भारतीय लोकसंगीत

Submitted by माधव on 12 October, 2011 - 02:07

प्रत्येक देशाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे त्या देशाचे लोकसंगीत. भारताला तर लोकसंगीताची समृध्द परंपरा आहे. भारतीय अभिजात संगीताचा उगम या लोकसंगीतामधूनच झाला. पण दुर्दैवाने वाढत्या नागरीकरणाबरोबर शहरातल्या माणसांची या संगीत प्रकाराशी फारकत होत गेली. आज मला महाराष्ट्रातल्याच लोकसंगीताची पुरेशी ओळख नाही. मराठी लोकसंगीत म्हटले की फक्त लावणी आणि कोळीगीतेच समोर येतात. पोवाडा, भारुड, गोंधळ असे अनेक प्रकार आज सहसा ऐकू येत नाहीत. वासुदेवगीते, ओव्या हे प्रकार तर त्यापेक्षाही दुर्मिळ.

लोकसंगीताचे शब्द, त्यांचे अर्थ, लोकसंगीताचे प्रांतवार प्रकार आणि त्यांचे संदर्भ, आज बाजारात उपलब्ध असणारे ध्वनीमुद्रीत पण अस्सल (अनुराधा पौडवालांच्या आवाजातले नव्हे) लोकसंगीत या सर्वांची चर्चा करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना सस्नेह आमंत्रण.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोभा गुर्टू : राजस्थानी लोकगीत : म्हारो मद छकियो घर आयो

आधी रात तारा गिणू
म्हारो आयो नही भरतार
हो सेज छोडी झटपट उठी
म्हारो कुण खडकायो द्वार

म्हारो मद छकियो घर आयो
हां जिणरे नैणा में रंग रस छायो
म्हारो मद छकियो घर आयो

बोलो भंवर जी थाने किण बिलमाया
किण सौतण रै मन थै भाया
मैं सोला सिणगार रचाया
हां, मैं सोला सिणगार रचाया

थै गलियां में भटका खाया
हां म्हारो गबरल रो व्रत काम आयो

मैं थारी बगिया री फुलवारी
म्हाने भुल्या सो सौंध तुम्हारी
जौ थै चाहो मैं कर द्यूली
प्यास बुझा थारो मन भर दूली
हां फैरु और कठिने मत ज्यायो

म्हारो मद छकियो घर आयो

माधव त्या गुजराती गरबा गीताचे हे शब्द :

खम्मा मारा नंदजी ना लाल
मोरली क्यां रे वगाडी

हूँ तो रे सूती थी मारा शयन भवन मां
सांभळ्यो मोरली नो राग
मोरली क्यां रे वगाडी

खम्मा मारा नंदजी ना लाल
मोरली क्यां रे वगाडी...

भर नींदर माथी झबकी ने जागी
भूली गई हूँ तो भान शान

मोरली क्यां रे वगाडी

खम्मा मारा नंदजी ना लाल
मोरली क्यां रे वगाडी.

(काहीशा वेळानेच हा धागा पाहिला. बाहेरगावी भटकंती आणि कामानिमित्य नेटपासून दूर असल्याने.)

सकाळचे ११.०० वाजले, आकाशवाणी मुंबई "कामगारसभा" आणि त्यापाठोपाठ येणारी उदघोषकाची [बहुधा उदघोषिकाच असायची] 'कामगारांसाठी' अशी सूचना आणि मग कानावर येत असे ती दिनकर अमेंबल यानी स्वरबद्ध केलेली ती श्रवणीय अशी सिग्नेचर ट्यून. आजही रेडिओला चिकटून बसलेले दिवस आठवतात. स्वागतासमवेत सुरू होत असलेली ती लोकसंगीताची सफर.

