Submitted by Ramesh Thombre on 25 December, 2011 - 05:40
रात्री एकटच झोपल्यावर हळूच
छातीवर फुंकर घालणारी बोचरी थंडी ...
अन सकाळी उठल्यावर ...
इस्त्रीच्या शिल्लक राहिलेल्या एकमेव
शर्टची तुटलेली गुंडी.
आठ दिवसांपासून एकाच जागी
झोपलेलं अस्ताव्यस्त अंथरूण ...
अन तिथेच बेडवर कोपऱ्यात
उघडं पडलेलं मळकट पांघरूण
किचनओट्याशेजारील मोरीत
पडलेली खरकटी भांडी ...
अन कधीकाळी ताजी असलेली
फ्रीझमधील सडलेली भाजी.
वर्तमानपत्रांपासून दूर पडलेल्या
रंगीत साप्ताहिक पुरवण्या ...
अन कपाटातील एकावर-एक पडलेल्या
पुस्तकातील अगणित कहाण्या.
झोपेच्या प्रयत्नात हजारदा
बदललेली कुशी ...
अन शेजारीच पडलेली
आणखी एक उशी.
बाथरूम मधील
ओल्या कुबट कपड्यांचा वास ...
अन पोटात ढकलताना
नरड्यात अडकलेल्या अन्नाचा घास.
हे सगळे मला पदो-पदी जाणीव करून देतात ...
...
...
...
...
...
तू घरात नसल्याची !
- रमेश ठोंबरे
(तू नसताना ...)
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
ठीक आहे. पण येव्हढ्यासाठीच जर
ठीक आहे. पण येव्हढ्यासाठीच जर 'तू' ने असायला पाहिजे होतं असं असेल तर तिनं न राहण्याचा फार योग्य निर्णय घेतलाय.
वरचा प्रतिसाद आवडला
वरचा प्रतिसाद आवडला
'आळशी नरपुंगव' असं कवितेचं
'आळशी नरपुंगव' असं कवितेचं शिर्षक ठेवा.
कविता उत्तम, पण पहिला
कविता उत्तम, पण पहिला प्रतिसाद त्याहून जबरदस्त!!!!
'ती' नसताना घराच्या
'ती' नसताना घराच्या अनावस्थेचं वर्णन चांगलं रंगवलंय.
पण मनाच्या अवस्थेबद्दल काय ??
फारच मटेरियलिस्टीक स्वभावाचा
फारच मटेरियलिस्टीक स्वभावाचा दिसतोय कवी.
कविता आवडली. पण कर्णिक सरांचा
कविता आवडली. पण कर्णिक सरांचा प्रतिसाद जास्तच आवडला
:D
(No subject)
१) कवितेपेक्शा १) प्रतिसाद
१) कवितेपेक्शा १) प्रतिसाद भारी.
कामवालीला उद्देशुन लिहिलिये
कामवालीला उद्देशुन लिहिलिये का ही कविता
कर्णिक, पंत
कर्णिक, पंत

पंतु एकदम सिक्सर
पंतु एकदम सिक्सर
पंत
पंत
ठीक आहे. पण येव्हढ्यासाठीच जर
ठीक आहे. पण येव्हढ्यासाठीच जर 'तू' ने असायला पाहिजे होतं असं असेल तर तिनं न राहण्याचा फार योग्य निर्णय घेतलाय.+१
एक साधीशी गोष्ट आहे.. "हर
एक साधीशी गोष्ट आहे.. "हर तऱ्हेची माणसं असतात."
देशभक्तीचे गोडवे गाणारी कविता लिहिणारा कवी स्वत: कितपत देशभक्त असतो हे प्रत्येकाला ठाऊक आहे.
कवीने एक विशिष्ट मन:स्थिती मांडली आहे, पण कविता सोडून वैयक्तिक टीका करण्यात धन्यता मानणे, वाचकाला शोभत नाही.
कविता मला भावली, भिडली.. साध्या सोप्या शब्दात पराकोटीची घुसमट मांडली आहे.
टू गुड !
(आता माझ्या प्रतिसादावरूनसुद्धा वायफळ शेरेबाजी होणार असल्यास.. एन्जॉय युवरसेल्फ..!)
रसप >>> सुंदर प्रतिसाद
रसप >>> सुंदर प्रतिसाद
आणखीन एक ,
बाथरूम मधील
ओल्या कुबट कपड्यांचा वास ...
अन पोटात ढकलताना
नरड्यात अडकलेल्या अन्नाचा घास
कवीने बाथरुम मधुन किचन मधे अचानक उडी मारली आहे , जॉईंट बाथरुम किचन ही नवीनच कन्सेप्ट दिसते