(निवेदनः या लेखाचा हेतू सचिन तेंडूलकर विरूद्ध इतर हा नाही आहे. सचिन तेंडूलकरचं कर्तुत्त्व मोठं आहेच. या लेखाचा हेतू क्रिकेट या खेळाला इतकं अवाजवी महत्त्व का मिळालं असावं याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आहे. त्यात लपलेलं पैशाचं राजकारण उघड करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे सचिन तेंडूलकर प्रेमींनी तेंडूलकर विरूद्ध हा लेख असा पवित्रा घेऊ नये.)
आमच्या घराच्या मागील शाळेत पूर्वी फुटबॉल अणि हॉकी या दोन खेळांची प्रत्येकी एक आणि दोन अशी मैदानं होती. आता होतीच म्हणायला हवं कारण गेल्या काही वर्षांत त्या मैदानांचं रूपांतर एकत्रितपणे एका क्रिकेटच्या ग्राऊंड्मध्ये झालंय. साठ-सत्तरच्या दशकातले चित्रपट पाहिले तर बॉलिवुड सिनेमांमध्येही कॉलेज तरूणांच्या हातात हॉकी-स्टीक्स दाखवून हॉकी या राष्ट्रीय खेळाला जागा दिल्याचं दिसून येतं. तसा या दशकात हॉकी वर ’चक दे इंडिया" आला आणि रसिकांना आवडलाही पण तो परिणाम तातपुरताच राहिला. हिंदीच्या पाठ्यपुस्तकात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद या नावाने धडाही होता पण त्या व्यतिरीक्त इतर कुठेही ध्यानचंद यांचं नाव झळकताना पाहिल्याचं मला तरी आठवत नाही. याने त्यांची कामगिरी छोटी होते असं नाही पण ’"रात गयी बात गयी” सारखं व्यक्ती काळाच्या पडद्या आड गेली की त्या व्यक्तीचं कर्तुत्त्व कितीही मोठं असलं तरी विसरलं जातं. तसंच काहीसं मेजर ध्यानचंद यांच्या बाबतीत झालं असं वाटतंय. मागे एकदा वर्तमानपत्रात भारतीय हॉकीचा कप्तान धनराज पिल्ले याचं नाव वाचण्यात आलं. तेव्हा भारतीय संघाने कोणत्यातरी आंतरार्ष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकलेलं होतं. धनराज पिल्लेसुद्धा पिंपरी-चिंचवड मधील एका झोपडपट्टीत रहात होता. मग त्याला आर्थिक मदत करण्याविषयीची आवाहनं वाचण्यात आली. त्यानंतर एकदोन वेळा दूरदर्शनवरही झळकला होता बिचारा. पण नंतर कुठेच दिसला नाही. नुकतंच भारतीय हॉकी संघातील युवराज या खेळाडूच्या बाबतीत असंच काहीसं झालं. त्याचप्रमाणे फेसबुकवर सध्या एका वेटलिफ्टरचा पापड करतानाचा फोटो झळकतो आहे. यासगळ्याच्या निमित्ताने विचारचक्रं सुरू झालं आणि नकळत सध्याचा भारतातील धर्म-खेळ क्रिकेट आणि राष्ट्रीय खेळ हॉकी यांची तुलना सुरू झाली.
१९७० च्या शेवटी आणि १९८० च्या सुरूवातीला सुनिल गावसकर, दिलीप वेंगसरकर, गुंडप्पा विश्वनाथ आणि इतर बर्याच क्रिकेटपटुंमुळे भारतातील क्रिकेटने मध्यमवर्गियांच्या आयुष्यात प्रवेश केला. तोपर्यंत क्रिकेट हा खेळ तसा श्रीमंती खेळ मानला जात असे. कसोटी क्रिकेटचे सामने ५-५ दिवस चालायचे. आपली कामं सोडून ५ दिवस खेळ बघायला येणारे फक्त श्रीमंतच. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये हा खेळ आजच्या इतका प्रसिद्ध नव्हता. नवाब मन्सुर अली खान पतौडी (इतरही काही नावं असतील पण उदाहणादाखल एकच लिहीले आहे) हे नाव त्यावेळी भारतीय क्रिकेटमध्ये आदराने घेतलं जायचं. साधारणपणे ८० च्या दशकात भारतात दूरदर्शन चालू झालं आणि क्रिकेट हा खेळ दूरदर्शन पाठोपाठ घरोघरी पोहोचला. ८० च्याच दशकात क्रिकेट या खेळात "वन डे क्रिकेट" च्यारूपाने क्रांती झाली. या "वन डे क्रिकेट" मुळे क्रिकेट जगतात उलथा पालथ झाली आणि पाच दिवसांच्या तुलनेत एक दिवस खेळणं सुटसुटीत वाटल्याने सामन्यांची संख्याही वाढली, त्याला लागणारी कौशल्य कसोटी क्रिकेटपेक्षा वेगळी होती. अधिक प्रेक्षवर्ग आणि मध्यमवर्गीय आर्थिक स्तरांतून आलेले खेळाडू पाहून सामान्य जनतेला क्रिकेट आपलं वाटू लागलं.
इकडे वाढत्या प्रेक्षक संख्येने आणि उपग्रह वाहिन्यांमुळे दूरदर्शन प्रक्षेपणात झालेल्या अमूलाग्र क्रांतीने तसेच वन-डे मुळे क्रिकेट फिव्हर "इट क्रिकेट, स्लीप क्रिकेट, ड्रिंक क्रिकेट इ. इ." पासून आता हे क्रिकेट वेडाचं लोण गल्ली-बोळ आणि झोपडपट्ट्यांमध्येही पोहोचलं आहे. ग्लोबलायझेशन मुळे जाहीरात कंपन्यांचं फावलं आणि त्यांनी क्रिकेटच्या खेळाडूंसाठी मोठमोठ्या प्रमाणात अनुदानं आणि बक्षिसं द्यायला सुरूवात केली. देशातल्या चलाख राजकारण्यांनी काळाची पावलं वेळीच ओळखून बीसीसीआय सारखी खासगी संस्था उभी केली की जी आता भारतीय क्रिकेटची सर्वेसर्वा झाली आहे आणि भ्रष्टाचार-काळापैसा यांचं आगारही. पूर्वी आपल्याकडे फुटबॉलला किंवा हॉकीला अशी डिमांड असायची. अजुनही आपण बंगाल आणि ईशान्य भारतातील राज्यांत गेलो तर भर पावसात, चिखलात अनेक मुलं फुटबॉल खेळताना दिसतील.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यामुळे मिळणारे पैसे आणि त्याशिवाय युवक-युवतींकडून मिळणार्या उस्फूर्त प्रतिसादाचं ग्लॅमर अनेक तरूणांना क्रिकेटकडे आकर्षित करून घ्यायला लागलं. सगळ्यांच्या गळ्यातील ताईत सचिन तेंडूलकरचा उदयही ८० च्या दशकात शेवटी शेवटी झाला आहे. त्याच्या नंतर कित्येक आले आणि गेले, भारतीय क्रिकेट संघाने आपल्या पर्फॉर्मन्सचा लंबक नेहमीच एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत हलता ठेवला पण सचिन तेंडूलकरच्या सातत्याला सलामच ठोकायला हवा. प्रत्येक घरातील आई-वडिलांना आपला बाळ्या सचिन तेंडूलकर बनण्याची स्वप्नं पडतात आणि त्यासाठी बाळ्याने शाळेत जायला सुरूवात केली की पेन्सिलच्या ऐवजी क्रिकेटची बॅट त्याला अधिक समर्थपणे कशी पेलता येईल याकडे लक्ष पुरवलं जातं. बॉलिवुडच्या सिनेनिर्मात्यांनीही या गंगेत "लगान" द्वारे आपले हात धुऊन घेतले. याच कालावधीत पेप्सी आणि कोक यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही क्रिकेटबरोबरच आपलंही बस्तान भारतात बसवलं. कदाचित पेप्सी आणि कोकच्या बाटल्यांमुळे भारतीय तरूणांच्या भावना फक्त क्रिकेटसाठीच उचंबळतात किंवा क्रिकेटसाठी उंचबळणार्या भावनांमुळे पेप्सी, कोकलाही भारतीय तरूणांच्या मनात जागा मिळाली...असंही असेल.