मूळचे मंगलोरवासी आणि नंतर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे पदवीधर दिनकरराव अमेम्बल याना हार्मोनियन आणि व्हायोलीन या दोन वाद्यांनी वेड लावले होते आणि त्यावरील प्रभुत्वावर मुंबई आकाशवाणीवरील त्यांचा स्टेशन डायरेक्टरपर्यंतचा प्रवास, त्या प्रवासात आकाशवाणीच्या सर्व केन्द्रासाठी शेकड्यांनी तयार केलेल्या अनेकविध सिग्नेचर ट्यून्स, मर्ढेकरांच्या आकाशवाणी श्रुतिकांना चढविलेला त्यानी साजेसा संगीत साज. ही जादुमय इतिहास आहे, जो आकाशवाणीने जपला आहे.

अकरा ते साडेअकराच्या त्या अर्ध्या तासात आम्ही उत्सुकतेने वाट पाहायचो ते कधीतरी "वारियाने कुंडल हाले, डोळे मोडित राधा चाले" तसेच "दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई" ह्या एकनाथी भारुडांची. दशरथ पुजारी, प्रल्हाद शिंदे, उमप, अमर शेख (वाटवे होते पण ते भावगीतात) आदी अनेकांच्या आवाजातून संत एकनाथांच्या अशा रचना मजेशीर वाटत. संत म्हटले की 'विठ्ठल विठ्ठल' असे जे चित्र येत असे त्याला छेद जातो तो त्यांच्या अशा भारूड रचनेतून. "नणंदेचं कारटं किरकिर करतं, खरूज होई दे त्य़ाला ।सत्वर पाव गं मला, भवानी आई, रोडगा वाहिन तुला" ~ ह्या ओळी एका संताने लिहिल्या असतील यावर प्रथमवाचनी विश्वास बसत नसे.

भारुड हे एक जबरदस्त लोकजागृतीचे माध्यम असूनही कालौघात भारूड म्हणजे 'निरर्थक बडबड' असा जो समज इथे रुजला तो खरंच दुर्दैवी म्हटला पाहिजे.

असो. एक चांगला अभ्यासू विषय चर्चेला आला आहे असे म्हणतो.

अशोक पाटील

भारतातील प्रत्येक प्रांतातील लोकसंगीत परंपरा, लोकसंगीतातील वाद्ये, महाकाव्यांची लोककलांमधील रूपे हा खरंच मोठ्या संशोधनाचा व कुतुहलाचा विषय आहे. आपल्याला त्यांविषयी जास्त माहितीही नसते.

राजस्थानी लोकसंगीताविषयी ही खालील माहिती लोकसत्तामधून साभार :

सारंगी हे आपल्याकडचे साथीचे प्रमुख वाद्य. सारंगीच्या उगमाचा शोध घेणार्‍या पाश्चात्त्य अभ्यासकांना राजस्थानी ‘कमायचा‘ आणि ‘लोकसारंगी‘त आजच्या रागदारी सारंगीचे मूळ दिसले.

राजस्थानातील अलवार जिल्ह्यात ‘भरणी‘ नावाचे तालवाद्य आहे. एका भांड्यावर तांब्याची पट्टी उलटी चिकटवून हे वाद्य तयार केले जाते. लाकडी काड्यांच्या मदतीने ते वाजविले जाते. राजस्थानी लोककलाकारांनी आपल्याकडील ‘अपना उत्सव‘ वगैरे मेळाव्यांमध्ये किंवा युरोप-अमेरिकेत कार्यक्रम सादर केले तेव्हा ‘करताल‘ वाजविणारा कलाकार उत्स्फूर्त दाद घेऊन गेला. ‘करताल‘ तालाचे आणि लयीचे सूचन करणारे वाद्ये. ते वाजविणारा अत्यंत रुबाबात रंगमंचावर वावरत असतो आणि त्याच्या हालचाली, हावभाव पाहणे हाच एक मोठा अनुभव असतो. लंगा आणि मांगणियार या जातीच्या संगीतकारांच्या संगीताची ताकदही फार मोठी आहे.

