चक दे इंडिया!!

Submitted by शांतीसुधा on 22 December, 2011 - 02:22

(निवेदनः या लेखाचा हेतू सचिन तेंडूलकर विरूद्ध इतर हा नाही आहे. सचिन तेंडूलकरचं कर्तुत्त्व मोठं आहेच. या लेखाचा हेतू क्रिकेट या खेळाला इतकं अवाजवी महत्त्व का मिळालं असावं याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आहे. त्यात लपलेलं पैशाचं राजकारण उघड करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे सचिन तेंडूलकर प्रेमींनी तेंडूलकर विरूद्ध हा लेख असा पवित्रा घेऊ नये.)

आमच्या घराच्या मागील शाळेत पूर्वी फुटबॉल अणि हॉकी या दोन खेळांची प्रत्येकी एक आणि दोन अशी मैदानं होती. आता होतीच म्हणायला हवं कारण गेल्या काही वर्षांत त्या मैदानांचं रूपांतर एकत्रितपणे एका क्रिकेटच्या ग्राऊंड्मध्ये झालंय. साठ-सत्तरच्या दशकातले चित्रपट पाहिले तर बॉलिवुड सिनेमांमध्येही कॉलेज तरूणांच्या हातात हॉकी-स्टीक्स दाखवून हॉकी या राष्ट्रीय खेळाला जागा दिल्याचं दिसून येतं. तसा या दशकात हॉकी वर ’चक दे इंडिया" आला आणि रसिकांना आवडलाही पण तो परिणाम तातपुरताच राहिला. हिंदीच्या पाठ्यपुस्तकात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद या नावाने धडाही होता पण त्या व्यतिरीक्त इतर कुठेही ध्यानचंद यांचं नाव झळकताना पाहिल्याचं मला तरी आठवत नाही. याने त्यांची कामगिरी छोटी होते असं नाही पण ’"रात गयी बात गयी” सारखं व्यक्ती काळाच्या पडद्या आड गेली की त्या व्यक्तीचं कर्तुत्त्व कितीही मोठं असलं तरी विसरलं जातं. तसंच काहीसं मेजर ध्यानचंद यांच्या बाबतीत झालं असं वाटतंय. मागे एकदा वर्तमानपत्रात भारतीय हॉकीचा कप्तान धनराज पिल्ले याचं नाव वाचण्यात आलं. तेव्हा भारतीय संघाने कोणत्यातरी आंतरार्ष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकलेलं होतं. धनराज पिल्लेसुद्धा पिंपरी-चिंचवड मधील एका झोपडपट्टीत रहात होता. मग त्याला आर्थिक मदत करण्याविषयीची आवाहनं वाचण्यात आली. त्यानंतर एकदोन वेळा दूरदर्शनवरही झळकला होता बिचारा. पण नंतर कुठेच दिसला नाही. नुकतंच भारतीय हॉकी संघातील युवराज या खेळाडूच्या बाबतीत असंच काहीसं झालं. त्याचप्रमाणे फेसबुकवर सध्या एका वेटलिफ्टरचा पापड करतानाचा फोटो झळकतो आहे. यासगळ्याच्या निमित्ताने विचारचक्रं सुरू झालं आणि नकळत सध्याचा भारतातील धर्म-खेळ क्रिकेट आणि राष्ट्रीय खेळ हॉकी यांची तुलना सुरू झाली.

१९७० च्या शेवटी आणि १९८० च्या सुरूवातीला सुनिल गावसकर, दिलीप वेंगसरकर, गुंडप्पा विश्वनाथ आणि इतर बर्‍याच क्रिकेटपटुंमुळे भारतातील क्रिकेटने मध्यमवर्गियांच्या आयुष्यात प्रवेश केला. तोपर्यंत क्रिकेट हा खेळ तसा श्रीमंती खेळ मानला जात असे. कसोटी क्रिकेटचे सामने ५-५ दिवस चालायचे. आपली कामं सोडून ५ दिवस खेळ बघायला येणारे फक्त श्रीमंतच. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये हा खेळ आजच्या इतका प्रसिद्ध नव्हता. नवाब मन्सुर अली खान पतौडी (इतरही काही नावं असतील पण उदाहणादाखल एकच लिहीले आहे) हे नाव त्यावेळी भारतीय क्रिकेटमध्ये आदराने घेतलं जायचं. साधारणपणे ८० च्या दशकात भारतात दूरदर्शन चालू झालं आणि क्रिकेट हा खेळ दूरदर्शन पाठोपाठ घरोघरी पोहोचला. ८० च्याच दशकात क्रिकेट या खेळात "वन डे क्रिकेट" च्यारूपाने क्रांती झाली. या "वन डे क्रिकेट" मुळे क्रिकेट जगतात उलथा पालथ झाली आणि पाच दिवसांच्या तुलनेत एक दिवस खेळणं सुटसुटीत वाटल्याने सामन्यांची संख्याही वाढली, त्याला लागणारी कौशल्य कसोटी क्रिकेटपेक्षा वेगळी होती. अधिक प्रेक्षवर्ग आणि मध्यमवर्गीय आर्थिक स्तरांतून आलेले खेळाडू पाहून सामान्य जनतेला क्रिकेट आपलं वाटू लागलं.

इकडे वाढत्या प्रेक्षक संख्येने आणि उपग्रह वाहिन्यांमुळे दूरदर्शन प्रक्षेपणात झालेल्या अमूलाग्र क्रांतीने तसेच वन-डे मुळे क्रिकेट फिव्हर "इट क्रिकेट, स्लीप क्रिकेट, ड्रिंक क्रिकेट इ. इ." पासून आता हे क्रिकेट वेडाचं लोण गल्ली-बोळ आणि झोपडपट्ट्यांमध्येही पोहोचलं आहे. ग्लोबलायझेशन मुळे जाहीरात कंपन्यांचं फावलं आणि त्यांनी क्रिकेटच्या खेळाडूंसाठी मोठमोठ्या प्रमाणात अनुदानं आणि बक्षिसं द्यायला सुरूवात केली. देशातल्या चलाख राजकारण्यांनी काळाची पावलं वेळीच ओळखून बीसीसीआय सारखी खासगी संस्था उभी केली की जी आता भारतीय क्रिकेटची सर्वेसर्वा झाली आहे आणि भ्रष्टाचार-काळापैसा यांचं आगारही. पूर्वी आपल्याकडे फुटबॉलला किंवा हॉकीला अशी डिमांड असायची. अजुनही आपण बंगाल आणि ईशान्य भारतातील राज्यांत गेलो तर भर पावसात, चिखलात अनेक मुलं फुटबॉल खेळताना दिसतील.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यामुळे मिळणारे पैसे आणि त्याशिवाय युवक-युवतींकडून मिळणार्‍या उस्फूर्त प्रतिसादाचं ग्लॅमर अनेक तरूणांना क्रिकेटकडे आकर्षित करून घ्यायला लागलं. सगळ्यांच्या गळ्यातील ताईत सचिन तेंडूलकरचा उदयही ८० च्या दशकात शेवटी शेवटी झाला आहे. त्याच्या नंतर कित्येक आले आणि गेले, भारतीय क्रिकेट संघाने आपल्या पर्फॉर्मन्सचा लंबक नेहमीच एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत हलता ठेवला पण सचिन तेंडूलकरच्या सातत्याला सलामच ठोकायला हवा. प्रत्येक घरातील आई-वडिलांना आपला बाळ्या सचिन तेंडूलकर बनण्याची स्वप्नं पडतात आणि त्यासाठी बाळ्याने शाळेत जायला सुरूवात केली की पेन्सिलच्या ऐवजी क्रिकेटची बॅट त्याला अधिक समर्थपणे कशी पेलता येईल याकडे लक्ष पुरवलं जातं. बॉलिवुडच्या सिनेनिर्मात्यांनीही या गंगेत "लगान" द्वारे आपले हात धुऊन घेतले. याच कालावधीत पेप्सी आणि कोक यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही क्रिकेटबरोबरच आपलंही बस्तान भारतात बसवलं. कदाचित पेप्सी आणि कोकच्या बाटल्यांमुळे भारतीय तरूणांच्या भावना फक्त क्रिकेटसाठीच उचंबळतात किंवा क्रिकेटसाठी उंचबळणार्‍या भावनांमुळे पेप्सी, कोकलाही भारतीय तरूणांच्या मनात जागा मिळाली...असंही असेल.

संगणक आणि आंतर्जालिय क्रांतीमुळे एकूणच संपूर्ण जगाचा वेग वाढल्याने २०-२० क्रिकेटची संकल्पना आली, की ज्यामध्ये प्रत्येक संघाने प्रत्येकी २० षटकं टाकायची. तीन तासात निकाल जाहिर. हे म्हणजे क्रिकेट वेड्यांच्या देशात तीन तासाच्या बॉलीवुड सिनेमापेक्षा कमी ग्लॅमरस आणि व्यवसाय खेचणारं नव्हतं. म्हणूनच की काय विविध जाहिरात कंपन्या, भारतातील मोठमोठे इंडस्ट्रीयालीस्ट तसेच काही बॉलीवुड स्टार्स यांनी एकत्र येऊन विविध व्यावसायिक संघांची उभारणी केली आणि जगभरातील क्रिकेटपटुंना भरपूर पैसे देऊन आपल्या संघासाठी खरेदी करून त्यांची कडबोळी टीम आय पी एल सारख्या स्पर्धांत खेळवायला सुरूवात केली. गेल्या ३-४ वर्षांत आय पी ल च्या माध्यमातून या सगळ्यांनी खोर्‍याने पैसा मिळवला आहे. तरूणांना वेडं करणारा आणि पैशासाठी देशापेक्षा वैयक्तिक खेळ महत्त्वाचा हा मंत्र देणारा आय पी एल हंगाम म्हणजे भारतातील विविध श्रीमंत लोकांचा विविध क्रिकेटपटुंवर लावलेल्या पैशाचा जुगार. मग यात अनेकांनी आपल्या काळ्या पैशाची धवल-गंगा करण्याच्या प्रक्रियेत नाहून घेतलं. क्रिकेटमधील भ्रष्टाचाराचं दुसरं मोठं केंद्र तयार झालं. बी सी सी आय काय किंवा आय पी एल काय सगळेच एका माळेचे मणी त्यामुळे या दरोडेखोरांना बेड्या कोण घालणार? ज्यांच्या हातात सत्ता त्यांचेच प्रतिनिधी या संघटनांच्या चालक पदावर असल्याने या वळूंना वेसण घालणं अशक्य होऊन बसलंय.

