पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिरीनः मल तुझ्या हि कल्पना आवड्ल्या ड्ब्या च्या. क्रमान्क १ आणि २ मी केले नाही अहेत अजुन ,बघीन नक्की करून. Thank you so much. दिनेश् दा: मला जुना विभाग सापडला मुलान् च्या खाण्याचा, पण तो मुखयत्वे नुकती खायला सुरवात केलेल्या मुलान् च्या पाकक्रुती चा वाटला, तुमचा लेख नाही मिळाला मात्र. तुम्हाला जम् ल तर link पोस्ट कराल का? Thank you.

क्षमा, वेगवेगळ्या मिश्र पिठांची व भाज्या घातलेली पिटुकली धिरडी / पॅनकेक्स/ डोसे.
इडली पिठात भाज्या, फोडणी घालून पिटुकल्या इडल्या.
बनाना ब्रेड / फ्रूट ब्रेड / कपकेक्स / फ्रेंच टोस्ट फिंगर्स.
वाफवलेले गाजराचे चौकोनी तुकडे, पपई / सफरचंद वा अन्य फळांचे तुकडे,

धन्स आर. चांगली माहिती दिलीस. मी नेहमी नाही पण बर्‍याच वेळा गोठ्यातुनच दुध आणते,पण ते ऑलरेडी पिशवीत काढुन ठेवलेले असत. प्रत्यक्ष दुध काढ्ताना उभ नाही राहु देत. पण तरी ते गायीच दुध म्हशीच्या दुधापेक्षा पातळच असतं.
दूध एकदा गर्म केल्यावर लगेच साय येत नाही सायिसाठि चार ते पाच वेळा दूध गरम करा. रात्रि थंड करुन फ्रिजमध्ये ठेवा, आणि सकाळी तुम्हाला भाकरीसारखि साय दिसेल.>> हा अनुभव मला फक्त म्हशीच्या दुधाबाबतीतच येतो गायीच्या दुधाची साय जाडसर येतच नाही कागदासारखी पातळ येते मग साठवुन किती दिवस साठवणार? त्यामुळे तुपही नाही येत व्यवस्थित. त्यपेक्षा म्हशीच्या १ ली. दुधाची पहिल्या वेळी पाव किलो पेक्षाही जास्त साय मिळते. Happy

पण नेटवर गायीच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधात कॅल्शिअम, प्रोटीन जास्त, कोलेस्टेरॉल कमी अशी माहीती मिळतेय. म्हणुन जरा कंफुझन आहे Uhoh

तूम्ही गोठ्यातूनच दूध घेत असाल तर प्रश्न नाही, पण बहुतेक डेअरीमधून दूधातले जास्तीचे क्रिम काढून घेतलेले असते. कारण ते वेगळे विकले जाते.

deepa_s , हल्ली ते स्मायली मिळत आहेत. घरी तळायचे. आवडेल मुलांना. मस्त आहे तो प्रकार नाहितर पोटॅटो फ्राईज चे पण रेफ्रिजेरेटेड पॅक मिळतात. पार्टी साठी चालेल ते.

क्षमा, फळांचे तुकडे, सॅलड्स पण ट्राय करु शकतेस. पण तिला आवडते का हे पहा. घरी बटाटा मा. वे मधे वाफवुन बटर व मिठ चोळुन परत वाफवावा, फ्रेंच फ्राईज सारखे होते. ते आवडीने खातात मुले. (बटाटा तसाच लांब लांब चिरावा. हवे तर वरुन बेक करता ना चिझ पण टाकु शकते कधितरी.)

चुरमुरे, लाह्यांचा चिवडा, पॉप कॉर्न देउ शकतेस.

पराठा चे तुकडे करुन, वा लहान लहान पुर्‍या तळुन देउ शकतेस.

क्षमा, ह्याच लिंक्स मी काल तुमच्या 'विचारपूस' मध्ये ठेवल्या होत्या. तुम्ही मायबोलीवर खूपच नवीन दिसताय. 'विचारपूस' ही सुविधा तुमच्या लक्षात आली नसावी असं वाटलं म्हणून मुद्दाम इथे येऊन हे सांगितलं Happy

धन्यवाद monalip,अवंतिका आणि अगो. हो अगो माझ्या ल क्षात नाही आले "विचार् पूस " मधे बघायचे. Thank you for telling me Happy monaalip: आज च ड्ब्यामधे बटाटा-गाज् र-पाल् क क् ट्लेट करुन दिल आहे. Twice-baked (I guess in this case twice-microwaved) बटाटा केला नाही आहे मीरा साठी अजुन्,पहाते करून Happy

साक्षी, पुण्याची आहेस का? पुण्यात दोन ठिकाणी - चितळे आणि ABC Farms ( यातलं ABC जास्त चांगलं) गायीचं आणि म्हशीचं वेगवेगळं लोणी मिळतं. गायीच्या दुधाची साय निघणं खरंच अवघड, म्हणुन मी ABC चं लोणी आणते, अगदी छान आणि शुद्ध गायीचं तुप मिळतं. बेरी अजिबात निघत नाही, त्यामुळे पातेलं साफ करायला सोपं. Happy तुप जवळ जवळ लोण्याच्या वजनाएवढंच निघतं.

पुण्यातलं माहीत नाही, पण इथे जे नंदिनी ब्रँड चं फुल फॅट ( लाल रंगाच्या पिशवीतलं ) गायीचं दूध मिळतं त्याला भरपूर साय येते, दर पंधरा दिवसांनी भरपूर तूप बनवते मी.