संगणक आणि आंतर्जालिय क्रांतीमुळे एकूणच संपूर्ण जगाचा वेग वाढल्याने २०-२० क्रिकेटची संकल्पना आली, की ज्यामध्ये प्रत्येक संघाने प्रत्येकी २० षटकं टाकायची. तीन तासात निकाल जाहिर. हे म्हणजे क्रिकेट वेड्यांच्या देशात तीन तासाच्या बॉलीवुड सिनेमापेक्षा कमी ग्लॅमरस आणि व्यवसाय खेचणारं नव्हतं. म्हणूनच की काय विविध जाहिरात कंपन्या, भारतातील मोठमोठे इंडस्ट्रीयालीस्ट तसेच काही बॉलीवुड स्टार्स यांनी एकत्र येऊन विविध व्यावसायिक संघांची उभारणी केली आणि जगभरातील क्रिकेटपटुंना भरपूर पैसे देऊन आपल्या संघासाठी खरेदी करून त्यांची कडबोळी टीम आय पी एल सारख्या स्पर्धांत खेळवायला सुरूवात केली. गेल्या ३-४ वर्षांत आय पी ल च्या माध्यमातून या सगळ्यांनी खोर्याने पैसा मिळवला आहे. तरूणांना वेडं करणारा आणि पैशासाठी देशापेक्षा वैयक्तिक खेळ महत्त्वाचा हा मंत्र देणारा आय पी एल हंगाम म्हणजे भारतातील विविध श्रीमंत लोकांचा विविध क्रिकेटपटुंवर लावलेल्या पैशाचा जुगार. मग यात अनेकांनी आपल्या काळ्या पैशाची धवल-गंगा करण्याच्या प्रक्रियेत नाहून घेतलं. क्रिकेटमधील भ्रष्टाचाराचं दुसरं मोठं केंद्र तयार झालं. बी सी सी आय काय किंवा आय पी एल काय सगळेच एका माळेचे मणी त्यामुळे या दरोडेखोरांना बेड्या कोण घालणार? ज्यांच्या हातात सत्ता त्यांचेच प्रतिनिधी या संघटनांच्या चालक पदावर असल्याने या वळूंना वेसण घालणं अशक्य होऊन बसलंय.
दरम्यान भारताच्या राष्ट्रीय खेळाचं, हॉकीचं काय झालं? भारतीय हॉकीला आंतर्गत राजकारणाचं ग्रहण लागायला ८० च्या दशकातच सुरूवात झाली. त्याचप्रमाणे काही जाणकारांच्या मते बदलेले हॉकी चे नियम हे सुद्धा हॉकीचा पडता काळ चालू होण्याचे कारण आहे. खरं तर नियम बदलले तर नविन नियमांनुसार खेळाडूंना प्रशिक्षण मिळणं गरजेचं होतं. पण तसं झालंच नाही. हॉकी इंडियावर एकतर खेळाडू किंवा ज्यांना भारतीय राजकारणात फारशी किंमत नाही असे राजकिय नेते प्रमुख म्हणून नेमले जाऊ लागले. मग आपोआपच केंद्र सरकारकडून मिळणारं अनुदानही कमी होत गेलं. मधेच वर्तमानपत्रात बातमी वाचली की ४-५ वर्षांपूर्वी झालेल्या एका आंतर्राष्ट्रीय हॉकीच्या स्पर्धा रजिस्ट्रेशनचे काही लाख रूपये केंद्रिय क्रिडामंत्रालयाने हॉकी इंडियाला दिलेच नाहीयेत आणि एकीकडे कॉमनवेल्थ गेम ची वेल्थ कॉमनली लुटून कलमाडी सारखे तिहार मध्ये सुद्धा गेलेत. किती हा विरोधाभास.. आता याला कारण हॉकीचा कारभार सांभाळत असलेले लोक आणि त्यांचं आंतर्गत राजकारण. एकूणच यासगळ्याचा परिणाम भारतीय हॉकीच्या खेळावर आणि त्याच्या पॉप्युलॅरीटीवर झाला असण्याची शक्यता आहे. कारणं काहीही असोत पण भारतीय हॉकीला.......भारताच्या राष्ट्रीय खेळाला ग्रहण लागलंय हे नक्की. आजही अमेरिका किंवा कॅनडात बघितलं तर लोक अनुक्रमे बेसबॉल आणि आईस हॉकी साठी वेडे असतात. का? कारण ते त्यांचे राष्ट्रीय खेळ आहेत. काही जाणकारांचं असंही म्हणणं आहे की त्या खेळांच्या पॉप्युलॅरीटीशी राष्ट्रीय खेळ असण्याचा संबंधच नाही. हे फक्त मार्केटींग आणि व्यावसायिक स्वरूप याचा परिणाम आहे.
हा प्रश्न केवळ हॉकीचा नसून इतर भारतीय खेळांचाही आहे. अगदी विश्वनाथन आनंदने बुद्धीबळात सातत्यपूर्ण कामगीरी करत जगज्जेते पद गेली काही वर्षे राखले आहे तरी भारतातील क्रिकेटपटुंना जी वागणूक मिलते ती त्यालाही मिळत नाही हे खटकतंच. मधे असं वाचनात आलं होतं की भारतीय नेमबाजी स्पर्धेतील कुमारवयीन वयोगटातील खेळाडूंच्या पालकांनी जाहीरपणे ही खंत व्यक्त केली की त्यांच्या मुलांना आंतर्राष्ट्रीय स्पर्धांत भाग घेण्यासाठी केंद्रशासनाकडून काहीच अर्थसहाय्य मिळालं नाही. ते त्यांनी स्वखर्चाने केलं. पण निदान भारताचं प्रतिनीधीत्त्व करणार्या या खेळाडूंना सरावासाठी गोळ्यासुद्धा उपलब्ध करून दिल्या गेल्या नाहीत. दोनच महिन्यांपूर्वी इंदौरला क्रिकेटची आंतर्राष्ट्रीय मॅच होती त्यावेळी तिथल्या प्रेक्षागृहातील खुर्च्या साफ करण्याचं काम ३ रूपये प्रति खुर्ची या दराने इंदौरच्या राष्ट्रीय पातळीच्या फुटबॉल टीम मधील खेळाडूंनी केलं. करण त्यांच्याकडे सरावासाठी साधनं घेण्यास पुरेसे पैसे नव्हते. स्थानिक क्रिडा मंत्रालयाकडे याविषयी चौकशी केली असता कल्पना नाही, बघतो अशी उत्तरं मिळाली.
आज कालच्या तरूण रक्तांनी वेगळाच प्रश्न उपस्थित करायला सुरूवात केलीय. भारतात हॉकी फारशी खेळली जात नाही, हॉकीचे सामने झाले तरी कोणाला माहिती नसतं आणि ह्याउलट क्रिकेटसाठी सर्वदेश वेडा झालेला असतो इतका की आम्ही सचिन तेंडूलकरला क्रिकेटचा देव ही उपाधी सुद्धा देऊन टाकली आहे. मग क्रिकेटच का नाही भारताचा राष्ट्रीय खेळ नाही. हॉकीच का? प्रश्न विचार करायला लावणारा म्हणून थोडा शोध घेतला तर धक्कादायक गोष्ट समोर आली. "हॉकी या खेळात भारताला एकूण ८ सुवर्ण पदकं मिळाली आहेत. सन १९२८ ते १९५६ हा हॉकीचा सुवर्णकाळ होता की जेव्हा भारताने सातत्याने ऑलिंपिक्स मध्ये ६ सुवर्णपदकं पटकावली. या सुवर्णकाळात भारताने २४ ऑलिंपिक सामने खेळले आणि एकूण १७८ गोल्स करत (७.४३ गोल प्रत्येक सामन्यात) २४ च्या २४ सामने जिंकले. त्यानंतरची दोन सुवर्णपदकं १९६४ साली तसेच १९८० साली झालेल्या ऑलिंपिक्स मध्ये मिळवलीत. १९८० पर्यंत इतका सुंदर पर्फॉर्मन्स असताना एकदम हॉकीला काय झालं? दूरदर्शन मधील क्रांतीचा उपयोग सर्वच खेळांना व्हायला हवा होता मग तो तसा का झाला नाही? केवळ क्रिकेटच्या खेळामध्येच क्रांती का झाली (वन डे, २०-२०) आणि त्याचंच स्वरूप का बदललं गेलं? क्रिकेट हा इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ आहे. आंतरराष्टीय क्रिकेट मध्ये खेळणारे सर्वच देश हे ब्रिटीशांनी अनेक वर्षे राज्य केलेले आहेत. असं का? ऑलिंपिक्स मध्ये अजुनही क्रिकेट या खेळाचा समावेश का नाही? ऑलिंपिक्स मध्ये ज्या देशांचे सुवर्ण पदक तालिकेत वर्च्यस्व असते असे चीन, अमेरिका, जपान, कोरिया, इंडोनेशिया सारखे देश क्रिकेट मधे का नाहीत? या प्रश्नांची उत्तरं (मिळत नसल्याने) मला अधिक भंडावून सोडतात.