दरम्यान भारताच्या राष्ट्रीय खेळाचं, हॉकीचं काय झालं? भारतीय हॉकीला आंतर्गत राजकारणाचं ग्रहण लागायला ८० च्या दशकातच सुरूवात झाली. त्याचप्रमाणे काही जाणकारांच्या मते बदलेले हॉकी चे नियम हे सुद्धा हॉकीचा पडता काळ चालू होण्याचे कारण आहे. खरं तर नियम बदलले तर नविन नियमांनुसार खेळाडूंना प्रशिक्षण मिळणं गरजेचं होतं. पण तसं झालंच नाही. हॉकी इंडियावर एकतर खेळाडू किंवा ज्यांना भारतीय राजकारणात फारशी किंमत नाही असे राजकिय नेते प्रमुख म्हणून नेमले जाऊ लागले. मग आपोआपच केंद्र सरकारकडून मिळणारं अनुदानही कमी होत गेलं. मधेच वर्तमानपत्रात बातमी वाचली की ४-५ वर्षांपूर्वी झालेल्या एका आंतर्राष्ट्रीय हॉकीच्या स्पर्धा रजिस्ट्रेशनचे काही लाख रूपये केंद्रिय क्रिडामंत्रालयाने हॉकी इंडियाला दिलेच नाहीयेत आणि एकीकडे कॉमनवेल्थ गेम ची वेल्थ कॉमनली लुटून कलमाडी सारखे तिहार मध्ये सुद्धा गेलेत. किती हा विरोधाभास.. आता याला कारण हॉकीचा कारभार सांभाळत असलेले लोक आणि त्यांचं आंतर्गत राजकारण. एकूणच यासगळ्याचा परिणाम भारतीय हॉकीच्या खेळावर आणि त्याच्या पॉप्युलॅरीटीवर झाला असण्याची शक्यता आहे. कारणं काहीही असोत पण भारतीय हॉकीला.......भारताच्या राष्ट्रीय खेळाला ग्रहण लागलंय हे नक्की. आजही अमेरिका किंवा कॅनडात बघितलं तर लोक अनुक्रमे बेसबॉल आणि आईस हॉकी साठी वेडे असतात. का? कारण ते त्यांचे राष्ट्रीय खेळ आहेत. काही जाणकारांचं असंही म्हणणं आहे की त्या खेळांच्या पॉप्युलॅरीटीशी राष्ट्रीय खेळ असण्याचा संबंधच नाही. हे फक्त मार्केटींग आणि व्यावसायिक स्वरूप याचा परिणाम आहे.

हा प्रश्न केवळ हॉकीचा नसून इतर भारतीय खेळांचाही आहे. अगदी विश्वनाथन आनंदने बुद्धीबळात सातत्यपूर्ण कामगीरी करत जगज्जेते पद गेली काही वर्षे राखले आहे तरी भारतातील क्रिकेटपटुंना जी वागणूक मिलते ती त्यालाही मिळत नाही हे खटकतंच. मधे असं वाचनात आलं होतं की भारतीय नेमबाजी स्पर्धेतील कुमारवयीन वयोगटातील खेळाडूंच्या पालकांनी जाहीरपणे ही खंत व्यक्त केली की त्यांच्या मुलांना आंतर्राष्ट्रीय स्पर्धांत भाग घेण्यासाठी केंद्रशासनाकडून काहीच अर्थसहाय्य मिळालं नाही. ते त्यांनी स्वखर्चाने केलं. पण निदान भारताचं प्रतिनीधीत्त्व करणार्या या खेळाडूंना सरावासाठी गोळ्यासुद्धा उपलब्ध करून दिल्या गेल्या नाहीत. दोनच महिन्यांपूर्वी इंदौरला क्रिकेटची आंतर्राष्ट्रीय मॅच होती त्यावेळी तिथल्या प्रेक्षागृहातील खुर्च्या साफ करण्याचं काम ३ रूपये प्रति खुर्ची या दराने इंदौरच्या राष्ट्रीय पातळीच्या फुटबॉल टीम मधील खेळाडूंनी केलं. करण त्यांच्याकडे सरावासाठी साधनं घेण्यास पुरेसे पैसे नव्हते. स्थानिक क्रिडा मंत्रालयाकडे याविषयी चौकशी केली असता कल्पना नाही, बघतो अशी उत्तरं मिळाली.

आज कालच्या तरूण रक्तांनी वेगळाच प्रश्न उपस्थित करायला सुरूवात केलीय. भारतात हॉकी फारशी खेळली जात नाही, हॉकीचे सामने झाले तरी कोणाला माहिती नसतं आणि ह्याउलट क्रिकेटसाठी सर्वदेश वेडा झालेला असतो इतका की आम्ही सचिन तेंडूलकरला क्रिकेटचा देव ही उपाधी सुद्धा देऊन टाकली आहे. मग क्रिकेटच का नाही भारताचा राष्ट्रीय खेळ नाही. हॉकीच का? प्रश्न विचार करायला लावणारा म्हणून थोडा शोध घेतला तर धक्कादायक गोष्ट समोर आली. "हॉकी या खेळात भारताला एकूण ८ सुवर्ण पदकं मिळाली आहेत. सन १९२८ ते १९५६ हा हॉकीचा सुवर्णकाळ होता की जेव्हा भारताने सातत्याने ऑलिंपिक्स मध्ये ६ सुवर्णपदकं पटकावली. या सुवर्णकाळात भारताने २४ ऑलिंपिक सामने खेळले आणि एकूण १७८ गोल्स करत (७.४३ गोल प्रत्येक सामन्यात) २४ च्या २४ सामने जिंकले. त्यानंतरची दोन सुवर्णपदकं १९६४ साली तसेच १९८० साली झालेल्या ऑलिंपिक्स मध्ये मिळवलीत. १९८० पर्यंत इतका सुंदर पर्फॉर्मन्स असताना एकदम हॉकीला काय झालं? दूरदर्शन मधील क्रांतीचा उपयोग सर्वच खेळांना व्हायला हवा होता मग तो तसा का झाला नाही? केवळ क्रिकेटच्या खेळामध्येच क्रांती का झाली (वन डे, २०-२०) आणि त्याचंच स्वरूप का बदललं गेलं? क्रिकेट हा इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ आहे. आंतरराष्टीय क्रिकेट मध्ये खेळणारे सर्वच देश हे ब्रिटीशांनी अनेक वर्षे राज्य केलेले आहेत. असं का? ऑलिंपिक्स मध्ये अजुनही क्रिकेट या खेळाचा समावेश का नाही? ऑलिंपिक्स मध्ये ज्या देशांचे सुवर्ण पदक तालिकेत वर्च्यस्व असते असे चीन, अमेरिका, जपान, कोरिया, इंडोनेशिया सारखे देश क्रिकेट मधे का नाहीत? या प्रश्नांची उत्तरं (मिळत नसल्याने) मला अधिक भंडावून सोडतात.

प्रश्न उरला क्रिकेटला भारताचा राष्टीय खेळ करण्याचा: तर भारतीय हॉकी संघांसारखी सारखी सातत्यपूर्ण सुवर्ण कामगिरी भारतीय क्रिकेटने अत्तापर्यंत कधिच केलेली नाही. अगदी मार्चच्या शेवटी विश्वचषक जिंकणारे भारतीय क्रिकेटचे विर चारच महिन्यांनंतर इंग्लंडमध्ये माती खातात. विश्वविजेत्याला साजेशी कामगिरी सोडाच पण जागतिक क्रमवारीतही सर्वच प्रकारच्या क्रिकेट मध्ये घसरण करून घेतात. यांना जगज्जेते कसं म्हणणार? बरं क्रिकेट हा खेळ १०-१२ देश खेळतात. १०-१२ देश म्हणजे संपूर्ण विश्व कसं काय होतं? मग हे विश्वविजेते कसे काय या प्रश्नाचं उत्तर (आम्ही विश्वविजेते म्हणण्यास पात्र नाही) भारतीय संघानेच आपल्या नजिकच्या कामगिरीने दिलं आहे. फक्त पॉप्युलॅरीटीच्या जोरावर एखाद्या खेळाला राष्ट्रीय खेळ कसा म्हणणार? खरं तर भारता मध्ये इतर खेळांच्या दुर्दशेला आणि क्रिकेटच्या अतिरेकाला नक्की कोण जबाबदार आहे याचा पद्धतशीर अभ्यासच व्हायला हवा. मला तर याची बिजं आंतर्गत तसेच आर्थिक राजकारण, आणि भ्र्ष्टाचाराच्या संधी यातच दिसताहेत.

