सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
रातभर जामसे जाम टकराएगा ...
रातभर जामसे जाम टकराएगा ... असं झालय का हल्ली इथे?
जागूने बेकरी काढली का? तिचे पाव हल्ली सांडत नाहीत असं जिप्सी म्हणतोय म्हणून विचारले.
कार्नेशन्सला उन, पाणी काय प्रमाणात लागते?
हाहाहा.. जिप्सी, रस्त्याची
हाहाहा.. जिप्सी, रस्त्याची परिस्थिती गंभीर असावी.
हो शांकली .. पाय बाद मग बोटीतच बसूया
वैजयन्ती ... ए त्या आजोबांकडे
वैजयन्ती ...:हाहा:
ए त्या आजोबांकडे नको जाउया ते सारखे सारखे जाम खायला लावतात.>>>>>>>>>>
बघ शांकली बोट बरी आहे का ते.
बघ शांकली बोट बरी आहे का ते.
रातभर जामसे जाम टकराएगा ...
रातभर जामसे जाम टकराएगा ... असं झालय का हल्ली इथे? >>>>माधव
वैजयंती, बोट मस्त!! माधव,
वैजयंती, बोट मस्त!!
माधव, जिप्सी...........
हाय सगळे! अगं वैजयंती काय
हाय सगळे!
अगं वैजयंती काय सांगते काय? काळजी घे ग. काय साथ बीथ आलीक्काय?
माझ्यानंतर त्याच ठिकाणी माझी मैत्रिणही पडली. तिला तर हेअर क्रॅक आहे. असो............
मी काल १४ वर्षांच्या ...आपलं ..............१४ दिवसांच्या वनवासातून.....आपलं.........घरवासातून मुक्त!
आपुनका पलॅषटर कल काटके, फाडके फेक दिया हय्!
अब सिर्फ अँकल कॅप/क्रेप बँडेजवर काम चालू. अजून सूज आहे.
असो ......सगळ्यांचे फोटो मस्त.
सगळं नुसतं वाचलं तरी ज्ञानात भर पडते.
खरच साथ आल्यासारखी वाटते.
खरच साथ आल्यासारखी वाटते. माझी एक आत्तेबहीण परवा घरीच पडून तिचा पाय फॅक्चर झाला.
माधव
वैजयंती काय हे? पहिल्या
वैजयंती काय हे? पहिल्या तिघांचा नंबर लावुन झाला. आता दुसर्या फेरीत तुमच्यानंतर कोण म्हणून विचार येवून गेला.
गेले कुठे सगळे ? ह्या फुलाचे
गेले कुठे सगळे ?
ह्या फुलाचे नाव माहीत आहे का?
जागू जामची फुलं आणि फळं
जागू जामची फुलं आणि फळं मस्तच, तोंडाला पाणी सुटलं
या चित्रात पिवळी फुलं माहित नाहीत पण पांढरी फुलं असलेला माका आहेना?
जागू असेच काहिसे दिसणारे एक
जागू असेच काहिसे दिसणारे एक फुल घसा दुखत असेल / खोकला झाला असेल तर खातात. जिभेवर मस्त चरचरते त्याने
जो एस तो माका नाही. काटेरी
जो एस तो माका नाही. काटेरी फुल आहे ते
मोना
दिनेशदा हे तुमच्या लिखाणासाठी उपयोगी पडेल का ?
जागू ही पिवळी फुलं माझ्याकडे
जागू ही पिवळी फुलं माझ्याकडे कुंडीत आहेत. पानंही सेमच असावीत. इकडे त्याला बहुतेक संक्रातीची फुलं म्हणतात.
हा वेल आहे. जागू तुझ्याकडच्या
हा वेल आहे. जागू तुझ्याकडच्या सारखाच आहे का? याला सुंदर पिवळी छोटी छोटी फुलं येतात.
नाही मानुषी ती वेगळी फुल
नाही मानुषी ती वेगळी फुल आहेत. त्या फुलांचे देठ बघ खुप लांब आहे शिवाय फुलांचा आकारही.
हो जागू! आहे फरक !
हो जागू! आहे फरक !
जागूकडील पिवळी फुले
जागूकडील पिवळी फुले Asteraceae या कुळातील वाटत आहेत. एक दांडी, झेंडू याच कुळातले.
जागू - त्या पिवळ्या फुलाबाबत
जागू - त्या पिवळ्या फुलाबाबत - Triadax या जीनस मधे "एक दांडी" आहे तर तशाच प्रकारचे पण थोडेसे निराळे - Galinsoga या जीनसमधे आहे. Asteraceae या कुळातीलच सर्व जण आहेत. वरील प्रकारे शोध घेतल्यास अडचण येणार नाही.
ओके शशांक, प्रयत्न करते.
ओके शशांक, प्रयत्न करते.
माझ्या ऑफिसच्या वाटेवर एक
माझ्या ऑफिसच्या वाटेवर एक डोंबिया नावाचे झुडुप दिसते. त्याला ह्या दिवसात फुलं येतात. पानं साधारणतः कापसाच्या पानांसारखी असतात. आत्ता फुललेलं झाड फिक्कट गुलाबी रंगाचं आहे. आणि त्याच्याच शेजारी त्याचं भावंड आहे; त्याच्या फुलांचा रंग जरा गडद गुलाबी आहे. ते मात्र जानेवारीत फुलतं.
