सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
प्रीती, गुलाब सुंदर हं!
प्रीती, गुलाब सुंदर हं!
जातीने आमंत्रण द्यायला येतोच
जातीने आमंत्रण द्यायला येतोच आहे.
दिनेशदा, तुमच्या हातचे
दिनेशदा, तुमच्या हातचे पदार्थ, फोटोज, निसर्गाची माहिती इतकं सगळं एकत्र आल्यावर मग आणखी काय पायजे? शिवाय अधून मधून अवीट गोडीची गाणी पण! मज्जाच!!
मी बहुदा मिसणार...
मी बहुदा मिसणार...
सेनापती, मी मुंबैत पण असणार
सेनापती,
मी मुंबैत पण असणार आहे.
हो पण तेंव्हा मी असायला हवाय
हो पण तेंव्हा मी असायला हवाय ना...
नमस्कार मंडळी - खूप दिवसांनी
नमस्कार मंडळी - खूप दिवसांनी इथे आले. सगळ्या नवीन गप्पा वाचून आणि फोटो बघून मस्त वाटतय
जागू welcome back !
अश्विनी, तुझ्या शुभेच्छा खूप आवडल्या
>>नविन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा स्मित नविन वर्षात पृथ्वीतलावर निसर्गाची चांगली निगराणी केली जाउदे.
+ १
दिनेशदा, असे छान फोटो टाकलेत तुमच्या कडच्या देखाव्यांचे तर एके दिवशी खरच सगळी टोळी हजर होणार आहे तुमच्या दारात
प्रिती, रीमा ती आयुर्वेदिक
प्रिती, रीमा ती आयुर्वेदिक कार्यशाळा 5-6-7 असे तीन दिवस आहे . आणि आयुर्वेदिक प्रदर्शन तेथेच आहे
पत्ता:-
Mahalaxmi Lawns,
Near Rajaram Bridge, Off Sinhgad road,
Karve Nagar,
मी लिंक देते . त्यावर ब्रोशर आहे.
http://ayuworld.org/
शांकली , आता लक्ष ठेवते त्या झाडावर.
दिनेशदा, आमच्याकडे
दिनेशदा, आमच्याकडे कढीपत्त्याचे झाड आहे आणि त्या झाडाची छोटी छोटी झाडे उगवतच असतात. आम्हाला हा एक उपद्रवच झाला आहे. हीच गत बुच्याच्या झाडाची आहे. ठिकठिकाणी फरशी फोडून ही झाडे उगवत आहेत. ह्यावर काही उपाय नाही का?
सर्वांना नवीन वर्षाच्या
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या या नि. गप्पासारखा निसर्गहि भरभरुन फुलत राहो.
या रे, मी काय घाबरतो कि काय
या रे, मी काय घाबरतो कि काय !
बी, एक काळ असा येतो कि आपले कढीपत्त्याचे खाणे आणि त्याचे वाढणे यात आपण मागे पडतो,
त्याच्या मूळातून रोपे ऊगवतच राहतात. रोजच्या रोज छाटणी करुन त्याची विल्हेवाट लावणे
हाच उपाय आहे. (कोण्या भाजीवाल्याला सांगितल्यास तो आनंदाने नेईल)
खणून काढायचे तर बरेच खणावे लागेल.
मी कुंडित लावला आहे
मी कुंडित लावला आहे कडिपत्ता...पण तो जोम धरत नाही..काय करु?
मी कुंडित लावला आहे
मी कुंडित लावला आहे कडिपत्ता...पण तो जोम धरत नाही..काय करु?
बीला सांग त्याच्याकडचा कढीपत्ता तुला पाठवायला... बीच्या छाटणीला अजिबात न जुमानता तो जोमाने नविन जीव जगात आणत आहे.
हा_कोण__?
हा_कोण__?
जो/जी कोणी आहे तो/ती एकदम
जो/जी कोणी आहे तो/ती एकदम क्युट आहे..
एका कण्हेरीच्या झाडावरच्या
एका कण्हेरीच्या झाडावरच्या फुलाचे फोटो काढत होतो तर फ्रेममधे दिसला कि हा झाडावरच आहे. फोटो नीट येत नव्हता, म्हणून त्याला खुणेने सांगितले कि खाली ये, तर खरंच आला, आणि असा बघत राहिला. रुप उंदराचे आणि आकार बोक्याचा !
नविन वर्षाच्या सगळ्या निसर्ग
नविन वर्षाच्या सगळ्या निसर्ग प्रेमिंना हार्दिक शुभेच्छा. हे वर्षही सगळ्यांना निसर्गपुर्ण, निसर्गाच्या सानिध्यात जावो हि सदिच्छा.
साधना कढीपत्त्याला थोड खत घाल तसेच टाकाऊ ताक असत ते त्याला टाकायच.
पपनिस अलिबाग मध्ये दिसले होते
पपनिस अलिबाग मध्ये दिसले होते मागिल वर्षी.
