सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
शशांकजी... मस्तं कल्पना...
शशांकजी... मस्तं कल्पना...
अजुन कोण कोण पुण्यात आहे ते समजलं तर सगळ्या निसर्गप्रेमींची भेट पण होऊ शकेल
शशांक मस्त आहे कल्पना . मी
शशांक मस्त आहे कल्पना . मी थोडीफार सुरुवात केली होती पण मला खुप कमी झाडे ओळखता येतात त्यामुळे खुप छोटी आहे लिस्ट. त्यात मी नाव आणि मी कुठे बघितले अशी लिस्ट बनवली होती. आणि ज्याचे नाव माहित नाही अश्या झाडाचे वर्णन आणि कुठे बघितले अशी एक लिस्ट होती. दुसरी लिस्ट ईतकी वाढायला लागली मग मी कंटाळुन तो नाद सोडुन दिला. बघु आता पुन्हा पाहते आठवुन. ईथेच करायची आहे यादी का अजुन कुठे?
शांकली तशीच पाने हजारी
शांकली तशीच पाने हजारी मोगर्याची आणि बेशरमच्या झाडाची पण असतात.
अवनी माझ्या माहेरी पांढरा तामण होता.
हो आ॑र्या, तेच झाड ते. शशांक
हो आ॑र्या, तेच झाड ते.
शशांक छान कल्पना आहे. मुंबईतील राणीच्या बागेतील झाडांची अशी यादी नेटवर
आहे. तिचा मला छान उपयोग झाला होता.
शहरातील झाडे तशी सुटीसुटी असल्याने, नेमका पत्ता सांगता येतो (जसे तूम्ही दोघे लिहितच असता.)
मी_आर्या - या
मी_आर्या - या इन्स्टिट्यूटचे नाव पत्ता कळू शकेल का जिथे ही रंग बदलणारी जास्वंद आहे ? नि प्रेमींना जाऊन बघता येइल का ?
त्या रंग बदलणार्या
त्या रंग बदलणार्या जास्वंदीला आमच्याइथे बेशरम हे नाव आहे. हल्ली आमच्याइथे पण फारशी दिसत नाही. त्याची फांदी लगेच जगते. आता मिळाली तर लावतेच.
शांकली मस्त फोटो. शशांक
शांकली
मस्त फोटो.
शशांक चांगली कल्पना आहे. पण आम्हाला फार थोडीच झाडं ओळखता येतात.
आमची आयुर्विमा सल्लागार नयना,
आमची आयुर्विमा सल्लागार नयना, हिने रणकपूरला टिपलेली एक अप्रतिम छबी.
.
.
सही फोटो.
सही फोटो.
माझी सध्या निसर्गाच्या
माझी सध्या निसर्गाच्या गप्पांच्या पानावर साप्ताहिक फेरी झालीय
शशांक, मस्त कल्पना. पहिला नंबर माझा कुठे एकत्र करू या ही माहिती?
खूप दिवसांपासून या कदंबाविषयी सगळ्यांना सांगायचंय. कोथरूडला आयडियल कॉलनी ग्राऊंडच्या अग्नेय कोपर्याला रस्त्याच्या पलिकडे कदंबाचं झाड आहे. पावसाळ्यात याचे चेंडू आवर्जून बघण्यासारखे. नेहेमी रस्त्याने जातानाच बघते, त्यामुळे माझ्याजवळ फोटो नाही. या पावसाळ्यात काढीन.
दिनेशदा मस्त फोटो!
दिनेशदा मस्त फोटो!
मस्त फोटो दिनेश, खंड्या आहेना
मस्त फोटो दिनेश, खंड्या आहेना तो?
दिनेशदा, अप्रतिम फोटो. हे
दिनेशदा, अप्रतिम फोटो. हे रणकपूर कुठे आहे? (माझा भूगोल सॉल्लीड कच्चा आहे हं त्यामुळे मी काही पण विचारतेय असे वाटण्याची शक्यता आहे.)
गौरी, कदंबाचे नक्की नक्की फोटो काढ. आमच्या जवळ तावरे कॉलनीमधे सुद्धा कदंबाचे २ मोठे वृक्ष आहेत.एका बंगल्याच्या फाटकाच्या बाहेर दोन्ही बाजूला दोन आहेत; (जय-विजय सारखे).
आर्या, तुझ्या इन्स्टिट्यूटचे नाव-पत्ता दे ना म्हणजे ती जास्वंद जाऊन बघता येईल.
अरे वा ! पुण्यातल्या
अरे वा ! पुण्यातल्या वृक्षमित्रांचे (वृक्ष हेच मित्र या अर्थाने, षष्ठी तत्पुरुष नाही :डोमा:) पत्ते मिळवण्यासाठी बरेच जण उत्सुक आहेत की ! शुभस्य शीघ्रम्
एकेका रस्त्याने सुरुवात करायची कल्पना बरोबर आहे.
एकदा यादी तयार झाली की गुलाबी थंडीत गटग म्हणून छान प्रभातफेरी काढता येईल.
अवनी
अवनी
शांकली, राजस्थानमधे आहे ते.
शांकली,
राजस्थानमधे आहे ते. नयना आणि माझी वहिनी एका ट्रेकर ग्रुपमधे
होत्या. जून्या आठवणी ताज्या करण्यासाठी दोघींनी २०/२५ वर्षांनी
परत एकदा ट्रेकचा घाट घातला, आणि यशस्वी पण केला.
