दोदोल - गोवन किरिस्ताव स्वीट पण संपूर्ण शाकाहारी.

Submitted by नीधप on 1 December, 2011 - 23:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

२ कप नारळाचे दूध
३/४ कप नाचणीचे सत्व किंवा पिठ (मी पिठ वापरले पण सत्व वापरल्यास जास्त बरे)
३-४ चमचे तूप किंवा खोबरेल तेल
३/४ कप काळा गूळ (माडाचा गूळ) - हा म्हापश्याच्या मार्केटमधे डिसेंबर-जानेवारी महिन्यात नक्की मिळतो. इतर कुठे मिळत असल्यास माहित नाही. गोवन कॅथलिक मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना विचारावे. पण या गुळाशिवाय दोदोलची योग्य चव येणार नाही.
हा काळा गूळ/ माडाचा गूळ (सौदागर सिनेमातला तो हाच की नाही ते माहित नाही. हा गोव्यातला आहे. तो सिनेमा बंगालातला होता. Happy )
kala-gool.jpg

१ टेबलस्पून गव्हाचे पीठ
चिमूटभर वेलदोडा पूड
१०-१२ काजू अर्धे केलेले. आणि हवे असल्यास बदाम

क्रमवार पाककृती: 

१. काळा गूळ बारीक किसून घ्या
२. नारळाचे दूध, नाचणीचे पिठ, काळा गूळ एकत्र करा. गुठळ्या रहाणार नाहीत आणि गूळ पुरा विरघळेल असं बघा. मी हॅण्ड ब्लेण्डरने मिक्स केलं.
३. ज्या पॅनमध/ ट्रेमधे किंवा कपांमधे दोदोल सेट करणार त्याला आधीच तुपाचा/ खो तेलाचा हात लावून घ्या.
४. जाड बुडाच्या पॅनमधे तूप/ खो तेल घाला. तापायला आले की त्यात काजू, बदाम वगैरे टाका. खरपूस परतून घ्या. गॅस कमी करा. मंद आचेवर ठेवा.
४. ना दूध, गूळ आणि ना पिठ असं मिश्रण या पॅनमधे सोडा. एका हाताने ढवळत रहा. आता गुठळ्या होऊ नयेत यासाठी सतत ढवळत रहावे लागेल.
५. थोडा घट्टपणा येऊ लागला की वेलची पूड भुरभुरा. ढवळत रहा. मग १ टेबलस्पून गव्हाचे पीठ पण भुरभुरा. ढवळत रहा.
६. मिश्रण घट्ट होऊ लागले, कडा सोडू लागले आणि साधारण अर्धे झाले की गॅस बंद करा.
७. पॅन/ ट्रे किंवा कप्समधे ओता. अर्धा तास गार व्हायला आणि सेट व्हायला द्या.
८. सेट झाले की काढा. वरून काजूने डेकोरेट करा. खा. गरम किंवा गार दोन्ही उत्तम लागते.

हे तयार झालेलं दोदोल. मी गॅसवरून उतरवायची थोडी घाई केली त्यामुळे थोडी जास्तच मऊ पडलीये वडी.
ready-dodol.jpg

वाढणी/प्रमाण: 
साधारण ७-८ कपकेक्सचे मोल्डस भरतील
अधिक टिपा: 

वड्या काढल्याप्रमाणे ट्रेमधे ओतून मग कापून याच्या वड्या पाडता येतील. किंवा छोटे छोटे कप्स भरता येतील.
वड्या म्हणलं तरी या कडक वड्या होत नाहीत. तश्या दुलदुलितच रहातात. म्हणूनच म्हणे त्याचं नाव दोदोल आहे असं एका गोव्यातल्या मैत्रिणीने सांगितलं होतं.

गोव्याला एवढ्यात कोणी जाणार असेल तर माझ्यासाठी म्हापश्याच्या स्टॅण्डजवळच्या मार्केटातून प्लीज प्लीज हा गूळ घेऊन या.

माहितीचा स्रोत: 
गोवन मित्र मैत्रिणी, इंटरनेट
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच. मला इथे काळा गूळ मिळतो. त्यामुळे मी बनवून बघेन. वरचा फोटो चॉकलेट केकसारखा दिसतोय. कुणाच्या तरी वाढदिवसाला फसवण्यासाठी मस्त पाकृ आहे.

सुलेखा, काळा गूळ हा ऑर्गॅनिक असतो पण उसाचा गूळ नसतो. माडाचा असतो.
चव उसाच्या(नेहमीच्या) गुळापेक्षा कमी गोड आणि थोडी खमंग असते.

छान जमलीय कि.
तिथे जरा आणखी आटवतात. मग तो जरा जास्त टिकतो.

वांद्राला जिथे कॅथलिक लोकांची वस्ती आहे, तिथे मिळायला पाहिजे हा गूळ. आता नीट लोकेशन नाही सांगता येणार, पण मेन रोडवरुन आत जिथे शिरतो (जिथे पावलो च्या बसेस थांबतात ) तिथे उजव्या बाजूला एक दुकान बघितल्यासारखे वाटतेय.

वांद्र्याला हिल रोड भागात किंवा मालाडला मार्वे भागात असू शकेल.
एक मैत्रिण आहे इथे. गोव्याची आणि कॅथलिक तिला विचारून बघते मुंबईत कुठे मिळेल का ते.

माझी थोडी घाई झाली गॅसवरून उतरवताना त्यामुळे खूपच जास्त मऊ वडी झालीये.