काही जाणकारांच्या मते इतर खेळाच्या कारभार करणार्यांनी गचाळ कारभार ठेवला आहे. कारण काहीही असो, पण क्रिकेट शिवाय दुसरा खेळच आपल्या देशात नाही असं वाटण्या इतपत क्रिकेटचं अवाजवी महत्त्व कमी व्हायला पाहीजे. इतर खेळांमधेही तितक्याच चांगल्या संधी उपल्ब्ध होऊ शकतात फक्त तिथलं आर्थिक गणित जुळलं पाहीजे. कारण खेळ लोकांमधे पॉप्युलर असेल तर त्याला आर्थिक सहाय्य किंवा प्रायोजक वगैरे मिळणार. क्रिकेट हा खेळ लोकांमधे पॉप्युलर आहे म्हणूनच त्याला प्रायोजक आणि प्रचंड पैसा मिळतो आहे. असं काही जाणकारांचं मत आहे. काहींचं म्हणणं आहे की नविन पद्धतीच्या नियमांमुळे आपल्या खेळाडूंचा वेग आणि क्षमता कमी पडतात. याला उत्तम प्रशिक्षण हाच एक उपाय आहे. आपल्या देशात इतर खेळांनाही महत्त्व आहे हे आपणच दाखवून दिलं पाहीजे. आपल्या मातीतील बुद्धीबळ, कबड्डी या खेळांना आपणच फारसं महत्त्व देत नाही मग त्यात आपल्याकडे कौशल्य असूनही त्याचा उपयोग होत नाही. यामागे होत असलेलं राजकारण थांबवणं हाच एक उपाय आहे. हे जनतेने ठरवल्या शिवाय होणार नाही. तेव्हा भारतातील क्रिकेट सोडून इतर खेळांसाठी 'चक दे इंडिया' च घडायला पाहिजे.

गुलमोहर: 

>>>> १९७० च्या शेवटी आणि १९८० च्या सुरूवातीला सुनिल गावसकर, दिलीप वेंगसरकर, गुंडप्पा विश्वनाथ आणि इतर बर्‍याच क्रिकेटपटुंमुळे भारतातील क्रिकेटने मध्यमवर्गियांच्या आयुष्यात प्रवेश केला. तोपर्यंत क्रिकेट हा खेळ तसा श्रीमंती खेळ मानला जात असे. कसोटी क्रिकेटचे सामने ५-५ दिवस चालायचे. आपली कामं सोडून ५ दिवस खेळ बघायला येणारे फक्त श्रीमंतच. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये हा खेळ फारसा प्रसिद्ध नव्हता.

क्रिकेट हा श्रीमंतांचा खेळ असला तरी तो सामान्य जनतेमध्ये खूप पूर्वीपासून म्हणजे स्वातंत्र्य मिळायच्या आधीपासूनच लोकप्रिय होता. सामान्य जनता ऑफिस, बस, ट्रेन इ. सर्व ठिकाणी कानाला ट्रान्झिस्टर लावून बसलेली असायची. त्याचे कारण या खेळाची अफाट लोकप्रियता!

एकनाथ सोळकर सारख्या अत्यंत गरीब परिस्थितीत असलेल्या खेळाडूने केवळ आपल्या कौशल्याच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळविले होते. १९८५ पूर्वी भारतीय संघात असलेले बरेचसे खेळाडू मध्यमवर्गीय परिस्थितीतून पुढे आलेले होते.

>>> तर भारतीय हॉकी संघांसारखी सारखी सातत्यपूर्ण सुवर्ण कामगिरी भारतीय क्रिकेटने अत्तापर्यंत कधिच केलेली नाही. अगदी मार्चच्या शेवटी विश्वचषक जिंकणारे भारतीय क्रिकेटचे विर चारच महिन्यांनंतर इंग्लंडमध्ये माती खातात. विश्वविजेत्याला साजेशी कामगिरी सोडाच पण जागतिक क्रमवारीतही सर्वच प्रकारच्या क्रिकेट मध्ये घसरण करून घेतात. यांना जगज्जेते कसं म्हणणार?

खेळात कामगिरी वरखाली होऊ शकते. इंग्लंडमधल्या पराभवाला पूर्वतयारीचा अभाव व प्रमुख खेळाडूंच्या दुखापती ही मुख्य कारणे होती.

जे क्रिकेटमध्ये तेच हॉकीमध्ये! १९७५ साली विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकलेल्या भारतीय हॉकी संघाचा १९७६ च्या ऑलिंपिकमध्ये तब्बल ७ वा क्रमांक आला होता. मग त्यांना जगज्जेते म्हणायचे नाही का?

>>> फक्त पॉप्युलॅरीटीच्या जोरावर एखाद्या खेळाला राष्ट्रीय खेळ कसा म्हणणार?

क्रिकेटला राष्ट्रीय खेळ म्हटले किंवा नाही तरी त्याची लोकप्रियता अबाधित राहील.

>>> खरं तर भारता मध्ये हॉकीच्या दुर्दशेला आणि क्रिकेटच्या अतिरेकाला नक्की कोण जबाबदार आहे याचा पद्धतशीर अभ्यासच व्हायला हवा. मला तर याची बिजं ग्लोबलायझेशन, आर्थिक राजकारण, आणि भ्र्ष्टाचाराच्या संधी यातच दिसताहेत. हॉकी हा भारताचा (नावापुरताच) राष्ट्रीय खेळ राहील याची पुरेपूर तजविज करून थेवलेली आहे.

जे विकलं जातं तेच पिकतं हा जगाचा नियम आहे.

>>> या परिस्थीतीला आपण बदलणार नाहीतर कोण? चला पुन्हा एकदा हॉकीला सुवर्णसिंहासनावर बसवुयात आणि क्रिकेटच्या जुगार्‍यांपासून देशातील युवकांना वाचवूयात. चक दे इंडिया!!

हॉकीला पुन्हा सोनेरी दिवस आल्यास आनंदच होईल. पण म्हणून क्रिकेटवेडे क्रिकेटपासून दूर जाणार नाहीत. हॉकी व क्रिकेट हे दोन वेगळ्या धर्तीचे खेळ आहेत. त्यांची तुलना करू नये. एक खेळ वाढवायचा म्हणून दुसरा नाकारायचा ही भूमिका योग्य वाटत नाही.

हॉकी हा खेळ गांधी -नेहरु घरण्यांनी चालवलेल्या सरकारच्या क्रिडा खात्याकडुन चालवला जातो त्यामुळेच तो रसातळाला गेला आहे,क्रिकेटचे तसे नाही.
जर BCCI मधे नेहरु-गांधी गेले असते तर तिथेही काही खरे नव्हते, तेंडूलकरने तर आतापर्यंत केली आहेत त्याच्या १०% शतके पण नसती केली.

शांतीसुधा, तुमच्या लेखातला मुद्दा मला काही केल्या समजत नाहिये. माझ्यापरीने मी मूळ मुद्दा समजून घ्यायचा प्रयत्न करतेय.

त्यानंतरची दोन सुवर्णपदकं १९६४ साली तसेच १९८० साली झालेल्या ऑलिंपिक्स मध्ये मिळवलीत. १९८० पर्यंत इतका सुंदर पर्फॉर्मन्स असताना एकदम हॉकीला काय झालं? दूरदर्शन मधील क्रांतीचा उपयोग सर्वच खेळांना व्हायला हवा होता मग तो तसा का झाला नाही? केवळ क्रिकेटच्या खेळामध्येच क्रांती का झाली (वन डे, २०-२०) आणि त्याचंच स्वरूप का बदललं गेलं? क्रिकेट हा इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ आहे. आंतरराष्टीय क्रिकेट मध्ये खेळणारे सर्वच देश हे ब्रिटीशांनी अनेक वर्षे राज्य केलेले आहेत. असं का? ऑलिंपिक्स मध्ये अजुनही क्रिकेट या खेळाचा समावेश का नाही? ऑलिंपिक्स मध्ये ज्या देशांचे सुवर्ण पदक तालिकेत वर्च्यस्व असते असे चीन, अमेरिका, जपान, कोरिया, इंडोनेशिया सारखे देश क्रिकेट मधे का नाहीत? या प्रश्नांची उत्तरं मला अधिक भंडावून सोडतात.

या प्रश्नाची उत्तरे तुमच्या लेखातून मिळाली असती तर जास्त बरे झाले असते.

हे म्हणजे क्रिकेट वेड्यांच्या देशात तीन तासाच्या बॉलीवुड सिनेमापेक्षा कमी ग्लॅमरस आणि व्यवसाय खेचणारं नव्हतं. म्हणूनच की काय विविध जाहिरात कंपन्या, भारतातील मोठमोठे इंडस्ट्रीयालीस्ट तसेच काही बॉलीवुड स्टार्स यांनी एकत्र येऊन विविध व्यावसायिक संघांची उभारणी केली आणि जगभरातील क्रिकेटपटुंना भरपूर पैसे देऊन आपल्या संघासाठी खरेदी करून त्यांची कडबोळी टीम आय पी एल सारख्या स्पर्धांत खेळवायला सुरूवात केली. गेल्या ३-४ वर्षांत आय पी ल च्या माध्यमातून या सगळ्यांनी खोर्‍याने पैसा मिळवला आहे. तरूणांना मूर्खासारखं वेडं करणारा आणि पैशासाठी देशापेक्षा वैयक्तिक खेळ महत्त्वाचा हा मंत्र देणारा आय पी एल हंगाम म्हणजे भारतातील विविध श्रीमंत लोकांचा विविध क्रिकेटपटुंवर लावलेल्या पैशाचा जुगार. मग यात अनेकांनी आपल्या काळ्या पैशाची धवल-गंगा करण्याच्या प्रक्रियेत नाहून घेतलं. क्रेकेटमधील भ्रष्टाचाराचं दुसरं मोठं केंद्र तयार झालं.

