कोकण दर्शन (भाग १)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 November, 2011 - 13:42

निसर्गाच्या ओढीमुळे कोकण दर्शनाची खुप वर्षानंतरची इच्छा काही दिवसांपुर्वीच पुर्ण झाली. त्याची छायाचित्र.

१) सर्वप्रथम ज्याने कोकणाची निर्मिती केली त्या परशुरामाच्या मंदीराला भेट दिली.

२) प्रवेश द्वारातच ही दिपमाळ आहे.

३) मंदीरासमोरील मंडप

४) मंडपाच्या भिंतीवरील हत्तीचे मुख

५) देवळाच्या परीसरातील तलाव

६) त्यातील कासव

७) नुकतीच दिवाळी झालेली असल्याने मंदीराच्या बाहेरील आवारातील दुकानांबाहेर हे किल्ले बांधले होते.

८)

९) पुढे वेळणेश्वरला गेलो.

१०)

११)

१२) तिथल्याच देवळात बाजुला शंकरभगवानही होते.

१३) देवळाच्या बाहेर असलेली विहीर

१४) वेळणेश्वरच्या समुद्र किनार्‍यावर जाताना रस्त्यात लागलेल्या सुपारीला फुलोरा आला होता.

१५)

१६) कच्ची व पिकलेली सुपारी

१७) वेळणेश्वरचा समुद्र किनारा

१८)

१९) वेळणेश्वरचा सुर्यास्त

२०)

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. त्या परशुराम मंदीराचे रंगकाम पुर्ण झालेले दिसतेय. मी गेलेले तेव्हा चालु केले होते.

मी आधी नव्हते पाहिलेले पण रंग द्यायच्या आधिचे असते ते दगडी बांधकाम कोणत्याही मंदिराला छान दिसते. मला तसे आवडते.

पण हा धागा "घरची बाग" मध्ये का? प्रचि विभागात टाक ना.>>> हो हो चेक कर ते.

जिप्सि, मोनाली रात्री झोपेत धागा टाकलाय Lol बदलते.

यो, दिपा, दिनेशदा, शशांक धन्यवाद.

भाऊ गोव्याला नाही गेलो. तिथून कोल्हापूरला गेलो.

साक्षी बामणघण नाही पाहीली.

छान आहेत फोटो Happy २ वर्षं झाली परशुरामला गेल्याला. तिथे अजून कमर्शियलायझेशन झालं नाहिये. घरांच्या ओसरीवर जी काही दुकानं मांडली आहेत तेवढीच आहेत. गरम गरम प्रसादाचं जेवण मिळालं होतं. माझी आई चिपळूणातून चालत जाऊन पाखाडी चढून परशुरामात दर्शनाला जात असे.

जागु ताइ परशुराम माझ सासर, त्यामुळे प्रत्येक मे मध्ये जाणं होतच, वेळनेश्वरचि सफर या मे मध्ये झालि, अतिशय सुंदर किनारा आहे तो.

प्रचि फार सुंदर

इनमिन, शोभा, आशु, मानुषी धन्यवाद.
अश्विनी आई डोळ्यासमोर आली तुझी.

दक्षिणा चातक पुढच्या भागात टाकते.
गार्गि खरच खुप सुंदर किनारा आहे तो.

जागू, कोकणाचे फोटो पाहिले किंवा त्याविषयी कुठेही काही वाचले ना की मनाची अवस्था फार हळवी होते गं ! आणि नोकरी धंद्यानिमीत्ताने नाईलाजाने कोकणापासून ज्यांना दूर राहावे लागते ते सगळे ह्याच अवस्थेतून जात असतील.

प्रिती प्रज्ञा धन्यवाद.

दिपीका अजून २ भाग टाकले आहेत.