राजस्थानातील ही बहुतेक सर्व लोकसंगीतकार कुटुंबे इस्लामची उपासना करणारी आहेत. मुस्लिम असूनही त्यांच्या दैनंदिन जीवनात संगीताला इतके स्थान कसे, असा प्रश्न पडला तर त्याचे उत्तर असे की, या भागातील ९९ टक्के मुस्लिम तलवारीच्या जोरावर नव्हे तर सूफी मतामुळे इस्लामकडे वळले आहेत. इथे जोगी मुस्लिम असतात, ते ‘पांडवों का कारा‘ गातात. म्हणजे महाभारतच की! लोकसंगीतामुळे बाहेरचे बरेच काही सामावून घेण्याची क्षमता इथल्या इस्लामला लाभली.

लोकगीताचा मूळ हेतू कलानिर्मिती हा नसून हे फंक्शनल म्युझिक असते. उदा. ‘मोरचून‘ हे वाद्य धनगर मंडळी गुरांना बोलाविण्यासाठी वाजवतात. ‘हीर रांझा‘ ही प्रेमकहाणी आहे असा आपला समजे. पण इथे ती गायली जाते गाई-म्हशींना झालेले रोग बरे करण्यासाठी. ‘देवदास‘च्या ताज्या आवृत्तीत ‘डोला‘ नावाचे गीत होते. उत्तर प्रदेशात ‘डोला‘ गायला की, गाणार्‍याचे हमखास लग्न ठरते असा समज आहे. जन्म, विवाह आणि मृत्यूच्या प्रसंगी गायल्या जाणार्‍या विविध गाण्यांमध्ये विलक्षण साम्य आढळते, आणि त्याचे कारण शोधताना आयुष्याविषयीचे चक्राकार आकलन हे तथ्य समोर येते.

अशोक, मस्त माहिती. ती भारूड, गोंधळ वगैरे ऑडीओ रुपात कुठे मिळू शकतील का अजूनही?

अरुंधती मस्त संग्रह होत चालला आहे या धाग्यावर तुझ्यामुळे Happy

वेगवेगळ्या पारंपारिक खेळांच्या वर्णनाच्या, रामलीला, कृष्णलीलांच्या माध्यमातून एकनाथांनी फार सुरेख प्रबोधन व निरुपण केले आहे. खेळांचे रुपक वापरून अतिशय सोप्या भाषेत परंतु गहन अर्थाचे तत्त्वज्ञान त्यांनी उलगडून दाखविले आहे.

टिपरी

लपंडाई

लगोरी

भोंवरा

एकीबेकी

सुरकांडी

हमामा

हुतुतु

पटपट सावली

चिकाटी

विटीदांडू

उमान

काला

पींपळी - राजस्थानी लोकगीत

पींपळी विरह लोक गीत

बाय चाल्या छा भंवर जी पींपळी जी
हांजी ढोला हो गई घेर घुमेर
बैठण की रूत चाल्या चाकरीजी
ओजी म्हारी सास सपूती रा पूत
मत ना सिधारो पूरब की चाकरी जी ।। स्थाई ।।
परण चाल्या छा भंवर जी गोरड़ी़ जी
हांजी ढोला हो गई जोध जवान
विलसण की रुत चाल्या चाकरी जी
ओ जी म्हारी लाल नणद बाई रा बीर