गावाकडून कॉलीफ्लॉवर आले आहेत, त्यांना मोठमोठी, छान हिरवीगार पानं आहेत, त्या पानांचे पालकाचे करतात तसे पराठे करता येतात का ? किंवा पानांची परतून भाजी ?

कॉलीफ्लॉवरची पाने परतून नीट शिजत नाहीत.
ती पाने,चण्याची डाळ, दाणे असे कूकरमधे शिजवून
मग ती फोडणीला देऊन भाजी करता येते. पानांचे सूपही
करता येते, पण त्याला उग्र वास येतो.

कॉलीफ्लोवर ची पाने धुवुन,चिरुन त्यात मावेल तितकेच पिठ बेसन व तांदुळ पिठ,तिखट-मीठ-ओवा-तीळ घालुन भिजवायचे.कुकरच्या डब्यात थापुन उकडायचे त्याच्या वडया पाडुन तेलावर परतायच्या..

बरेच वेळा हिरवी मिरची फारच कमी तिखट असते. त्यामुळे पदार्थाला नीट चव येत नाही.
कांदापोह्यांना वरून लाल तिखट पूड घातली तर चव बदलते.
अश्या वेळी काय करता येईल?
वाळलेली तिखट हिरवी मिरची पावडर करून टिकेल का ?
अजून काही पर्याय ?

हिरव्या मिर्चीचा ठेचा करुन ठेवा. तो घालायचा . पोहे, उप्पीट, भाजी साठी.. पण त्याची चव हिरव्या मिर्चीऐवजी ठेच्याचीच लागते, एवढाच दोष. Sad फ्रेश हिरवी मिर्ची घालणे आणि ठेचा घालणे यात चवीत फरक रहातो.

मनिमाऊ, धन्स गं, पण मी पुण्याची नाहीये पण इथे ABCच तुप मिळत का बघते. पण माझा मुळ प्रश्न तुपाचा नाहीय तर दुधाचा आहे. कि नक्की पौष्टीक दुध कोणते गायीचे की म्हशीचे?? पण नेटवर गायीच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधात कॅल्शिअम, प्रोटीन जास्त, कोलेस्टेरॉल कमी अशी माहीती मिळतेय. म्हणुन जरा कंफुझन आहे.

मोसंबी / संत्रा जुस फ्रिज मधे काढुन ठेवला तर कीती दिवस टिकेल?
त्याच्यामधे काय मिक्स करावे लागेल का?
प्लीज कोणी सांगणार का?

चमकी, त्या पानांना थोडा वास येतोच. पण डाळ दाणे घातल्याने जरा कमी येतो.
हिंग, आले, जिरे पण वापरायचे.

रावी लाल भोपळ्याचा किस तेलावर वाफवून घेतात. मग त्यात गूळ घालतात.
गुळ विरघळला कि त्यात थोडे तांदळाचे आणि मग गव्हाचे पिठ घालून शिजवतात.
मग त्या खसखसीवर थापून तळून घाऱ्या करतात. (इथे आहे कृती) असे दोनदा शिजवल्यावर
काकवी कडवट लागेल का, अशी शंका येतेय. पण प्रयोग केला तर इथे अवश्य लिहायचे.

नितीन,
रस काढून का ठेवायचाय ? तसा टिकेलही पण तेवढा आरोग्यपूर्ण राहणार नाही.
आजारी व्यक्तीसाठी असेल, तर नकोच. अगदीच शक्तीपात झाला असेल तर गोष्ट
वेगळी, पण आजारी व्यक्तीनेदेखील रस पिण्यापेक्षा फळे चावून चावून खाणे जास्त योग्य.
तात्काळ शक्ती येण्यासाठी हवी असेल तर या स्वादाच्या ग्लुकोजचे सॅशे आणता येतील.
नारळ पाण्याचेही सॅशे मिळतात.

रस काढून ठेवला तर ३ ते ४ दिवस घेतला असता.
पण दिनेशदा तुम्हि सान्गितल्या प्रमाणे "रस पिण्यापेक्षा फळे चावून चावून खाणे जास्त योग्य" पटल मला.
पण लहान मुले फळ खाण्याचा कधी कधी कंटाळा करतात.
परंतु तात्काळ साठि ग्लुकोजचे सॅशे आणता येतील. तसेच त्याच वेळेला ज्युस ताजा काढुन देता येईल.

माहीती बद्द्ल धन्यवाद....

माझ्याकडे ३५ माणस जेवायला येत आहेत. सॅलड हव आहे. त्यात काही लोक मोठे आहेत ज्याना दात नाही आहेत. बाकीचा मेनु उंदियो, वालाचा भात, मिक्स डाळींची भजी, श्रीखंड, फुलके, ओल्या नारळाच्या करंज्या, चिंगु चटनी असा आहे. सॅलड जरा हटके हव आहे. मदत करा. इन अड्वॅन्स धन्यवाद.

दिनेशदा धन्यवाद! घार्‍या नाही ट्राय केल्या. पण काकवी वापरून कणकेची गोड धिरडी केली होती. चांगली लागत होती.

स्नेहश्री, इकडे पहा - http://www.maayboli.com/node/2548/by_subject/11/259

पपनस मिळाला तर - http://www.maayboli.com/node/3537
अ‍ॅपल रेलिश - http://www.maayboli.com/node/6029
रशियन सॅलड - http://www.maayboli.com/node/2613
अंडं चालत असेल तर - http://www.maayboli.com/node/22191

Pages