Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
थाई व्हेज रेड करी ची ट्राईड
थाई व्हेज रेड करी ची ट्राईड अँड टेस्टेड रेसिपी कोणाकडे असेल तर प्लीज लिंक द्या.
थाई रेड करी पेस्ट तयार मिळते का (भारतात) ?
मवा, http://www.food.com/reci
मवा,
http://www.food.com/recipe/thai-red-curry-with-vegetables-63209
थाई करी पेस्ट मिळते भारतात. नाही मिळाली तर http://www.misalpav.com/node/9844
मवा, तरला दलालची खूप छान
मवा, तरला दलालची खूप छान पाककृती आहे थाई रेड करीची. पण हे पान संपूर्ण उघडतेय का बघ, बर्याचदा कही पाकृ सदस्यांसाठीच असतात फक्त.
थाई रेड करी पेस्ट तयार मिळते
थाई रेड करी पेस्ट तयार मिळते का (भारतात) ?>> हो. गोदरेज नेचर्स बास्केट मध्ये मिळेल कदाचित. तिथे किन्वापासून स्टारबक्सच्या कॉफीपर्यंत सगळे फिरंगी प्रकार मिळतात
अरे हे मी पाहीलेच नव्हते.
अरे हे मी पाहीलेच नव्हते. धन्यवाद सगळ्यांना. :). वीकेंड मेन्यू करायचा होता. पण मला जवळच्या दुकानांत नाही मिळाली आज. आता मोठ्या दुकानात / मॉल मध्ये बघेन. तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या लिंक्स मधून वाचून करुन बघेन.
केळफुलाच्या भाजीची कृती हवी
केळफुलाच्या भाजीची कृती हवी आहे. कृपया द्या. धन्यवाद.
इथे शोधल्यावर http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/57606.html?1111418041 लिंक मिळाली. पण तिथले वाचता येत नाही.
गजानन, इंटरनेट एक्स्प्लोरर
गजानन, इंटरनेट एक्स्प्लोरर मध्ये उघडलं की वाचता येतंय.
अकु, आय.ई. मध्ये दिसली.
अकु, आय.ई. मध्ये दिसली. धन्यवाद.
कोल्हापुरी कांदा लसूण
कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्याची रेसिपी सांगाल का ?
लालूने इथे लिहिली होती. सर्च
लालूने इथे लिहिली होती. सर्च मधे ते शब्द टाकून बघा.
मी बनविली होती थाई चिकन करी.
मी बनविली होती थाई चिकन करी. रेड करी पेस्ट ग्रीन करी पेस्ट गोदरेज नेचर्स बास्केट मध्ये मिळते. घरून लिहीते रेश्पी.
माझ्याइथे नाहीये गोदरेज
माझ्याइथे नाहीये गोदरेज नेचर्स बास्केट... निलगिरीज मध्ये मिळाली मला पेस्ट. पण त्याची मॅन्युफॅक्चरींग डेट २०१० डिसे> आहे आणि इंपोर्ट डेट आत्ताची.
ट्राय करेन २-३ दिवसात.
मी slow-cooker च्या रेसिपी
मी slow-cooker च्या रेसिपी शोधत होते इथे पण सापडल्या नाही. Internet वर आहेत भरपूर पण कोणी इथे असतील ट्राय केलेल्या तर चांगले.
मला मावे मध्ये चिकन
मला मावे मध्ये चिकन ग्रिल/रोस्ट करायचे आहे..यापुर्वी एकदाही केले नाहीये. कोणी केले असेल तर प्लीज रेसिपी सांगाल का?
सुप्रिता :
सुप्रिता : http://www.maayboli.com/node/2624 इथे बघा.
अ. कु. धन्यवाद!!
अ. कु. धन्यवाद!!
ओव्हनमधे हांडवो करायचा झाला
ओव्हनमधे हांडवो करायचा झाला तर टेम्परेचर काय ठेवायचे? मला गिट्सचे हांडवो पॅकेट फ्री आलय. त्याच्यावर त्यानी गॅसवर करायचीच कृती दिली आहे.