तुम्ही लिहिलेल्या फॅक्ट्समधे थोडी गडबड आहे. बीसीसीआयने आयपीएल ही संघटना तयार केली आहे. त्यामुळे ते दुसरे मोठे केंद्र नाही, त्यांचेच अपत्य आहे. या द्वारे आठ विविध शहराच्या टीम्स बनवल्या गेल्या त्यासाठी सर्वात आधी निविदा मागवल्या गेल्या व त्यानंतर टीम्सची घोषणा झाली. बीसीसीआयने सर्व खेळाडूबरोबर करार केला. व त्यानंतर कुणाच्या टीम मधे कोण खेळणार हे लिलाव पद्धतीने ठरवले गेले. यामधे जुगार कसा होतो? बरं जरी त्यानी जुगार लावला अथवा स्वतःचे काळे पैसे पांढरे केले तरी त्याचा हॉकीशी संबंध कसा येतो?

यामधे बीसीसीआय अथवा आयपीएलने "तरूणाना मूर्खासारखे वेडे" कसे केले? हे जाणून घ्यायला आवडेल. भारतातील सर्व तरूण आपली अक्कल गहाण ठेवून वागतात असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यामुळे मिळणारे पैसे आणि त्याशिवाय युवक-युवतींकडून मिळणार्‍या उस्फूर्त प्रतिसादाचं ग्लॅमर अनेक तरूणांना क्रिकेटकडे आकर्षित करून घ्यायला लागलं. सगळ्यांच्या गळ्यातील ताईत सचिन तेंडूलकरचा उदयही ८० च्या दशकात शेवटी शेवटी झाला आहे.>> हे डोक्यावरून गेलं. अहो, त्याचा जन्म जेव्हा झाला तेव्हाच तो उदय पावणार ना? पैसा मिळतो म्हणून सचिन क्रिकेटमधे आला असं तुम्हाला म्हणायचय का? पूर्ण लेखामधे सचिन === क्रिकेट असं का समीकरण झालय???

दुसरं म्हणजे पंजाब मधील दहशतवाद संपुष्टात आला आणि काश्मीर मधील अतिरेकी कारवायांमुळे अशांत झालेला काश्मिर. त्यामुळेच आता आर्मी्ला सुद्धा कायम अतिरेकी हल्ल्यांपासून, घूसखोरांपासून वाचवण्यासाठी सारखं सतर्क रहावं लागतं. तसंच हॉकी या खेळात फारसं ग्लॅमर नसल्याने कदाचित आर्मीमधील लोक हॉकी खेळायला आता येत नसावेत

खरंतर या विधानाला विनोदी म्हटलं असतं पण त्यातून तुम्हाला कुठलाही खेळ/त्यामधील खेळाडू अथवा आर्मी याचे काम कसे चालते याची काहीदेखील कल्पना येत नाही हे स्पष्ट दिसतय. अशी बेजबाबदार विधाने टाळा.

फक्त पॉप्युलॅरीटीच्या जोरावर एखाद्या खेळाला राष्ट्रीय खेळ कसा म्हणणार? खरं तर भारता मध्ये हॉकीच्या दुर्दशेला आणि क्रिकेटच्या अतिरेकाला नक्की कोण जबाबदार आहे याचा पद्धतशीर अभ्यासच व्हायला हवा. मला तर याची बिजं ग्लोबलायझेशन, आर्थिक राजकारण, आणि भ्र्ष्टाचाराच्या संधी यातच दिसताहेत. हॉकी हा भारताचा (नावापुरताच) राष्ट्रीय खेळ राहील याची पुरेपूर तजविज करून थेवलेली आहे.

मग्कशाच्या जोरावर राष्ट्रीय खेळ ठरतो? जेव्हा भारताला स्वतःचा राष्ट्रीय खेळ ठरवायचा होता तेव्हा हॉकी पॉप्युलॅरीटीच्या शिखरावर होता, आज क्रिकेट आहे, उद्या कदाचित टेनिस असेल.

असा अभ्यास जेव्हा कराल तेव्हा जरूर करा. आणि त्याचे निष्कर्ष जरूर मान्डा.

<<<साधारणपणे ८० च्या दशकात राजकीय समीकरणं बदलणार्‍या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या देशात घडल्या. एक म्हणजे पंजाब मधील वाढलेला खलिस्तानवाद आणि त्यामुळे झालेली इंदिरा गांधींची हत्त्या....पाठोपाठ आलेला शिख विरोध. त्यामुळे अनेक शिख कुटुंब परदेशात स्थायिक झाली. दुसरं म्हणजे पंजाब मधील दहशतवाद संपुष्टात आला आणि काश्मीर मधील अतिरेकी कारवायांमुळे अशांत झालेला काश्मिर. त्यामुळेच आता आर्मी्ला सुद्धा कायम अतिरेकी हल्ल्यांपासून, घूसखोरांपासून वाचवण्यासाठी सारखं सतर्क रहावं लागतं. तसंच हॉकी या खेळात फारसं ग्लॅमर नसल्याने कदाचित आर्मीमधील लोक हॉकी खेळायला आता येत नसावेत. एकूणच यासगळ्याचा परिणाम भारतीय हॉकीच्या खेळावर झाला असण्याची शक्यता आहे.>>>

या संशोधनाला डायरेक्ट नोबेल प्राइझ दिले पाहिजे.
इंदिरा गांधींचा एकेरी उल्लेख करायचा राहिला की हो.

भारतीय संघ १९७२ पर्यंत ऑलिंपिकमध्ये हॉकीचे सुवर्णपदक पटकावत होता. १९७६ साली सातव्या क्रमांकावर होता. १९८० साली सुवर्णपदक जिंकले कारण मॉस्को ऑलिंपिकवर अमेरिकेच्या गटातल्या देशांनी बहिष्कार टाकला होता.

याची कारणे म्हणजे हॉकीचे बदललेले नियम . हॉकी अ‍ॅस्ट्रो टर्फवर खेळली जाऊ लागली. हॉकीचे नियमही बदलले. आधी कलात्मक हॉकी खेळली जायची ज्यात भारतीय/पाकिस्तानी खेळाडू निष्णात होते. नंतर वेगाला अणि स्टॅमिनाला प्रचंड महत्त्व आले, ज्यात भारतीय उपखंडातले खेळाडू कमी पडले. १९८४ नंतर युरोपीय देशांचा आणि ऑस्ट्रेलिया न्युझीलंडचा हॉकीवर पगडा बसला तो यामुळे.

ही प्राथमिक माहिती नसताना खेळबाह्य कारणांमुळे भारतीय हॉकीची घसरण झाली हा निष्कर्ष काढण्याचे तुमचे धाडस कौतुकास्पद आहे. केपीएस गिल यांना भेटून आपण मार्गदर्शन करा.

आंतरराष्टीय सामना खेळणार्‍या दोन देशांत माझे काही काळ वास्तव्य होते.
केनया आता फारसा या खेळात नसतो, पण अगदी सामना चालू असतानाही, त्याचे इथे विशेष वातावरण नसते. फुटबॉल मात्र सर्वच आफ्रिकन देशांत आणि दक्षिण अमेरिकेतही प्रचंड लोकप्रिय आहे. माझ्या घरातूनच एक मोठे स्टेडियम दिसते, तिथे सतत फुटबॉलच्याच मॅचेस चाललेल्या असतात. केवळ या खेळाला वाहिलेल्या काही वाहिन्या आहेत, आणि विकेंडला बार मधून, लोक बेभान होऊन त्या बघत असतात.

न्यू झीलंडची टीम खेळत असली तरी तिथे जास्त करुन रग्बीचीच हवा असते. (एक मालिका चालू असताना, मी तिथेच होतो.)

तात्पर्य, भारतात हा खेळ पद्धतशीर पणे मार्केट केला गेलाय. आणि त्यात ते यशस्वीही झालेत. सध्यातरी याच लोकांचे त्यावर वर्चस्व आहे.

मास्तुरे,
मला श्री एकनाथ सोळकर यांच्या विषयी माहीती नव्हती. आपल्या अधिक माहीती बद्धल धन्यवाद.
जरी लोक ट्रेन, बस मधे रेडीओवरून कॉमेंट्री ऐकत असले तरी सध्या इतकं क्रिकेट वेड सामान्य जनतेत पसरलेलं नव्हतं हे सुद्धा तितकंच सत्य आहे.

मान्य आहे खेळात कामगीरी वर खाली होऊ शकते पण एकूणच परीस्थीती संशयास्पद वाटते. होम पिचवर कोणीही जिंकेल. भारताने वर्ल्ड कप होम पिचवर जिंकला तर त्यात काय नवल? भारतीय खेळाडू परदेशात गेले की मगच सगळं बाहेर येतं ना. क्रिकेट मधलं मॅच फिक्सींग प्रकरणही काही नविन नाही. असो.

माझा आक्षेप हा क्रिकेटला दिले जाणारे अतिरेकी महत्त्व आणि इतर खेळांना मिळणारी सापत्न वागणूक..उदाहरणादाखल भारताचा राष्ट्रीय खेळ घेतला. कारण राष्ट्रीय खेळालाच जर दयनीय वागणूक मिळत असेल तर बाकीच्या खेळांचं विचारायलाच नको.

