हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुराष्ट्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकर !

Submitted by विशाल कुलकर्णी on 12 October, 2009 - 07:16

स्वा. सावरकरांचे आजवर वाचलेले साहित्य, आंतरजालावर उपलब्ध माहिती आणि इतरही काही संदर्भ वापरुन हा लेख संकलीत केला होता. अर्थात त्यामुळे हा लेख मी लिहीलाय असे म्हणता येइल की नाही कुणास ठाऊक. पण स्वातंत्र्यवीरांचे विचार संकलित करण्याची मेहनत मी जरुर घेतली आहे. हा लेख माबोच्या दिवाळी अंकासाठीदेखील पाठवला होता. पण कुठल्याशा कारणाने (नियमात बसत नसल्याने असेल कदाचित) तो तिथुन साभार परत आला. तेव्हा तो इथे टाकत आहे. धन्यवाद.

..............................................................................................................................................

"आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: I I "

सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू! सिंधुपासुन सिंधुपर्यंत, अर्थात सिंधुनदीपासुन ते सिंधु म्हणजे सागरापर्यंत पसरलेली ही भुमी म्हणजे हिंदुभुमी आहे आणि प्रत्येक व्यक्ती ,जो कुणी या भुमीला केवळ आपली पितृभुमीच नव्हे तर पुण्यभुमीही मानतो तो हिंदु!मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेना का! मुळात हिंदु हा केवळ एक धर्म नाहीच आहे, तर ती एक जिवनप्रणाली आहे. 'हिंदुधर्म' हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष नि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची नि पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी नि पुण्यभूमी आहे त्या सार्‍यांना समावेशिणार्‍या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे.!

हे आमचे एकजीवन आज ज्या एकाच शब्दात नवीन व्याख्येप्रमाणे व्यक्तविता येते तो अनन्य शब्द आहे 'हिंदू' ! या शब्दाच्या 'हिंदू' या दोन अक्षरांत अगस्तीच्या अंजलीत महासागर तसे तीस कोटी लोकांचे राष्ट्रचे राष्ट्र सामावलेले आहे.किती सार्थ आणि योग्य शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदु या शब्दाची महती, त्याचा योग्य अर्थ सांगितला आहे. हिंदु या संकल्पनेची व्यापकता, तिचा विस्तार केवढ्या समर्पक शब्दात मांडले गेल आहे इथे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते आपल्या वंशाच्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला व आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि जवळ जवळ पाळण्यातले नाव निवडले ते सप्तसिंधू अथवा हप्त हिंधू आहे. सिधु नदीच्या समृद्ध खोर्‍यात राहणारे ते सिंधू. आणि इतर जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे आपणांस ह्याच सिंधू किंवा हिंदू याच नावाने ओळखत असत. बर्‍याचदा असे म्हणले जाते की हिंदु हे नाव किंवा हा शब्द आपल्याला अरबांकडुन मिळाला. पण सावरकरांच्या मते हिंदू हा शब्द आपणांस अरबांनी दिलेला नाही. प्रेषित महंमदाच्या जन्मापूर्वी, नव्हे अरब हे एक 'लोक' म्हणून ओळखले जाण्यापूर्वीदेखील हे प्राचीन राष्ट्र आपणांकडून व इतरांकडून सिंधू वा हिंदू ह्या स्वाभिमानी नावाने ओळखले जात होते. अरबांनी सिंधू नदीचा शोध लावला हे म्हणणे जितके खरे तितके अरबांनी ह्या शब्दाचा शोध लावला हे म्हणणे आहे

हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्

हिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्‍या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो.

स्वातंत्र्यवीर अगदी ठामपणे प्रतिपादन करतात की हिंदुत्व हा केवळ एक शब्द नव्हे, तर तो इतिहास आहे. ते मनापासुन समग्र हिंदु बांधवाना आवाहन करतात की अग्निहोत्री ब्राह्मण ज्याप्रमाणे यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित ठेवतो त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करुन ठेवा. योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल

हिंदुत्व का हवे? त्याचा आपल्याला काय फायदा होवु शकेल हे विषद करताना स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात कीं असा एक दिवस जरुर उगवेल किं समग्र मनुष्यजातीस ह्या शक्तीस (हिंदुत्व) तोंड द्यावे लागेल .हिंदुस्थानाला पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे, असा इतिहास असणारे व समान रक्त व संस्कृती ह्यांनी बांधलेले कोट्यावधी लोक सर्व जगाला आपले म्हणणे अधिकारवाणीने सांगू शकतील. स्वातंत्र्यवीर एका आंतरिक अभिमानाने सांगतात की ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही हेही तितकेच खरे आहे. हिंदू जेव्हा हिंदू राहत नाही तेव्हा तो अत्यंत उत्कटपणे हिंदू असतो व शंकराप्रमाणे सर्व पृथ्वी वाराणसी मानतो. वाराणसी मेदिनी ! मानतो किंवा तुकारामाप्रमाणे 'आमुचा स्वदेश ! भुवनत्रयामध्ये वास ! ' असे उद्गारतो. हे बंधूंनो ! विश्वाच्या मर्यादा - तेथे माझ्या देशाच्या सीमा आहेत !

हिंदुस्थानात सुखाने नांदत असणार्‍या अनेक - नानाविध धर्मांविषयी बोलताना सावरकरांचा कंठ भरुन येत असे. त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर एक अलौकीक असे तेज, एक समाधान पाहायला मिळे. विश्व हिंदु परिषदेच्या एका सभेत बोलताना स्वातंत्र्यवीर म्हणाले होते.

"बहुसंख्य हिंदूंच्या धर्माला सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म अथवा वैदिक धर्म ह्या प्राचीन व मान्य संज्ञांनी संबोधिता येते. इतर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल. ह्यामुळे अर्थहानी होणार नाहीच, परंतु तो अधिक अचूक व नि:संदिग्ध होईल व आपल्या लहान समाजातील संशय व मोठया समाजातील राग दूर करुन आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्‍या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील..

इतर धर्मांप्रमाणे (उदा. मुस्लिम - कुराण, ईसाई- बायबल) हिंदुधर्माचे एक धर्मपुस्तक नाही हे चांगलेच आहे. कारण यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही. आमचे धर्मतत्वही कोणत्या पुस्तकाच्या दोन पुठ्ठयात सामावू शकणार नाही. ह्या विश्वाच्या दोन पुठ्ठयांमध्ये जितके सत्य नि ज्ञान विस्तृत पसरलेले आहे तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत होईल.

हिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाही. हिंदुधर्म नि:संशय सात्विक, क्षमाशील आहे. हिंदुधर्म क्रोधशीलही आहे. 'क्लैब्यं मा स्म गम: पार्थ' ही हिंदुधर्माची गर्जना आहे. 'अहिंसा परम धर्म:' ही ज्या हिंदुधर्माची व्याख्या आहे त्याच हिंदुधर्माची अगत्याची व तेजस्वी आज्ञा आहे की 'आततायिनमायान्तं हन्यादेवाविचारयन्' आणि त्या दोन्ही आज्ञांचा समन्वय, हिंदुधर्मच उत्तम प्रकारे लावू शकतो काही झाले तरी बुध्दिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय !"

आपल्या हिंदुत्वाच्या कल्पनेबाबतीत सावरकर अतिशय स्पष्ट आहेत. योग्य ते बदल स्विकारण्याची त्यांची तयारी आहे. त्यासाठी प्रसंगी आपली रुढी-परंपरा यांच्या चौकटी मोडायला देखील ते तयार असत हे त्यांच्या आचार विचारातुन ठामपणे स्पष्ट होत असे. रत्नागिरीतील पतित पावन मंदीर हे याचे स्पष्ट उदाहरण आहे. मानवाच्या, मानव्याच्या भल्यासाठी आपल्या रुढी परंपरा मोडायची, चौकटी तोडायची त्यांची नेहेमीच तयारी असे. धर्म आणि राष्ट्रधर्म या संकल्पना स्पष्ट करताना सावरकर सांगतात किं हिंदीधर्म हा कुठल्याही रुढी परंपरांमध्ये, तथाकथीत चौकटीत अडकुन राहणारा नाही. बदलत्या समाजाला पोषक होइल अशा पद्धतीने आपले स्वरुप बदलत राहणे हा हिंदुधर्माचा स्वभावच आहे. पण फक्त तुम्ही आमच्याकडुनच जर बदलण्याची अपेक्षा करत असाल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. जर मुस्लिम , ख्रिश्चन वा इतर बांधव त्यांची मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी 'त्वे' सोडीत असतील तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल.
अगदी याच पद्धतीने माझे राष्ट्रीयत्वही - हिंदीपणही मानवराष्ट्रात तेव्हा विलय पावेल जेव्हा इंग्लिशपण, जर्मनपण इत्यादीपणा लुप्त होऊन फक्त मानवता, मनुष्यपणा तेवढा जगात, मनुष्यमात्रात सुखेनैव नांदू लागेल ! आज देखील जो खरा मनुष्यवादी (humanitarian) असेल त्याच्यापुरते त्याच्याशी देखील मी सर्व भेदभाव सोडून वागेन.

स्वातंत्रवीर सावरकरांनी भविष्यकाळाचाही विचार करुन ठेवलेला आहे. ते म्हणतात कि एखाद्या भविष्यकाळी हिंदू हा शब्द केवळ हिंदुस्थानचा नागरिक वाचक होऊ शकेल. जेव्हा सर्व सांस्कृतिक व धार्मिक दुराग्रह आक्रमक गर्विष्ठपणाशी वचनबध्द असलेल्या शक्तीचे विसर्जन करतील व धर्म 'वाद' म्हणून न राहता ज्या समान पायावर मानवी राज्य ऐश्वर्याने व दृढपणे उभे राहील अशा पायाच्या मुळाशी असलेल्या चिरंतन तत्वांचा केवळ समान संचय म्हणून राहतील, तेव्हा हा दिवस उगवेल. भक्तिभावाने इच्छा करावी अशा ह्या सिध्दीची पहिली रेखासुध्दा क्षितिजावर दिसत नसताना कठोर वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल. जोपर्यंत धोकादायक युध्दघोषणांकडे झुकणार्‍या मतांचा त्याग इतर प्रत्येक वादाने केलेला नाही तोपर्यंत एकजीवता व सामर्थ्य निर्माण करणारी बंधने विशेषत: समान नाव व समान ध्वज ही बंधने शिथिल करणे कोणत्याही सांस्कृतिक वा राष्ट्रीय एकांकाला परवडणार नाही.

"हिंदुस्थान" या नावाबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांना अतिव आदर, अभिमान होता. ते अभिमानाने सांगत की आपल्या देशाचे सर्वात प्राचीन नाव, ज्याविषयी आपणापाशी आधार आहे, ते सप्तसिंधू वा सिंधू आहे. भारतवर्ष हे नावसुध्दा नंतरचे अभिधान आहे. आणि त्याचे आवाहन व्यक्तिविषयक आहे. मनुष्य कितीही महान् असो, जसजसा काळ जातो तसतसा त्याचा गौरव कमी कमी होत जातो.संस्कृतमधील सिंधू शब्दाने सिंधू नदीचाच नव्हे तर समुद्राचाही ,दक्षिण द्वीपकल्पाला परिवेष्टणार्‍या समुद्ररशनेचा बोध होत असल्यामुळे हा एक शब्द आपल्या देशाच्या जवळ जवळ सर्व सीमा दर्शवितो. हिंदुस्थान ह्या शब्दाने मुख्य राजकीय व सांस्कृतिक विधेय जितके वक्तृत्वपूर्णपणे प्रकट होते तितके आर्यावर्त, दक्षिणापथ, जंबुद्वीप आणि भारतवर्ष ह्या शब्दांनी होऊ शकत नव्हते.

