हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुराष्ट्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकर !

Submitted by विशाल कुलकर्णी on 12 October, 2009 - 07:16

स्वा. सावरकरांचे आजवर वाचलेले साहित्य, आंतरजालावर उपलब्ध माहिती आणि इतरही काही संदर्भ वापरुन हा लेख संकलीत केला होता. अर्थात त्यामुळे हा लेख मी लिहीलाय असे म्हणता येइल की नाही कुणास ठाऊक. पण स्वातंत्र्यवीरांचे विचार संकलित करण्याची मेहनत मी जरुर घेतली आहे. हा लेख माबोच्या दिवाळी अंकासाठीदेखील पाठवला होता. पण कुठल्याशा कारणाने (नियमात बसत नसल्याने असेल कदाचित) तो तिथुन साभार परत आला. तेव्हा तो इथे टाकत आहे. धन्यवाद.

..............................................................................................................................................

"आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: I I "

सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू! सिंधुपासुन सिंधुपर्यंत, अर्थात सिंधुनदीपासुन ते सिंधु म्हणजे सागरापर्यंत पसरलेली ही भुमी म्हणजे हिंदुभुमी आहे आणि प्रत्येक व्यक्ती ,जो कुणी या भुमीला केवळ आपली पितृभुमीच नव्हे तर पुण्यभुमीही मानतो तो हिंदु!मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेना का! मुळात हिंदु हा केवळ एक धर्म नाहीच आहे, तर ती एक जिवनप्रणाली आहे. 'हिंदुधर्म' हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष नि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची नि पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी नि पुण्यभूमी आहे त्या सार्‍यांना समावेशिणार्‍या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे.!

हे आमचे एकजीवन आज ज्या एकाच शब्दात नवीन व्याख्येप्रमाणे व्यक्तविता येते तो अनन्य शब्द आहे 'हिंदू' ! या शब्दाच्या 'हिंदू' या दोन अक्षरांत अगस्तीच्या अंजलीत महासागर तसे तीस कोटी लोकांचे राष्ट्रचे राष्ट्र सामावलेले आहे.किती सार्थ आणि योग्य शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदु या शब्दाची महती, त्याचा योग्य अर्थ सांगितला आहे. हिंदु या संकल्पनेची व्यापकता, तिचा विस्तार केवढ्या समर्पक शब्दात मांडले गेल आहे इथे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते आपल्या वंशाच्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला व आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि जवळ जवळ पाळण्यातले नाव निवडले ते सप्तसिंधू अथवा हप्त हिंधू आहे. सिधु नदीच्या समृद्ध खोर्‍यात राहणारे ते सिंधू. आणि इतर जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे आपणांस ह्याच सिंधू किंवा हिंदू याच नावाने ओळखत असत. बर्‍याचदा असे म्हणले जाते की हिंदु हे नाव किंवा हा शब्द आपल्याला अरबांकडुन मिळाला. पण सावरकरांच्या मते हिंदू हा शब्द आपणांस अरबांनी दिलेला नाही. प्रेषित महंमदाच्या जन्मापूर्वी, नव्हे अरब हे एक 'लोक' म्हणून ओळखले जाण्यापूर्वीदेखील हे प्राचीन राष्ट्र आपणांकडून व इतरांकडून सिंधू वा हिंदू ह्या स्वाभिमानी नावाने ओळखले जात होते. अरबांनी सिंधू नदीचा शोध लावला हे म्हणणे जितके खरे तितके अरबांनी ह्या शब्दाचा शोध लावला हे म्हणणे आहे

हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्

हिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्‍या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो.

स्वातंत्र्यवीर अगदी ठामपणे प्रतिपादन करतात की हिंदुत्व हा केवळ एक शब्द नव्हे, तर तो इतिहास आहे. ते मनापासुन समग्र हिंदु बांधवाना आवाहन करतात की अग्निहोत्री ब्राह्मण ज्याप्रमाणे यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित ठेवतो त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करुन ठेवा. योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल

हिंदुत्व का हवे? त्याचा आपल्याला काय फायदा होवु शकेल हे विषद करताना स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात कीं असा एक दिवस जरुर उगवेल किं समग्र मनुष्यजातीस ह्या शक्तीस (हिंदुत्व) तोंड द्यावे लागेल .हिंदुस्थानाला पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे, असा इतिहास असणारे व समान रक्त व संस्कृती ह्यांनी बांधलेले कोट्यावधी लोक सर्व जगाला आपले म्हणणे अधिकारवाणीने सांगू शकतील. स्वातंत्र्यवीर एका आंतरिक अभिमानाने सांगतात की ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही हेही तितकेच खरे आहे. हिंदू जेव्हा हिंदू राहत नाही तेव्हा तो अत्यंत उत्कटपणे हिंदू असतो व शंकराप्रमाणे सर्व पृथ्वी वाराणसी मानतो. वाराणसी मेदिनी ! मानतो किंवा तुकारामाप्रमाणे 'आमुचा स्वदेश ! भुवनत्रयामध्ये वास ! ' असे उद्गारतो. हे बंधूंनो ! विश्वाच्या मर्यादा - तेथे माझ्या देशाच्या सीमा आहेत !

हिंदुस्थानात सुखाने नांदत असणार्‍या अनेक - नानाविध धर्मांविषयी बोलताना सावरकरांचा कंठ भरुन येत असे. त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर एक अलौकीक असे तेज, एक समाधान पाहायला मिळे. विश्व हिंदु परिषदेच्या एका सभेत बोलताना स्वातंत्र्यवीर म्हणाले होते.

"बहुसंख्य हिंदूंच्या धर्माला सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म अथवा वैदिक धर्म ह्या प्राचीन व मान्य संज्ञांनी संबोधिता येते. इतर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल. ह्यामुळे अर्थहानी होणार नाहीच, परंतु तो अधिक अचूक व नि:संदिग्ध होईल व आपल्या लहान समाजातील संशय व मोठया समाजातील राग दूर करुन आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्‍या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील..

इतर धर्मांप्रमाणे (उदा. मुस्लिम - कुराण, ईसाई- बायबल) हिंदुधर्माचे एक धर्मपुस्तक नाही हे चांगलेच आहे. कारण यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही. आमचे धर्मतत्वही कोणत्या पुस्तकाच्या दोन पुठ्ठयात सामावू शकणार नाही. ह्या विश्वाच्या दोन पुठ्ठयांमध्ये जितके सत्य नि ज्ञान विस्तृत पसरलेले आहे तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत होईल.

हिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाही. हिंदुधर्म नि:संशय सात्विक, क्षमाशील आहे. हिंदुधर्म क्रोधशीलही आहे. 'क्लैब्यं मा स्म गम: पार्थ' ही हिंदुधर्माची गर्जना आहे. 'अहिंसा परम धर्म:' ही ज्या हिंदुधर्माची व्याख्या आहे त्याच हिंदुधर्माची अगत्याची व तेजस्वी आज्ञा आहे की 'आततायिनमायान्तं हन्यादेवाविचारयन्' आणि त्या दोन्ही आज्ञांचा समन्वय, हिंदुधर्मच उत्तम प्रकारे लावू शकतो काही झाले तरी बुध्दिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय !"

आपल्या हिंदुत्वाच्या कल्पनेबाबतीत सावरकर अतिशय स्पष्ट आहेत. योग्य ते बदल स्विकारण्याची त्यांची तयारी आहे. त्यासाठी प्रसंगी आपली रुढी-परंपरा यांच्या चौकटी मोडायला देखील ते तयार असत हे त्यांच्या आचार विचारातुन ठामपणे स्पष्ट होत असे. रत्नागिरीतील पतित पावन मंदीर हे याचे स्पष्ट उदाहरण आहे. मानवाच्या, मानव्याच्या भल्यासाठी आपल्या रुढी परंपरा मोडायची, चौकटी तोडायची त्यांची नेहेमीच तयारी असे. धर्म आणि राष्ट्रधर्म या संकल्पना स्पष्ट करताना सावरकर सांगतात किं हिंदीधर्म हा कुठल्याही रुढी परंपरांमध्ये, तथाकथीत चौकटीत अडकुन राहणारा नाही. बदलत्या समाजाला पोषक होइल अशा पद्धतीने आपले स्वरुप बदलत राहणे हा हिंदुधर्माचा स्वभावच आहे. पण फक्त तुम्ही आमच्याकडुनच जर बदलण्याची अपेक्षा करत असाल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. जर मुस्लिम , ख्रिश्चन वा इतर बांधव त्यांची मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी 'त्वे' सोडीत असतील तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल.
अगदी याच पद्धतीने माझे राष्ट्रीयत्वही - हिंदीपणही मानवराष्ट्रात तेव्हा विलय पावेल जेव्हा इंग्लिशपण, जर्मनपण इत्यादीपणा लुप्त होऊन फक्त मानवता, मनुष्यपणा तेवढा जगात, मनुष्यमात्रात सुखेनैव नांदू लागेल ! आज देखील जो खरा मनुष्यवादी (humanitarian) असेल त्याच्यापुरते त्याच्याशी देखील मी सर्व भेदभाव सोडून वागेन.

