस्थेतले) लेखन लोकांपुढे आले की काय असे वाटते. म्हणून अशा अप्रकाशित लेखनाचा रंग वेगळा (करडा इ.) ठेवता येईल का? किंवा या अप्रकाशित लेखनाच्या सुरुवातीला 'हे अप्रकाशित लेखन आहे आणि अद्याप ते लेखकाव्यतिरिक्त इतरांना वाचनासाठी उपलब्ध झालेले नाही' अशी ओळ टाकता येईल का?
स्लार्टी, अपूर्ण हा पर्याय निवडून 'Submit' केलेले लेखन जतन होते (आणि लेखकापुरते प्रकाशित होते). इतरांना दिसत नाही.
आपण
आपण सांगित्ल्याप्रमाणे पाऊलखुणा मध्ये पाहिले, पण माझा अप्रकाशित लेख कुठेच दिसत नाही. ललित मध्ये "कातरवेळ" नाव होते. कुठे हरवला तर नसेल ना?
परवा
परवा रंगीबेरंगीमध्ये एक लेख लिहायला सुरूवात केली होती. 'एका तिकीटांची कथा' नाव होते. अपूर्ण म्हणून सेव्ह केले होते. परंतु आता पाऊलखूणामध्ये दिसत नाहीये. कुठे पाहायला पाहिजे?
नितिन,
नितिन, अश्विनी
कदाचीत तुम्ही लेखन Preview केलं असेल आणि नंतर सेव करायचं राहीलं असेल.
माझ्यामते
माझ्यामते सेव्ह केले होते. पण शक्यता नाकारता येणार नाही. असो, आधीच उल्हास त्यात.. आता परत कधी लिहायला मुहूर्त लागणार देव जाणे.
पाऊलखुणा
पाऊलखुणा मध्येही एकापेक्षा जास्त पेजेस असतील तर पहा. शेवटी लिंक्स असतील. पहिल्या पानावर नसले तरी पुढे कुठे आहे का पहा.
नाहि हो!!!!
नाहि हो!!!! सगळिकडे पाहिले. सेव्ह पण केले होते......
मदत
मदत समिती,
मला एक प्रश्न आहे.
काही लेखन 'अपुर्ण' अवस्थेत सेव्ह केल्यावर नंतर जर ते लिखाण नकोसे वाटल्यामुळे किंवा काही कारणामुळे काढुन टाकायचे (डिलीट करायचे) असल्यास कसे करावे ?
'अपूर्ण'
'अपूर्ण' म्हणून सेव्ह केलेले लेखन काढून टाकण्यासाठी 'माझे सदस्यत्व > पाऊलखुणा' मध्ये जा आणि लेखनाच्या लिन्क वर क्लिक करा. हे केल्यानंतर 'संपादन' टॅब मध्ये खाली 'Delete' लिन्क दिसेल.
अप्रकाशीत
अप्रकाशीत लेखन मुखपृष्ठावर प्रकाशनानंतर दिसावे असे वाटते. मी ३-४ दिवसांपासुन रंगिबेरंगी वर लेखन करत होतो .ते अप्रकाशीत ठेवले होते. आता प्रकाशित केल्यावर ते ६व्या ७व्या स्थानावर आहे. जर अजुन २-३ दिवसांनी प्रकाशित केले असते तर ते मुखपृष्ठावर दिसलेच नसते.त्यामुळे कृपया मुखपृष्ठावरील लिस्ट प्रकाशनानंतर लिहावी.
मागे मी
मागे मी मदत समितीला माझे लिखाण पाठवले होते... ते नक्की कुठल्या सदरा खाली प्रकाशित करावे ते कळेना म्हणून आणी ते आता कुठे प्रकाशित झाले आहे हे ही समजत नाही.
दीपक
"Reality is an intensely personal experience..subject to all forms of perceptual biases."