आपल्या या पितृभुमीबद्दल सावरकर अतिव श्रद्धेने, आदराने स्पष्ट करतात की हिंदुस्थान आमची पितृभुमीच नव्हे तर पुण्यभूमी आहे. ही परम पावन भारतभूमी, हे सिंधुस्थान, सिंधूपासून सिंधूपर्यंतची ही भूमी आमची पुण्यभूमी आहे. ह्या भूमीत आमच्या धर्मविचारांच्या संस्थापकांना व ऋषींना वेदांचा साक्षात्कार झाला; वैदिक ऋषींपासून ते दयानंदापर्यंत, जिनापासून महावीरापर्यंत, बुध्दापासून नागसेनापर्यंत, नानकापासून गोविंदापर्यंत, बंदापासून बसवापर्यंत, चक्रधरापासून चैतन्यापर्यंत, रामदासापासून राममोहनापर्यंत आमच्या गुरुंनी व धार्मिक पुरुषांनी जन्म घेतला व ते वाढले. तिच्या मार्गातील धुळीत आमच्या प्रेषितांचे व गुरुंचे पदरव ऐकू येतात. तिच्या नद्या व तिची उपवने पवित्र आहेत. कारण चंद्रप्रकाशात त्यांच्या घाटावर किंवा सायंकाळच्या छायेत बुध्दाने किंवा शंकराने जीवन, मनुष्य, आत्मा, ईश्वर, ब्रह्म आणि माया ह्यांच्या गहन प्रश्नांवर वाद व चर्चा केली. प्रत्येक डोंगर व प्रत्येक वृक्षाच्छादित खोरे कपिलाच्या, व्यासाच्या, शंकराच्या व रामदासाच्या स्मृतीने भरलेले आहे. येथे भगीरथ राज्य करतो, येथे कुरुक्षेत्र आहे. वनवासाला जाताना रामचंद्राने पहिला विश्राम येथेच घेतला. तेथेच जानकीने सोनेरी हरिण पाहिला व त्याला मारण्याचा आपल्या प्रियकराशी प्रेमाने हट्ट घरला. ज्या बासरीने गोकुळातील प्रत्येक हृदय मोहनिद्रेत असल्याप्रमाणे एका लयीत नाचू लागेल अशी बासरी त्या दैवी गुराख्याने वाजविली. येथे बोधिवृक्ष आहे व येथे मृगवन आहे. येथेच महावीराला निर्वाण प्राप्त झाले. येथेच भक्तांच्या मेळाव्यात बसून 'गगन थाल रविचंद्र दीपक बने' ही नानकाने आपली आरती म्हटली. येथे गोपीचंद राजाने गोपीचंदजोगी होण्याची प्रतिज्ञा केली व भिक्षापात्र घेऊन मूठभर भिक्षेकरिता आपल्या बहिणीचे दार ठोठावले. येथेच हिंदू म्हणून मरण्याच्या अपराधाकरिता बंदा बहादुराच्या मुलाचे वडिलांच्या डोळयांसमोर तुकडे तुकडे करण्यात येऊन त्याचे हृदय वडीलांच्या तोंडात कोंबण्यात आले. येथील प्रत्येक दगड हौतात्म्याची कथा सांगू शकेल. हे माते ! तुझ्या भूमीचा प्रत्येक तसू यज्ञभूमी आहे. जेथे कृष्णसार सापडले तेथेच नव्हे तर काश्मीर ते सिंहल ही ज्ञानयज्ञाने पवित्र झालेली यज्ञीयभूमी आहे. म्हणून प्रत्येक हिंदूला, मग तो साधू असो वा संताळ ही भारतभूमी, हे हिंदुस्थान पितृभू आणि पुण्यभू आहे.

आपली हिंदुत्वाची व्यापक संकल्पना मांडल्यावर ते ठामपणे सांगतात की हिंदुस्थान हा हिंदूंचाच देश आहे. वस्तुत: जो समाज देशात बहुसंख्य असतो त्यांचाच तो देश मानला जाण्याची प्रथा सर्व जगात आहे. या नात्याने तर हिंदुस्थान हिंदूंचा आहेच; पण त्याशिवायही तो हिंदूंचा असल्याचे आणखी एक निश्चित गमक सांगता येईल. ते म्हणजे हिंदुस्थानच्या उध्दाराचा प्रयत्न कोणी केला ते पाहणे, हे होय. या देशाच्या स्वातंत्र्याच्या १८५७ पासून सुरु झालेल्या लढयात कोणी खरा त्याग केला ? - हिंदूंनी का मुसलमानांनी ?

ते पुढे स्पष्ट करतात की हिंदुस्थान ह्या नावाने अहिंदू बांधवांची मानहानी होत नाही, काही नुकसान होत नाही. चीनमध्ये कोटयावधी मुसलमान आहेत. ग्रीस, पॅलेस्टाईन इतकेच काय पण हंगेरी, पोलंडमध्येही त्यांच्या राष्ट्रघटकांत हजारो मुसलमान आहेत पण तेथे ते अल्पसंख्य, केवळ एक जाती आहेत. आणि त्या देशांना त्यांतील मोठया बहुसंख्येने असलेल्या वंशाची वसाहतस्थाने म्हणून रुढ असलेली प्राचीन नावे बदलण्यासाठी तेथे कोणी अल्पसंख्य जातीच्या अस्तित्वाचे कारण पुढे करीत नाही. तेथील मुसलमानांनी ही नावे विकृत केली नाहीत वा करण्यास धजले नाहीत. प्रसंग येताच पोलिश मुसलमान, ग्रीक मुसलमान , किंवा चिनी मुसलमान अशा नावांनी संबोधिले जाण्यात समाधान मानतात. त्याचप्रमाणे आपल्या मुसलमान देशबंधूंनी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक दृष्टया आपला निर्देश करताना हिंदुस्थानी मुसलमान म्हणून करावा. तसे करण्यात त्यांच्या धार्मिक वा सांस्कृतिक स्वतंत्र अस्तित्वास बाधा येत नाही.

हिंदुस्थान ह्या आपल्या मातृभूमीच्या रुढ नावाने ऋग्वेद काळातील सिंधूपासून आपल्या पिढीतील हिंदू शब्दापर्यंत जी अखंड परंपरा व्यक्त होते तिचा उच्छेद वा तिच्याशी प्रतारणा हिंदूंनी करु नये. जर्मनांचा देश जसा जर्मनी, इंग्रजांचा इंग्लंड, तुर्कांचा तुर्कस्थान नि अफगाणांचा अफगाणिस्थान, त्याचप्रमाणे हिंदूंचा देश म्हणून हिंदुस्थान ह्या नावानेच आपले स्थान जगाच्या नकाशात चिरंतन खोदून ठेविले पाहिजे

आपल्या साहित्यातुन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "राष्ट्र आणि हिंदुराष्ट्र" याबद्दलचे आपले विचारही खुप समर्पकपणे आणि पर्खडपणे मांडले आहेत. ते म्हणतात....

"जगातील मानवांनी एक व्हावे हीच आमची सदिच्छा आहे. जगातील मानवांनी एक होऊन त्यांचे एक मानवी राष्ट्र व्हावे असे आम्हांसही वाटते. आमचा वेदान्त तर याही पुढे जाऊन दगड नि मनुष्य हे सारखेच असल्याचे सांगतो. पण आपण परिस्थितीनुरुप व्यवहार केला पाहिजे. राष्ट्रवाद कालबाह्य नाही ,राष्ट्रवाद पाचशे वर्षे तरी जिवंत राहणार आहे. त्यानंतर काय होईल ते सांगता येत नाही. त्यानंतर पृथ्वी एक राष्ट्र होऊन मंगळ हे दुसरे राष्ट्र होईल. सिंधू ह्या शब्दाने व्यक्त होणारी कल्पना राष्ट्रवाचक आहे, केवळ भौगोलिक नाही

'हिंदू'शब्द मूलत: देशवाचक, राष्ट्रवाचक आहे. याचे मुख्य अधिष्ठान आसिंधु सिंधू अशी ही भारतभूमिका आहे. 'आसिंधु सिंधू' अशा त्या भारतभूमिकेत अत्यंत प्राचीन काळापासून ज्यांचे पूर्वज परंपरेने निवसत आले, ज्या राष्ट्रात प्रचलित असलेली सांघिक संस्कृती, घडलेला इतिहास, बोललेल्या भाषा, अनुसरलेले धर्म; ज्यांचे संस्कृती, इतिहास, भाषा, धर्म आहेत ते सारे हिंदु होत. त्या हिंदुराष्ट्राचे घटक होत. -

