मनाला भावलेले काही.
सध्या नाचाचे, गाण्याचे अनेक रीअॅलिटी शोज सुरू झालेले आहेत. लहान मुलांपासून थोरा मोठ्यांपर्यंतचे.
त्यातच अंदाज घुसवून 'आप गायकही नही , महाग्आयक हो' म्हणायला महाअंतिम फेर्या असतात. पण अशांमध्ये काही काही गाणी, नाच अगदी आवडून जातात. मला आवडलेले असेच काही.
काळ देहासि आला खाउ हे प्रथमेशने गायलेले गाणे. सुरूवातीची निलेशची ढोलकी वाजवतानाची दाद, तो अभंग, ताना आणि लय, आणि हृदयनाथांनी "आभारी आहे मी तुमचा. आनंद दिलात तुम्ही मला" असं म्ह्टल्यावर, भरून आलेले डोळे आणि आपोआप जोडलेले हात. चांगलेच लक्षात आहेत.
ख्वाजा मेरे ख्वाजा - श्रीराम.
अशी काही जादू आहे आवाजात की ब्बास !
त्याने शंकर महादेवन बरोबर गायलेले 'ब्रेथलेस' गाणेदेखील सुंदर होते.
दिल तो बच्चा है जी - रुतुराज महालिमने केलेला हा नाच त्यातल्या दोन गोष्टींसाठी - 'उम्र कबकी बरस के सुफेद हो गयी' आणि 'वल्ला ये धडकन बढने लगी है' या दोन वाक्यासोबतच्या स्टेप्ससाठी लक्षात आहे.
शिवानीचा हा नाच - त्यातल्या तिच्या 'ग्रेस'साठी लक्षात आहे.
तुमच्या लक्षात राहिलेले असे काही खास गाणी नाच आहेत का?
नंद्या, खूप आहेत. इथे दिल्या
नंद्या, खूप आहेत. इथे दिल्या तर चालेल ना ? सवडीने देते. असा धागा काढल्याबद्दल धन्यवाद
हो हो.. नक्कीच चालेल अगो. देच
हो हो.. नक्कीच चालेल अगो. देच तू.
मस्तय धागा. . मी जनरली हे शोज
मस्तय धागा. :). मी जनरली हे शोज बघू शकत नाही. त्यामुळे इथे दिलेले चांगले नाच आणि विशेषतः गाणी बघायला नक्कीच आवडेल.
एखादं गाणं पहिलल्यांदा ज्या
एखादं गाणं पहिलल्यांदा ज्या आवाजात ऐकलं त्याचा ठसा पुसून दुसर्या आवाजातलं गाणं तिथे उमटणे हे माझ्याबाबत सहसा होत नाही.
तरीपण पुष्कर लेले यांनी गायलेली कुमार गंधर्वांची गाणीआणि वसंतराव देशपांडेंच 'माझं ठरल्यालं लगीन मोडलं' लक्षात आहेत.
(No subject)
रोहित राऊत ने गायलेलं "मोरया
रोहित राऊत ने गायलेलं "मोरया मोरया" खूप आवडलं होतं. त्यात जी आर्तता होती ती मूळ गाण्यापेक्षा जास्त भिडली.
खूप आहेत लक्षात राहिलेले
खूप आहेत लक्षात राहिलेले पर्फॉर्मन्स
डाइंडा मधले काही :
सलमान -खुशबूचा 'जा रे हट नटखट' गाण्यावरचा साल्सा - बॉलिवुड गाण्यावर आणि स्स्ल्सा ? हा प्रकार तेव्हा प्रथम पाहिला मी . अप्रतिम एक्झिक्यूट केली आहे फ्युजन साल्सा ची आयडिया !!
http://www.youtube.com/watch?v=mSV5yTUBh60
डिआयडी मधलाच कृतीचा द्रौपदी वसत्रहरणावर केलेला भारतनाट्यम पर्फॉर्मन्स - तिने एकटीने युधिष्टीर, दुर्योधन, द्रौपदी, कृष्ण हे सगळे रोल जिवंत केलेत, ग्रेस्फुल अन फ्लॉलेस!!
http://www.youtube.com/watch?v=2FAddtcZ4Fw&feature=results_video&playnex...
लॉकिंग पॉपिंग प्रिन्स चा टिश्यू पेपर डान्स..!
http://wn.com/Prince_Tissue_Dance_Dance_India_Dance
डान्स ३:३० ला सुरु होतो
मैत्रेयी, शेवटचा बघून मला
मैत्रेयी, शेवटचा बघून मला रुतूराजचा हा डान्स आठवला.
वा, चांगला धागा. मी tv पहात
वा, चांगला धागा. मी tv पहात नाही, एकेक पाहिन, ऐकेन आता
>>ग्रेस्फुल अन फ्लॉलेस!! वॉव
>>ग्रेस्फुल अन फ्लॉलेस!!
वॉव !