मी माझे दुर्गभ्रमण या सदरात
मी माझे दुर्गभ्रमण या सदरात राजमाची हा नविन लेखनाचा धागा लिहिला आहे. मला पाहिजे कि तो लेख सर्वांना दिसावा. पण आता तो फक्त लॉगिन केलेल्या सभासदांनाच दिसत आहे. अॅडमिन हि चुक सुधारु शकतील काय?
गिरिविहार तुम्ही तो लेख फक्त
गिरिविहार
तुम्ही तो लेख फक्त ग्रूप पुरताच मर्यादित ठेवला आहे, तो सगळ्यांना दिसाण्यासाठी लेखाचे संपादन करून तो तुम्हाला सार्वजनिक करावा लागेल. संपादन मध्ये गेल्यावर "ग्रूप" असा ड्रॉप डाऊन मेन्यु दिसेल तिथे हा पर्याय आहे.
मी
मी http://www.maayboli.com/node/18419/edit इथे लेख लिहिते आहे. पण ते 'अपुर्ण' वगैरे कुठे दिसतच नाहीये. मी सेव केल्यावर तो सगळ्यांना दिसायला लागला. म्हणुन मी त्याला फक्त सभासदांसाठी केला. पण मला तो एवढ्यात प्रसिद्ध करायचा नाहीये. कृपया लवकर मदत करा.
साधना लेख अपूर्ण स्थितीत
साधना लेख अपूर्ण स्थितीत ठेवायची सोय हितगुज ग्रूप मध्ये "नवीन धागा", "नवीन गप्पांचे पान" यासाठी उपलब्ध नाही. ती फक्त गुलमोहर आणि रंगीबेरंगी साठी आहे.
यावरचा तात्पुरता उपाय म्हणजे लेख गुलमोहर विभागात लिहायला घेणे आणि तिथे अपूर्ण म्हणून सेव्ह करणे. लेख पूर्ण झाल्यावर तो नवीन धागा उघडून तिथे कॉपी पेस्ट करून प्रकाशित करणे.
मी आजच सकाळी एक लिखाण केले
मी आजच सकाळी एक लिखाण केले होते व ते "अपूर्ण" अवस्थेत ठेवले होते.
पण नंतर पुन्हा पाउलखुणामध्ये तपासले असता, मला हे अपूर्णावस्थेतील लिखाण मिळाले नाही.
मला हे लिखाण मिळू शकेल काय, शक्यता तशी कमी आहे, पण आशा आहे ?
एखादे लिखाण "अपूर्ण" ठेवायचे असेल तर आणखीण काय काळजी घ्यावी?
सेठ, लिखाण सेव्ह केले होते
सेठ, लिखाण सेव्ह केले होते काय हो?
चित्रपट ग्रूप मधे लिखाण
चित्रपट ग्रूप मधे लिखाण करायचे झाल्यास ते "अप्रकाशित" कसे ठेवता येईल. तसा पर्याय सद्ध्या नाहीये का? की मलाच तो सापडत नाहीये.
कारण मी चित्रपटांवर जी लेखमालिका लिहीतो ती ललित मधे न टाकता चित्रपट ग्रूप मधे लिहावी अशी सूचना मला करण्यात आली होती पण अप्रकाशित ठेवण्याची सोय दिसत नाही.
मंदार, लिखाण अप्रकाशित
मंदार,
लिखाण अप्रकाशित ठेवण्याची सोय सध्या फक्त गुलमोहरातच available आहे. मागे हाच प्रश्न मी मदत समिती (किंवा अॅडमिन) ला विचारला होता. तेव्हा असे उत्तर मिळाले होते.
मला माझे नुकतेच ललित मध्ये
मला माझे नुकतेच ललित मध्ये प्रकाशित झालेले लिखाण काढून टाकायचे आहे. ‘अपूर्ण’ असे क्लिक करूनही ते प्रकाशित झाले आहे. अजून त्यावर मला काम करायचे आहे. पूर्वीची ‘पाउलखुणा’ ही सोय टप्प्याटप्प्याने लिखाणासाठी चांगली होती. त्या ऐवजी काय करता येईल? कृपया मला मदत करा.