अजुन एक नुकतंच घडलेलं उदाहरण: गेल्याच महिन्यात भारतीय क्रिकेट टीमची इंग्लंड का वेस्ट इंडीज बरोबर इंदौर ला मॅच होती. आणि इंदौरच्या स्टेडीअम मधील प्रेक्षागृहातील खुर्च्या साफ करण्याचं काम इंदौरच्या स्टेट लेव्हलच्या फुटबॉल संघातील खेळाडूंनी ३ रूपये प्रति खुर्ची या दराने केले. कारण त्यांच्याकडे सरावासाठी साधनं विकत घ्यायला पुरेसे पैसे नव्हते.

>>जे विकलं जातं तेच पिकतं हा जगाचा नियम आहे. >> अगदी बरोबर. पण आपल्याकडे नक्की मुद्दामहून कोण काय विकतंय किंवा पिकवतंय आणि कशासाठी विकतंय किंवा पिकवतंय याचा विचार तर नक्कीच होऊ शकतो. नाहीतर वेळ निघून गेल्यावर उपयोग होत नसतो.

>>>हॉकीला पुन्हा सोनेरी दिवस आल्यास आनंदच होईल. पण म्हणून क्रिकेटवेडे क्रिकेटपासून दूर जाणार नाहीत. हॉकी व क्रिकेट हे दोन वेगळ्या धर्तीचे खेळ आहेत. त्यांची तुलना करू नये. एक खेळ वाढवायचा म्हणून दुसरा नाकारायचा ही भूमिका योग्य वाटत नाही.>>> अगदी अगदी मलाही असंच वाटतं. फक्त क्रिकेट या खेळासाठी इतर खेळांना नाकारणं त्यांना सापत्न वागणूक देणं हे योग्य नाही.

arc,

>>>हॉकी हा खेळ गांधी -नेहरु घरण्यांनी चालवलेल्या सरकारच्या क्रिडा खात्याकडुन चालवला जातो त्यामुळेच तो रसातळाला गेला आहे,क्रिकेटचे तसे नाही.>>>

ही माहीती मला नविनच आहे. त्याबद्धल धन्यवाद. पण क्रिकेट च्या बोर्डवर अगदी नेहरू-गांधी घराणं नसलं तरी काँग्रेसजनच आहेत. उदा: शरद पवार
तसं पहायला गेलं तर हॉकी इंडियावरही काँग्रेसवलेच आहेत. उदा: के पी एस गिल.

>>>जर BCCI मधे नेहरु-गांधी गेले असते तर तिथेही काही खरे नव्हते, तेंडूलकरने तर आतापर्यंत केली आहेत त्याच्या १०% शतके पण नसती केली.>>>

अरे बापरे हे तर १००% तेंडूलकर विरोधी विधान झालं. दंगली होतील हो तुमच्या असल्या विधानाने. तुम्ही डायरेक्ट सचिन तेंडूलकरच्या विक्रम करण्याच्या क्षमतेचा आणि गुणवत्तेचा संबंध क्रिकेट मंडळावर कोण आहे याच्याशीच जोडलात. अरेरे.....

नंदिनी,

>>>या प्रश्नाची उत्तरे तुमच्या लेखातून मिळाली असती तर जास्त बरे झाले असते.>>> हम्म, म्हणजे मी लेख लिहून मला पडलेले प्रश्न उपस्थित केलेत.......मला जर त्याची उत्तरं सापडली असती तर लेखात ती लिहीणं मलाही आवडलं असतं हो. पण काय करणार नाही मिळाली म्हणून तर इतरांसाठी उत्तर शोधायला ठेवली आहेत.

>>>तुम्ही लिहिलेल्या फॅक्ट्समधे थोडी गडबड आहे. बीसीसीआयने आयपीएल ही संघटना तयार केली आहे. त्यामुळे ते दुसरे मोठे केंद्र नाही, त्यांचेच अपत्य आहे.>>>

आय पी एल ही संघटना जरी बीसीसीआय चं अपत्य असलं तरी त्यांची बँक खाती तर वेगळी आहेत ना आणि दोन्ही संघटनांचे पदाधिकारी वेगळे आहेत ना. मग दोन वेगळ्या संघटना आणि दोन मोठी भ्रष्टाचाराची केंद्रे म्हणण्यात काय गैर आहे? बीसीसीआय मधला भ्रष्टाचार तसेच आयपीएल मधला भ्रष्टाचार हे जगजाहीर आहे. त्यातून कुणी किती करचुकवेगिरी केली आहे हे सुद्धा बाहेर आलेलं आहे. असो.

>>व त्यानंतर कुणाच्या टीम मधे कोण खेळणार हे लिलाव पद्धतीने ठरवले गेले. यामधे जुगार कसा होतो? >>

हा हा हा, रेसच्या घोड्यांनाही रेसकोर्स वर रजीस्टर केलं जातं आणि श्रीमंत लोकं घोड्यांवर तसेच जॉकींवर पैसे लावतात. त्याला जुगार असंच म्हणतात. आय पी एल मधले संघ हे पैशाची बोली लावून खेळाडू विकत घेतात हे जगजाहीर आहे.

>>बरं जरी त्यानी जुगार लावला अथवा स्वतःचे काळे पैसे पांढरे केले तरी त्याचा हॉकीशी संबंध कसा येतो? >>> या असल्या काळ्या पैशामुळे आणि सवंग लोकप्रियतेमुळे क्रिकेट खेळणार्या खेळाडूंना दिले जाणारे अवास्तव महत्त्व आणि पैसा याचा परिणाम नक्कीच इतर खेळांवर आणि पर्यायाने खेळाडूंवर होतच असतो. हॉकी हा प्रातिनिधीक खेळ म्हणून नमूद केला आहे. मग यांचा संबंध नाही कसा?

>>>यामधे बीसीसीआय अथवा आयपीएलने "तरूणाना मूर्खासारखे वेडे" कसे केले? हे जाणून घ्यायला आवडेल. >>>
एक दुरूस्ती आय पी एल हंगामाने तरूणांना मूर्खासारखं वेडं केलं आहे असं लिहीलं आहे. आणि ते जाणून घ्यायचं असेल तर आय पी एल हंगाम चालू असताना जर विविध वाहिन्या, वृत्तपत्रं तसेच शाळा, महाविद्यालयं, कंपन्या यांमधील वातावरण पाहीलंत तर उपयोगी पडेल.

>>> भारतातील सर्व तरूण आपली अक्कल गहाण ठेवून वागतात असे तुम्हाला म्हणायचे आहे का? >>>
असं तुम्हालाच म्हणायचंय वाटतं. कारण मी जे लिहीलेलं नाही त्यावर भाष्य करण्याची गरज नाही.

>>>अहो, त्याचा जन्म जेव्हा झाला तेव्हाच तो उदय पावणार ना? >>> सचिन तेंडूलकरचा जन्म हा १९७३ सालातला आहे. तेव्हा जरी तो जन्माला आला आणि त्याचं नाव सचिन तेंडूलकर असं त्याचवेळी असलं तरी क्रिकेटच्या खेळामधे त्याचं नाव होण्यास १९८० च्या शेवटी सुरूवात झाली उदा: १९८७ साली तो पहिली आंतर्राष्ट्रीय मॅच खेळला आणि प्रसिद्धीस आला. त्याआधी तो रणजीमधे वगैरेही प्रसिद्धीस आला असेल पण हे सगळं ८० च्या दशकात. म्हणून सध्याच्या 'सचिन तेंडूलकरचा" उदय हा ८० च्या दशकातला. असं लिहीण्याची पद्धत आहे. असो.

>>खरंतर या विधानाला विनोदी म्हटलं असतं पण त्यातून तुम्हाला कुठलाही खेळ/त्यामधील खेळाडू अथवा आर्मी याचे काम कसे चालते याची काहीदेखील कल्पना येत नाही हे स्पष्ट दिसतय. अशी बेजबाबदार विधाने टाळा.>>>

तुम्ही काहीही म्हणू शकता. मी मनात आलेल्या शंका बोलून दाखवल्यात. मला कल्पना नाहीये पण तुम्हाला आहे ना. मग सांगा की स्पष्टपणे.

>>>मग्कशाच्या जोरावर राष्ट्रीय खेळ ठरतो? जेव्हा भारताला स्वतःचा राष्ट्रीय खेळ ठरवायचा होता तेव्हा हॉकी पॉप्युलॅरीटीच्या शिखरावर होता, आज क्रिकेट आहे, उद्या कदाचित टेनिस असेल.>>>

आता इथे मात्रं हद्दच झाली. राष्ट्रीय खेळ, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रगीत हे भारतीय घटना ज्यावेळी अस्तित्त्वात आली त्यावेळी काही विचार करून ठरवलेल्या गोष्टी आहेत. उद्या भारतात मोरांची संख्या कमी झाली (त्यांची मोरपिसांसाठी हत्या होते आहेच) आणि कावळ्यांची संख्या वाढली म्हणून भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर नसून कावळा ठरवण्यासारखं आहे. सध्याचं राष्ट्रगीत फारसं पॉप्युलर नाही मग सध्या सगळ्यात पॉप्युलर असलेलं गाणं "व्हाय दिस कोलावेरी कोलावेरी दी" हे गाणं राष्ट्रगीत म्हणून स्विकारण्यासारखं आहे. बरं अगदी खेळाच्या साठी तुमचा हास्यास्पद युक्तीवाद जरी क्षणभर गृहीत धरला तरी भारतीय घटनेमधे असे घडी घडी राष्ट्रीय खेळ बदलण्याची सोय असेल याची शंकाच आहे. पण कदाचित क्रिकेट प्रेमींनी दबाव आणला तर ते सुद्धा घदू शकते (जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच).

