आपले साहित्य सवडीनुसार पूर्ण करुन एकत्रितपणे प्रकाशित करणे आता नवीन मायबोलीवर शक्य आहे. लेखक वा लेखिकेला आपले साहित्य जोपर्यंत प्रकाशित करायचे नसेल तोपर्यंत ते "अपूर्ण" अवस्थेत ठेवता येईल. असे साहित्य इतर वाचकांना दिसणार नाही. जेव्हा आपले साहित्य प्रकाशित करण्यायोग्य होईल तेव्हा त्याची स्थिती "संपूर्ण" अशी करावी.
"अपूर्ण" साहित्यात काही बदल करायचे असल्यास आपल्या सभासद खात्यात जाऊन "माझे सदस्यत्व" या विभागांतर्गत असलेल्या "पाऊलखुणां" मध्ये आपला अप्रकाशित लेख दिसेल. तिथे लेखक वा लेखिकेला आपल्या साहित्याचे संपादन करून त्यात आवश्यक ते बदल करता येतील.
कृपया लक्षात ठेवा: नवीन लेखाची मूळ स्थिती "संपूर्ण" असेल. त्यामुळे ज्यांना पूर्ण लेख लिहून लगेच प्रकाशित करायचा आहे, त्यांना काहीही करण्याची आवश्यकता नाही. परंतु ज्यांना लेख लगेच प्रकाशित करायचा नाही, त्यांना लेखाची स्थिती "अपूर्ण" अशी बदलावी लागेल.
१. माझे सदस्यत्व मधे पाऊलखुणा अंतर्गत नवीन विभाग केला आहे. जुन्या विभागाला लेखन+प्रतिक्रिया असे नवे नाव दिले आहे. नवीन "लेखन" विभागात फक्त त्या सभासदाने केलेले लेखन दाखवले जाते.
२. अप्रकाशित लेखन वेगळे ओळखता यावे म्हणून त्याला वेगळ्या रंगाची पार्श्वभूमी आणि ठिपक्यांची सीमारेषा दिली आहे.
वर दिलेल्या दोन्ही सुविधा वापरून अप्रकाशित लिखाण शोधणे व ओळखणे सोपे झाले आहे.
अपूर्ण लेखनाबद्दल अधिक माहिती इथे वाचा.
खूप खूप धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद.
मान. मदत समिती... मी काल
मान. मदत समिती...
मी काल दुपारी, 'ललित लेखन' विभागामधे लेखन करत होतो. लेखनाचे शीर्षक 'ई-विक्@कुडाळ कॉलेज' असे होते. लेखना दरम्यान विद्युत पुरवठ्या मधे बिघाड निर्माण झाल्याने, सरळ-सरळ केलेले (अर्धवट) लेखन 'सेव्ह' केले. त्या नंतर विद्युत पुरवठा पूर्ववत झाल्यावर, माझे अर्धवट राहिलेले लिखाण शोधायचा प्रयत्न केला, पण ते सापडत नाही आहे...
१> माझे अर्धवट लिखाण सेव्ह झालेच नाही का?...
२> 'सेव्ह' झालेले असल्यास, कुठे शोधावे लागेल?...
कृपया मार्गदर्शन करा...
मला 'अपूर्ण'/संपूर्ण असं
मला 'अपूर्ण'/संपूर्ण असं कुठेच दिसत ना ही इंटरनेट एक्स्पोलर्वर मराठी सिलेक्ट करुनही रोमनच टाईप होतंय मदत करा आत्ता गोगल क्रोम वापरतेय
मला तर पाउलखुणा हा विभागच
मला तर पाउलखुणा हा विभागच दिसत नाही
मला ही पाउलखुणा दिसत नाही.
मला ही पाउलखुणा दिसत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
पाउलखुणा बंद केल्यात. आता
पाउलखुणा बंद केल्यात. आता फक्त लेखन दिसते.
गुलमोहर लेखन - १ ऑगस्टपासून
गुलमोहर लेखन - १ ऑगस्टपासून बदल इथे केलेल्या घोषणेनुसार, अपूर्ण लेखनाचा पर्याय सध्या काही काळापुरता बंद आहे.
आता लेखनाच्या धाग्यालादेखील अपूर्ण स्थितीत ठेवता येईल. त्यामुळे नेहेमीप्रमाणे लेखन पूर्ण झाल्यावर लेखन प्रकाशीत करू शकता. ही सुविधा तात्पुरती तांत्रीक कारणासाठी बंद केली आहे. सुरू होताच कळवण्यात येईल.
त्याला पर्याय म्हणून ऑफलाईन केलेलं लिखाण मायबोलीवर कसे लिहावे? या दुव्यावरील उपाय करता येतील व लेखन तुमच्या काँप्यूटरवर सेव्ह करता येईल.
पाउलखुणांबद्दल अधिक माहितीसाठी कृपया पाऊलखुणांची सोय तात्पुरती बंद आणि लेखकाचे/लेखिकेचे जुने लेखन पाहण्याची सोय पुन्हा सुरु या अॅडमिन टीमच्या रंगीबेरंगीवरच्या दोन पोष्टी पहाव्यात ही विनंती.
तसदीबद्दल क्षमस्व !
मदत_समिती.
नमस्कार मिरिंडा
.
पाऊलखुणा हो पर्याय माझ्या
पाऊलखुणा हो पर्याय माझ्या सदस्य खात्यात दिसत नाही
मला अपूर्ण आणि पूर्णचा पर्याय
मला अपूर्ण आणि पूर्णचा पर्याय दिसत नाही तसेच माझे सदस्यत्व मध्ये पाऊल खुणाही दिसत नाही. कारण एक कथा एका दिवशी पूर्ण होत नाही. मी खूप दिवसांनी मायबोलीवर आले.
Pages