प्रश्न उरला क्रिकेटला भारताचा राष्टीय खेळ करण्याचा: तर भारतीय हॉकी संघांसारखी सारखी सातत्यपूर्ण सुवर्ण कामगिरी भारतीय क्रिकेटने अत्तापर्यंत कधिच केलेली नाही. अगदी मार्चच्या शेवटी विश्वचषक जिंकणारे भारतीय क्रिकेटचे विर चारच महिन्यांनंतर इंग्लंडमध्ये माती खातात. विश्वविजेत्याला साजेशी कामगिरी सोडाच पण जागतिक क्रमवारीतही सर्वच प्रकारच्या क्रिकेट मध्ये घसरण करून घेतात. यांना जगज्जेते कसं म्हणणार? बरं क्रिकेट हा खेळ १०-१२ देश खेळतात. १०-१२ देश म्हणजे संपूर्ण विश्व कसं काय होतं? मग हे विश्वविजेते कसे काय या प्रश्नाचं उत्तर (आम्ही विश्वविजेते म्हणण्यास पात्र नाही) भारतीय संघानेच आपल्या नजिकच्या कामगिरीने दिलं आहे. फक्त पॉप्युलॅरीटीच्या जोरावर एखाद्या खेळाला राष्ट्रीय खेळ कसा म्हणणार? खरं तर भारता मध्ये इतर खेळांच्या दुर्दशेला आणि क्रिकेटच्या अतिरेकाला नक्की कोण जबाबदार आहे याचा पद्धतशीर अभ्यासच व्हायला हवा. मला तर याची बिजं आंतर्गत तसेच आर्थिक राजकारण, आणि भ्र्ष्टाचाराच्या संधी यातच दिसताहेत.
काही जाणकारांच्या मते इतर खेळाच्या कारभार करणार्यांनी गचाळ कारभार ठेवला आहे. कारण काहीही असो, पण क्रिकेट शिवाय दुसरा खेळच आपल्या देशात नाही असं वाटण्या इतपत क्रिकेटचं अवाजवी महत्त्व कमी व्हायला पाहीजे. इतर खेळांमधेही तितक्याच चांगल्या संधी उपल्ब्ध होऊ शकतात फक्त तिथलं आर्थिक गणित जुळलं पाहीजे. कारण खेळ लोकांमधे पॉप्युलर असेल तर त्याला आर्थिक सहाय्य किंवा प्रायोजक वगैरे मिळणार. क्रिकेट हा खेळ लोकांमधे पॉप्युलर आहे म्हणूनच त्याला प्रायोजक आणि प्रचंड पैसा मिळतो आहे. असं काही जाणकारांचं मत आहे. काहींचं म्हणणं आहे की नविन पद्धतीच्या नियमांमुळे आपल्या खेळाडूंचा वेग आणि क्षमता कमी पडतात. याला उत्तम प्रशिक्षण हाच एक उपाय आहे. आपल्या देशात इतर खेळांनाही महत्त्व आहे हे आपणच दाखवून दिलं पाहीजे. आपल्या मातीतील बुद्धीबळ, कबड्डी या खेळांना आपणच फारसं महत्त्व देत नाही मग त्यात आपल्याकडे कौशल्य असूनही त्याचा उपयोग होत नाही. यामागे होत असलेलं राजकारण थांबवणं हाच एक उपाय आहे. हे जनतेने ठरवल्या शिवाय होणार नाही. तेव्हा भारतातील क्रिकेट सोडून इतर खेळांसाठी 'चक दे इंडिया' च घडायला पाहिजे.
शांतीसुधाजी बाळु जोशी हा
शांतीसुधाजी बाळु जोशी हा आयडीने क्रिकेटच्या प्रसारासाठी वर दिलेले कारण खोटे आहे.मुळात नेहरु-गांधी घाराण्याचा खुप मोठी चाल आहे पवारांच्या माध्यमातुन क्रिकेट पसरवण्यात.(म्हणुनच पवारांना एवडे मह्त्वाचे खाते दिले.) कारण ह्या निमिताने त्यांना नवाब अलीखन पतौदी,अझरुद्दीन्,झहीरखान अशा मुस्लिम लोकांना संघात माफ करा teamमधे स्थान देउन मुस्लिमांची मते खेचायची होती, तेच ते कॉग्रेसचे नेहमीचे मुस्लिम लांगुलचालन. पुधे जाउन त्यांनी आन्ध्रत अझरला उमेदवारी देउन हे सिध्च केले.आणि हा कट मोतीलाल नेहरुंनी इंग्रजांच्या सहकार्याने आखला होता (ही माहीती मी नेटवर वाचली होती, कपिल सिब्बलने उडवली त्यामुळे लिंक नाही)कारण मोतीलाल्ना माहीत होते आपला दिवटा खापरपणतु राहुल यास मुस्लिम मताम्शिवाय तरणोपाय नाही. हॉकीला जाणीवपुर्वक खाली खेचण्यात आले कारण इंदिरा गांधींची हत्या करनार्या शीख समाजाचे लोक हॉकीए जास्त खेळतात.
क्रिकेटचा उदय आणि हॉकीचा अस्त
क्रिकेटचा उदय आणि हॉकीचा अस्त यांचा अर्थाअर्थी संबंध नसेलही तरी सुद्धा क्रिकेटच्या खेळाडूंना मिलणारी वागनूक आणि इतर खेळाच्या अगदी जगज्जेत्यांना मिळणारी वागणूक यातील फरक खटकतोच.
फायदा कोणाचा होतो प्रायोजक कंपन्या आणि खेळाडू. हा वेडेपणा नाहीतर काय?
>> आणि हे सगळे इतर खेळांची लोकप्रियता वाढल्यावर त्यात असे होणार नाहि असे समजायचे का ? तसे वाटत असेल तर तो निव्वळ भाबडा आशावाद.
Ekhi prashnaa che uttar
Ekhi prashnaa che uttar google la na vichartaa deun daakhvaa..?
cricket chya naave galaa kadhnya aadhi dusarya khelaanchi kiti maahiti aahe baghu?
kabbdi chya team che swagat
kabbdi chya team che swagat karaaylaa kiti jan tumchya paiki gelele...?
team bharataat parat aali he tari mahit hote kaa?
ugaach aaple kahichya kahi
उदयवन, मी कित्ती कित्ती
उदयवन, मी कित्ती कित्ती गुगलून पाहिलं , पण "जपान, चिन, कोरीया या देशांचे संघ कबड्डीत ऑलिंपिक्स मधे सुवर्ण, रौप्य आणि रजत पदकाचे आलटून पालटून मानकरी असतात" ही माहिती मला मिळतच नाही आहे.
कोणीतरी विकिपिडियात १९३६ पासूनच्या ऑलिंपिकमधील कबड्डी पदक विजेत्या देशांची माहिती लिहा ना प्लीज.
हम्म, म्हणजे मी लेख लिहून मला
हम्म, म्हणजे मी लेख लिहून मला पडलेले प्रश्न उपस्थित केलेत.......मला जर त्याची उत्तरं सापडली असती तर लेखात ती लिहीणं मलाही आवडलं असतं हो. पण काय करणार नाही मिळाली म्हणून तर इतरांसाठी उत्तर शोधायला ठेवली आहेत>> न मिळालेल्या प्रश्नाची उत्तरे भंडावून कशी सोडतात ते जरा सोदाहरण स्पष्ट करा.
या असल्या काळ्या पैशामुळे आणि सवंग लोकप्रियतेमुळे क्रिकेट खेळणार्या खेळाडूंना दिले जाणारे अवास्तव महत्त्व आणि पैसा याचा परिणाम नक्कीच इतर खेळांवर आणि पर्यायाने खेळाडूंवर होतच असतो. हॉकी हा प्रातिनिधीक खेळ म्हणून नमूद केला आहे. मग यांचा संबंध नाही कसा?>>> इथे तुम्ही नक्कीच अशा शब्दप्रयोग वापरलेला आहे. म्हणजे तुम्हाला या विषयी माहिती आहे. त्यामुळे कशा पद्धतीने हा परीणाम होतो याचे प्लीज विश्लेषण द्याल का?? क्रिकेट ची लोकप्रियता ही "सवंग" आहे हे कशावरून ते ही प्लीज सांगा.