>> या संशोधनाला डायरेक्ट नोबेल प्राइझ दिले पाहिजे.>>
अरेरे माझं नशिब! तुम्ही नाहीत ना नोबेल पारितोषिक कमीटीवर. Happy

>>ही प्राथमिक माहिती नसताना खेळबाह्य कारणांमुळे भारतीय हॉकीची घसरण झाली हा निष्कर्ष काढण्याचे तुमचे धाडस कौतुकास्पद आहे.>> तुम्ही ती प्राथमिक माहीती पुरवलीत त्याबद्धल शतशः धन्यवाद. मला असलेल्या माहीतीच्या आधारावर लेख लिहीला....माझा क्लेम काही असा नाही की मला पूर्ण माहीती आहे. तसं लेखनात मी अंदाज बांधते आहे असं नमूद केलेलंच आहे. पण आपल्यासारखे त्याला संशोधन म्हणत असतील तर आनंदच आहे. प्राथमिक माहीतीचा अभाव माझ्या लेखात होता म्हणून तरी तुम्हाला असलेली प्राथमिक माहीती तुम्ही लिहीलीत आणि इतरांना त्याची माहीती झाली. नाहीतर तुम्ही तुमचं ज्ञान स्वतःकडेच ठेवलं असतंत. निदान त्यासाठी तरी मला धन्यवाद द्या. असो.

>>>याची कारणे म्हणजे हॉकीचे बदललेले नियम . हॉकी अ‍ॅस्ट्रो टर्फवर खेळली जाऊ लागली. हॉकीचे नियमही बदलले. आधी कलात्मक हॉकी खेळली जायची ज्यात भारतीय/पाकिस्तानी खेळाडू निष्णात होते. नंतर वेगाला अणि स्टॅमिनाला प्रचंड महत्त्व आले, ज्यात भारतीय उपखंडातले खेळाडू कमी पडले. >>> हॉकीचे नियम बदलले म्हणून हॉकीपटुंना बदललेल्या नियमांनुसार प्रशिक्षण देण्या ऐवजी हॉकीला मिळत असलेली अनुदानं कमी करणं हे कोणत्या न्यायात बसतं? मग याला राजकारण का म्हणू नये? जर नविन हॉकी मधे स्टॅमीना आणि वेग याला महत्त्व असेल तर तसं प्रशिक्षण खेळाडूंना द्यायला हवं. ते दिलंच नाही त्यासाठी अनुदान उपलब्ध केलंच नाही तर हे राजकारण नाही का?

दिनेशदा,

>>>तात्पर्य, भारतात हा खेळ पद्धतशीर पणे मार्केट केला गेलाय. आणि त्यात ते यशस्वीही झालेत. सध्यातरी याच लोकांचे त्यावर वर्चस्व आहे.>>> आपन नक्की कोणत्या खेळाबद्धल बोलता आहात? क्रिकेट की हॉकी? कारण केनिया, न्युझिलंड बद्धलची माहीती ही हॉकी संबंधी वाटते आहे. पण हॉकी ला भारतात मार्केट नाहीच आहे. ते तर क्रिकेटला आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे क की भारतात क्रिकेट हा खेळ पद्धतशीर्पणे मार्केट केला गेला आहे आणि सध्यातरी याच लोकांचे वर्च्यस्व आहे. तसं असेल तर आपल्या विधानाशी सहमत.

कारण माझाही निष्कर्ष वेगळा नाहीये. क्रिकेटला पद्धतशीरपणे भारतात पिकवलं आणि विकलं गेलं आहे.

कृपया स्पष्ट करावे.

शांतीसुधा, मी क्रिकेटबद्दलच लिहिले आहे. भारतात या खेळाला अतिरिक्त महत्व दिलेय याच्याशी मी सहमत आहे.

ज्याकाळी रेडीओवर कॉमेंट्री असे तो काळही मला आठवतोय. त्यावेळी लोक कानाला ट्रांझिस्टर लावून बसत हेही खरे आहे, पण तरीहि त्याचे वेड मर्यादीत होते असेच मी म्हणेन. कारण त्याला प्रायोजक नसत.

तसे बघायला गेले तर माझ्या वडीलांच्या तरुणपणीदेखील या खेळांचे वेड म्हणा आवड म्हणा होतीच (बापू नाडकर्णी त्यांचे मित्र होते, ते आमच्या घरीही येत असत.)
मलाही होते, पण नंतरचा ऊबग आणणारा बाजारुपणा, मॅच फिक्सींग बघून मला अत्यंत तिटकारा आला. (माझ्या वडीलांच्या लहानपणीचा काळ म्हणजे १९४०/५० चा काळ आणि माझ्या तरुणपणीचा काळ म्हणजे १९७०/८० चा काळ.)

तूम्ही हॉकीचे एक उदाहरण घेतलेय, पण बाकीच्या खेळातही तसेच आहे. माझ्या मित्राची मूले राष्ट्रीय पातळीवर जिमनॅस्टीक्स मधे भाग घेत असत. त्यांच्या शिबिरात त्यांना भेटायला गेलो होतो, तर अत्यंत दर्जाहीन ठिकाणी त्यांची राहण्याची सोय केली होती. काही मुलांना चक्क कॉटखाली झोपावे लागत असे. त्यांच्यासाठी असलेल्या खाऊ योजनेत अफरातफर झाल्याने, खाऊचे पैसे थेट त्यांच्या हातातच देण्यात येत होते. (त्यावेळी त्यांचे वय ९/१० वर्षे.)

मान्य आहे खेळात कामगीरी वर खाली होऊ शकते पण एकूणच परीस्थीती संशयास्पद वाटते. होम पिचवर कोणीही जिंकेल. भारताने वर्ल्ड कप होम पिचवर जिंकला तर त्यात काय नवल? भारतीय खेळाडू परदेशात गेले की मगच सगळं बाहेर येतं ना. क्रिकेट मधलं मॅच फिक्सींग प्रकरणही काही नविन नाही. असो. >> हेहि तुम्ही अंदाजाने लिहिलय कि अजून काहि ?

होम पिचवर कोणीही जिंकेल.>> किती टिमनी आत्तापर्यंत होम पिचवर World Cup जिंकलाय ? तुमचा अंदाज किंवा संशोधन काय आहे ह्याबद्दल ?

हॉकीची दुर्दशा उडायला Astro turf हे किती मोठे कारण आहे ह्यबद्दल नेटवर जे दुवे आहेत ते बघाल का ?

पद्धतशीर मार्केटींग करून क्रिकेटचा उदो करण्याबद्दल अनुमोदन पण हे बाबा आदमच्या काळापासून होत आलेय का ? एके काळी क्रिकेटही त्याच stage मधून गेले आहे ना ? त्याची लोकप्रियता वाढण्यामागे फक्त मार्केटींग आहे ह्याचबरोबर मार्केटींग करणार्‍यांनी क्रिकेट(च) का निवडले ह्याबद्दल विचार केला आहात का ?

या परिस्थीतीला आपण बदलणार नाहीतर कोण? चला पुन्हा एकदा हॉकीला सुवर्णसिंहासनावर बसवुयात आणि क्रिकेटच्या जुगार्‍यांपासून देशातील युवकांना वाचवूयात. चक दे इंडिया!!>> समजा उद्या हॉकीला चांगले दिवस आले कि मग हे मग हे दुष्ट जुगारी, क्रूर मार्केटींगवाले, नि धूर्त राजकारणी त्याचा उदो उदो करतील मग वरचेच विधान खेळांच्या नावाची अदलाबदल करून लिहावे लागेल Wink

>>> या परिस्थीतीला आपण बदलणार नाहीतर कोण? चला पुन्हा एकदा हॉकीला सुवर्णसिंहासनावर बसवुयात आणि क्रिकेटच्या जुगार्‍यांपासून देशातील युवकांना वाचवूयात. चक दे इंडिया!!>>

म्हणजे लोकांनी क्रिकेट बघणं/खेळणं थांबवून हॉकी बघायला/खेळायला सुरूवात करायची का? अशी बळजबरी करून एखादा खेळ लोकप्रिय करता येतो का आणि एखादा लोकप्रिय खेळ नावडता करता येतो का?

>>> होम पिचवर कोणीही जिंकेल.>> किती टिमनी आत्तापर्यंत होम पिचवर World Cup जिंकलाय ? तुमचा अंदाज किंवा संशोधन काय आहे ह्याबद्दल ?

बरोबर. लेखिकेच्या माहितीसाठी म्हणून सांगतो. आतापर्यंत झालेल्या १० विश्वचषक स्पर्धांमध्ये ८ वेळा यजमान संघाल विश्वचषक जिंकता आलेला नाही. फक्त एकदा (म्हणजे २०११ मध्ये) यजमान संघाने विजय मिळविला. अजून एकदा (म्हणजे १९९६ मध्ये) तांत्रिकदृष्ट्या यजमान संघ (म्हणजे श्रीलंका) जिंकला, पण वस्तुस्थिती अशी होती की (१) श्रीलंका हा सहयजमान संघ होता. इतर २ सहयजमान देश म्हणजे भारत व पाकिस्तान, (२) श्रीलंकेत फक्त ४ सामने आयोजित केले होते व त्यापैकी २ सामने बहिष्कारामुळे झालेच नाहीत व (३) सर्वात महत्त्वाचे म्हणजे अंतिम सामना लाहोरमध्ये (म्हणजे विजेत्यांच्या होम पीचवर नव्हे) खेळला गेला होता. त्यामुळे होमपीचवर कोणीही जिंकेल हे फक्त १०-२० टक्केच सत्य आहे. होमपीचवर यजमान संघ न जिंकण्याची शक्यता ८०-९० टक्के आहे.