अनया नमस्कार. पाउलखुणा बंद
अनया नमस्कार.
पाउलखुणा बंद केल्या आहेत पण केलेले लेखन अजूनही दिसते. माझे सदस्यत्व या ठिकाणी गेल्यास लेखन असा दुवा दिसेल. तिथे तुमचे पूर्ण /अपुर्ण असे सर्व लेखन दिसेल.
लेखन अपुर्ण स्थिती त क से
लेखन अपुर्ण स्थिती त क से ठेवायचे? ते माहिती नसल्यामुळे एक ओळ जरी लिहीली तरी ती सगळ्यांना दिसते
आणि पाउलखुणा मध्ये कसे जायचे?
.
.
पाऊलखूणा वै बंद झाल्याने
पाऊलखूणा वै बंद झाल्याने वरच्या रेसीपीने अर्धवट लिखाण सेव्ह करता येत नाहिये.
अजून काही युक्ती आहे का? मला कुठेही "अपूर्ण" का पर्याय दिसत नाहिये.
नमस्कार _मधुरा_ गुलमोहर
नमस्कार _मधुरा_
गुलमोहर लेखन - १ ऑगस्टपासून बदल इथे केलेल्या घोषणेनुसार, अपूर्ण लेखनाचा पर्याय सध्या काही काळापुरता बंद आहे.
आता लेखनाच्या धाग्यालादेखील अपूर्ण स्थितीत ठेवता येईल. त्यामुळे नेहेमीप्रमाणे लेखन पूर्ण झाल्यावर लेखन प्रकाशीत करू शकता. ही सुविधा तात्पुरती तांत्रीक कारणासाठी बंद केली आहे. सुरू होताच कळवण्यात येईल.
त्याला पर्याय म्हणून ऑफलाईन केलेलं लिखाण मायबोलीवर कसे लिहावे? या दुव्यावरील उपाय करता येतील व लेखन तुमच्या काँप्यूटरवर सेव्ह करता येईल.
तसदीबद्दल क्षमस्व !
-मदत_समिती.
माझे सदस्यत्व मध्ये गेल्यावर
माझे सदस्यत्व मध्ये गेल्यावर मला पाऊलखूणा ही टॅब कुठेही दिसत नाही. कारण समजल्यास बरे होइल.
सुरेखा कुलकर्णी , नमस्कार
सुरेखा कुलकर्णी , नमस्कार
आपल्याला हवे असलेल्या कारणासाठी कृपया पाऊलखुणांची सोय तात्पुरती बंद आणि लेखकाचे/लेखिकेचे जुने लेखन पाहण्याची सोय पुन्हा सुरु या अॅडमिन टीमच्या रंगीबेरंगीवरच्या दोन पोष्टी पहाव्यात ही विनंती.
-धन्यवाद
मदत_समिती.
पाऊलखूणाबद्दल एवढ्यासाठी
पाऊलखूणाबद्दल एवढ्यासाठी विचारले की अप्रकाशित अर्धवट लेखन बघायचे कुठे? माझ्याकडे "अप्रकाशित्"ची टॅब पण दिसत नाही. आत्ता कुठे मायबोलीवर रुळले होते. आता ह्या बदलामुळे पुन्हा शोधाशोध, चाचपडणं सुरु झालं आहे.
सुरेखा कुलकर्णी ,
सुरेखा कुलकर्णी ,
>>अप्रकाशित अर्धवट लेखन बघायचे कुठे?
सुरेखा कुलकर्णी यांचे लेखन या दुव्यावर गेल्यावर प्रकाशित आणि अप्रकाशित लेखन या दोन्हींची यादी दिसेल. त्यातल्या शीर्षकावर क्लिक करून उघडल्यास अप्रकाशित लेखन हे गुलाबी रंगात दिसेल.
शोधाशोध करावी लागू नये म्हणून वरती लिंक दिलेली आहे.
त्याने मदत होईल असे वाटते.
कळावे.
-मदत_समिती.
Pages