हिंदू हे केवळ एक राष्ट्र नसून ती एक जाती आहे. उत्पत्ती करणे ह्या अर्थाच्या जन धातूपासून जाती हा शब्द सिध्द झाला असून त्याचा अर्थ बंधुभाव, समान रक्त अंगात खेळत असलेला, एक उगम असलेला वंश असा होतो सप्तसिंधूतील लोक जसजसे हिंदुस्थानभर पसरत गेले तसतसे त्यांच्यात विविध वंशाचे मिश्रण, अनुलोम-प्रतिलोम विवाह इत्यादीमुळे झाले. जाती हा शब्द ह्या अर्थी वापरलेला आहे.राष्ट्रीय व वांशिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपली तीर्थे सर्व हिंदू जातीचा समान वारसा आहे आपले सण, उत्सव, संस्कार व आचार समान असहेत. हिंदु कोठेही असो मग तो शीख, जैन, ब्राह्मण वा पंचम असे तो दसरा, दिवाळी, रक्षाबंधन आणि होळी ह्यांचे स्वागत करतो.ज्या तीर्थांचे, पर्वतांचे, नगरांचे व नद्यांचे स्मरण हिंदू करतात ती कोणाही एक प्रांतातील नाहीत. तर ती अखिल हिंदुस्थानातील आहेत.शीखांचे अमृतसर, वैदिकांची काशी, बौध्दांची गया ही सारी आम्ही हिंदूंची सामायिक नि सारखीच पुण्यक्षेत्रे होत कलाकृती वा वास्तू, मग त्या वैदिक वा अवैदिक विचारांच्या प्रतिनिधी असोत, आपल्या वंशाचा समान वारसा आहे हिंदू निर्बंध व त्यांची आधारभूत तत्वे ह्यांतील तपशिलांत वा आदेशांत काही ठिकाणी परस्पर विरोध भासत असले तरी त्यांचा इतका एकावयवी विकास झालेला आहे की काल व देश ह्या स्थितीतून ही त्यांची वैशिष्टये टिकून राहिली आहेत

हिंदु धर्मामधील विविध समाजरचना, तसेच वैचित्र्यांबद्दल बोलताना ते विशद करतात......

कोणताही समाज वा राष्ट्र एकजीव होऊन जे जगते आणि त्यांच्याव्यतिरिक्त एतर समाजांशी होणार्‍या संघर्षातुनही तग धरते त्या लोकांमध्ये आपसात वैषम्य असे मुळीच नसते म्हणून नव्हे. कारण कुटुंब म्हटले की कुटुंबात व्यक्तिवैचित्र्य नि मतभिन्नता असतेच. मग कोटी कोटी व्यक्तींच्या एकजीवी समाजाची वा राष्ट्राची गोष्टच बोलणे नको. एका साच्यात पाडलेल्या गणपतीच्या मूर्तीप्रमाणे त्या कोटी कोटी व्यक्ती एकसाची असणे अशक्यच. परंतु त्या समाजातील पक्षोपक्षांची ही अंतर्गत विषमता इतर कोणत्याही समाजाशी असलेल्या त्यांच्या विषमतेहून अगदी कमी असते. आणि त्या समाजातील अनेक पक्षांना एकजीव करणारी महत्वाची बंधने दुसर्‍या समाजाशी असणार्‍या त्यांच्या संबंधांपेक्षा आत्यंतिक आकर्षक नि बळकट असतात म्हणून ते समाज वा राष्ट्र तसे पृथक नि एकजीव राहू शकते.

हिंदुराष्ट्रातील विविध विभागांचे परस्पर धोरण काय असावे ? यावरही सावरकरांची मते खुप उद्बोधक आणि क्रांतिकारक आहेत.

संख्येचे, भौगोलिक किंवा वांशिक लाभ निसर्गत: व ऐतिहासिक दृष्टया ज्यांना लाभलेले नाहीत असे लोक इतरांबरोबर देवाण घेवाण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. जन्मसिध्द अधिकारांनी प्राप्त झालेले लाभ ज्यांना माहीत नाहीत व त्याहूनही वाईट म्हणजे त्यांचाच तिरस्कार करतात अशांचा सत्यानाश होवो ! कागदाच्या कपटयांतून किंवा अडचणीत उत्पन्न झालेल्या बंधंनांनी नव्हे तर रक्ताच्या, जातीच्या, संस्कृतीच्या बंधनांनी झालेल्या प्राचीन, नैसर्गिक व एकजीवी एकीकरणापासून फुटणे व त्यालाच नाशिणे हे तुमच्यापैकी जैन समाजी, सनातनी , शीख वा कोणत्याही उपविभागाला परवडणार आहे का? असलेले बंध दृढ करा. ज्या भिंतीची उपयुक्ततता संपली आहे अशा भिंती, जाती, रुढी, विभाग मोडून टाका.आमच्या वैदिक, जैन, बुध्द, शीख, लिंगायत प्रभृती यच्चयावत् हिंदू बंधूंनी आपले मतभेद धार्मिक क्षेत्रापुरते काय ते ठेवून आपणा सर्वांना जी अनेकविध सामाजिक जीवनाची प्रिय बंधने आणि नात्यागोत्याचे स्नेहसंबंध आज शतकोशतके एकजीवी असे एक महान् राष्ट्र बनवीत आले आहेत, त्या स्नेहसंबंधांनाच शक्यतो जोपासीत राहावे, यातच आपल्या सगळयांचे कल्याण आहे

त्यांच्यामते हिंदुस्थानात हिंदू ही 'जात' होऊ शकत नाही. हिंदुस्थानात आम्हांस एक जाती म्हणणे मूर्खपणाचे आहे. जर्मनीत 'जर्मन' हे राष्ट्र आहे आणि ज्यू एक जात आहे. तुर्कस्थानात तुर्क हे एक राष्ट्र आहे. व अरब वा आर्मेनियन अल्पसंख्य जाती आहेत. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात हिंदू एक राष्ट्र आहेत व अल्पसंख्य मुसलमान वा ख्रिश्चन या एक जाती आहेत