मत ना सिधारो पूरब की चाकरी जी ।।
कुण थांरा घुड़ला कस दिया जी
हांजी ढोला कुण थानै कस दीनी जीन
कुण्यांजी रा हुकमा चाल्या चाकरी जी
ओजी म्हारे हिवड़ा रो नौसर हार
मत ना सिधारो पूरब की चाकरी जी ।।
रोक रुपैया भंवर जी मैं बणूं जी
हां जी ढोला बण ज्याऊं पीळी पीळी म्होर
भीड़ पड़ै जद सायबा बरत ल्योजी
ओजी म्हारी सेजां रा सिणगार
पिया की पियारी ने सागे ले चलो जी ।।
कदेई नां ल्याया भंवर जी चूनड़ी जी
हां जी ढोला कदेई ना करी मनवार
कदेई नां पूछी मनड़ै री बारता जी
हां जी म्हारी लाल नणद रा बीर
थां बिन गोरी नै पलक ना आवड़ै जी
बाबोसा नै चाये भंवर जी, धन घणों जी
हां जी ढोला कपड़े री लोभण थारी माय
सैजां री लोभण उडीकै गोरड़ी जी
हां जी थारी गोरी, उड़ावै काळा काग
अब घर आओ, धाई थारी नौकरी जी ।।
चरखो तो लेल्यो भंवर जी रांगलो जी
हां जी ढोला पीढ़ो लाल गुलाल
मैं कातूं थे बैठ्या बिणजल्यो जी
ओजी म्हारी लाल नणद रा बीर
घर आओ प्यारी ने पलक ना आवड़ै जी ।।
सावण सुरंगों लाग्यो भादवो जी
हां जी कोई रिमझिम पड़े है फुहार
तीज तिंवारा घर नहीं बावड़्या जी
ओजी म्हारा घणा कमाऊ उमराव
थारी पियारी नै पलक ना आवड़ै जी ।।
फिर-घिर महिना भंवर जी आयग्या जी
हाँ जी ढोला हो गया बारा मास
थारी धण महला भंवर जी झुर रही जी
हाँ जी म्हारे चुड़ले रा सिणगार
आच्छा पधारया पूरब की नौकरी जी
उजड़ खेड़ा भंवर जी फिर बसे जी
हाँ जी ढोला निरधन रे धन होय
जोबन गयां पीछे नांही बावड़े जी
ओजी थाने लिख हारी बारम्बार
ओजी घर आओ थारी धण एकली जी ।।
जोबन सदा नां भंवर जी थिर रवे जी
हाँ जी ढोला फिरती घिरती छाँव
कुळ का तो बाया मोती नीपजे जी
ओ जी थारी प्यारी जोवै बाट
जल्दी पधारो गोरी रे देस में जी ।। स्थाई ।।

हिचकी : प्रख्यात पारंपारिक राजस्थानी लोकसंगीताचा प्रकार : गायक लंगा मांगणियार जमातीचे आहेत.

आलिजो चितारे बैरण आवे हिचकी

हे लता मंगेशकर यांनी गायलेलं पिंजरा चित्रपटातील रूपांतरित हिचकी गाणं.

भूंगर खां मांगणियार यांच्या आवाजातील मूमल राजस्थानी लोकगीत

मूमल आणि महेंद्र यांची प्रेमकथा ही पश्चिम राजस्थानाच्या अमर प्रेमकथांपैकी एक. मूमल नावाची ही स्त्री म्हणे एवढी सुंदर होती की तिच्या अचानक झालेल्या दर्शनामुळे अगोदर विवाहित असलेल्या महेंद्राला बाकीच्या सर्व बंधनांचा विसर पडला आणि तो तिच्या प्रेमाच्या पाशात बांधला गेला. गीतात मूमलच्या सौंदर्याचे वर्णन केले गेले आहे.

काळी रे काळी काजळियै री रेखडी रे
हांजी रे, काळोडी कांठळ मे चिमकै बीजळी
म्हारी बरसाळै मूमल, हालै नी ए आलीजै रै देस

न्हायो मूमल माथोलियो रे मेट सूं
हांजी रे, कडिया तो राळ्या मूमल केसडा
म्हारी जगमीठी मूमल, हालीजै रै देस

सीसडळो मूमल रो सरूप नारेळ ज्यूं
हांजी रे, केसडला माडेची रा बासग नाग ज्यूं
म्हारी हरियाळी ए मूमल, हालै नी ए अमराणै रे देस