अजून एक महत्त्वाचे म्हणजे हॉकीच्या सुवर्णकाळातही (म्हणजे १९६४ पर्यंत) क्रिकेट अतिशय लोकप्रिय होते.

खरं तर भारता मध्ये हॉकीच्या दुर्दशेला आणि क्रिकेटच्या अतिरेकाला नक्की कोण जबाबदार आहे याचा पद्धतशीर अभ्यासच व्हायला हवा. मला तर याची बिजं ग्लोबलायझेशन, आर्थिक राजकारण, आणि भ्र्ष्टाचाराच्या संधी यातच दिसताहेत. हॉकी हा भारताचा (नावापुरताच) राष्ट्रीय खेळ राहील याची पुरेपूर तजविज करून थेवलेली आहे. या परिस्थीतीला आपण बदलणार नाहीतर कोण? चला पुन्हा एकदा हॉकीला सुवर्णसिंहासनावर बसवुयात आणि क्रिकेटच्या जुगार्‍यांपासून देशातील युवकांना वाचवूयात. >>
Rofl Rofl Rofl

बाकी शांतिसुधाजी आणि मास्तुरेजी (हो त्यांच्यात 'जी' लावणे अनिवार्य असते :)) यांच्यात जुगलबंदी चाललीय आणि एआरसी ते शांतपणे पाहात आहेत हे दृश्यच दुर्मिळ आणि मनोरंजक आहे... Proud

आसामी, Astro Turf साठी गुगलवर अनेक दुवे आहेत. आणि प्रत्येकातूनच उपयुक्त माहीती मिळत नाहीये. अगदी विकीपीडीया मधे सुद्धा (मी उघडलेल्या पेजवर) फक्त तो एक शू ब्रँड आहे इतकंच समजलं त्याचा हॉकीच्या डाऊन फॉलशी काय संबंध आहे हे समजलं नाही. त्यामुळे तुम्हाला अपेक्षित माहीती असलेले धागे दिलेत तर बरं होईल.

आसामी, >>>त्याची लोकप्रियता वाढण्यामागे फक्त मार्केटींग आहे ह्याचबरोबर मार्केटींग करणार्‍यांनी क्रिकेट(च) का निवडले ह्याबद्दल विचार केला आहात का ?>>> त्याचंच तर उत्तर शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. लेखाचा शेवट सुद्धा अशाच अनेक प्रश्नांनी केला आहे की ज्यांची उत्तरं मला मिळालेली नाहीयेत. हा लेख लिहीण्यामागची एक अपेक्षा हीच होती की जे हा लेख वाचतील त्यांनी सचिन तेंडूलकरवर न घसरता मी उपस्थीत केलेल्या प्रश्नांच्या संदर्भात उत्तरं शोधण्यास मदत करावी. पण............शेवटी सगळे आपल्या मूळ वळणावरच जाणार.

धन्यवाद अन्कॅनी, आता लक्षात आलं हे अ‍ॅस्ट्रो टर्फ काय प्रकरण आहे ते. पण मूळ प्रश्न अनुत्तरीतच रहातो. आता जर हओकी खेळण्याची स्टाईल बदलली तर त्याप्रमाणे खेळाडूंना प्रशिक्षण द्यायला पाहिजे न की त्यांचं अनुदान कमी कमी करत आणलं पाहीजे. आता या नविन हॉकीच्या स्टँडर्ड प्रमाणे खेळाडूंना प्रशिक्षण का मिळालं नसेल? कारण पैसे नाहीत. इतके पैसे कोण गुंतवणार? प्रायोजक जाहीरातदार कंपन्या. मग प्रश्न येतोच नं की हे फक्त क्रिकेटलाच का इतर खेळांना का नाही? यात कुठेही आर्थिक राजकारण आणि ग्लोबलायझेशनचा वास येत नाही? खरंच आश्चर्य आहे नाही.

पाश्चात्य देशांत कृत्रीम मैदान तयार करून त्यावर खेळणंच त्यांना सोयीचं कारण त्यांच्याकडील हवामान विषम आहे. आपल्याकडील हवामान नैसर्गिक मैदानांना अधिक योग्य आहे. आता आपल्या खेळाडूंना आंतर्राष्ट्रीय पातळीवर खेळायचं असेल तर त्यांनाही कृत्रीम मैदानावर सराव आणि प्रशिक्षण मिळालं पाहीजे. मग ते का नाही उपलब्ध करून देत? पण क्रिकेटच्या बाबतीत हवे ते साहित्य आणि हवे ते प्रशिक्षण उपलब्ध केले जाते असे का? याचा विचार नक्कीच व्हायला हवा.

हॉकी कशाला पण? खूप देश खेळतात आता. त्यांच्याकडे जास्त प्रशिक्षण, पैसा, मांसाहारी तगडे खेळाडू.. तिथे आता कुठला नंबर लागायला? क्रिकेट पण खेळू लागलेत बाकीचे, थोड्या दिवसांनी चिनी टीम येते की नाही बघा वर्ल्ड कपात. मोजकेच देश खेळतात असं काहीतरी शोधायला पाहिजे. दुसरे शिकून तरबेज होईपर्यंत जिंकून घ्यायचे. कबड्डी, खो खो इ. आंतरराष्ट्रीय पातळीवर जोरात नेले पाहिजे. Light 1

>>आजही अमेरिका किंवा कॅनडात बघितलं तर लोक अनुक्रमे बेसबॉल आणि आईस हॉकी साठी वेडे असतात. का? >>कारण ते त्यांचे राष्ट्रीय खेळ आहेत.
इथे बेसबॉल, फुटबॉल चं वेड असण्याचा ते 'राष्ट्रीय खेळ' असण्याशी काही संबंध नाही. (आधी ते तसे आहेत का हेच मला माहीत नाही. Happy ) इथे त्यांचा 'व्यवसाय' केलाय. भारतात क्रिकेटचे जे आहे तेच यांचे इथे. क्रिकेटवरुन लक्ष्,पैसा काढून 'हॉकीत' घाला हे चुकीचे आहे. आंतरराष्ट्रीय इतर खेळांत भारतीय खेळाडू कसे पुढे येतील हे पहा म्हणत असाल तर ठीक. फक्त हॉकीचे जाऊदे!

अन्कॅनी, हॉकी हा खेळ मी फक्त उदाहरणादाखल घेतला. कारण त्याला राष्ट्रीय खेळ म्हणतात. राष्ट्रीय खेळालाच हा दर्जा तर इतर खेळांचे हाल विचारायलाच नकोत. तुम्ही म्हणताय कबड्डीचं......

[याआधी कबड्डी आणि ऑलिंपीक्स यासंदर्भात दिलेली माहीती चुकीची असल्याने काढून टाकत आहे.] कबड्डी या खेळाच ऑलिंपिक्स मधे प्रदर्शन झालेलं होतं.

मागे एकदा टीव्ही वर ईस्ट-एशीयन संघांचा कबड्डीचा खेळ बघण्याचा योग आला होता. शूज घालून तेवढ्याच चपळाईने ते कबड्डी खेळत होते.

अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ बेसबॉल आहे आणि कॅनडाचा आईस हॉकी हा राष्ट्रीय खेल आहे. तुम्ही म्हणता तसं मार्केटींग आणि व्यावसायीकरण हे सुद्धा त्या खेळांची तिथल्या पॉप्युलॅरीटीची कारणं असू शकतात. पण एका खेळाला डोक्यावर चढवून इतर खेळांना पायदळी तुडवणे असले प्रकार नक्कीच होत नसावेत. असो.
शेवटी गोष्ट पैसा, प्रशिक्षण, प्रायोजक, अनुदान, सोयीसुविधा यांवरच थांबते. भारतात जितका पैसा क्रिकेटसाठी ओतला जातो तितका पैसा इतर खेळांसाठी का नाही ओतला जात? आपले खेळाडू नेमबाजीत चांगले आहेत. बुद्धीबळात तर गेली अनेक वर्षे विश्वनाथन आनंद केवळ स्वबळावर जगज्जेते पद राखून आहे. त्याला देखिल सापत्न वागणूक मिळते. जे स्वागत भारतीय क्रिकेट टीमचं होतं ते स्वागत विश्वनाथन आनंदचं कधीच झालेलं नाही. सगळं पैसा आणि प्रशिक्षण यापाशी येऊन थांबतं.

शांतीसुधा, हॉकीचे आयपीएल् च्या धर्तीवर तयार केलेले मॉडेल भारतात आहे. याबद्दल माहिती इथे मिळेल. हे सगळे कागदावरच रहाते का प्रत्यक्षात तितकेच खरे उरते ते बघायचे.

अन् कॅनी .. भारताचे कबड्डीतले विश्वविजेतेपद अबाधित आहे. ते चषक जिंकून भारतात परतल्यावर त्यांना कुणी काही विचारत नाही तो भाग वेगळा !