वैदिक काळापासून निदान पाच सहस्त्र वर्षे तरी आपले पूर्वज आपल्या लोकांचा धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक नि राजकीय दृष्टया एकात्म असा गट घडवून आणीत होते. त्या क्रियेला स्वाभाविकपणे विकास पावता जे फळ आले ते म्हणजेच वैदिक काळातील त्या सिंधूचेच आज सबंध हिंदुस्थानभर पसरलेले आणि हिंदुस्थानालाच आपली एकमेव पितृभू नि पुण्यभू मानीत असलेले असे हिंदुराष्ट्र होय. कदाचित चिनी राष्ट्र वर्ज्य केल्यास जगातील दुसर्‍या कोणत्याही राष्ट्राला आपल्या हिंदुराष्ट्रासारख्या आपल्या जीवनाच्या नि विकासाच्या अखंड सातत्यावर अधिकार सांगता येणार नाही. हिंदुराष्ट्र हे काही पावसाळयातल्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेले नाही. ते एखाद्या तहातून उत्पन्न झालेले नाही. ते निव्वळ कागदी खेळणे नाही. किंवा ते एखाद्या मागणीप्रमाणे घडविलेले नाही. अथवा ती एखादी चालचलाऊ सोय नाही. ते ह्याच भूमीतून वर आलेले आहे नि ह्या भूमीतच त्याची मुळे खोल नि दूरवर पसरलेली आहेत. मुसलमानांचा किंवा जगातील अन्य कोणाचा द्वेष करण्याकरिता म्हणून काही तरी लावलेला शोध नाही. तर आपली उत्तर सीमा सांभाळणार्‍या हिमालयाप्रमाणे ते एक भक्कम आणि प्रचंड सत्य आहे.

आपल्या आचारातुन, विचारातुन आपल्या साहित्यातुन स्वा. विनायक दामोदर सावरकर सर्वे हिंदुस्थानवासीयांना एक हृद्य आवाहन करतात.....

"आपल्या पितामहांनी मराठा व शीख हिंदु साम्राज्याच्या पतनाच्या वेळी जो तेथेच सोडून दिला तो आपल्या राष्ट्रीय जीवनाचा धागा आपण हिंदूंनी पुन्हा उचलून हाती धरावा. आत्मविस्मृतीमुळे क्षय झालेल्या आपल्या हिंदुराष्ट्राच्या जीवनाचे आणि विकासाचे आपण पुनरुज्जीवन केले पाहिजे, त्याला समाधीतून पुन्हा उठविले पाहिजे प्रामाणिक व भोळसट अशा हिंदूंच्या हे स्पष्ट ध्यानात आले पाहिजे की सर्वसामान्य राष्ट्रीय जीवनाशी मुसलमानांनी समरस होण्याचे नाकारले म्हणजे नकारात्मक दृष्टीने सुध्दा हिंदूंचे एक राष्ट्र उरते.

राष्ट्राचा मोठेपणा त्याच्या ध्येयातून व्यक्त होतो. राष्ट्राचे स्वरुप त्याने आपल्यापुढे ठेवलेल्या ध्येयावर अवलंबून असते. संकुचित ध्येयाच्या राष्ट्रांनी भूतकाळात चिरंतन मोठेपणा प्राप्त केलेला नाही. राष्ट्राला महानता व वैभव प्राप्त करुन देण्याकरिता उदात्त ध्येय असणे आवश्यक आहे...

माझा हा वारसा मी तुम्हांस देत आहे

वटवृक्षाचे बीज मोहरीहून लहान असते पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, जी वल्गना असते ती वाढता वाढता तिचा प्रचंड वटवृक्ष बनून त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात, उन्हाने श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो.

मलाही वल्गना करु द्या ! माझे गाणे मला गाऊ द्या !

या जगात आपणाला जर हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल तर तसा आपला अधिकार आहे आणि ते राष्ट्र हिंदुध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे. या नाही तरी पुढल्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल.

माझी वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन. माझी ही वल्गना खरी ठरली तर मी प्रॉफेट ठरेन. माझा हा वारसा मी तुम्हाला देत आहे!

त्या महान द्वेष्ट्या समाजसुधारकाला, महान तत्वचिंतकाला, हिंदुत्वाचा खरा खुरा अर्थ समजलेल्या त्या महान देशभक्ताला माझे लाखो प्रणाम!

जय हिंद !

विशाल कुलकर्णी

संदर्भ : १. सहा सोनेरी पाने : स्वा. सावरकर
२. हिंदुत्व : स्वा. सावरकर
३. Savarkar & Hindutva : The Godse Connection by A.G. Durrani
४. www.savarkar.org

Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

>>जागोमोहनप्यारे | 27 October, 2011 - 00:58
हा धागा बंद करा असे मी आधीच सांगितले आहे.. येशु हा हिंदु ( किंवा हिंदु अवतार ) ठरत असेल तर उगाच्ग त्या धर्माना नाकारनं वेडेपणा आहे.. सगळी कृष्णाचीच लेकरं, असेही मी लिहिले होते.. ( पण हिंदुत्ववाले रक्त्बीज राक्षसासारखे असतात.. एक धागा मेला न मेला तोच दुसरा काढून बसतात ! चर्चेचे फलित काय म्हणून! )
<<
'चर्चेचे फलित काय?' अशा शीर्षकाचा वेगळा लेख मी माबो वर टाकला तो चर्चेचा नवा धागा तयार व्हावा म्हणून नव्हे.
मूळात तो येथे प्रतिसाद म्हणूनच टाकला होता. पण त्यातील कांही दुवे माबो यांना मान्य नसल्याने तो त्यांनी अप्रकाशित केला. म्हणून ते दुवे काढून टाकुन तो लेख मी स्वतंत्रपणे पाठवला. त्यातील प्रमुख प्रतिपादन थोडक्यात येथे देतो आहे-
कुलकर्णी यांच्या लेखावरील प्रतिसादांची संख्या 650 च्या घरात पोचली आहे. बहुतेक सर्व विरोधी प्रतिसाद मन उद्विग्न करणारे आहेत. ते विरोधी आहेत म्हणून नव्हे, तर ’उचलली जीभ लावली टाळ्याला.’ या प्रकारचे आहेत आणि त्यामागील प्रेरणा मुख्यत्वे करून जातीय द्वेषाची आहे. श्री. अक्षय जोगांनी कितीही पुरावे दिले तरी उपयोग होणार नाही. हे स्वच्छ दिसत असूनही कांही सावरकर चहाते आक्षेपांना उत्तरे देण्यात शक्ति घालवत आहेत असे मला वाटते.
सावरकरांवरील आक्षेप आणि सावरकरांचे मूळ लिखाण यांचा अक्षरशः प्रचंड अभ्यास करून प्रा. शेषराव मोरे यांनी १५-२० वर्षांपूर्वीच लिहिलेल्या [अ] सावरकरांचा बुद्धिवाद व हिंदुत्ववाद, आणि [आ] सावरकरांच्या समाजकारणाचे अंतरंग या त्यांच्या पुस्तकांमध्ये असे म्हटले आहे की, "सावरकर विरोधकांनी त्यांच्या विचारांची प्रचंड मोडतोड केली आहे व त्यांच्यावर खोटे आरोप करणे आजही चालू आहे." या दोन्ही पुस्तकांमधून प्रा. मोरे यांनी या सर्वांना साधार, सविस्तर उत्तरे दिली आहेत. त्यांच्यापैकी कुणीही त्यांच्या या म्हणण्याचा प्रतिवाद केलेला दिसत नाही. त्यांच्या पुस्तकात प्रा. शेषराव मोरे लिहितात, "सावरकरांची मानहानी, बदनामी व अवमूल्यन करण्याबद्दल, असे करणाऱ्यांवर खटला भरता येऊ शकतॊ. पण अशा मार्गाचा विचार करण्याची पाळी येणे हाच या समाजाचा वैचारिक दर्जा किती खालावला आहे याचे निदर्शक होय. सावरकरांचे सामाजिक विचार म. फुले व डॉ. आंबेडकर यांच्या विचारापेक्षा कुठेही कमी क्रांतिकारक नव्हते आणि कार्य बहुजनांच्या हिताचे होते. त्यांनीच सावरकरांचा यासाठी गौरव करायला हवा होता. फुले, शाहू, आंबेडकर या परंपरेत त्यांना मानाचे स्थान द्यायला हवे होते . पण बहुजनांनी सावरकरांच्या समाजक्रांतिचा अभ्यासच केला नाही. सावरकर भक्तांनाही याची खंत दिसत नाही. "
सावरकरांच्या चाहत्यांनी आपली शक्ति सावरकरांचे कार्य आणि विचार तरूण वर्गापर्यंत पोचविण्यासाठी खर्च करावी असे मला वाटते.

