२ कप नारळाचे दूध
३/४ कप नाचणीचे सत्व किंवा पिठ (मी पिठ वापरले पण सत्व वापरल्यास जास्त बरे)
३-४ चमचे तूप किंवा खोबरेल तेल
३/४ कप काळा गूळ (माडाचा गूळ) - हा म्हापश्याच्या मार्केटमधे डिसेंबर-जानेवारी महिन्यात नक्की मिळतो. इतर कुठे मिळत असल्यास माहित नाही. गोवन कॅथलिक मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना विचारावे. पण या गुळाशिवाय दोदोलची योग्य चव येणार नाही.
हा काळा गूळ/ माडाचा गूळ (सौदागर सिनेमातला तो हाच की नाही ते माहित नाही. हा गोव्यातला आहे. तो सिनेमा बंगालातला होता. )
१ टेबलस्पून गव्हाचे पीठ
चिमूटभर वेलदोडा पूड
१०-१२ काजू अर्धे केलेले. आणि हवे असल्यास बदाम
१. काळा गूळ बारीक किसून घ्या
२. नारळाचे दूध, नाचणीचे पिठ, काळा गूळ एकत्र करा. गुठळ्या रहाणार नाहीत आणि गूळ पुरा विरघळेल असं बघा. मी हॅण्ड ब्लेण्डरने मिक्स केलं.
३. ज्या पॅनमध/ ट्रेमधे किंवा कपांमधे दोदोल सेट करणार त्याला आधीच तुपाचा/ खो तेलाचा हात लावून घ्या.
४. जाड बुडाच्या पॅनमधे तूप/ खो तेल घाला. तापायला आले की त्यात काजू, बदाम वगैरे टाका. खरपूस परतून घ्या. गॅस कमी करा. मंद आचेवर ठेवा.
४. ना दूध, गूळ आणि ना पिठ असं मिश्रण या पॅनमधे सोडा. एका हाताने ढवळत रहा. आता गुठळ्या होऊ नयेत यासाठी सतत ढवळत रहावे लागेल.
५. थोडा घट्टपणा येऊ लागला की वेलची पूड भुरभुरा. ढवळत रहा. मग १ टेबलस्पून गव्हाचे पीठ पण भुरभुरा. ढवळत रहा.
६. मिश्रण घट्ट होऊ लागले, कडा सोडू लागले आणि साधारण अर्धे झाले की गॅस बंद करा.
७. पॅन/ ट्रे किंवा कप्समधे ओता. अर्धा तास गार व्हायला आणि सेट व्हायला द्या.
८. सेट झाले की काढा. वरून काजूने डेकोरेट करा. खा. गरम किंवा गार दोन्ही उत्तम लागते.
हे तयार झालेलं दोदोल. मी गॅसवरून उतरवायची थोडी घाई केली त्यामुळे थोडी जास्तच मऊ पडलीये वडी.
वड्या काढल्याप्रमाणे ट्रेमधे ओतून मग कापून याच्या वड्या पाडता येतील. किंवा छोटे छोटे कप्स भरता येतील.
वड्या म्हणलं तरी या कडक वड्या होत नाहीत. तश्या दुलदुलितच रहातात. म्हणूनच म्हणे त्याचं नाव दोदोल आहे असं एका गोव्यातल्या मैत्रिणीने सांगितलं होतं.
गोव्याला एवढ्यात कोणी जाणार असेल तर माझ्यासाठी म्हापश्याच्या स्टॅण्डजवळच्या मार्केटातून प्लीज प्लीज हा गूळ घेऊन या.
वरती टाकले फोटो
वरती टाकले फोटो
आहा! यम्मी वाटतय.
आहा! यम्मी वाटतय.
आह्हा!!! चॉकोकेक/ फज सार्खं
आह्हा!!! चॉकोकेक/ फज सार्खं टेंप्टिंग दिसतंय
नी.. आज मी गोवन सोर्पातेल केलंय (तिख्ख्खट पोर्क डिश) क्या कोइंसीडंस है!!
व्वा!! मस्तच.. चॉकलेट केकच
व्वा!! मस्तच.. चॉकलेट केकच वाटतोय.. एकदम तोंपासु..
वर्षूताई सोर्पातेल म्हणजे
वर्षूताई
सोर्पातेल म्हणजे गोवन सॉसेज ना?
छान एवढं मऊ असेल तर वाटी
छान एवढं मऊ असेल तर वाटी चमच्यानेही खाता येईल. सिनियर सिटिझन्सना, मुलांना नाचणीचं सत्व्/पीठ खाऊ घालायचा अजून एक मार्ग.
काळा गुळ आता हुडकावाच
काळा गुळ आता हुडकावाच लागेल....
हो अश्वे साधारण जेलीसारखं
हो अश्वे साधारण जेलीसारखं असतं पण हेल्दी.