स्वातंत्रवीर सावरकरांनी भविष्यकाळाचाही विचार करुन ठेवलेला आहे. ते म्हणतात कि एखाद्या भविष्यकाळी हिंदू हा शब्द केवळ हिंदुस्थानचा नागरिक वाचक होऊ शकेल. जेव्हा सर्व सांस्कृतिक व धार्मिक दुराग्रह आक्रमक गर्विष्ठपणाशी वचनबध्द असलेल्या शक्तीचे विसर्जन करतील व धर्म 'वाद' म्हणून न राहता ज्या समान पायावर मानवी राज्य ऐश्वर्याने व दृढपणे उभे राहील अशा पायाच्या मुळाशी असलेल्या चिरंतन तत्वांचा केवळ समान संचय म्हणून राहतील, तेव्हा हा दिवस उगवेल. भक्तिभावाने इच्छा करावी अशा ह्या सिध्दीची पहिली रेखासुध्दा क्षितिजावर दिसत नसताना कठोर वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल. जोपर्यंत धोकादायक युध्दघोषणांकडे झुकणार्‍या मतांचा त्याग इतर प्रत्येक वादाने केलेला नाही तोपर्यंत एकजीवता व सामर्थ्य निर्माण करणारी बंधने विशेषत: समान नाव व समान ध्वज ही बंधने शिथिल करणे कोणत्याही सांस्कृतिक वा राष्ट्रीय एकांकाला परवडणार नाही.

"हिंदुस्थान" या नावाबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांना अतिव आदर, अभिमान होता. ते अभिमानाने सांगत की आपल्या देशाचे सर्वात प्राचीन नाव, ज्याविषयी आपणापाशी आधार आहे, ते सप्तसिंधू वा सिंधू आहे. भारतवर्ष हे नावसुध्दा नंतरचे अभिधान आहे. आणि त्याचे आवाहन व्यक्तिविषयक आहे. मनुष्य कितीही महान् असो, जसजसा काळ जातो तसतसा त्याचा गौरव कमी कमी होत जातो.संस्कृतमधील सिंधू शब्दाने सिंधू नदीचाच नव्हे तर समुद्राचाही ,दक्षिण द्वीपकल्पाला परिवेष्टणार्‍या समुद्ररशनेचा बोध होत असल्यामुळे हा एक शब्द आपल्या देशाच्या जवळ जवळ सर्व सीमा दर्शवितो. हिंदुस्थान ह्या शब्दाने मुख्य राजकीय व सांस्कृतिक विधेय जितके वक्तृत्वपूर्णपणे प्रकट होते तितके आर्यावर्त, दक्षिणापथ, जंबुद्वीप आणि भारतवर्ष ह्या शब्दांनी होऊ शकत नव्हते.