ते विरोधी आहेत म्हणून नव्हे, तर ’उचलली जीभ लावली टाळ्याला.’ या प्रकारचे आहेत आणि त्यामागील प्रेरणा मुख्यत्वे करून जातीय द्वेषाची आहे.

तुमच्या विरोधी असनारे प्रतिसाद तुम्हाला असेच वाटणर.

आवाहन

मायबोलीच्या वाचकांपैकी ज्या कोणाला खाली दिलेल्या 'वैनायक' वृत्तातील कविता वाचनाच्या विशिष्ट पद्धतीची /पद्धतीबद्दल माहिती असेल त्यांनी येथे ती माहिती द्यावी अशी माझी विनंति आहे. अशी कांही पद्धत आहे याबद्दलचा संदर्भ असा-
मूर्ति दुजी ती
(सावरकरांची निवडक कविता)
संपादक- डॉ. ना. ग. जोशी
व्हीनस प्रकाशन, पुणे
या जुन्या पुस्तकात खालील माहिती दिलेली आहे.
वैनायक वृत्त
काव्य प्रांतात त्यांचा एक प्रयोग सावरकरी विशेषांनी भरलेला आहे. तो म्हणजे 'वैनायक' वृत्ताची निर्मिती. कमला व गोमंतक(पूर्वार्ध) यासाठी त्यांनी त्याचा वापर केला.
यात सहा सहा मात्रांचे तीन गट किंवा आवर्तने आणि शेवटी एक गुरू अक्षर , अशी चरण योजना असते. यमक नसते आणि वाक्यार्थाचा संदर्भ तसाच पुढील ओळीत घुसत जातो. वैनायक ही निर्यमक 'धवलचंद्रिका जाती आहे. हे वृत्त 'मूर्ति दुजी ती' , 'मरणोन्मुख शय्येवर' या कवितांमध्येही वापरले आहे.
या वृत्ताची खरी महत्ता सावरकरी पद्धतीने सावेश, साघात, वक्तृत्वपूर्ण शैलीने पठण केले असता विशेष लक्षात येते.
वैनायक वृत्ताच्या खर्‍या शक्ति संभाषण धर्तीच्या काव्यवाचनानेही पटतात.
हे वृत्त त्यांनी शंभर वर्षांपूर्वी अंदमानातील बंदिवासात शोधले. ज्या कोणाला या पद्धतींची माहिती असेल त्याने एक कर्तव्य म्हणून त्याची ध्वनिमुद्रीत क्लिप /सीडी तयार करून उपलब्ध करून दिल्यास ते सावरकरांना केलेले मोठे अभिवादनच ठरेल. श्री हृदयनाथ मंगेशकर वा श्री शंकर अभ्यंकर यांचा याबाबतीत मोठा व्यासंग आहे. त्यांच्या क्यासेट वा सीडी मध्ये हे कोठे येऊन गेले असेल तर तशी माहिती दिल्यास तीही बहुमोल ठरेल.

अक्षर गण वृत्ते हा प्रकारच मुळी अत्यन्त कृत्रिम होता. पन्त कविनी केलेला हा शब्दच्छल त्यातील कृत्रीमतेमुळे व रसभंगामुळे आपसूकच मृतप्राय झाला. हल्ली तर तो फक्त प्राचीन गद्याप्रमाणे फक्त पाठ्यपुस्तकातच ब.दिस्त झालाय. व केवळ एक इतिहासाचा टप्पा यापलिकडे त्याला काय महत्व?

>>> ते विरोधी आहेत म्हणून नव्हे, तर ’उचलली जीभ लावली टाळ्याला.’

पुस्तकातील एकही ओळ न वाचता त्याविरूद्ध तावातावाने लिहिणे, काही धाग्यांवर जी मते मांडली होती त्याच्याबरोब्बर विरूद्ध मते दुसर्‍या धाग्यावर लिहिणे, कोणतेही पुरावे नसताना व स्वानुभव घेतला नसताना निव्वळ द्वेषभावनेतून दुसर्‍यावर विनाकारण टीका करणे, इ. सर्व गोष्टींना सुद्धा ’उचलली जीभ लावली टाळ्याला' असेच संबोधले जाते.

३ वर्षात मते बदलू शकतात.. त्यात काय विशेष? . पुस्तकातील ओळी जशाच्या तश्या दिल्या आहेत..

>>> ३ वर्षात मते बदलू शकतात.. त्यात काय विशेष?

३ वर्षांत मते बदलू शकतात, ३ महिन्यांतही बदलू शकतात, ३ सेकंदात सुद्धा एकदम यूटर्न घेऊन आधीच्या पूर्ण विरूद्ध मते सुद्धा मांडता येतात . . . आणि अजून ३ सेकंदांनी पुन्हा एकदा पूर्वीचीच जुनी मते मांडता येतात . . . आपल्याला पाहिजे ती टोपी घालता येते आणि ती पाहिजे तशी फिरवता येत! आणि याबद्दल ना खंत ना खेद!

>>> पुस्तकातील ओळी जशाच्या तश्या दिल्या आहेत..