एक दुरूस्ती आय पी एल हंगामाने तरूणांना मूर्खासारखं वेडं केलं आहे असं लिहीलं आहे. आणि ते जाणून घ्यायचं असेल तर आय पी एल हंगाम चालू असताना जर विविध वाहिन्या, वृत्तपत्रं तसेच शाळा, महाविद्यालयं, कंपन्या यांमधील वातावरण पाहीलंत तर उपयोगी पडेल. >> उपयोगी पडेल काय? लाखोनी वृत्तपत्रामधल्या बातम्या/टीव्हीच्या क्लिपिंन्ग्ज्/वेबलिंक्स हे सर्व वाचलय मी. मी स्वत: आयपीएलची अधिकृत पीआरओ म्हणून तीन वर्षे काम केले आहे. अगदी आयपीएलची पहिली प्रेस कॉन्फरन्स दिल्लीत झाली तिथपासून. त्यामुळे या सर्व वातावरणाचा मी स्वत: एक भाग राहिलेली आहे. एखाद्या खेळाच्या हन्गामापुरते वातावरण उत्साही झाले तर त्यात लगेच मूर्खासारखे वेडे म्हणायची काय गरज आहे? परदेशामधे हेच वातावरण फूटबॉल अथवा इतर खेळच्या वेळेला असतेच की. त्यामधे तुम्हाला काही चूक वाटत नाही का? मग "क्रिकेट"नेच काय घोडे मारले आहे हो तुमचे???
या वर्षी वर्ल्ड कपच्या सुमारास हैद्राबाद मध्ये वर्ल्ड वाईड वेब ही इंटर्नॅशनल कॉन्फरन्स होती. अगदी सेमी फायनल ज्या दिवशी होती त्या दिवशी सगळे भरतीय कॉन्फरन्स हॉलमधे मोठा स्क्रीन लावून नाहीतर शेजारच्या फाईव्हस्टार हॉटेलमधील बार मधे बसलेले होते मॅच बघत. परदेशी पार्टीसीपंट्स क्रिकेटसाठी इतके वेडे दिसलेच नाहीत. हैद्राबादच्या माय्क्रोसॉफ्टच्या एका युनीटने कॉन्फरन्स व्हेन्यु मधील एक पूर्ण हॉल बुक केला होता. तिथे गाद्या-गिर्द्या टाकून हार्ड ड्रिंक्स, विविध खाद्य पदार्थ आणि अगदी भोपू इथपासून बैठकीची जय्यत तयारी. बाहेर रस्त्यावर गेलं तर लोक रस्त्यावर टीव्हीच्या दुकानाबाहेर गर्दी करून उभे. मॅच जिंकल्यावर तर बघायलाच नको. रस्त्यावर जाणार्या येणार्या गाड्यांचे देखिल भान नाही. हे सगळं वेड नाहीतर काय आहे? हा मूर्खासारखा वेडेपणा नाहीतर काय? कारण यात हे लोक आपल्या पदरचे पैसे खर्च करून तसेच प्रायोजक कंपन्यांची प्रॉडक्ट्स विकत घेऊन उल्लु बनायला जातात. कारण समोर चाललेला खेळ हा नक्की खरंच खेळ आहे की फिक्स्ड आहे तेच समजत नाही. यालोकांना ते समजून घेण्याची शुद्धही नसते. म्हणजे या सगळ्यात लुटले कोण जातात प्रेक्षक. फायदा कोणाचा होतो प्रायोजक कंपन्या आणि खेळाडू. हा वेडेपणा नाहीतर काय?
हे काय लिहिलय??? लुटले जाणे म्हणजे नक्की काय होते? मी टीव्हीसमोर बघून मॅच बघत असताना,सेहवागचा एखादा सिक्सर (सारखं सारखं सचिन काय वेगळं उदा. घेऊ!!!) किंवा भज्जीची एखादी विकेट मला बघायला आवडत असेल,. त्याने मला आनंद होत असेल. भारत जिंकल्यावर मला ढोल ताशे वाजवावेसे वाटत असतील तर यामधे लुटले जाणे म्हणजे काय होते?? तुम्ही सारखं सारखं "मूर्खपणा" "वेडेपणा" असे म्हणत आहात... मग हॉकीला लोकप्रियता का नाही असा प्रश्न विचारताय? उद्या हॉकी लोकप्रिय झाली तरी असा वेडेपणा येणारच. ती माणसाची स्वाभाविकता आहे.
फूटबॉल वर्ल्ड कपच्या दिवशी बाकीच्या देशामधे (जिथे फूटबॉल भयंकर लोकप्रिय आहे) तिथे काय परिस्थिती आहे याचा कल्पना आहे का तुम्हाला?
बोल्ड केलेले वाक्य फारच महत्त्वाचे आहे बरं का!!
कबड्डीमधे भारतीय संघ
कबड्डीमधे भारतीय संघ विश्वविजेता आहे तर मग ते कधीच कुणाला कसं कळलं नाही. मी मान्य करते की खेळाच्या संघांची मला काही फार माहीती नाही पण तरीही क्रिकेटमुळे इतर खेळाडूंवर अन्याय होतो हे कुणीच अमान्य करू शकत नाही. अगदी जगज्जेते असले तरी.
इथली मानसिकता पहा: कुणी सापडलं की सगळे उड्यामारून धावले टोचायला. उदा: भरत मयेकर. अतिशय आनंद झालेला दिसतोच आहे तुम्हाला कारण गेल्यावेळी सापडले नव्हते नं.
हरकत नाही......मी नक्की नसलेली माहीती वाचेन आणि मगच त्यावर अधिक भाष्य करणारा लेख लिहेन.
आणि arc, तुम्हाला काय वाटलं तुम्ही काही वाट्टेलती फूस लावाल आणि ते केवळ नेहरू-गांधी घराण्या विरूद्ध आहे म्हणून मी त्याला पाठींबा देईन. तुमच्यासारखे स्वतःच्या आयडी वरून खोट्या गोष्टी पुरवून उगाचच भांडणं लावून देण्याचा प्रयत्न करणार्या लोकांपेक्षा भरत मयेकर, बाळू जोशी या आयडीं सारखे परवडले.......निदान उघडपणे तरी स्वतःची मानसिकता दाखवतात. असो. एकूण काय तर आपल्याला फारच आनंद मिळालेला आहे. आणि मी मान्य केलेलं आहे की मी खेळा संदर्भांत अधिक माहीती नक्कीच मिळवेन. पण तरीही सत्य सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहेच.............क्रिकेटचं अवाजवी महत्त्व आनि इतर खेळांना मिळणारी वागणूक आणि हे चुकीचं आहेच.
स्वतःची चूक मान्य करायलाही गट्स लागतात आणि ते माझ्याकडे आहेत.
पराग, >>>या प्रश्नांची
पराग,
>>>या प्रश्नांची उत्तरं मला अधिक भंडावून सोडतात. >>>> इथे म्हणताय उत्तरं भंडावून सोडतात.. पुढे नंदिनीला दिलेल्या प्रतिसादात म्हणताय तुम्हांला उत्तरं माहित नाही म्हणून लेख लिहिला... माहित नसलेली उत्तर कशी काय भंडावून सोडतायत तुम्हांला?>>>
या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीयेत म्हणूनच भंडावून सोडतायत......
कोणताही आधार नसलेली विधाने
कोणताही आधार नसलेली विधाने तुम्ही बिनदिक्कत ठोकून देता आहात आणि त्या नसलेल्या आधारावर क्रिकेट बद्दल उगाच काहीही लिहिताय.
मुळात कबड्डीचा ऑलिंपिकमध्ये समावेश काय, त्याबद्दलची चर्चाही कुठे चाललेली नाही. (फारतर पदर्शनीय खेळ म्हणून पुन्हा एकदा त्याचा समावेश होईल) आणि तुम्हाला चक्क जपान, कोरिया इ. देश ऑलिंपिक कबड्डीची पदके मिळवताना दिसलेत. कबड्डीत भारतीय संघ एशियाड आणि विश्वचषक स्पर्धेत जिंकत आला तर त्यात नवल ते काय? त्यात कुणाला कळण्या न कळण्याजोगं काय आहे? कबड्डी हा खेळ भारत -पाकिस्तान सोडून अन्य कोणते देश याआधी खेळत होते?