नंदिनी इथे आश या आयडीने
नंदिनी इथे आश या आयडीने लिहीलेली कृती आहे बेक्ड हांडवोची. त्यात असेल तापमान, बहुदा ४०० फॅ म्हणजेच साधारण १८० से. असावे पण तू परत एकदा तपासून घे.
मला कोणि कोल्हापुरि पांढरा
मला कोणि कोल्हापुरि पांढरा रसाचि रेसेपि सांगेल का?
डोनट्स कसे बनवायचे ,कुणाला
डोनट्स कसे बनवायचे ,कुणाला माहीत आहे का?
पेरुची कोशिंबीर कशी करायची?
पेरुची कोशिंबीर कशी करायची?
निकिता :
निकिता : http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/122194.html?1169991256 इथे पहा. मायबोलीत ''सर्च'' हा ऑप्शन आहे. तुम्हाला ज्या पदार्थाची पाकृ हवी आहे त्याचे नाव सर्चमध्ये टाईप केले की इथे जर ती पाकृ असेल तर त्याची लिंक दिसते.
मी केल होतं सर्च. पण स्गळिकडे
मी केल होतं सर्च. पण स्गळिकडे हलव्याची रेसिपी मिळाली म्हणुन मग विचारल
आभारी आहे
निकिता, पेरूच्या बिया वगळून
निकिता, पेरूच्या बिया वगळून फोडी करुन त्यावर तिखट, मीठ टाकायचे किंवा चाट मसाला टाकायचा.
दह्यात घालून (पेरू पिकलेला पाहिजे) हिरवी मिरची व मोहरी वाटून लावून पण करता येते. पेरु किसून शिकरण करता येते (सर्व प्रकारात बिया वगळायच्या.)
मोठ्या पोपटी मिरच्यांची भजी
मोठ्या पोपटी मिरच्यांची भजी कशी करतात ? नेहेमीसारखी का ?
गोव्यात ती आतमधे बटाट्याचे
गोव्यात ती आतमधे बटाट्याचे सारण भरुन करतात. त्याला मिर्चीवडा म्हणतात तिथे. त्या मिरच्या तश्या तिखट नसतात, म्हणून सारण जरा जास्त तिखट / आंबट करायचे.
तुम्हाला ज्या पदार्थाची पाकृ
तुम्हाला ज्या पदार्थाची पाकृ हवी आहे त्याचे नाव सर्चमध्ये टाईप केले की इथे जर ती पाकृ असेल तर त्याची लिंक दिसते.
ज्या पाकृ सर्वसामान्य पब्लिकसाठी असतात त्याच सर्चमध्ये येतात. बरेच लोक पाकृ टाकतात पण धागा सार्वजनिक करायला विसरतात. त्यामुळे कितीही शोधले तरी पाकृ सापडत नाही. मी तर कित्येकदा पाकृ कोणी टाकलेली ते आठवुन त्या सदस्याच्या पाऊलखुणांमध्ये शोधते. सर्चमध्ये नेमके हवे ते सोडुन इतर सगळे सापडते.
पेरुच्या बिया कशा वगळायच्या
पेरुच्या बिया कशा वगळायच्या
निकिता, पेरूच्या फोडी करताना
निकिता,
पेरूच्या फोडी करताना बाहेरचाच भाग घ्यायचा. पिकलेल्या पेरुत तो भाग आपोआप वेगळा होतो. तो किसताना बारिक भोकाची किसणी घ्यायची. बिया किसणीच्या वरच राहतात.
गोव्यामधे जे गावा चीज करतात त्यासाठी पेरु उकडून, फडक्यावर झारून घेतात.
आग्री लोकांच्या लग्नात असते
आग्री लोकांच्या लग्नात असते ती चवळीच्या की सफेद वाटाण्याच्या उसळीची/भाजीची रेसीपी मिळेल का? फार पातळ पण नाही नी एकदम सुकी पण नाही अशी अस्ते ती. पानात राहण्याइतपत. त्यांचा मसाला वेगळा असतो का? मी बरेच मसाले बदलुन ट्राय केली पण तशी चव येतच नाही.
Pages