त्या १-२ आळींच्या पूर्वी आणि नंतर काय लिहिले आहे ते वाचले आहे का? त्या ओळी ज्या प्रकरणात लिहिल्या आहेत ते प्रकरण, त्याच्या मागची-पुढची प्रकरणे वाचली आहेत का? संपूर्ण पुस्तक वाचले आहे का? त्या १-२ ओळी कोणत्या संदर्भात लिहिल्या आहेत, ते वाचले आणि समजले आहे का? . . .

कुठल्यातरी मधल्या १-२ ओळी वाचायच्या आणि मागचे-पुढचे कोणतेही संदर्भ न वाचता तावातावाने काहीतरी मुक्ताफळे झोडायची यालाच म्हणतात, 'उचलली जीभ, लावली टाळ्याला'. आणि याबद्दल ना खंत ना खेद!

त्या ओळी सेल्फ एक्स्प्लेनेटरी आहेत. मागच पुढच वाचल किंवा नाही वाअचलं तर त्यांचा अर्थ बदलणार नाही. पुस्तकावर बंदी आली होती.. आणि त्यानंतर तथाकथित गुर्जीनी पुन्हा तसं लिहायचं धाडस स्वप्नातही केले नाही.. इतके पुरेसे आहे.

पुस्तक लिहून प्रकाशित केलं तेंव्हा कोण अभिमान.. आणि बंदी आली तर हे पुस्तक म्हणजे निव्वळ भाषांतर आहे, असे म्हणून सुटका करुन घेणं.. याला म्हणतात टोपी फिरवणं. त्याबद्दल ना खंत ना खेद.. उचल्ली जीभ आणि लावली टाळ्याला असली वक्तव्य असली की असेच होते. आणि मग यु टर्न घ्यायची पाळी येते. Proud कळ्ळ्ले का?

आपल्या क्षणाक्षणाला बदलत असलेल्या भूमिकेबद्दल, आपल्या ठार अज्ञानाबद्दल, पुस्तकातला एकही परिच्छेद न वाचता आपण जे तारे तोडतो त्याबद्दल, आपल्या द्वेषभावनेबद्दल, आपल्या चुकांबद्दल, आपल्या चुकीच्या मतांबद्दल . . . तुम्हाला "ना खंत ना खेद", हे तुमच्या प्रतिसादांवरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय.

>>> त्या ओळी सेल्फ एक्स्प्लेनेटरी आहेत. मागच पुढच वाचल किंवा नाही वाअचलं तर त्यांचा अर्थ बदलणार नाही.

काय हे अज्ञान! मनात द्वेषमूलक विचार ठासून भरले असले की हे असं होतं. त्या १-२ ओळींच्या जागी बालकवींच्या कवितेच्या ओळी असत्या तरी तुम्ही त्यातून तुम्हाला सोयिस्कर तोच अर्थ काढला असता.

>>>>> त्या ओळी सेल्फ एक्स्प्लेनेटरी आहेत. मागच पुढच वाचल किंवा नाही वाअचलं तर त्यांचा अर्थ बदलणार नाही.

मूर्खस्य पञ्च चिह्नानि गर्वो दुर्वचनं मुखे ।
हठी चैव विषादी च परोक्तं नैव मन्यते ॥

वा वा ! संस्कृतमध्ये हिंदुत्वाचा अर्थ सांगितलात की ! धन्यवाद

To keep up the purity of the Race and its culture, Germany shocked the world by her purging the country of the semitic Races — the Jews. Race pride at its highest has been manifested here. Germany has also shown how well nigh impossible it is for Races and cultures, having differences going to the root, to be assimilated into one united whole, a good lesson for us in Hindusthan to learn and profit by.
Ever since that evil day, when Moslems first landed in Hindustan, right up to the present moment, the Hindu Nation has been gallantly fighting on to take on these despoilers. The Race Spirit has been awakening.

या बालकवीच्या ओळी वाटतात का? तसे असेल तर सगळी मूर्खलक्षणे तुम्हालाच लागू होतील.

जामोप्या, वरची लिंक इंटरेस्टींग आहे पण ५ वर्षे जुनीही आहे, इतक्या वेळात अजून कितीतरी कोलांट्या मारुन झाल्या असतील. त्यांचे लेटेस्ट आणि ऑफिशिअल म्हणणे (अशी काही गोष्ट अस्तित्वात असल्यास!) काय आहे?

त्यांचे लेटेस्ट आणि ऑफिशिअल म्हणणे (अशी काही गोष्ट अस्तित्वात असल्यास!) काय आहे?

ते आता कसे कळणार? Proud वरच्या लिंकमध्ये नेमके काय आहे? फाँट प्रोब्लेम कसा सोडवायचा? तो मॅटर कॉपी पेस्ट करुन टाका.

इतक्या वेळात अजून कितीतरी कोलांट्या मारुन झाल्या असतील. त्यांचे लेटेस्ट आणि ऑफिशिअल म्हणणे (अशी काही गोष्ट अस्तित्वात असल्यास!) काय आहे?

मग लेटेस्ट मत ऐकून तरी काय करणार? त्यानंतरही ते कोलांटी उडी मारतीलच की! त्याना दोन्ही दगडावर हात ठेवायचा आहे.. ज्वलंत हिंदुत्व हा मुद्दा आला की पुस्तक आमचे... पण टीका होऊ लागली की पुस्तक आपले नाही.. . याला राउंड टर्न म्हणायचं .. म्हणजे दोन वेळा यु टर्न Biggrin

>>> ते आता कसे कळणार? वरच्या लिंकमध्ये नेमके काय आहे?

तिथे काय लिहिलंय ते तुम्हाला वाचायला कशाला हवंय? न वाचता सुद्धा त्यावर तुम्हाला भरपूर मुक्ताफळे झोडता येतीलच की! नाहीतरी आजवर ज्या पुस्तकांच्या विरूद्ध तुम्ही तावातावाने लिहिलंय, त्यातल्या एकाही पुस्तकातला एकही परिच्छेद तुम्ही वाचलेला नाही. मग ही लिंक वाचायचे कष्ट तुम्ही कशाला घेताय? न वाचताच तावातावाने लिहायची सवय आहेच तुम्हाला!