खरे तर क्रिकेट हा गरीबांचा खेळ आहे. गल्ली बोळातही खेळता येतो, एक बॅट, एक चेंडू- अगदी रबरीही आणि चार दगड पुरतात. हॉकीसाठी प्रत्येक खेळाडूकडे स्टिक असावी लागते, सपाट मोठे मैदान लागते. बॅडमिंटन खेळायचे तर शटलकॉक्सचा पुरवठा लागतो.
चुका मान्य करायला जितके गट्स लागतात त्यापेक्षा जास्त गट्स अशा चुका करायला लागतात.
क्रिकेटमुळे इतर खेळाडूंवर
क्रिकेटमुळे इतर खेळाडूंवर अन्याय होतो हे कुणीच अमान्य करू शकत नाही. अगदी जगज्जेते असले तरी. >>> इतर खेळाडूवर अन्याय होतो.. हे मान्य. पण ते क्रिकेटमुळेच होते हे अमान्य.. हा अन्याय होऊ नये यासाठी उपाययोजना जरूर शोधाव्यात पण म्हणून क्रिकेट हा "मूर्खपणा" आहे असे समजू नये. तो पण एक खेळ आहे. आणि चांगला खेळ आहे. त्याला अवाजवी महत्त्व मिळतय हे तुमचे मत व्यक्तीसापेक्ष असू शकते.
अता तुम्ही अभ्यास करेन असं म्हणताय म्हणून हे काही मुद्दे माहितीसाठी.
मुळात क्रिकेट लोकप्रिय करणारी संस्था (बीसीसीआय) ही एक प्रायव्हेट संस्था आहे. जास्तीत जास्त फायदा हे त्यांचे तत्त्व आहे. इतर खेळासाठी अशी प्रायव्हेट संस्था नाही. ती निर्माण का झाली नाहीत याचा जरूर शोध घ्या.
क्रिकेट न खेळणार्या देशामधे क्रिकेट लोकप्रिय होण्यासाठी आयसीसीने काही स्ट्रॅटजी आखल्या आहेत, त्यांचा जरूर अभ्यास करा. अशा प्रकारे मार्केटिन्ग करून भारतात इतर खेळ लोकप्रिय करता येतील का याचा विचार करा.
प्रायोजक कंपन्या क्रिकेटमधे करोडो रूपये घालण्यासाठी का उत्सुक असतात? त्याना त्यामधून नक्की काय फायदा होतो? आयपीएलचे पहिल्या वर्षी अॅड रेट्स काय होते. २०११ मधे हेच रेट्स काय होते ते वाचा.
पिंक न्युजपेपर्समधे (ईटी/बीएस/एफ्टी/मिंट/एफ ई) मधे स्पोर्ट्स ब्रँडिंग नावाचा एक बीट असतो. त्या बीटच्या बातम्या कायम वाचत राहा. जागतिक पातळीवर देखील या बीटमधे नक्की काय चालले आहे ते जरूर बघा.
तुम्हाला ज्या प्रश्नाच्या उत्तरानी ऑलरेडी भंडावून सोडलय, कदचित त्यानी उत्तरे मिळून जातील.
@ shanti...mi vicharlelya
@ shanti...mi vicharlelya prashnan chi uttare maahit aahe kaa?
nasatil tar haa bb band karaa...pls
swathala kahi hi mahit nahi aani dusarya var tikaa karataat...
SUSHMA SWARAAJ ANNI DIGGI DOGHE EKSAATH MAANGUTI VAR BASALET KAA TUMCHYA ?
udayone , आपण माझा प्रतिसाद
udayone , आपण माझा प्रतिसाद वाचलेला दिसत नाही. असो.
बीबी बंद कसा करायचा असतो? म्हणजे तशी सोय लेखकाला आहे का? का प्रतिक्रीया देणं बंद करायचं? तशी मी प्रतिक्रीया द्यायची नाही असंच ठरवलं होतं पण नंदिनींचा प्रतिसाद हा सकारात्मक आहे. तुमचा जरी तिरका असला तरी मला पळून जाण्याची सवय नाही. म्हणून हे उत्तर. यापुढे या बीबी वर मी तरी प्रतिसाद लिहीणार नाहीये कारण लिहीण्यासारखं माझ्याकडे तरी काही नाहीये.
नंदिनी, धन्यवाद. मी नक्की याविषयी माहीती घेईन पण सगळ्याच गोष्टी एकाचवेळी माहीती करून घेणं शक्य नसतं त्यामुळे याविषयातील कोणी तज्ज्ञ व्यक्ती असतील तर किंवा तुम्हाला बरीच माहीती आहे तर तुम्ही सुद्धा यावर एक लेख का लिहीत नाही. म्हणजे आम्हाला माहीती मिळेल. कारण तातडीने इतकी माहीती शोधणं अवघड आहे पार्टली खेळ हा माझा विषय नाहीये किंवा अगदी मार्केटींग सुद्धा. पण तुम्ही जर स्पेस्फिक लिंक्स दिल्यात तर बरं होईल.
भारतात क्रिकेट व इतर खेळातील
भारतात क्रिकेट व इतर खेळातील मुख्य तफावत ही मुख्यतः त्या त्या खेळासाठी संघटन कसे आहे यामुळे आहे. अगदी ८० च्या पूर्वी सुद्धा (जेंव्हा क्रिकेटर्सना सुद्धा आताच्या इतर खेळांप्रमाणेच हौशी कलाकारा सारखे पैसे मिळत तेंव्हा) अगदी प्रायमरी शाळे च्या ज्युनियर टीम पासून ते रणजी पर्यंत अत्यंत सुव्यवस्थित प्रत्येक वयोगटात असलेल्या स्पर्धा व त्यायोगे मिळणारे प्रशिक्षण यामुळे क्रिकेट हा खेळ भारतात लोकप्रिय आहे. याचा मार्केटिंगशी संबंध नाही. वसंत रांजणे या परवा कालवश झालेल्या सत्तरीतील खेळाडूची काय दयनीय अवस्था होती हे आपण वाचलेच असेल. पण त्यांच्या काळात सुद्धा क्रिकेट शहरांमध्ये तळागाळात रुजलेला होता. दूर दर्शन मुळे तो खेड्या पाड्यात गेला येवढच. (म्हणून मुंबईचे खेळाडू कमी होऊन झारखंडचे यायला लागले. धोनी हा क्रिकेट खेळाडू भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार असून झारखंडचा आहे - ही आपल्या साठी अधिक माहिती. ).
माझे वडिल ज्या टुर्नांमेंट खेळले , त्याच मीही खेळलो व माझा मुलगाही.
हेच क्रिकेटच्या लोकप्रियतेचे गमक आहे.
दुसरा मुख्य फरक म्हणजे क्रिकेट कुठल्याही बाबतीत सरकारवर अवलंबून नाही. उलट कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न सरकारलाच मिळते आणि बीसीसीआय इतर खेळांना मदत सुद्धा करते.
यात अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गुळाची गोडी ही त्याची स्वतःची असते, मुंगळ्यांमुळे आलेली नसते. उलट त्या गोडीमुळे मुंगळे गुळाला चिकटतात. (पण गाढवे मात्र नाही. दिवे पण)
क्रिकेटच्या संघटनात्मक दृष्टिने थोडाफार जवळ जाणारा फक्त बुद्धिबळ हाच खेळ मला दिसतो, आणि त्यात आपली बर्यापैकी जागतीक स्तरावर दखल घेतली जाते हल्ली हा योगायोग नक्कीच नाही.
टेनिस, बॅडबिंटन आणि इतर काही खेळात संघटनात्मक गोष्टींचे महत्व पटल्याने आता खूप सुधारणा आहे. भारतात फूटबॉल प्रिमियर लिग हळूहळू लोकप्रिय होत आहे आणि मला नक्की खात्री आहे येत्या १० वर्षात भारतात फूटबॉल क्रिकेट इतकाच लोकप्रिय होउन आपला जागतिक स्तरही ५० च्या आत जाइल.
@shanti...jar aaplyala etar
@shanti...jar aaplyala etar khelaan madhil kahich mabiti naahi..mag..ugach cricket la virodh kaa?
varil sarv prashnanchi uttar re mahit aahet mala...mi swatha DD Sports var he khel paahato...tumhi kiti vela te channel lavale aahe....aadhi tya khelanna baghaa..support karaa....mag bola...
aapanch he khel channle var baghayche naahi..mag sponcers nahi milat mhanun gala kadhaycha..? je jast baghitale jaayil tyala jaast praayojak milanaar...he saadhe ganit tumhalaa kalaalele naahi aahe
.....