आपल्या या पितृभुमीबद्दल सावरकर अतिव श्रद्धेने, आदराने स्पष्ट करतात की हिंदुस्थान आमची पितृभुमीच नव्हे तर पुण्यभूमी आहे. ही परम पावन भारतभूमी, हे सिंधुस्थान, सिंधूपासून सिंधूपर्यंतची ही भूमी आमची पुण्यभूमी आहे. ह्या भूमीत आमच्या धर्मविचारांच्या संस्थापकांना व ऋषींना वेदांचा साक्षात्कार झाला; वैदिक ऋषींपासून ते दयानंदापर्यंत, जिनापासून महावीरापर्यंत, बुध्दापासून नागसेनापर्यंत, नानकापासून गोविंदापर्यंत, बंदापासून बसवापर्यंत, चक्रधरापासून चैतन्यापर्यंत, रामदासापासून राममोहनापर्यंत आमच्या गुरुंनी व धार्मिक पुरुषांनी जन्म घेतला व ते वाढले. तिच्या मार्गातील धुळीत आमच्या प्रेषितांचे व गुरुंचे पदरव ऐकू येतात. तिच्या नद्या व तिची उपवने पवित्र आहेत. कारण चंद्रप्रकाशात त्यांच्या घाटावर किंवा सायंकाळच्या छायेत बुध्दाने किंवा शंकराने जीवन, मनुष्य, आत्मा, ईश्वर, ब्रह्म आणि माया ह्यांच्या गहन प्रश्नांवर वाद व चर्चा केली. प्रत्येक डोंगर व प्रत्येक वृक्षाच्छादित खोरे कपिलाच्या, व्यासाच्या, शंकराच्या व रामदासाच्या स्मृतीने भरलेले आहे. येथे भगीरथ राज्य करतो, येथे कुरुक्षेत्र आहे. वनवासाला जाताना रामचंद्राने पहिला विश्राम येथेच घेतला. तेथेच जानकीने सोनेरी हरिण पाहिला व त्याला मारण्याचा आपल्या प्रियकराशी प्रेमाने हट्ट घरला. ज्या बासरीने गोकुळातील प्रत्येक हृदय मोहनिद्रेत असल्याप्रमाणे एका लयीत नाचू लागेल अशी बासरी त्या दैवी गुराख्याने वाजविली. येथे बोधिवृक्ष आहे व येथे मृगवन आहे. येथेच महावीराला निर्वाण प्राप्त झाले. येथेच भक्तांच्या मेळाव्यात बसून 'गगन थाल रविचंद्र दीपक बने' ही नानकाने आपली आरती म्हटली. येथे गोपीचंद राजाने गोपीचंदजोगी होण्याची प्रतिज्ञा केली व भिक्षापात्र घेऊन मूठभर भिक्षेकरिता आपल्या बहिणीचे दार ठोठावले. येथेच हिंदू म्हणून मरण्याच्या अपराधाकरिता बंदा बहादुराच्या मुलाचे वडिलांच्या डोळयांसमोर तुकडे तुकडे करण्यात येऊन त्याचे हृदय वडीलांच्या तोंडात कोंबण्यात आले. येथील प्रत्येक दगड हौतात्म्याची कथा सांगू शकेल. हे माते ! तुझ्या भूमीचा प्रत्येक तसू यज्ञभूमी आहे. जेथे कृष्णसार सापडले तेथेच नव्हे तर काश्मीर ते सिंहल ही ज्ञानयज्ञाने पवित्र झालेली यज्ञीयभूमी आहे. म्हणून प्रत्येक हिंदूला, मग तो साधू असो वा संताळ ही भारतभूमी, हे हिंदुस्थान पितृभू आणि पुण्यभू आहे.

आपली हिंदुत्वाची व्यापक संकल्पना मांडल्यावर ते ठामपणे सांगतात की हिंदुस्थान हा हिंदूंचाच देश आहे. वस्तुत: जो समाज देशात बहुसंख्य असतो त्यांचाच तो देश मानला जाण्याची प्रथा सर्व जगात आहे. या नात्याने तर हिंदुस्थान हिंदूंचा आहेच; पण त्याशिवायही तो हिंदूंचा असल्याचे आणखी एक निश्चित गमक सांगता येईल. ते म्हणजे हिंदुस्थानच्या उध्दाराचा प्रयत्न कोणी केला ते पाहणे, हे होय. या देशाच्या स्वातंत्र्याच्या १८५७ पासून सुरु झालेल्या लढयात कोणी खरा त्याग केला ? - हिंदूंनी का मुसलमानांनी ?