>>> त्यांचे लेटेस्ट आणि ऑफिशिअल म्हणणे (अशी काही गोष्ट अस्तित्वात असल्यास!) काय आहे?
>>> मग लेटेस्ट मत ऐकून तरी काय करणार? त्यानंतरही ते कोलांटी उडी मारतीलच की! त्याना दोन्ही दगडावर हात ठेवायचा आहे.. ज्वलंत हिंदुत्व हा मुद्दा आला की पुस्तक आमचे... पण टीका होऊ लागली की पुस्तक आपले नाही.. . याला राउंड टर्न म्हणायचं .. म्हणजे दोन वेळा यु टर्न

निधर्मांधांबद्दलचे आमचे लेटेस्ट आणि ऑफिशिअल म्हणणे मागील अनेक प्रतिसादात दिले आहे. त्यात कोणताही बदल नाही. एका धाग्यावर हिंदूत्ववाद्यांना समर्थन, दुसर्‍या धाग्यावर त्यांना शिव्या; एका धाग्यावर गांधीजींची तोंड फाटेस्तोवर स्तुती, तर दुसर्‍या धाग्यावर हिंसेचे समर्थन; एका धाग्यावर 'भारतीयत्व', 'सारे भारतीय एक' इ. बडबड, तर दुसर्‍या धाग्यावर 'बिहारींना बदडून काढायला पाहिजे' अशा शब्दात मारहाणीचे समर्थन . . . अशी प्रत्येक धाग्यावर पूर्ण परस्परविरोधी भूमिका मांडणे ही एका वेगळ्या व्यक्तीची मिरासदारी आहे. कोलांटी उडी मारणे, ३ वर्षांत मते बदलली असा यूटर्न घेणे (पण ३ महिन्यांपूर्वी जुनीच मते कायम होती, हे सोयिस्कररीत्या विसरणे) इ. सवयी कोणाच्या आहेत, हे वेगळे सांगायची गरज नाही. Light 1

मास्तुरे तुम्ही कशाला डोक फोडताय त्यांच्या समोर.
ते आता समजावण्या आणि समजण्या पलीकडे गेलेले आहेत. Proud
जामोप्या इफ्तारपार्टीतील ती टोपी काढुन लवकर बरे व्हा. ही एक हिदुत्ववादी म्हणून तुमच्या खुदाकडे प्रार्थना करतो. Light 1

>>> फाँट प्रोब्लेम कसा सोडवायचा? तो मॅटर कॉपी पेस्ट करुन टाका.

नको. तो मूळ लेखच दिसू देत. तो पूर्ण वाचल्यावरच त्यावर बोलता येईल. मूळ आणि पूर्ण लेख न वाचता त्यातली काही विशिष्ट २-४ पेस्ट केलेली वाक्ये वाचून प्रतिक्रिया द्यायची वाईट सवय आम्हाला नाही.

>>> जामोप्या इफ्तारपार्टीतील ती टोपी काढुन लवकर बरे व्हा. ही एक हिदुत्ववादी म्हणून तुमच्या खुदाकडे प्रार्थना करतो

मॅनेजमेंट थेअरी मध्ये एक ६ वेगवेगळ्या रंगांच्या टोप्या परिधान करून ब्रेनस्टॉर्मिंग करण्याची एक "६ हॅट्स थेअरी" असते. यांच्याकडे सुद्धा वेगवेगळ्या रंगांच्या अनेक टोप्या आहेत. काही धाग्यांवर ते हिंदूंची भगवी आणि संघाची कृष्णवर्णी टोपी परिधान करतात; तर काही धाग्यांवर ते भारतीयत्वाची तिरंगी टोपी, काँग्रेसची पांढरी गांधी टोपी व रिपब्लिकनांची निळी टोपी धारण करतात; तर अजून काही धाग्यांवर ते हिरवी फरकॅप पहेनतात. त्यामुळे इफ्तारपार्टीतील ही टोपी फार काळ ते डोक्यावर ठेवणार नाहीत. ते लवकरच, माझी मते बदलली असे सांगून, ही टोपी फेकून दुसरी टोपी परिधान करतील व इतरांना आपल्या भूमिकेची टोपी घालायचा प्रयत्न करतील.

पूर्ण लेखः
Image and video hosting by TinyPic
Image and video hosting by TinyPic

(लोकसत्ताचा फॉण्ट कॉपीपेस्ट होत नाही. स्क्रीन कॅप दिलेत)
चला, थ्यांक्यू म्हणा?

धन्यवाद....

घोळवलकरांचं वुइ वाचण्यापेक्षा आंबेडकरानी लिहिलेली घटना वुइ ( द पीपल ) सर्वानी वाचल्यास देशाचे कल्याण होईल...

इफ्तारपार्टी कशाला, आता आठ दहा दिवसात बकरी ईद आहे ना? Proud

ओह! तरीच. हे "लोकसत्तात" (म्हणजे काँग्रेसच्या मुखपत्रात) आलेलं दिसंतय. मुख्य म्हणजे हे केतकर ऐन भरात असताना आलेलं दिसतंय. केतकरांच्या काळातली लोकसत्ताची विश्वासार्हता शून्य होती. लोकसत्तात अनेक पुड्या सोडल्या जायच्या. लोकसत्तातल्या काही "खास" बातम्या "लोकसत्ता" सोडून इतर कोठेही वाचायला मिळायच्या नाहीत. त्याचं कारण उघडच आहे. कारण त्या केतकरांच्या कल्पनेतल्या वावड्या असायच्या. लोकसत्तातलं वाचून ते लिखाण विचार न करता सोडून द्यायचं असतं. आज तुम्ही लोकसत्तात केतकरांच्या काळात छापून आलंय त्याचा संदर्भ देत आहात. उद्या काँग्रेसच्या अधिकृत पक्षपत्रात छापून आलंय त्यावर विश्वास ठेवून त्याची लिंक द्याल! Biggrin

यात जे काही लिहिलं आहे, त्या बातमीची लिंक इतर दुसर्‍या कोणत्या मासिकात/वृत्तपत्रात/साप्ताहिकात आहे का? किंवा याबाबतीत संघाची अधिकृत भूमिका सांगणारी लिंक आहे का? असल्यास द्या.

लोकसत्ता असो वा केतकर... ती बातमी वस्तुनिष्ठच आहे.. संघाने वुईला १९४८ सालीच काडीमोड दिला आहे..

( ज्याचं मत पटत नाही, त्याला एक तर विष्णूचा अवतार ठरवून मोकळं व्हायचं नाहीतर वेडा/ मनोरुग्ण तरी ठरवायचं.. हिंदुत्ववाद्यांची स्ट्रॅटेजीच आहे.. Proud )

जर १९४८ मध्येच या पुस्तकाला काडीमोड दिली असेल, तर २००६ मध्ये किंवा २०११ मध्ये एवढा गहजब कशासाठी? वुई हे संघाचे बायबल नाही, असे जर वैद्य म्हणाले असतील, तर त्यात एवढं आकाश कोसळण्यासारखं काय आहे? वुई किंवा इतर कोणतेच पुस्तक संघाचे बायबल नाही. इतर काही जण जसे ८ व्या शतकातल्या पुस्तकाला प्रमाण धरून चालतात, तसंच संघाने केलं तर त्यांच्यात आणि संघात फरक तो काय?

Pages