होटडला मूमल रा रेसमियै रै तार ज्यूं
हांजी रै, दांतडला ऊजळदंती रा दाडम बीज ज्यूं
म्हारी हरियाळी ए मूमल, हालै नी ए अमराणै रै देस

पेटडलो मूमल री पींपळियै रै पान ज्यूं
हांजी रे, हिवडलो मूमल रो सांचै ढाळियो
म्हारी नाजुकडी मूमल, हालै नी ए रसीलै रै देस

जांघडली मूमल री देवलियै री थांभ ज्यूं
हांजी रे, साथडली सपीठी पींडी पातळी
म्हारी माडेची मूमल, हालै नी ए आलीजै रै देस

जायी रे मूमल इए लोद्रवाणै रै देस में
हांजी रे, माणी रे मूमल नै राणै महेंदरै
म्हारी जेसाणै री मूमल, हालै नी ए अमराणै रे देस

परदेशी असलेल्या पतीच्या विरह व्यथेत पत्नी गाते ते भैरवी रागावर आधारित प्रसिद्ध राजस्थानी लोकगीत : म्हारो जलालो विलालो घर आओ सी

डॉलर निंबूडाकरता आणि अकु सगळ्याच पोस्टींकरता धन्यवाद.

खूप पुर्वी घुमर पाहिले होते. बरेच वेगवान होते. पण तू दिलेल्या लिंकमधले बरेच स्लो आहे. खरे घुमर कसे असते मग?

माधव, स्लो मधून शेवटी शेवटी वेगवान होत जात असावेत. परवा एक यूट्यूबवरची लिंक बघत होते. युरोपमधील एका महोत्सवात सादर केलेले राजस्थानी लोकगीत प्रकार होते ते... त्यात त्यांनी बर्‍यापैकी वेगवान गीते, नृत्य प्रकार निवडले होते. शोधते व सापडली लिंक की देते इथे...

हां सापडली... रंगीला (बेल्जियम येथील सादरीकरण)

घूमरचे वेगवान सादरीकरण.

लोकपरंपरेतील कबीर....कबीरानंतर त्याची परंपरा चालविणारे अनेक कवी लोकसंस्कृतीत होऊन गेले. आजही आहेत. निर्गुणी भजने, कवने रचणारे. कबीराचा हा संप्रदायच म्हणायचा! कबीराच्या काव्याचे स्थानिक भाषांमध्ये, त्याच्या संदेशाचे आपल्या बोलीत रूपांतर करून स्वरचित कवने गाणार्‍यांची ही परंपरा.
ह्यातीलच एक लोकगीत गायक मुखत्यार अली. राजस्थानातील गायक. त्यांनी गायलेले हे आज तो हजारी हंसो पावणो रे एली

अरुंधती,
चीजांच्या धाग्यावर लिहिलं होतं ते 'तीज का गीत' कुठे मिळालं तर बघ ना!
शब्द काहीसे असे होते-
दळ बादळ बीच चमक्यो है तारा,
त्यो लगे प्रीतम ****** (हे शब्द आठवत नाहियेत) प्यारा |
आणि नंतरचं कडवं आठवत नाहिये- पण
ती नायिका आहे, तिला श्रावणातल्या रात्री ढगातूनच अचानक तारा दिसतो आणि तिचा प्रियकर जवळ नाही याची जाणीव अजून तीव्र होते. मग ती स्वतःलाच कोसते की 'का भांडलीस अशी त्याच्याशी? तूच भांडलीस ना? मग आता भोग हे पाप' असा आशय पुढल्या २ ओळीत व्यक्त झालाय.
कुमारांच्या 'माळवा की लोकधुने' मध्ये कदाचित असलं तर असेल. पण मला जालावर माळवा की लोकधुने सुद्धा सापडलं नाही.