ते पुढे स्पष्ट करतात की हिंदुस्थान ह्या नावाने अहिंदू बांधवांची मानहानी होत नाही, काही नुकसान होत नाही. चीनमध्ये कोटयावधी मुसलमान आहेत. ग्रीस, पॅलेस्टाईन इतकेच काय पण हंगेरी, पोलंडमध्येही त्यांच्या राष्ट्रघटकांत हजारो मुसलमान आहेत पण तेथे ते अल्पसंख्य, केवळ एक जाती आहेत. आणि त्या देशांना त्यांतील मोठया बहुसंख्येने असलेल्या वंशाची वसाहतस्थाने म्हणून रुढ असलेली प्राचीन नावे बदलण्यासाठी तेथे कोणी अल्पसंख्य जातीच्या अस्तित्वाचे कारण पुढे करीत नाही. तेथील मुसलमानांनी ही नावे विकृत केली नाहीत वा करण्यास धजले नाहीत. प्रसंग येताच पोलिश मुसलमान, ग्रीक मुसलमान , किंवा चिनी मुसलमान अशा नावांनी संबोधिले जाण्यात समाधान मानतात. त्याचप्रमाणे आपल्या मुसलमान देशबंधूंनी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक दृष्टया आपला निर्देश करताना हिंदुस्थानी मुसलमान म्हणून करावा. तसे करण्यात त्यांच्या धार्मिक वा सांस्कृतिक स्वतंत्र अस्तित्वास बाधा येत नाही.

हिंदुस्थान ह्या आपल्या मातृभूमीच्या रुढ नावाने ऋग्वेद काळातील सिंधूपासून आपल्या पिढीतील हिंदू शब्दापर्यंत जी अखंड परंपरा व्यक्त होते तिचा उच्छेद वा तिच्याशी प्रतारणा हिंदूंनी करु नये. जर्मनांचा देश जसा जर्मनी, इंग्रजांचा इंग्लंड, तुर्कांचा तुर्कस्थान नि अफगाणांचा अफगाणिस्थान, त्याचप्रमाणे हिंदूंचा देश म्हणून हिंदुस्थान ह्या नावानेच आपले स्थान जगाच्या नकाशात चिरंतन खोदून ठेविले पाहिजे

आपल्या साहित्यातुन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "राष्ट्र आणि हिंदुराष्ट्र" याबद्दलचे आपले विचारही खुप समर्पकपणे आणि पर्खडपणे मांडले आहेत. ते म्हणतात....

"जगातील मानवांनी एक व्हावे हीच आमची सदिच्छा आहे. जगातील मानवांनी एक होऊन त्यांचे एक मानवी राष्ट्र व्हावे असे आम्हांसही वाटते. आमचा वेदान्त तर याही पुढे जाऊन दगड नि मनुष्य हे सारखेच असल्याचे सांगतो. पण आपण परिस्थितीनुरुप व्यवहार केला पाहिजे. राष्ट्रवाद कालबाह्य नाही ,राष्ट्रवाद पाचशे वर्षे तरी जिवंत राहणार आहे. त्यानंतर काय होईल ते सांगता येत नाही. त्यानंतर पृथ्वी एक राष्ट्र होऊन मंगळ हे दुसरे राष्ट्र होईल. सिंधू ह्या शब्दाने व्यक्त होणारी कल्पना राष्ट्रवाचक आहे, केवळ भौगोलिक नाही

'हिंदू'शब्द मूलत: देशवाचक, राष्ट्रवाचक आहे. याचे मुख्य अधिष्ठान आसिंधु सिंधू अशी ही भारतभूमिका आहे. 'आसिंधु सिंधू' अशा त्या भारतभूमिकेत अत्यंत प्राचीन काळापासून ज्यांचे पूर्वज परंपरेने निवसत आले, ज्या राष्ट्रात प्रचलित असलेली सांघिक संस्कृती, घडलेला इतिहास, बोललेल्या भाषा, अनुसरलेले धर्म; ज्यांचे संस्कृती, इतिहास, भाषा, धर्म आहेत ते सारे हिंदु होत. त्या हिंदुराष्ट्राचे घटक होत. -

