Submitted by मंदार-जोशी on 20 November, 2011 - 04:57
एका फसव्या क्षणी
क्रोधाचे गुलाम झालेल्या
माझ्या संमोहित शब्दांनी
तुझ्या नाजुक भावनांचा
वेध घेतला
अन्...
माझं निष्पाप प्रेम,
ते जादुई क्षण,
वचनं....शपथा,
हे सारं विसरून
तू लक्षात ठेवलेस
फक्त माझे अर्थहीन शब्द
अन् झिडकारून निघून गेलीस
तेव्हा पासून
अहिल्येसारखं
शिळेचं आयुष्य जगत
नसांनसांत भिनलेल्या
तुला जगवतोय
अहिल्येसारखा मलाही उ:शाप आहे
...की माझ्याही भाळी लिहीलंय
अश्वत्थाम्यासारखं वणवण भटकणं ?
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मी पहिली Nice One
मी पहिली
Nice One दा!!!!!!!!!
छान
छान
प्रकाटाआ!
प्रकाटाआ!
व्यथा जाणवतेय
व्यथा जाणवतेय कवितेतून
--------------------------------------------------------------------
शेवटच्या दोन ओळी नसत्या तर अधिक प्रभावी वाटली असती.
वैयक्तिक मत..... चुकलंही असेल कदाचित.
भिडेकाकांशी सहमत.....
भिडेकाकांशी सहमत.....
उल्हासला अनुमोदन. शेवटच्या
उल्हासला अनुमोदन.
शेवटच्या दोन ओळी सोडून, कविता अत्यंत उल्लेखनिय.
कविता छान आहे. शेवच्या २
कविता छान आहे.
शेवच्या २ ओळीशी काकांशी सहमत.
नसांनसांत भिनलेल्या तुला
नसांनसांत भिनलेल्या
तुला जगवतोय>>> व्वा! तुला जगवतोय हे खरच सॉलिड आलंय!
शेवटच्या ओळी असल्या तरी काय? असो!
कविता टोन मेन्टेन करत आहे.
कल्पनाविलास फार आवडला.
-'बेफिकीर'!
भिडे काकांना १०००%
भिडे काकांना १०००% अनुमोदन..
अप्रतिम जमली आहे, मलाही वाटलं की, शेवटच्या ओळी नसतील तर अधिक प्रभावी वाटेल..
मंदार, छानच जमली आहे. आवडली.
मंदार, छानच जमली आहे. आवडली.
अहिल्येसारखा मलाही उ:शाप आहे
...की माझ्याही भाळी लिहीलंय
अश्वत्थाम्यासारखं वणवण भटकणं ? >> या ओळी विशेषच आवडल्या. तुझी कविता आणि तुझंच चॉइस, पण इथेच थांबला असतास तर खरंच जास्त प्रभावी वाटला असता शेवट.
क्रोधाचे गुलाम झालेले
क्रोधाचे गुलाम झालेले शब्द
वाह..!
अप्रतिम........
अप्रतिम........
खुप छान मंदारदा
खुप छान मंदारदा
सर्वांना धन्यवाद. आवश्यक बदल
सर्वांना धन्यवाद. आवश्यक बदल केला आहे.
सुंदर्,,शेवटच्या ओळी वाचायला
सुंदर्,,शेवटच्या ओळी वाचायला मिळाल्या असत्यातर बर झाल असतं.
छानै!!
छानै!!
छान आहे.
छान आहे.
@ विभाग्रज, तुम्हाला विपू
@ विभाग्रज, तुम्हाला विपू केली आहे.
वि'भा'ग्रज असावे ते!
वि'भा'ग्रज असावे ते!
मस्त कविता. हे तुझ्यासाठी.
मस्त कविता. हे तुझ्यासाठी. :)उत्तम कवितेबद्दल. अशाच अजून येऊदेत, म्हणून प्रोत्साहनात्मक बक्षीस.
मला तर शेवट्च्या दोन ओळीच
मला तर शेवट्च्या दोन ओळीच जास्त आवड्या. पण मी काही तज्ज्ञ नाही त्यामुळे हेमावैम....
कविता आवडली, पण शेवटच्या दोन
कविता आवडली, पण शेवटच्या दोन ओळीत जरा गडबड आहे.
अहिल्या एकाजागी पडली होती, तर अश्वत्थामा भटकत होता.
अहिल्येला तिने अजाणतेपणी केलेल्या कृत्याची शिक्षा मिळाली तर अश्वत्थाम्याला जाणतेपणी केलेल्या अपराधाची शिक्षा मिळाली.
@ दिनेशदा, तुमचं अगदी बरोबर
@ दिनेशदा, तुमचं अगदी बरोबर आहे.
चूक ती चूकच, मग जाणतेपणी घडली असो वा अजाणतेपणी. पण इथे भर शिक्षेच्या तीव्रतेवर आहे. मला वाटतं शिक्षा जरूर असावी, पण ती अश्वत्थाम्याला मिळालेल्या शिक्षेसारखी कायमची आणि जीवघेणी नव्हे. शिक्षेवर उ:शाप जरूर असावा.
आवड्ली
आवड्ली
छान आहे कविता.
छान आहे कविता.
मस्त मस्त मस्त! येऊदेत आणखी
मस्त मस्त मस्त! येऊदेत आणखी अशाच आशयपूर्ण कविता
खूप शुभेच्छा.
अहिल्या एकाजागी पडली होती, तर
अहिल्या एकाजागी पडली होती, तर अश्वत्थामा भटकत होता.>>> दिनेशराव, यालाच टेंपरामेन्ट इन पोएट्री म्हणतात बहुधा!
छानै रे मंदार कविता.. आवडली
छानै रे मंदार कविता.. आवडली
छानच.
छानच.
बेफी, इथे महत्व उ:शाप
बेफी, इथे महत्व उ:शाप असण्याला आहे. कोण कुठल्या अवस्थेत होतं, एके जागी होतं की वणवण फिरत होतं याला नाही.
त्यामुळे ही दोन उदाहरणे योग्यच आहेत.
Pages