चैतन्य, मला कुमारांच्या / कलापिनींच्या आवाजात नाही मिळाली लिंक. तेच गाणं आहे की हे वेगळंच आहे ते कळत नाहीए. पण रीचा शर्माच्या आवाजात मिळाली. (चाल पण वेगळी असणारच्च बहुतेक! :फिदी:)

विंड्स ऑफ राजस्थान नावाच्या अल्बममध्ये आहे हे गाणं.

दळ बादळ बिच चमक्ये जी तारा

(संपादित : कुमारांच्या गीतवर्षा भाग १ मध्ये आहे हे गाणं. चाल वेगळी आहे. बहुतेक शब्दही वेगळे असतील.)

नयो नयो मेहा नंतर आहे.

दळ बादळ बिच चमक्ये

दळ रे बादळ बिच चमक्ये (जी) तारा
साँझ पडे पियु (पिव) लागे जी प्यारा
(येहुरे जवाब करो रसियासे
जवाबे करौली तो पापे करौली)

काई तो मिजाज करो रसियां

दळ रे बादळ बिच चमक्ये जी तारा

जाब करौली मैं जवाब करौली
रसिये री सेजा में रिझ रहूँगी
काई तो जवाब तो करो रसियां

दळ रे बादळ बिच....

माथे हो रसकस बिंदली लीनो
बिंदली रो रस साजन लीनो
काई तो मिजाज करो रसियां

अर्र, आठवलं, बहुतेक गीतवर्षात आहे का हे गाणं.... चेक करते.
येस्स, गीतवर्षा भाग १ मध्ये आहे हे गाणं. मिळालं!!!

धन्स अरुंधती!
काय सुंदर आहे ते... मी राजस्थानी अजून ऐकलं नाहिये.
कुमारांच्याच गाण्याची मोहिनी इतकी आहे..!
पण ऐकेन नक्की!

अरुंधती मस्तच.

इथे मांगणियार बद्दल माहिती आहे. त्यात काही प्रसिध्द मांगणियारांची नावे पण दिली आहेत. आता त्यावरून काही सापडते का ते बघतो.

अकु - राजस्थानी, पंजाबी, गुजराती, वगैरे अनेक भाषा तू जाणतेस.... काही दिवसानी मला वाटतं मा बो वर तू इतर भाषात (तमिळ, तेलगू, इ.) लिहिलंस तरी आश्चर्य वाटणार नाही - का ऑलरेडी या सगळ्या भाषांमधले ब्लॉग्ज आहेत तुझे ???
हा धागा आहे मस्तच......

थँक्स माधव, मी पाहिलीच नव्हती विकीची ही लिंक.

चैतन्य, गूगलदेवांची कृपा!! Proud

शशांक, माझा इतर भाषांसाठी संबंध फक्त गाण्यांच्या शब्दांपुरता असतो हो! एखादं गाणं आवडलं (त्याची चाल, सुरावट, गायची पद्धत इ.) तर मग अर्थही जाणायची गरज नसते, पण तरी कुतूहल स्वस्थ बसू देत नाही. Happy

राजस्थानची कालबेलिया ही भटकी जमात त्यांच्या नाग-सापांना पकडून खेळविणे, त्यांचे गावोगावी खेळ करणे व आपल्या खास नृत्यासाठी व गीतांसाठी प्रसिद्ध आहे. त्यांचा वेशही रंगीबेरंगी, नजर खिळवून ठेवणारा. या जमातीत बायका - पुरुष दोघांनाही सर्प पकडण्याचे कौशल्य अवगत असते. पुरुष पारंपारिक वाद्ये - पुंगी, डफ, मंजिरा वाजवतात तर त्या तालावर बायका अतिशय बहारदार असे कालबेलिया नृत्य करतात. बायका घरोघरी जाऊन गाणी गाऊन, नृत्य करून लोकांचे मनोरंजन करतात व त्या बदल्यात पैसे, अन्न घेतात. बाजरीची रोटी आणि भाजी असा साधासा आहार असतो. सतत नवनवीन वेषभूषेचे व आपल्या कलाकारीत सफाई, नूतनता आणण्याचे या जमातीचे प्रयत्न असतात.