नंदिनी +१०००
नंदिनी +१०००
udayone, मला कोणत्याच
udayone, मला कोणत्याच खेळाबद्धल काहीच माहीती नाही असं नाहीये. पण तुमच्या इतकी तपशीलात नाही हे मात्रं खरंय. माझ्या घरी टीव्ही नाहीये त्यामुळे कुठलाच चॅनल आणि कितीवेळ बघण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्हाला उत्तरं माहीती आहेत तर तुम्हीच का नाही एखादा लेख लिहीत आणि सर्व मुद्द्यांवर प्रकाश टाकत? आता या सुचवण्यामागे सुद्धा माझी चूकच दिसत असेल तर सॉरी.
खरंतर डीस्ट्रक्टीव्ह प्रतिसादांपेक्षा कंन्स्ट्रक्टीव्ह प्रतिसादांची गरज अधिक असते. पण माबोवर आधी डिस्ट्रक्टीव्हची चलती आहे. असो. आपला माहीतीपूर्ण लेख वाचायची इच्छा आहे.
लावून देण्याचा प्रयत्न
लावून देण्याचा प्रयत्न करणार्या लोकांपेक्षा भरत मयेकर, बाळू जोशी या आयडीं सारखे परवडले.......निदान उघडपणे तरी स्वतःची मानसिकता दाखवतात. असो.>>>>>
आमची म्हणजे माझी मानसिकता स्पष्ट आहे. कोणत्याही विषयावर सुरु झालेली चर्चा (हॉकीचा चेन्डू जसा खेळाडू कोणीकडूनही कोणीकडेही नेऊन जसा सुव्यवस्थितपणे गोलपोस्ट कडे नेतात ,पुन्हा हॉकी :))तशी ही चर्चा काँग्रेस ,गांधी , नेहरू ,सोनिया
राहुल गांधी इकडे फाफलवत न्यायची .त्याला काऊन्टर बॅलन्स म्हणून बोस, सावरकर आणून उभे करायचे हा उद्योग इथला एक विशिष्ट गट जाणीवपूर्वक करीत आहे. त्यात कसाब आणि अफजल गुरुच्या फाशीचा विषयची फोडणी चवीसाठी द्यायची आवर्जून. ८० टक्के इथल्या येणारांना फारसे त्याचे सोयर्सुतक नसतेही . हिटलरच्या राजवटीला कंटाळून जसे ज्यू परागंदा झाले तसे गांधी नेहरू इंदिरा, राजीव सोनिया राहुल यांच्या राजवटीला कंटाळून परदेशी परागंदा झालेल्याना इथल्या इश्यूत काही एक रस नाही. उरलेल्यांचा बुद्धिभेद करू पाहण्याचा हा प्रयत्न , वातेल ती चुकीची माहिती इथल्या उच्च शिक्षीत प्रजेच्या गळी मारण्याचे प्रचारी तत्वज्ञान हाणून पाडण्याची आमची मानसिकता आहे आणि ती स्पष्टआहे.आम्ही काही काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांच्या प्रचाराचा मक्ता घेतलेला नाही. त्यांच्याबद्दल आम्हाला फार प्रेम आहे असेही नाही पण त्यांचे काहीच श्रेय त्यांना द्यायचे नाही हा कृतघ्नपणा आहे. मग १९४७ पासून आजतागायत सत्ताधार्यांनी देशविघातक आणि देशद्रोही कारवायाच केल्या का? केल्या असतील तर हा देश चालला कसा ? त्याचे पाकसारखे तुकडे का नाही झाले? उलट तो अधिक मजबूत होत महासत्ता होण्याची निदान स्वप्ने तरी पाहतोय . हे देशद्रोह्यांकडून झाले असते काय ? चार निर्णय चुकले असतील तर त्यात एरर ऑफ जजमेन्ट होऊ शकत नाही काय? काही लोक स्वातंत्र्यलड्यात सामील झाले नाहीत त्यांचा एरर ऑफ जजमेन्टची कबुली खाजगीत होत नाही का? ज्योती बसूंना पन्तप्रधान व्हायला परवानगी नाकारणारा कम्युनिस्टांचा पॉलीटब्युरो आज डोके आपटून घेतोच आहे ...
आमची मानसिकता स्पष्ट आहे,त्यासाठी आम्हाला तेंडुलकर, भारतरत्न असे नथीतून तीर मारण्याची गरज वाटत नाही.
ही विषवल्ली प्रिन्ट आणि इलेक्ट्रॉनिक मेडियात पसरवण्याचेही प्रयत्न चालूच असतात. पण तिथे मालक लगाम घालीत असल्याने मर्यादा येतात एवढेच. इथे वेबमास्तर व प्रशासक यांच्या सहिश्णुतेचा गैरफायदा घेतला जातो एवढेच.....
मला क्रिकेटबद्दल माहिती नाही,
मला क्रिकेटबद्दल माहिती नाही, हॉकी या भारताच्या राष्ट्रीय खेळाबद्दल माहिती नाही, कबड्डी या भारतीय मातीतल्या खेळाबद्दल माहिती नाही, तरीही ".............क्रिकेटचं अवाजवी महत्त्व आनि इतर खेळांना मिळणारी वागणूक आणि हे चुकीचं आहेच."" असा निष्कर्ष मी काढणारच.
क्रिकेटबद्दल निष्कर्ष काढून झाला की मायबोलीवर डिस्ट्रक्टिव्ह प्रतिसादांची चलती आहे असाही निष्कर्ष काढणार.
नंदिनी, या महाभारतामुळे आयपीएलबद्दल पुन्हा एकदा विचार केला आणि लक्षात आले की ज्यांना भारताच्या राष्ट्रीय संघातून खेळण्याची संधी कधी मिळालीच नसती (त्यांच्यातील गुणवत्तेच्या अभावामुळे नव्हे, तर मोठ्या संख्येमुळे) अशा असंख्य खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसोबत, आंतरराष्ट्रीय सामन्याचा माहौल अनुभवत खेळता आले. तसेच न्युझीलंड, वेस्ट इंडिज यासारख्या देशांतल्या क्रिकेटपटूंना (ज्यांना इतर देशांसारखा पैसा मिळत नाही) पैसाही कमवता आला.
मी नक्की याविषयी माहीती घेईन
मी नक्की याविषयी माहीती घेईन पण सगळ्याच गोष्टी एकाचवेळी माहीती करून घेणं शक्य नसतं त्यामुळे याविषयातील कोणी तज्ज्ञ व्यक्ती असतील तर किंवा तुम्हाला बरीच माहीती आहे तर तुम्ही सुद्धा यावर एक लेख का लिहीत नाही. म्हणजे आम्हाला माहीती मिळेल. कारण तातडीने इतकी माहीती शोधणं अवघड आहे पार्टली खेळ हा माझा विषय नाहीये किंवा अगदी मार्केटींग सुद्धा. पण तुम्ही जर स्पेस्फिक लिंक्स दिल्यात तर बरं होईल.>>
शांतीसुधा, लेख वगैरे लिहिण्याइतकी माहिती माझ्याजवळ नाही. जी माहिती मी देऊ शकते ती ऑलरेडी मीडीयामुळे सर्वाना माहीत आहे. जी माहिती मीडीयामधे नाही, ती देण्यासाठी माझ्यावर कायदेशीर बंधने आहेत. त्यामुळे मी शक्यतो या विषयावर लिहत नाही. तुम्हाला स्पेसिफिक लिंक्स म्हणजे नक्की काय देऊ?
http://www.iplt20.com/ इथे आयपीएल विषयी पूर्ण माहिती आहे. न्युज सेक्शनमधे सर्व प्रेस रीलीज आहेत. त्याव्यतिरिक्त सर्च केल्यास आयपीएल विषयी बर्याच बातम्या मिळतील.