सॅलिसबरी पार्कवरून सी डी ए कडच्या रस्त्याने सरळ आलं की एक 'T' लागतो. डावीकडे गेलं की गोळीबार मैदानाकडे रस्ता जातो, आणि उजवीकडे गेलं की कमांड हॉस्पिटलकडे रस्ता जातो. या बरोब्बर मध्यभागी ही ३/४ झुडुपं आहेत.
ह्या डोंबियाचे फोटोसेशन आज केलं....
हे त्याचं पान....
आणि हा गुच्छ कळ्या-पानांसकट......
तसंच मार्केटयार्ड रोडवर M S W C च्या रांगेतच श्री तारापोर यांचा मोठा बंगला आहे. त्यांच्या बागेत तर एकेक नवलाची झाडं आहेत. आत्ता तामणीची सुकलेली बोंडं मला मिळाली. त्याच्या फुलांचे फोटो मी काढीनच पण सुकलेल्या बोंडांचे फोटो इथे देतिये.
एक गोष्ट मला जाणवली की ह्या सुकलेल्या बोंडांच्या १/२ फांद्या आपल्या घरातल्या दिवाणखान्यात एका कोपर्यात ड्राय अॅरेंजमेंट म्हणूनही खूप सुंदर दिसतील. फुलावर असताना तामण सुंदर दिसतेच पण सुकल्यावरही तिची वेगळी खासियत जाणवते!
तामण हे महाराष्ट्राचं state
तामण हे महाराष्ट्राचं state flower आहे.त्याची क्रेपसारखी दिसणारी सुन्दर जांभळी फुलं बघितली आहेत.
गुलाबी तामण पण असते म्हणे ! कोणी बघितली असेल तर पत्ता सांगा.
अवनी, के के मार्केट (सातारा
अवनी, के के मार्केट (सातारा रोड) च्या आवारात जी तामणीची झाडं आहेत त्यात १/२ गुलाबी रंगाची आहेत. शिवाय टिळक रोडवर टाटाच्या शोरूमपाशी एक आहे; पण त्याचा रंग माहिती नाही. आदमबागेत सुद्धा खूप झाडं लावली आहेत पण ती सगळी जांभळ्या रंगाची आहेत.:स्मित:
जागू, मश्रुम हे तर वेगळेच
जागू, मश्रुम हे तर वेगळेच प्रकरण आहे.
पुर्वी त्याला हरितद्रव्यविरहित वनस्पति असा दर्जा दिला होता.
पण आता तो वेगळाच ग्रुप मानतात.
शांकली, गुलाबी फुले सुंदरच. आकाराने आणखी मोठी असती तर..
या ताम्हणीची बोंडे अगदी वर्षभर झाडावर असतात. गेल्या वर्षीची
बोंडे आणि या वर्षीची फुले, एकाचवेळी असतात झाडावर.
हं, ही फुलं आकाराने फार मोठी
हं, ही फुलं आकाराने फार मोठी नाहीयेत, पण त्यांचा झुबका फार सुंदर दिसतो. शिवाय या फुलांना मंदसा सुगंध पण असतो.
वॉव शांकली तामिणीची सु. बोंडं
वॉव शांकली तामिणीची सु. बोंडं काय मस्त दिसताहेत. खरंच ड्राय अरेंजमेंटला आयडियल!
जास्वंदीच्या वर्गातले पण एक
जास्वंदीच्या वर्गातले पण एक असे झाड असते, त्याची फुले
सकाळी पांढरी असतात व जसजसा दिवस चढत जातो, तसतशी गुलाबी
होत जातात. आता हे झाड दिसत नाही फारसे.
शांकली...मस्तं फोटोज.... मी
शांकली...मस्तं फोटोज....
मी टिळक रोडवर जाऊन पाहून येईन ते तामणीचं झाड जमलं तर...
(फोटो टाकायचा प्रयत्न करेन... मागच्यावेळीपण आस आणि शोभाने ज्या कर्वे रोडवरच्या झाडाचा उल्लेख केला होता.. तो फोटो काढलाय मी, पण मोबा. वरचा असल्याने तितकासा स्पष्ट नाही तो फोटो... )
सर्व पुणेकर निसर्गप्रेमी - एक
सर्व पुणेकर निसर्गप्रेमी - एक नम्र विनंती / आवाहन - पुण्यातील मुख्य रस्त्यांवर (अर्थात जेथे जेथे झाडे आहेत असे रस्ते) जे वेगवेगळे वृक्ष आहेत त्यांची एक यादी करु या का -फोटोसकट - पूर्ण वृक्ष, पाने , फुले व फळे असल्यास त्यांचेही. एफ सी रोडवर बर्याच झाडांवर बोटॅनिकल नावाच्या पाट्या आहेत - तिथून सुरुवात करता येईल. बघा, कसा वाटतोय हा विचार .... कार्यवाहीत कसा आणता येईल..
बाकी नि प्रे - कृपया नाराज होउ नये - पुण्यात कधी आलात तर या "नातेवाईंकांचीही" भेट घेता येईलच की या यादीमुळे तुम्हाला......
<<जास्वंदीच्या वर्गातले पण एक
<<जास्वंदीच्या वर्गातले पण एक असे झाड असते, त्याची फुले
सकाळी पांढरी असतात व जसजसा दिवस चढत जातो, तसतशी गुलाबी
होत जातात. आता हे झाड दिसत नाही फारसे.<<
आमच्या इन्स्टीट्युटच्या आवारात होतं असं झाड दिनेशदा! संध्याकाळी तर मस्त डार्क राणीकलरचं होतं ते फुल.
Pages