Submitted by मंदार-जोशी on 20 November, 2011 - 04:57
एका फसव्या क्षणी
क्रोधाचे गुलाम झालेल्या
माझ्या संमोहित शब्दांनी
तुझ्या नाजुक भावनांचा
वेध घेतला
अन्...
माझं निष्पाप प्रेम,
ते जादुई क्षण,
वचनं....शपथा,
हे सारं विसरून
तू लक्षात ठेवलेस
फक्त माझे अर्थहीन शब्द
अन् झिडकारून निघून गेलीस
तेव्हा पासून
अहिल्येसारखं
शिळेचं आयुष्य जगत
नसांनसांत भिनलेल्या
तुला जगवतोय
अहिल्येसारखा मलाही उ:शाप आहे
...की माझ्याही भाळी लिहीलंय
अश्वत्थाम्यासारखं वणवण भटकणं ?
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
कविता आवडली. सुरेखच!
कविता आवडली. सुरेखच!
सुंदर!!
सुंदर!!
मंदार , खुपच छान... आवडली.
मंदार , खुपच छान...
आवडली.:)
अरे वा ! मस्त ! आवडली
अरे वा ! मस्त ! आवडली
सर्वांना धन्यवाद. श्रुती,
सर्वांना धन्यवाद. श्रुती, प्राजु, प्रिती, अवल, विशेष धन्स
छानैरे मंदार... मंदार...
छानैरे मंदार...
मंदार... वाचकांच्या मतावर प्रतिक्रिया देऊ नयेत असं मला वाटतं. कविता एकदा सादर केल्यानंतर त्यांचं काय मत होईल ते अंतिम
आलं लक्षात किरण.
आलं लक्षात किरण.
मंदार मस्त जमलेली आहे.
मंदार मस्त जमलेली आहे.
चांगली जमली आहे!
चांगली जमली आहे!
छान आहे कविता कवितेत आशय
छान आहे कविता कवितेत आशय पोह्चण्याला महत्व आहे.
छान मांडलीय व्यथा. मंदार जोशी
छान मांडलीय व्यथा. मंदार जोशी यांच्या स्पष्टीकरणाला अनुमोदन. अहिल्येने जसा अनावधानाने केलेल्या चुकीची शिक्षा भोगली पण नंतर तिला उ:शाप मिळाला. तसाच कवितेतील नायकाकडून अनावधानाने चूक झाली म्हणून तो त्याच्या प्रेयसी कडून माफीची अपेक्षा करतोय.....ही उपमा अगदी समर्पक आहे. कवितेचा गाभा हा "एका प्रियकराकडून अनावधानाने चूक झालेली आहे आणि तो प्रांजळपणे प्रेयसीची माफी मागतो आहे यावर आहे." अजाणतेपणी केलेल्या चुकीची माणूस माफी मागतो जशी अहिल्येने मागीतली पण जाणतेपणी केलेल्या अपराधाची माफी अपराधी कधीच मागत नाही म्हणूनच पुढे दिलेली अश्वत्थाम्याच्या शिक्षेची उपमाही याला सपोर्टीव्हच आहे असे वाटते.
शांतिसुधा, अत्यंत समर्पक
शांतिसुधा, अत्यंत समर्पक विश्लेषण. मनःपूर्वक आभार
मस्त.. उपमा आवडल्या..आणि
मस्त.. उपमा आवडल्या..आणि शांतीसुधा यांच विश्लेषण पण पटल..
Kupacha Sundar!
Kupacha Sundar!:)
राखी, हर्षदा, धन्स
राखी, हर्षदा, धन्स
सुरेख !!
सुरेख !!
कविता सुरेखच. खास. फक्त दुसरे
कविता सुरेखच. खास.
फक्त दुसरे कडवे अजून थोडे विश्लेषणात्मक हवे होते असे वाटते;(म्हणजे ती ढगात रूसून बसली टाईप) म्हणजे कधीही परत न येण्यासाठी निघून जाण्याइतपत तुटलेले धागे दिसले असते मग. कदाचित जाणकारांच्या सल्ल्यामुळे 'मुक्तछंदअनंतविस्तारभयास्तव' कट शॉर्ट केली असेल.
अहिल्येची उपमा......मे बी माझे वैयक्तिक मत. नाही पटली. अहिल्येला शाप दिला भलत्याने(ते पण खरेच चूक नसतांना) आणि उद्धार झाला दुसर्याकडून. येथे उ:शाप नव्हे तर पुन्हा मनोमीलन अपेक्षित आहे.
काय आहे आता मंदार जोशींच्या कविता चवीने वाचणे भाग पडतेय ना म्हणून....
मंदार मला आधी तुझी कविता
मंदार मला आधी तुझी कविता नि:संशय आवडली, पण टू बी फ्रॅन्क शांतीसुधा यांच विश्लेषण अधिक आवडलं!
मस्त!!
मस्त!!
तेव्हा
तेव्हा पासून
अहिल्येसारखं
शिळेचं आयुष्य जगत
नसांनसांत भिनलेल्या
तुला जगवतोय
अहिल्येसारखा मलाही उ:शाप आहे
...की माझ्याही भाळी लिहीलंय
अश्वत्थाम्यासारखं वणवण भटकणं ?>> हे खुप आवडल.
सुरेख! आवडली.
सुरेख! आवडली.
खुप छान .. !!
खुप छान .. !!
सुरेख.
सुरेख.
आवडली!
आवडली!
अहिल्येसारखा मलाही उ:शाप
अहिल्येसारखा मलाही उ:शाप आहे
...की माझ्याही भाळी लिहीलंय
अश्वत्थाम्यासारखं वणवण भटकणं ?>>> ह्या ओळी विशेष आवडल्या !.......... चिरंजीवी अश्वत्थाम्याच्या भळभळत्या जखमेच्या वेदना कधीहि कुणाच्याही वाट्याला न येवो ! ................
आवडली कविता
आवडली कविता
SUPERB. KEEP IT UP.
SUPERB.
KEEP IT UP.
आवडली!
आवडली!
आवडलीच एकदम.. भारी...!
आवडलीच एकदम.. भारी...!
>> चिरंजीवी अश्वत्थाम्याच्या
>> चिरंजीवी अश्वत्थाम्याच्या भळभळत्या जखमेच्या वेदना कधीहि कुणाच्याही वाट्याला न येवो ! ................
खरंच!!!
धन्स वनराई
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
या निमित्ताने ह्या ओळी आठवल्या...
Pages