जागू मी विचारल कडिपत्त्या
जागू
मी विचारल कडिपत्त्या साठी ;\:-)
माहिती बद्द्ल धन्यवाद :
चांगले पिकलेले, मधुर चवीचे
चांगले पिकलेले, मधुर चवीचे पपनस खायला मी आतुरलेय. खाल्ल्याशिवाय मरणार नाही, जर मेलेच तर मात्र कुठुनतरी चांगले पिकलेले, मधुर चवीचे पपनस आणा आणि बाराव्याला माझ्या पानात ठेवा - माझ्या होऊ घातलेल्या मृत्युपत्रातल्या विशलिस्टमधले पहिल्या पाचात असलेले वाक्य.
साधने मरायला कशाला हव
साधने मरायला कशाला हव त्यासाठी ? मला मिळाला की आणते तुला.
साधना, आमच्याकडे मिळतात. पण
साधना, आमच्याकडे मिळतात. पण आणू कसे ? तूम्हीच या !
१. जागु - अगं पपनसासाठी मरत
१. जागु - अगं पपनसासाठी मरत नाहीये, पण जर ते न खाता मेले तर पुढे काय करावे ह्या हेतुने अपडेशन केले आहे. उगीच एका यत्किश्चित पपनसासाठी माझा आत्मा इथे घोटाळायला नको किंवा त्याने परत पृथ्वीवर यायचा विचार करायला नको. तसे मी पपनस खाल्लेत भरपुर पण ते बिचारे कच्चे अस्तानाच झाडावरुन काढलेले त्यामुळे त्याला ना रंग ना चव. इगीचच आपली हौस म्हणुन आंबट धोडे खायचे तुला जर चांगले पपनस मिळाले तर तु आधी ते अर्धे खा आणि चांगले असेल तर मला दे. चांगले असेल तर आपल्या दोघींनाही आनंद, नेहमीसारखे असेल तर माझे अपेक्षाभंगाचे दु:ख टळेल.
दिनेश, येताना पिशवीत घालुन आणा तिकडे येणे मला आवडेल पण माझ्याकडे पासपोर्टही नाहीये
दिनेशदा, किती सुंदर दिसतोय
दिनेशदा, किती सुंदर दिसतोय परीसर.
अय्या काय सांगताय दिनेशदा?
अय्या काय सांगताय दिनेशदा? खाली ये म्हटल्यावर खाली आला! गंमतच आहे. तुम्हाला बघून न घाबरता आला आणि तुमच्याकडे बघत राहिला म्हणजे नक्की तुम्हाला कुठली तरी सिद्धी अवगत असणारे!
दिनेशदा, कांडेचोर तर नाही ना
दिनेशदा, कांडेचोर तर नाही ना तो प्राणी?
पण तो आहे मात्र फारच सुंदर!
एक वाईट बातमी वाचली आत्ताच.
एक वाईट बातमी वाचली आत्ताच. http://navbharattimes.indiatimes.com/articleshow/11366196.cms
हे फ्लेमिंगो (अग्नीपंख ) उडतांना काय शोभिवंत दिसतात, क्षणात पंख लाल तर क्षणात पांढरे!! एकदा बघितल तर विसरु शकणार नाही. मी हरिहरेश्वर ला जाताना बघितले होते.
दिनेशदा, मस्त फोटो - आणि खाली
दिनेशदा, मस्त फोटो - आणि खाली ये म्हटल्यावर न घाबरता आला आणि तुमच्याकडे बघत राहिला - हे म्हणजे एकदम सहि आहे. मला अगदी रहावेना तो कोण हे शोधल्याशिवाय - म्हणून गुगल देवांच्या किंचित धाव्यानंतर हे सापडले - तुम्ही बघून सांगा ना तोच वाटतो आहे का..
पूर्वी नाशिकला एक 'बिजू' नावाचा प्राणी पाहिला होता - त्याची आठवण झाली याला बघून.
त्याचे नाव Cape Hyrax - आणि त्याचा सगळ्यात जवळचा जिवंत नातेवाईक हत्ती आहे म्हणे !
http://en.wikipedia.org/wiki/Cape_Hyrax
रानवाटा प्रस्तुत छायाचित्र
रानवाटा प्रस्तुत छायाचित्र प्रदर्शन.
सगळ्यांना आग्रहाचे निमंत्रण.
http://www.maayboli.com/node/31707
आज नाईट शिफ्ट मधे वेळ जाता
आज नाईट शिफ्ट मधे वेळ जाता जात नाहीये. जुन्या आठवणी येत आहेत. अकोल्याला कॉलेजात असतांना मी एका मित्राच्या ओळखीने नॅशनल जिऑग्राफिक चे अंक वाचायला त्या काळी पार गावाबाहेर असलेल्या पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या लायब्ररी मधे सायकल मारत जात असे. आज त्याची आठवण येउन सहज नॅशनल जिऑग्राफिकचीच वेबसाईट उघडली http://photography.nationalgeographic.com/photography/photos/pod-best-of... या शार्क ने बहुतेक सुरक्षित अंतर ठेवा अशी पाटी आपल्या डोक्यावर लावून ठेवली असावी.
एकसे एक फोटो दिसतायत, ही वेबसाईट बुकमार्क करायला हवी.
Pages