मागे एका तुमच्या बीबीवर हा सल्ला मी तुम्हाला दिला होता, परत देतेय. नक्की काय लिहायचे आहे ते ठरवा. त्यानुसारच लिहा. तुम्ही सर्वात आधी कुठलाही लेख का लिहत आहात हा प्रश्न स्वतःला २५ वेळा विचारा. त्यानंतर जे उत्तर असेल त्यानुसार मुद्दे ठरवा. उदा. तुमचा मुद्दा जर क्रिकेटला दिले जाणारे अवास्तव महत्त्व असा असेल तर उगाच दुसर्या खेळाना त्यामधे आणू नका. तुमचा पूर्ण लेख क्रिकेट आणि क्रिकेटबद्दलच बोलणारा असला पाहिजे. आर्थात अवास्तव महत्त्व दिले जात असेल तर ते का दिले जाते याचा विचार करताना ह्युमन इंटरेस्ट फॅक्ट्स (क्रिकेटवेडी मुले अथवा क्रिकेटमधे फेल झाल्याने आलेले नैराश्य यासारखी उदाहरणे. ) त्याशिवाय योग्य ती आकडेवारी (क्रिकेटची व्ह्युअरशिप्/इतर कार्यक्रमाची व्ह्युअरशिप याची तुलना क्रिकेटवर खर्च केला जाणारा पैसा, खेळाडूचे मॉडेलिंग) दिली गेली पाहिजे. स्वतःला आलेले वैयक्तिक अनुभवाना सार्वत्रिक असल्याचा दावा करू नका. (माबोच्या बर्ञाच लेखामधे हल्ली हे आढळते.)
पूर्ण लेख झाल्यावर वाचून बघा. एक वाचक म्हणून त्याचा तुमच्यावर काय परिणाम होतो ते बघा. आवश्यक ते बदल कर आणि मग लेख प्रकाशित करा. आणिनंतर होणार्या सर्व प्रकारच्या प्रतिसादाना तयार रहा. एखाद्या खोडसाळ प्रतिसादाला वाटले तर उत्तर द्या, नाहीतरे देऊ नका. मात्र तुमच्या लेखातून चुकीचीमाहिती अथवा चुकीचे तपशील मिळणार नाहीत याची दक्षता घ्या.
हा माझा आजच फू.स.
नन्दिनी अजेन्डा वेगळा आहे .
नन्दिनी अजेन्डा वेगळा आहे . क्रिकेट्/हॉकी निमित्तापुरते आहे. इसका मतलब है 'लिफाफा कुछ और है और मजमून कुछ और !'
बाजो. जो काही अजेन्डा आहे तो
बाजो. जो काही अजेन्डा आहे तो घेऊनच लेख लिहा असा सल्ला. त्यानिमित्ताने माझी फीचर रायटिंगच्या नोट्सची उजळणी झाली.
नंदिनीच्या क्रिकेटच्या
नंदिनीच्या क्रिकेटच्या पोस्टला अनुमोदन.
अजून एक मुद्दा क्रिकेटमधला पैसा BCCI च्या बर्या वाईट प्रयत्नांमूळे आला. इतर खेळांच्या administration ला हे करता आले नाहि. त्यामूळे त्याचा दोष क्रिकेटच्या माथ्यावर नको.
इतर बाफांवर लिहिलेले परत लिहितो, तुम्ही ज्या ग्रुहितकांवार आधारीत छातीठोक निश्कर्ष मांडलेत ती चुकीची आहेत (त्याबद्दल तुम्हाला पुरेशी माहिती नाहि हे तुम्ही जवळजवळ प्रत्येक प्रतिसादामधे कोणालाकोणाला तरी उद्देशून लिहिलेय) हे मान्य केल्यावर, निश्कर्ष बरोबरच आहेत हे कसे पटणार ? तुम्ही तुमचा लेख परत संपादीत करून चूकीचा किंवा तुम्हाला माहित नसलेला भाग काढून relevant भाग लिहिलात तर योग्य ठरेल.
जगातला सगळ्यात लोकप्रिय
जगातला सगळ्यात लोकप्रिय सांघिक खेळ सॉकर / फुटबॉल ठरेल. त्यातही प्रचंड पैसा आहे. कारण त्या खेळाला लोकप्रियता आहे. (http://www.mostpopularsports.net/)
भारतापुरतं बोलायचं झालं तर राजेमहाराजांच्या काळी धनुर्विद्येला महत्त्व होतं, नंतर मल्लयुध्द (कुस्ती) वगैरे खेळही टॉपवर होते. हॉकीतही भारतानं नाव कमावलं होतं. आता क्रिकेट जर सर्वसामान्यांना आवडतोय तर त्यात पैसा येणारच. शिवाय क्रिकेटमधले अनेक दिग्गज भारतानं दिलेत, त्यामुळे इथे हा खेळ आणखीनच लोकप्रिय झाला. निदान जगात नाव होईल असा एखादा खेळ भारतात आहे याचं कौतुक करायला हवं. बाकीच्या खेळांकरता जरूर प्रोत्साहन द्यावे, आणि सरकार ते देतेही. या खेळांकरता मिळणारा सरकारी पैसा जर योग्य प्रकारे वापरला जात नसेल तर तो आपला करंटेपणा आहे. पण याकरता क्रिकेटवर टिका करून फायदा नाही.
लवकर क्रिकेटचं अजीर्ण होऊन त्याची लोकप्रियताही उतरणीस लागू शकते, कोणी सांगावे.
********************************************
"पैसे से दुनिया चलती है बाबा, ये ही सृष्टी का नियम है!"
असामी, आपल्या सूचनेनूसार मूळ
असामी, आपल्या सूचनेनूसार मूळ लेखात बदल केले आहेत. जिथे प्रतिक्रीयेत चूक होती तेथेही ते नमूद करून काढून टाकले आहे. धन्यवाद.
१९८० पर्यंत इतका सुंदर
१९८० पर्यंत इतका सुंदर पर्फॉर्मन्स असताना एकदम हॉकीला काय झालं?
>> काल दिलेल्या लिंकमधे ह्याचा गोषवारा घेतलाय तो वाचलात का ?
दूरदर्शन मधील क्रांतीचा उपयोग सर्वच खेळांना व्हायला हवा होता मग तो तसा का झाला नाही? केवळ क्रिकेटच्या खेळामध्येच क्रांती का झाली (वन डे, २०-२०) आणि त्याचंच स्वरूप का बदललं गेलं?
>> Credit goes to shrewdness of Mr Dalmiya and Bindra. why others could not replicate it ? Well there is no real answer to that. maybe they weren't smart enough to recognize these opportunities. त्याचा दोष ज्यांनी फायदा घेतला त्यांना कसा देता येईल ?
क्रिकेट हा इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ आहे. आंतरराष्टीय क्रिकेट मध्ये खेळणारे सर्वच देश हे ब्रिटीशांनी अनेक वर्षे राज्य केलेले आहेत. असं का?
>> हा प्रश्नच नीट समजला नाहि ? त्यआंनी राज्य केले म्हणून त्यांनी ऐत्त देशीयांना त्यांचा खेळ शिकवला. जसे त्यांनी त्यांची राज्यसत्ताक पद्धती, दळणवळण, पोस्ट सेवा इत्यादी आणले तसेच हे. त्यांनी कब्बडी शिकायला हवे होते असा तुमचा आग्रह तर नाहि ना ?
ऑलिंपिक्स मध्ये अजुनही क्रिकेट या खेळाचा समावेश का नाही?
>> ICC त्यासाठीही प्रयत्न करतेय. मूळात Test / ODI ह्यआंचे format ऑलिंपिक्स साठी योग्य नाहित. T-20 कदाचित येऊ शकेल. टेबल टेनिस नि टेनिससारखे खेळसुद्धा मधे नव्हते.
ऑलिंपिक्स मध्ये ज्या देशांचे सुवर्ण पदक तालिकेत वर्च्यस्व असते असे चीन, अमेरिका, जपान, कोरिया, इंडोनेशिया सारखे देश क्रिकेट मधे का नाहीत? या प्रश्नांची उत्तरं (मिळत नसल्याने) मला अधिक भंडावून सोडतात.
>> प्रत्येक खेळ प्रत्येक देशात खेळलाच पाहिजे हा अट्टाहास का ? अमेरिकेतले पॉप्युलर असे american football, lacrosse, softball हे किती देशात खेळले जातात ? रग्बीसारखा युरोप, SA, Aus, NZ मधे लोकप्रिय खेळ किती ठिकाणी खेळला जातो ? अमेरिका ICC World Cup associates मधे आहे.
काही जाणकारांच्या मते इतर खेळाच्या कारभार करणार्यांनी गचाळ कारभार ठेवला आहे. कारण काहीही असो, पण क्रिकेट शिवाय दुसरा खेळच आपल्या देशात नाही असं वाटण्या इतपत क्रिकेटचं अवाजवी महत्त्व कमी व्हायला पाहीजे. .....तेव्हा भारतातील क्रिकेट सोडून इतर खेळांसाठी 'चक दे इंडिया' च घडायला पाहिजे.