वेगवेगळ्या ऋतूंची वेगवेगळी गाणी असतात. फाग इथेही उत्साहात साजरा होतो. फाग-गीते जोशपूर्ण असतात. त्यात पती-पत्नींचे खटकेबाज संवाद, थट्टा यांचाही समावेश असतो. लूत गीतात बायको नवर्‍याला चिडवते, माझा साक्षर / पढा-लिखा पती अंधारात पत्र वाचतो बरं का! अंधारात वाचत असलेल्या पत्रात तो काय वाचतो - तर त्याला सार्‍या तरुणींची नावे वाचता येतात... अरे माझ्या साक्षर नवर्‍या, सांग बरं तू अंधारात पत्र कसं काय वाचतोस ते? Happy

युनेस्को द्वारा निर्मित ही कालबेलिया जमातीवरची एक सुंदर चित्रफीत.

आणि ही कालबेलिया जमातीची विकीवरची माहिती.

जोशपूर्ण कालबेलिया नृत्य

आणि हे आणखी एक : काल्यो कूद पड्यो मेला में

आणि हे त्याच नृत्याचं आणखी एक सफाईदार रूप.

राजस्थानी बाजूबंद गीत : मॉस्कोतील सादरीकरण

टूटे बाजूडा री लूम लड़ उलझी उलझी जाए
टूटे बाजूबंद री लूम लड़ उलझी उलझी जाए
कोई पंचरंगी लहेरिया रो पल्लो लहेराए
धीरे चालो नी बायरिया हौळे हालो नी बयारिया
झालो सहयो नही जाए

टूटे बाजूडा री लूम लड़ उलझी उलझी जाए
टूटे बाजूबंद री लूम लड़ उलझी उलझी जाए
कोई पंचरंगी लहेरिया रो पल्लो लहेराए
धीरे चालो नी बायरिया हौळे हालो नी बयारिया
झालो सहयो नही जाए

लागी प्यारी फुलवारी आतो झूम झूम जाए
ल्याई गोरी रो संदेशो घर आओ नी सजन
बैरी आंसुडा रो हार बिखर नही जाए
कोई चमकी री चुंदरी में सळ पड़ जाए
धीरे चालो नी बायरिया हौळे हालो नी बयारिया
झालो सहयो नही जाए
धीरे चालो नी बायरिया हौळे हालो री बयारिया
झालो सहयो नही जाए

* गाणे इला अरुण यांनी गायले आहे, शब्द थोडे वेगळे आहेत.
राजस्थानातील परंपरेत स्त्रिया आपल्या पतीचे नाव उघड घ्यायच्या नाहीत. त्या ऐवजी एखादा दागिना, कपडा दर्शवायच्या. बाजूबंद पुल्लिंगी म्हणून जेव्हा बाजूबंदाचा उल्लेख गाण्यात येतो तेव्हा त्याच्या आड पतीचा किंवा परिवारातील पुरुष आप्तांचा उल्लेख असतो. तर चूडी म्हणजे स्त्रीलिंगी, जो शब्द स्त्री आप्तांना दर्शवण्यासाठी वापरण्यात सांकेतिक रूपाने येतो.

राजस्थानातील परिवार म्हणजे प्रमुखतः लढवय्ये किंवा भटके कलाकार. त्या अनुषंगानेच तेथील लोकगीतेही आहेत.

