उ:शाप

Submitted by मंदार-जोशी on 20 November, 2011 - 04:57

एका फसव्या क्षणी
क्रोधाचे गुलाम झालेल्या
माझ्या संमोहित शब्दांनी
तुझ्या नाजुक भावनांचा
वेध घेतला

अन्...

माझं निष्पाप प्रेम,
ते जादुई क्षण,
वचनं....शपथा,
हे सारं विसरून
तू लक्षात ठेवलेस
फक्त माझे अर्थहीन शब्द
अन् झिडकारून निघून गेलीस

तेव्हा पासून
अहिल्येसारखं
शिळेचं आयुष्य जगत
नसांनसांत भिनलेल्या
तुला जगवतोय

अहिल्येसारखा मलाही उ:शाप आहे
...की माझ्याही भाळी लिहीलंय
अश्वत्थाम्यासारखं वणवण भटकणं ?

गुलमोहर: 

कवितेचा आशय उत्तम..!!
कधी कधी फक्त "वेळ" हा सर्वोत्तम उपाय ठरतो.. तेव्हा शांत राहता आलं पाहिजे.. चक्रीवादळातून सुटायची धडपड जास्त केली की अधिकाधिक अडकायलायच होतं.

(तुझ्या कविता बर्‍याचशा एकांगी वाटतात- वैम राग मानू नकोस Happy )

मंदार, कविता छान आहे, मुक्तछंद असुनही कवितेत एक लय आहे आणि वैफल्याचा एक विव्हळ स्वर सार्‍या रचनेच्या मागे रूंजी घालतो आहे असा भास होतोय. आणि शेवटच्या दोन ओळींमुळे कवितेत एक आकृतीबंध पूर्ण होतो आहे, आणि त्यामुळे कवितेला पूर्णता आली आहे, असे मला वाटते!
पुलेशु !

बागेश्री, संपूर्ण सहमत.
गिरीशजी, विश्लेषणाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद.

Happy

"तेव्हा पासून
अहिल्येसारखं
शिळेचं आयुष्य जगत
नसांनसांत भिनलेल्या
तुला जगवतोय " मला समजलं नाही कि अहिल्येसारखं आयुष्य कोण जगतं आहे. प्रेयसी का कवी.

सुरेखा,
अहिल्येसारखं आयुष्य इथे प्रियकर जगतो आहे. त्याच्या नसांनसांत प्रेयसी भिनली असल्याने त्याच्यातल्या तिला जगवणं म्हणजेच त्याने जगणं असा अर्थ अभिप्रेत.

चाऊ,
धन्स. आशा हाच मोठा आधार असतो. उम्मीदपे दुनिया कायम है म्हणतात ना Happy

What is उ:शाप ?

Rofl

@नीलम
कवी के दाट केस मे जब ऊ कडकडके चावती है तब कवी के मुंह से जो कुछ निकलता है उसे उ:शाप ऐसा कहते है |

इंग्लिशमधे पाहीजे असल्यास दोन वर्षे थांबा.

Pages