नी पदार्थ मस्त! आणि "सौदागरा"तलाही गूळ हाच असावा. कारण माझ्या हपिसातला एक स्टाफ बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातला आहे. तो गावी गेला की हा गूळ माझ्यासाठी घेऊन येतो. काळा दिसतो पण खिरीत वगैरे चव मस्त लागते. रेग्युलर गुळापेक्षा खमंग!
पण आता हे तुझं दोदोल की काय ते हा गूळ(आमचा आपला बंगाली गूळ) वापरून करून बघीन. सीझनही आयडियल आहे.

गोव्याची आणि कॅथलिक तिला विचारून बघते मुंबईत कुठे मिळेल का ते. >> नी नक्की सांग ग, मी पण वाट पाहतेय... Happy

यम्मी दिसतय दोदोल! आज तुझ्याकडे चक्कर टाकायलाच हवी. दोदोल, बेबिंका (की बिम्बिका) हे दोन्ही गोव्याचे पदार्थ माझे फेव्हरिट.

खोताच्या वाडीजवळ काळा गुळ मिळतो. दोदोल वगैरेही मिळतं या सिझनला. माऊंटमेरीच्या पायथ्यालाही मिळतं. एक पेरुचं स्वीटही मिळतं तिथे या दिवसात ते अफाट सुंदर लागतं.

नी...
चे.पू. वर फोटो बघुनच 'तोंडाला पाणी सुटलं' हे मी, तुला 'कोकणी ष्टायल'ने सांगत होतो... म्हणजेच माझ्या सारख्या 'खादाड' माणसाला पदार्थ आवडला... चे.पू. वरचा माझा प्रतिसाद वाचून तुला कदाचीत राग आला असेल...त्या बद्दल '(माझेच) कान पकडुन' जाहीर रीत्या 'माफी करावि सरकार...'...
Happy ...

शर्मिला, बरं झालं माहिती दिलीस ते. आता गोव्याकडे डोळे लावून बसायला नको काळ्या गुळासाठी Happy
आत्ता येतेयस का चहा आणि दोदोल साठी?
बादवे माउंटमेरी, पेरूचं स्वीट इत्यादी.... कधी जाऊया?

तोंपासु Happy
करून बघेन एकदा. Happy

सौदागर सिनेमातला तो हाच की नाही ते माहित नाही. हा गोव्यातला आहे. तो सिनेमा बंगालातला होता. >>>>>
माझं चुकत नसेल तर 'सौदागर' मधला गूळ हा खजूराच्या रसापासून बनवत असते नूतन. बंगालमधला गूळ हा खजूराच्या रसाचा बनलेला असतो असे माझ्या एका बंगाली मैत्रिणीने सांगितल्याचे आठवते. ती हा गूळ वापरून तांदळाची खीर बनवायची.

मस्तच रेसिपी Happy आमच्या ओळखीच्या एक काकू गोव्याच्या आहेत. त्या 'नाचणीचं सत्व' म्हणून बनवतात. रेसिपी अगदी हीच. फक्त साधा गूळ वापरतात आणि ज्या भांड्यात सेट करायचे त्याला तुपाचा हात लावतात. ती अप्रतिम चव आठवून आत्ताही तोंडाला पाणी सुटलं. काळ्या गुळाशिवाय बनवलं म्हणूनच त्यांनी दोदोल नाव सांगितलं नसणार तेव्हा.

अगो + १ . मी veg दोदोल काहीतरी वेगळ अस वाचायला आले पण पोपट झाला. Happy
ह्याला नाचणिची खान्डवी असही म्हणतात. मी ह्याच्या वड्या पाडते. आता काळा गुळ घालुन try करेन.

एक तीपः ना. दुध + नाचणी mix करुन रात्रभर kitchen counter वर झाकुन ठेवल तर सकाळपर्यन्त सग्ळ्या गुठळ्या सुटतात. mixer धुवायचे कश्ट वाचतात. Wink

अगं सिंडीबाय नवर्‍याच्या वाढदिवसाला दोन्ही गोष्टी पहिल्यांदा केल्या होत्या. आणि बर्‍यापैकी यशस्वी झाल्या (बिगिनर्स लक!). मग मिरवायला नको? Wink

अगं नी, मला इथे एका नॅचरल फूड स्टोअर मध्ये कोकोनट शुगर म्हणून एक साखर मिळाली आहे. त्यामुळे मी पण हे येत्या काही दिवसात ट्राय मारणार.

मारा मारा.. Happy
ती कोकोनट शुगर आपल्या साखरेपेक्षा कमी गोड आणि किंचित खमंग चवीची आहे का?
रिपोर्ट कळवा, फोटो टाका
जमल्यास नाचणीचे सत्व(कोरडे पिठ स्वरूपात) किंवा नाचणी रात्रभर भिजत घालून नारळाबरोबरच मिक्सरमधून फिरवून घेऊन मग गाळून असं घे. जास्त चांगलं होईल.
हे आवडलं तर नेक्स्ट टाइम तुपाऐवजी खोबरेल तेल वापर. Happy

आईने टिवीवर पाहिलेले आणि एकदा केलेले तेव्हापासुन ऐशु प्रेमात आहे याच्या. या शनवारीच घेउन आलेली.

ती नारळाचे दुध आणि नाचणिचे दुध वेगवेगळे काढते. नी, तुझा दोन्ही एकत्रच फिरवुन गाळायचा शॉर्टकट मस्तय. मी पुढच्या वेळेस वापरेन.

फक्त आम्ही काळा गुळ न वापरता साधाच गुळ वापरतो. काळा गुळ जेव्हा मिळेल तेव्हा भरपुर घेऊन ठेवेन. Happy

काल परत केलं दोदोल. यावेळेला सत्व वापरलं. आणि खरंच पिठापेक्षा खूपच चांगलं झालंय. आता अमराठी मैत्रिणीला रेसिपी द्यायचीये. तर नाचणीच्या सत्वाला इंग्रजीमधे काय म्हणता येईल?

Ragi malt?

Pages