हे एक प्रसिद्ध लोकगीत, जिथे आपल्या पतीला पत्नी तिच्यासाठी महागडा असा 'लेहरियो' घागरा पोशाख घ्यायला सांगत आहे. जेणेकरून राजपुताना परंपरेतील नवर्‍याच्या लढवय्या, राजेशाही व प्रबळ परिवारात तिला सामावून जायला अडचण येणार नाही. या गाण्यात बायको नवर्‍याच्या परिवारातील इतर पुरुष आप्तांच्या राजेशाही वीरगुणांची व शौर्याची प्रशंसा करते, तसेच स्त्री आप्तांचे कौतुक करते. माझा सासरा दिल्ली दरबारी आहे, सासू गढाची मालकीण आहे, जेठ घराचा मालक आहे, जेठाणी मालकीण, देवर जणू चांदण्यातील तारा तर देवराणी बिजली... आणि सर्वात शेवटी पतीची स्तुती.

राजस्थानी लहेरियो

हा आणखी एक लहेरियो.

इण लहेरिये रा नौ सौ रुपया रोकड़ा सा
म्हाने ल्याईदो नी बादिला ढोला लहेरियो सा
म्हाने ल्याईदो नी बाईसा रा बीरा लहेरियो सा
म्हाने ल्याईदो ल्याईदो ल्याईदो ढोला लहेरियो सा
म्हाने ल्याईदो नी बादिला ढोला लहेरियो सा

म्हारा सुसराजी तो दिल्ली रा राजवी सा
म्हारा सासूजी तो गढ़ रा मालक सा
इण लहेरिये रा नौ सौ रुपया रोकड़ा सा
म्हाने ल्याईदो ल्याईदो ल्याईदो ढोला लहेरियो सा
म्हाने ल्याईदो नी बादिला ढोला लहेरियो सा

म्हारा जेठजी तो घर रा पाटवी सा
म्हारा जेठानी तो घर रा मालक सा
इण लहेरिये रा नौ सौ रुपया रोकड़ा सा
म्हाने ल्याईदो ल्याईदो ल्याईदो ढोला लहेरियो सा
म्हाने ल्याईदो नी बादिला ढोला लहेरियो सा

म्हारो देवरियो तो तारा बिचलो चंदो सा
महरी द्योरानी तो आभा माय्ली बीजळी सा
इण लहेरिये रा नौ सौ रुपया रोकड़ा सा
म्हाने ल्याईदो ल्याईदो ल्याईदो ढोला लहेरियो सा
म्हाने ल्याईदो नी बादिला ढोला लहेरियो सा

म्हारा सायब्जी तो दिल रा राजवी सा
म्हें तो सायब्जी रे मनडे री राणी सा
इण लहेरिये रा नौ सौ रुपया रोकड़ा सा
म्हाने ल्याईदो ल्याईदो ल्याईदो ढोला लहेरियो सा
म्हाने ल्याईदो नी बादिला ढोला लहेरियो सा
म्हाने ल्याईदो ल्याईदो ल्याईदो ढोला लहेरियो सा

लांगा मांगणियारांनी गायलेलं हे चिरमी / चिर्मी लोकगीत.

चिरमी भोली म्हारी चिरमी
चिरमी रा डाळा च्यार
वारी जाऊ चिरमी ने

चिरमी बाबोसा री लाडली
आतो दोड़ी दौड़ी पीवर जाय
वारी जाऊ चिरमी ने

चढती ने दिखे मेड़तो
उतरती ने गढ़ अजमेर
वारी जाऊ चिरमी ने

म्हारी पीहरियारी रे चुनडी सा

म्हे तो ओडूं वार त्यौहार

वारि जाऊं चिरमी ने

ऊपर रे डाले म्हारा जेठजी सा
काईँ नीचले डाला भरतार
वारि जाऊं चिरमी ने

के वारि जाऊं चिरमी ने
के वारि जाऊं चिरमी ने
के वारि जाऊं चिरमी ने

* चिरमी हे एका वेलीच्या फुलाच्या बीजाला (गुंजा) म्हणतात. पण राजस्थानातील 'चिरमी' किंवा 'चिर्मी' चा संबंध 'बाबोसा री लाडली' लोकगीताशीच जास्त लावण्यात येतो. लोक आपल्या मुलींची नावेही 'चिरमी' ठेवतात.

Pages