आता या नविन हॉकीच्या स्टँडर्ड प्रमाणे खेळाडूंना प्रशिक्षण का मिळालं नसेल? कारण पैसे नाहीत. इतके पैसे कोण गुंतवणार? प्रायोजक जाहीरातदार कंपन्या. मग प्रश्न येतोच नं की हे फक्त क्रिकेटलाच का इतर खेळांना का नाही? यात कुठेही आर्थिक राजकारण आणि ग्लोबलायझेशनचा वास येत नाही? खरंच आश्चर्य आहे नाही. >>
चला क्रमाने जाऊ. अ‍ॅस्ट्रो टर्फ साधरणत: ७० च्या दशकामधे अधिकाधिक वापरले जाउ लागले (असेही म्हणतात कि पाश्यात्य देशांनी sub continental मक्तेदारी मोडायला अ‍ॅस्ट्रो टर्फ वापरणे सुरू केले, खरे खोटे मला माहित नाहि). ७६ च्या olympics मधे प्रथम वापरले गेले. तोपर्यंत क्रिकेटमधे भारताचे स्थान फारसे कौतुकाने घेण्यासारखे नव्हते. पैसा तर नक्कीच नव्ह्ता, मार्केटींग पण नव्हते. ते सुरू झाले ८३ नंतर. ह्याउलट आपण हॉकीमधे सणकून मार खाउ लागेतो हॉकीला glamor होते. हॉकीचे खाली घसरणे नि क्रिकेटचे वर जाणे ह्या दोन भिन्न कालखंडांमधे सुरू झालेल्या घटना आहेत. "नविन हॉकीच्या स्टँडर्ड प्रमाणे खेळाडूंना प्रशिक्षण का मिळालं नसेल ?" ह्याचा दोष हॉकी मॅनेज करणार्‍यांचा आहे. अजूनही तिथली परिस्थिती तशीच आहे. गिलसारखी व्यक्ती दहा-दहा वर्षे ह्या पदावर आहे.
इथे कुठलीही supreme power बसलेली नाहि जिने हॉकीमधले पैसे काढून क्रिकेटमधे घातले नि हॉकीचा र्हास घडवून आणला. राहिता राहिला क्रिकेटचा भाग, तर मार्केटिंग्वाल्यांनी त्याची लोक्प्रियता बघून ते अधिकाधिक cash in करन्याकडे लक्ष दिले. ह्यात क्रिकेट नाममात्र आहे. जर इतर कूठला खेळ अधिक प्रसिद्ध होण्याची संधी असती तर त्याकडे पैसे गेले असते. ह्यात ग्लोबलायझेशनचा वास कसला येतो ते तुम्हालाच माहित.

गूगल केल्यावर मिळालेली पहिली लिंक
http://www.hindustantimes.com/News-Feed/Hockey/How-we-lost-the-turf-war/...

>>आजही अमेरिका किंवा कॅनडात बघितलं तर लोक अनुक्रमे बेसबॉल आणि आईस हॉकी साठी वेडे असतात. का? >>कारण ते त्यांचे राष्ट्रीय खेळ आहेत.>> इथे बेसबॉल, फुटबॉल चं वेड असण्याचा ते 'राष्ट्रीय खेळ' असण्याशी काही संबंध नाही>> +१. बेसबॉल राष्ट्रीय खेळ आहे कि नाहि हे मला माहित नाही, favorite past time आहे. समजा आहेत असे धरून, त्याच्या एव्हढाच किंवा काकणभर अधिक पॉपुलर NFL, NBA आहेत. तेंव्हा ......

असामी, हॉकी राजकारणाची शिकार आहे हे आधीच नमूद केलेलं आहे. तसेच इतर भारतीय खेळही राजकारणात अडकलेले आहेत. पुण्यात बालेवाडीत करोडो रूपये खर्चून नॅशनल गेम्सच्या वेळी आंतर्राष्ट्रीय दर्जाची मैदानं उभी केली पण ते गेम्स संपल्यावर ही मैदानं धूळ खात पडून होती. का? तर बालेवाडीतल्या त्या मैदानांवर प्रशिक्षण शिबीरं आयोजित करायला शासनाला भारतीय राष्ट्रीय आणि आंतर्राष्ट्रीय पतळीच्या खेळाडूंच्या संघांकडून किंवा त्यांच्या प्रशिक्षण आयोजकांकडून बक्कळ पैसा हवा होता. तेवढा पैसा हाताशी नसल्याने प्रशिक्षण शिबीरं तिथे घेतली गेली नाहीत. मग पैसा वसूल करण्यासाठी ती मैदानं चक्क लग्नाच्या रीसेप्शन्स साठी भाड्याने दिलीत. आता हे कर्म दरीद्रीपण नाही का? यात राजकारण तर आहेच. आता दिल्लीत कॉमनवेल्थ गेम्स झाल्या. इतका पैसा खर्च केला गेला (त्याच्या तिप्पट खाल्ला गेला) पण आता त्या मैदानांची काय स्थीती असेल किंवा त्यांचा वापर नक्की कशासाठी होत असेल याची कल्पनाच केलेली बरी.
आपल्या विस्तृत माहीती बद्धल धन्यवाद. क्रिकेटचा उदय आणि हॉकीचा अस्त यांचा अर्थाअर्थी संबंध नसेलही तरी सुद्धा क्रिकेटच्या खेळाडूंना मिलणारी वागनूक आणि इतर खेळाच्या अगदी जगज्जेत्यांना मिळणारी वागणूक यातील फरक खटकतोच.

माझा आक्षेप हा क्रिकेटला दिले जाणारे अतिरेकी महत्त्व आणि इतर खेळांना मिळणारी सापत्न वागणूक.. >>>> ठिके.. पण मग त्या आक्षेपाबद्दल बोला ना फक्त. होमपिचवर कोण कसे जिंकले / नाही जिंकले, इंग्लंडमध्ये काय झालं वगैरे हवेतली विधानं कशाला?

ऑलिंपिक्स मध्ये ज्या देशांचे सुवर्ण पदक तालिकेत वर्च्यस्व असते असे चीन, अमेरिका, जपान, कोरिया, इंडोनेशिया सारखे देश क्रिकेट मधे का नाहीत? या प्रश्नांची उत्तरं मला अधिक भंडावून सोडतात. >>>> इथे म्हणताय उत्तरं भंडावून सोडतात.. पुढे नंदिनीला दिलेल्या प्रतिसादात म्हणताय तुम्हांला उत्तरं माहित नाही म्हणून लेख लिहिला... माहित नसलेली उत्तर कशी काय भंडावून सोडतायत तुम्हांला?

ह्याही लेखात तेच आहे. काहितरी अर्धवट विधाने. मग लोकांनी माहिती दिली की धन्यवाद.. मला हे माहितच नव्हतं.. ! त्यामुळे चालू दे..

<<<मला आठवतंय काही वर्षांपूर्वी जेव्हा कबड्डी ऑलींपिक्स मधे अगदी नविन होती त्यावेळी भारतीय टीम उत्तम ठरली होती कारण त्यावेळी कबड्डी हा खेळ सगळ्यांनाच नविन होता. पण आता पाहिलंत तर जपान, चिन, कोरीया या देशांचे संघ कबड्डीत ऑलिंपिक्स मधे सुवर्ण, रौप्य आणि रजत पदकाचे आलटून पालटून मानकरी असतात.>>>

हे वाचून मी आधी कॅलेंडरमध्ये साल पाहिले की आपण डायरेक्ट १०० years लीप घेऊन २१११ मध्ये तर पोचलो नाही.

मला एकतर कबड्डी काय आहे ते माहीत नसावे किंवा ऑलिंपिक्स तरी.

शांतीसुधा यांना भारताच्या क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री, भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या मुख्य तसेच क्रिकेट सोडून अन्य सर्व खेळांच्या संघटनांच्या मुख्य म्हणून तातडीने नियुक्त करावे यासाठी अण्णा हजारे यांनी या क्षणीच उपोषणाला बसावे अशी मी मागणी करीत आहे. मला करोडोंच्या संख्येने अनुमोदन द्या Lol

कॉमनवेल्थ देशां क्रिकेट असण्याचे कारण म्हणजे मूलत्:हा इंग्रजांचा गेम. रविवारी निवांत टाईमपास करण्यासाठी काढलेला. तो राज्यकर्ते म्हणून त्यांच्या अधिकारी कर्मचारी यांनी वसाहतीच्या देशांत उदा: भारत नेला . आपापसात खेळता खेळता फिल्डिंगला वगैरे अधिक माणसे मिळावीत म्हणून स्थानिकांनाही त्यानी शिकवला व स्थानिकही खेळू लागले व त्यात प्राविण्यही मिळवले. त्यामुळे इंग्रज रज्यकर्ते असलेल्या देशांतच क्रिकेट फैलावले.

@shantisudha...
1) hocky team madhlya sagalya players chi naave na chukta sanga..google vaaparu naye.
2) kabbadi chya team madhil sagalyanchi naave sangaa..
3) hocky madhe jagaat aapalaa kitvaa number aahe..?
4) bhutia ani chhetry sodun ajun ek football player che naav sangaa...
5) boting madhe koni bronz padak milavle..
6) england chya no.1 boxer la kon bhartiyaa ne haravale..?
7) koneru hammy kadhi grandmaster banali..?
8) somdev cha tenis madhe ranking kaay aahe..?
9)virdhavl khade yaani kontaa vikram rachlaa?
10) saayana nehwal ne kiti vela champianship jinkali..?

he sagale google na vaapartaa saangaa..

उदय त्यांचे दुखणे तेंडुलकर आहे. आणि त्याच्या साठी भारतरत्नचे निकष बदलणारे भारत सरकार आहे. आणि ते सरकार काँग्रेसचे आहे. आणि त्यात गांधी -नेहरू घराण्याचे लोक आहेत. (खरे तर नाहीत पण असो.). त्यामुळे मूळ दुखणे कुठे आहे तुम्हाला कळले असेल.

म्हणजे 'फिरून फिरून गंगावेशीतच' Proud

Pages