सुरेख दिसतय!
सुरेख दिसतय!
'सोर्पातेल म्हणजे गोवन सॉसेज
'सोर्पातेल म्हणजे गोवन सॉसेज ना?'
नाय गा!!! पोर्क,बीफ ,पोर्क फॅट चे बार्रीक तुकडे करून टाकतात या करी मधे !!!
ओह.. माझ्यासाठी ते सगळंच
ओह.. माझ्यासाठी ते सगळंच 'काला अक्षर भैंस बराबर' असं आहे वर्षूताई
वा! मस्त आहे पाककृती साधा
वा! मस्त आहे पाककृती
साधा गूळ वापरून नक्कीच करून बघेन. हे साधारण किती दिवस टिकतं?
३-४ दिवस टिकायला हवं. पण मी
३-४ दिवस टिकायला हवं.
पण मी आजच फ्रिजात टाकणारे.
आआआअग आग!
आआआअग आग!
वा छान आहे की कृती. काळाकुट्ट
वा छान आहे की कृती. काळाकुट्ट गुळ मिळणार नाही मला, पण ऑर्गनिक म्हणून चॉकलेटी मिळतो तो घेऊन करून पहाते. नाचणीच्या पिठासाठी काही पर्याय सुचवा कुणीतरी
मस्त रेसिपी
मस्त रेसिपी
अनामी, गहू + तांदूळ पिठ किंवा
अनामी, गहू + तांदूळ पिठ किंवा नुसतं तांदूळ पिठ करून बघ.
पण नाचणीने जे टेक्श्चर येतं ते यात मिळणार नाही.
मस्तच पदार्थ. तो गुळ आता
मस्तच पदार्थ. तो गुळ आता शोधावा लागेल.
कब तो बी करको देकेंगा.
कब तो बी करको देकेंगा.
बरं. नाचणी जर धान्य मिळाल तर
बरं. नाचणी जर धान्य मिळाल तर ते भाजून पीठ करावं का?
(मागे आम्ही, लहानपणी नाचणीच्या पिठाची लोणी अन साखर घालून बिस्कीटे केली होती ती दिसायला काळीकुट्ट अन अतिशय चामट झाली होती. त्यामुळे या पिठाची जरा बीकच लागते.
अनघा, जुन्या हितगुजवर नाचणी
अनघा, जुन्या हितगुजवर नाचणी सत्त्व वापरून दोदोलाची पाककृती दिनेशनी लिहिली आहे, ती पण वाचून घे.
अनामी, नाचणी मिळालीच तर सरळ
अनामी,
नाचणी मिळालीच तर सरळ रात्रभर भिजवून ठेव. सकाळी उपसून काढ.
भिजवलेली नाचणी + नारळ हे पाणी घालून मिक्सरातून काढ. ते जे पेस्ट सदृश तयार होईल ते वस्त्रगाळ करून घे. १-२ वेळा पाणी घालून मिक्सर फिरवून परत वस्त्रगाळ असं कर. आणि मग जे लिक्विड मिळेल त्यात गूळ विरघळव.
पौष्टीक पदार्थ मस्त
पौष्टीक पदार्थ
मस्त
मस्त दिसत आहे. काळ्या गुळाचा
मस्त दिसत आहे. काळ्या गुळाचा खायला हवा, तरच मूळ चव काय आहे ते कळेल.
ये मुंबईला. आहे घरात.
ये मुंबईला. आहे घरात.
ekadam toMpasu
ekadam toMpasu
मी एकदा खाऊन पाहिलं , पण चव
मी एकदा खाऊन पाहिलं , पण चव नही जम्या!
मी खाल्लं होतं ते घरी केलेलं
मी खाल्लं होतं ते घरी केलेलं होतं. आणि ते मला तरी जाम आवडलं होतं.
मार्केटातलं मी खाल्लं नाहीये अजून.
नाचणी,काळा गुळ.अन नारळाचे दुध
नाचणी,काळा गुळ.अन नारळाचे दुध सगळेच पौष्टीक पदार्थ..थंडीचे खाणे ..फारच छान मस्त पदार्थ आहे..काळा गुळ हा नैसर्गिक रित्या बनवतात त्यात केमिकल मसाला घातलेला नसतो..मी कलकत्याचा व आसाम चा गुळ बर्याचदा खाल्ला आहे..माझे शेजारी बंगाली होते तेव्हा..
नाही ग बाई, एवढी मोठी कृती मी
नाही ग बाई, एवढी मोठी कृती मी कसली करतेय... त्यापेक्षा सत्व(आभार मनजुडी) किंवा तांदूळपीठ/बाजरी पीठ अस काही तरी कॉम्प्रोमाईज करण बर राहिल. एनी वे, दोघींचे आबार.
Pages