>> म्हणजे नक्की काय करायचे ? एखादा कायदा काढायचा ? क्रिकेट follow करणार्यांनी तसे करणे सोडून द्यायचे ? इतर खेळ कूठले बघायचे हे कोण ठरवणार ? आणि का ? मला विठी-दांडू नि लगोरी खेळायला अतिशय आवडते नि सर्वांनी तेच बघावे असा माझा आग्रह आहे हे कितपत पटेल ? मूळात एक खेळ खाली आणून दुसरा वर चढेल हे ग्रुहितक चूकीचे आहे. जो खेळ लोकांना आवडतो तो ते खेळणार नि follow करणार. त्याला पद्धतशीरपणे प्रमोट केले असेल हे शक्य आहे, पण इतरही तसे करु शकतात. No one is stopping them.
मला तेच तेच लिहून कंटाळा आलाय.
अनेक वर्षं बर्याच खेळांच्या
अनेक वर्षं बर्याच खेळांच्या लोकप्रियतेचे चढ-उतार जवळून पाहिल्यावर मी काढलेले निष्कर्ष -
१] कोणत्याही खेळाला पैसा व माध्यमं शिखरावर नेऊं शकत नाहीत; [ मध्यंतरी स्थानिक व आंतरराष्ट्रीय टेनिसवर माध्यमानी इतकं लक्ष केंद्रीत केलं होतं पण तात्पुरता 'टाईमपास' याउपर खर्या अर्थाने तो खेळ लोकप्रिय झाला का ? ]उलट, जो खेळ लोकप्रिय होतो आहे असं वाटतं तिकडेच पैसा व माध्यमं आकर्षित होतात. नंतरची शिखराकडची चढाई कदाचित खेळ व पैसा/माध्यमं हातात हात घालून करतही असतील [ इथल्या क्रिकेटप्रमाणे ] पण मूळ प्रेरणा पैसा व माध्यमं नसतातच;
२]कोणत्या देशात, प्रदेशात कोणता खेळ केंव्हा लोकप्रिय होईल याचे कांहीही ठोकताळे मांडता येत नाहीत; पण, एका खेळाची लोकप्रियता दुसर्या खेळाला मारक होते, या म्हणण्यात कांहीच तथ्य नाही; प्रत्येक खेळाच्या लोकप्रियतेच्या चढ-उताराचीं कारणं वेगवेगळीं असतात. दोन कारणं प्रमुख असण्याची शक्यता मात्र असते - १] आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले विजय व २] त्या खेळाचं पद्धतशीर व्यवस्थापन. या दोन्हीच्या अभावामुळे भारतीय हॉकीची लोकप्रियता कमी होत गेली. उलटपक्षीं, ऑस्ट्रेलियात चार्ल्सवर्थ या अत्यंत प्रतिभाशाली खेळाडूने व कप्तानाने पद्धतशीरपणे व अभ्यासपूर्वक स्वतःच्या देशाला सोईस्कर अशी हॉकीची शैली विकसित केली व हॉकीच्या व्यवस्थापनात सुसूत्रता आणून आपल्या देशाला त्या खेळात अग्रस्थानी नेलं [ ऑस्ट्रेलियात क्रिकेट लोकप्रियतेच्या शिखरावर व हॉकी नगण्य असतानाही चार्ल्सवर्थने क्रिकेटमधे करिअर करायची सुवर्णसंधि असूनही हॉकी निवडलं होतं ]; भारतीय क्रिकेटची प्रगति व वाढती लोकप्रियता ही देखील मुख्यतः नेमकी याच दोन कारणांमुळे आहे;
३] मैदानी सांघिक खेळांची भव्य लोकप्रियता इतर खेळाना मिळावी ही अपेक्षाच चुकीची आहे; विश्वनाथन आंनंद अभिमानास्पद विश्वविजेता असला तरीही !!
४] ज्या क्रिकेटच्या व क्रिकेटर्सच्या वैभवाबद्दल इतकं इतर खेळांशी तुलना करून बोललं जातं, तो खेळही कित्येक दशकं 'गरिबा'वस्थेत राहूनच वर आलाय, याचंही भान ठेवणं आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय किर्तिचे क्रिकेटपटू रेल्वेच्या दुसर्या वर्गात प्रवास करताना पहाणं ही फार प्राचिनकाळची गोष्ट नव्हे.
[ मी क्रिकेट व हॉकी या दोन्ही खेळांचा वेडा आहे; दिल्लीचं एशियाड व मुंबईचा १९८२ चा हॉ़की विश्वचषक
मी सुट्टी घेऊन पाहिलाच पण आगाखान, सुवर्णचषक सामनेही मी नियमितपणे पहात असे. कांही हॉकीपटूंबरोबर याबाबतीत चर्चा करायची संधिही नला मिळाली.उगीच, क्रिकेट्चा मी पक्षपाती आहे, असं वाटू नये म्हणून हे स्पष्टीकरण ]
एकनाथ सोलकर निवृत्त झाला
एकनाथ सोलकर निवृत्त झाला तेव्हा त्याचे कसोटीचे मानधन दर दिवशीचे ७५० रु. होते
काय त्याने भविषसाठी बचत करावी?
<< एकनाथ सोलकर निवृत्त झाला
<< एकनाथ सोलकर निवृत्त झाला तेव्हा त्याचे कसोटीचे मानधन दर दिवशीचे ७५० रु. होते >> कसोटी अंपायर रुबेन मला म्हणाले होते कीं सुरवातीला कसोटीत अंपायरींगचे दिवसाला फक्त रु.१००/ मिळत. सामना तीन दिवसात संपला तर रु.३००/च फक्त !!!
लेखिकेची राजकीय मते व त्या
लेखिकेची राजकीय मते व त्या विरोधी मते असणारांचे प्रतिसाद यांना जरा बाजुला ठेउन मला इथे प्रसारमाध्यमांच्या भूमिके बद्द्ल लिहावस वाटतं. स्पोर्ट स् कव्हरेज मधे तुम्हाला फारच क्वचित अन्य खेळांबद्दल च्या बातम्या पहायला मिळतात. टीआरपी चा बहाणा पुढे करुन हे लोक आपले काम नीट करत नाहीत पाट्या टाकतात. तेच तुम्ही बीबीसीच व अन्य परदेशी वाहिन्यांच स्पोर्ट स् कव्हरेज पहा तिथे जरी फुटबॉल ला झुकते माप असल तरी अन्य खेळांची आपल्या वाहिन्या करतात तशी घोर उपेक्षा नसते. आपल्या कडे तर भारत पाक सारखा हॉकी सामना जिंकला तरी बातमी जेमतेम दाखवतात विशेषज्ञांची टीकाटिप्पणी तर दूर झालेले गोल ही नीट दाखवत नाहीत रिप्ले दाखवत नाहीत. विश्वनाथन आनंद मोठा सामना जिंकतो तेव्हा त्या सामन्याचे वर्णन त्याचे व प्रतिस्पर्धी चे डावपेच गुणदोष या बद्द् ल कधी पाहिलय ? लोकाना बघायलाच मिळाल नाही तर रस यावा कसा? आज भारताच्या हॉकीटीम मधले खेळाडू जाउदे कप्तान कोण आहे सांगता येइल? मलाही माहित नाही. जुन्या काळात वि वि करमरकर दूरदर्शन वर क्रीडांगण हा कार्यक्र्म सादर करत तो हजार पटींनी बरा म्हणावा अशी परिस्थिती आहे .
श्रीकांत, आपल्या संपूर्ण
श्रीकांत, आपल्या संपूर्ण प्रतिसादालाच १००% अनुमोदन आहे.
>>>आपल्या कडे तर भारत पाक सारखा हॉकी सामना जिंकला तरी बातमी जेमतेम दाखवतात विशेषज्ञांची टीकाटिप्पणी तर दूर झालेले गोल ही नीट दाखवत नाहीत रिप्ले दाखवत नाहीत. विश्वनाथन आनंद मोठा सामना जिंकतो तेव्हा त्या सामन्याचे वर्णन त्याचे व प्रतिस्पर्धी चे डावपेच गुणदोष या बद्द् ल कधी पाहिलय ? लोकाना बघायलाच मिळाल नाही तर रस यावा कसा? आज भारताच्या हॉकीटीम मधले खेळाडू जाउदे कप्तान कोण आहे सांगता येइल?>>> विशेष.
Pages