(त्यांच्यामूळे मला अजून आशा आहे.)
कसला मस्त फोटो. किती देखणा
कसला मस्त फोटो. किती देखणा पक्षी. शेअर केल्याबद्दल धन्यवाद दिनेशदा. आधी मी रणथंबोर वाचलं घाईत.
अरे वा, पुणेकर झकास कल्पना.
हा माझा आणखी एक दोस्त
हा माझा आणखी एक दोस्त
दिनेशदा नयनाचे टिपलेला फोटो
दिनेशदा नयनाचे टिपलेला फोटो भारी आणि वैजयंतीचा दोस्तही.
अवनी..
षष्ठी तत्पुरुष ..हा शब्द खूप वर्षांनी ऐकला. छान वाटलं.
दिनेशदा व वैजयंती - फोटो मस्त
दिनेशदा व वैजयंती - फोटो मस्त आहेत पण नेमके कुठले पक्षी सांगणार का?
दिनेशदा - तो किंगफिशर वाटतोय - पण उडतानाचा असल्याने नेमके कळत नाहीये.
वैजयन्ती - घार, गरुड - हे बसलेल्या अवस्थेत ओळखणे अवघडच जाते. उडताना घारीचे शेपूट "व्ही" आकाराचे दिसते तर गरुडाचे वेगळे असते त्यावरुनच ओळखता येते - हा पक्षी मात्र ओळखता येणे कठीण आहे...
आता डिजीटल फोटोग्राफी आपल्या
आता डिजीटल फोटोग्राफी आपल्या आवाक्यात असल्याने असे अनेक क्षण आपल्याला
वाटून घेता येत आहेत.
पुर्वीच्या काळी अनुभव, केवळ शब्दातूनच वर्णन करावा लागायचा. रोलवरचे फोटो तसा अनुभव देऊ शकत नाहीत. (अर्थात त्या काळी पर्याय नव्हताच म्हणा.)
माझा भाऊ आणि वहिनीने एव्हरेस्ट बेस कँप पर्यंत ट्रेक्स केले होते. (त्यातूनच तर त्यांचे प्रेम जमले.) महाराष्ट्रातील बहुतेक गडकिल्ले केलेच. आता मी इथल्या एखाद्या लेखाबद्दल सांगितले, तर ते त्यांच्या ट्रेक्सचे अनुभव सांगतात.
--
हे दिवस म्हणजे आपल्याकडे भाज्यांची रेलचेल असते नाही ? गाजरे, ओले हरभरे, वांगी, कोनफळं, पातीचा लसूण, सुरती पापडी, बोरे, चिंचा...
इथेही हे सगळे मिळते, मस्त थंडीही असते..लेकिन वो बात कहा ?
सुंदर फोटो आहेत पक्षांचे.
सुंदर फोटो आहेत पक्षांचे.
शशांक, तो गरुड आहे. गाईड्च्या
शशांक, तो गरुड आहे. गाईड्च्या मते serpent eagle. काझिरंगा अभयारण्यात पक्षी खूप आहेत. त्याचं घरटं पण जवळ होतं. घरट्यातलं पिल्लू खालून सुद्धा दिसत होतं. उडताना काय दिमाखदार दिसतो! पण मला उडतानाचा फोटो नाही काढता आला
तामण हे महाराष्ट्राचं state
तामण हे महाराष्ट्राचं state flower आहे.त्याची क्रेपसारखी दिसणारी सुन्दर जांभळी फुलं बघितली आहेत.
गुलाबी तामण पण असते म्हणे ! कोणी बघितली असेल तर पत्ता सांगा.>>>>>अवनी, हि जांभळी आणि गुलाबी तामण.
जांभळा तामण
जिप्सीदा, आहाहा ! किती सुंदर
जिप्सीदा,
आहाहा ! किती सुंदर फोटो ! आजच्या रविवारची सुरुवात छानच झाली !
जागू,
तुझ्याकडून आता पांढर्या तामणीचा फोटो हवाय !
तामणचे दुसरे नाव जरूल (Jarul)
तामणचे दुसरे नाव जरूल (Jarul) असे आहे.
http://www.flickr.com/photos/dinesh_valke/505648324/
सध्या सिटाउटातली रातराणी
सध्या सिटाउटातली रातराणी रात्री(!) घमघमते!
आणि रोज सकाळी ९ ते १० च्या दरम्यान फुलचुख्यांची एक जोडी येते. मस्त चिवचिव करतात.
पण माझा कॅमेरा नेमका पलिकडच्या खोलीत अस्तो.
आणि एकदाच येतात सकाळी परत नाही येत ...काय कारण असेल याचं?
साधारण फिक्कट हिरवट/ खाकी रंगाचे आहेत. लांब बाकदार चोच आहे.
हुश्श! झालं वाचून. सर्वच फोटो
हुश्श! झालं वाचून. सर्वच फोटो मस्त. धन्यवाद.
अग पोरींनो जरा जपून चाला की ग. आजकाल फारच पाय घसराया लागलाय तुमचा.
जिप्स्या,काय चिडवतो रे माझ्या सख्यांना?
अवनी अग मी ते होत म्हणाले आता
अवनी अग मी ते होत म्हणाले आता नाही.
Pages