हिंदू हे केवळ एक राष्ट्र नसून ती एक जाती आहे. उत्पत्ती करणे ह्या अर्थाच्या जन धातूपासून जाती हा शब्द सिध्द झाला असून त्याचा अर्थ बंधुभाव, समान रक्त अंगात खेळत असलेला, एक उगम असलेला वंश असा होतो सप्तसिंधूतील लोक जसजसे हिंदुस्थानभर पसरत गेले तसतसे त्यांच्यात विविध वंशाचे मिश्रण, अनुलोम-प्रतिलोम विवाह इत्यादीमुळे झाले. जाती हा शब्द ह्या अर्थी वापरलेला आहे.राष्ट्रीय व वांशिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपली तीर्थे सर्व हिंदू जातीचा समान वारसा आहे आपले सण, उत्सव, संस्कार व आचार समान असहेत. हिंदु कोठेही असो मग तो शीख, जैन, ब्राह्मण वा पंचम असे तो दसरा, दिवाळी, रक्षाबंधन आणि होळी ह्यांचे स्वागत करतो.ज्या तीर्थांचे, पर्वतांचे, नगरांचे व नद्यांचे स्मरण हिंदू करतात ती कोणाही एक प्रांतातील नाहीत. तर ती अखिल हिंदुस्थानातील आहेत.शीखांचे अमृतसर, वैदिकांची काशी, बौध्दांची गया ही सारी आम्ही हिंदूंची सामायिक नि सारखीच पुण्यक्षेत्रे होत कलाकृती वा वास्तू, मग त्या वैदिक वा अवैदिक विचारांच्या प्रतिनिधी असोत, आपल्या वंशाचा समान वारसा आहे हिंदू निर्बंध व त्यांची आधारभूत तत्वे ह्यांतील तपशिलांत वा आदेशांत काही ठिकाणी परस्पर विरोध भासत असले तरी त्यांचा इतका एकावयवी विकास झालेला आहे की काल व देश ह्या स्थितीतून ही त्यांची वैशिष्टये टिकून राहिली आहेत

हिंदु धर्मामधील विविध समाजरचना, तसेच वैचित्र्यांबद्दल बोलताना ते विशद करतात......

कोणताही समाज वा राष्ट्र एकजीव होऊन जे जगते आणि त्यांच्याव्यतिरिक्त एतर समाजांशी होणार्‍या संघर्षातुनही तग धरते त्या लोकांमध्ये आपसात वैषम्य असे मुळीच नसते म्हणून नव्हे. कारण कुटुंब म्हटले की कुटुंबात व्यक्तिवैचित्र्य नि मतभिन्नता असतेच. मग कोटी कोटी व्यक्तींच्या एकजीवी समाजाची वा राष्ट्राची गोष्टच बोलणे नको. एका साच्यात पाडलेल्या गणपतीच्या मूर्तीप्रमाणे त्या कोटी कोटी व्यक्ती एकसाची असणे अशक्यच. परंतु त्या समाजातील पक्षोपक्षांची ही अंतर्गत विषमता इतर कोणत्याही समाजाशी असलेल्या त्यांच्या विषमतेहून अगदी कमी असते. आणि त्या समाजातील अनेक पक्षांना एकजीव करणारी महत्वाची बंधने दुसर्‍या समाजाशी असणार्‍या त्यांच्या संबंधांपेक्षा आत्यंतिक आकर्षक नि बळकट असतात म्हणून ते समाज वा राष्ट्र तसे पृथक नि एकजीव राहू शकते.

हिंदुराष्ट्रातील विविध विभागांचे परस्पर धोरण काय असावे ? यावरही सावरकरांची मते खुप उद्बोधक आणि क्रांतिकारक आहेत.

संख्येचे, भौगोलिक किंवा वांशिक लाभ निसर्गत: व ऐतिहासिक दृष्टया ज्यांना लाभलेले नाहीत असे लोक इतरांबरोबर देवाण घेवाण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. जन्मसिध्द अधिकारांनी प्राप्त झालेले लाभ ज्यांना माहीत नाहीत व त्याहूनही वाईट म्हणजे त्यांचाच तिरस्कार करतात अशांचा सत्यानाश होवो ! कागदाच्या कपटयांतून किंवा अडचणीत उत्पन्न झालेल्या बंधंनांनी नव्हे तर रक्ताच्या, जातीच्या, संस्कृतीच्या बंधनांनी झालेल्या प्राचीन, नैसर्गिक व एकजीवी एकीकरणापासून फुटणे व त्यालाच नाशिणे हे तुमच्यापैकी जैन समाजी, सनातनी , शीख वा कोणत्याही उपविभागाला परवडणार आहे का? असलेले बंध दृढ करा. ज्या भिंतीची उपयुक्ततता संपली आहे अशा भिंती, जाती, रुढी, विभाग मोडून टाका.आमच्या वैदिक, जैन, बुध्द, शीख, लिंगायत प्रभृती यच्चयावत् हिंदू बंधूंनी आपले मतभेद धार्मिक क्षेत्रापुरते काय ते ठेवून आपणा सर्वांना जी अनेकविध सामाजिक जीवनाची प्रिय बंधने आणि नात्यागोत्याचे स्नेहसंबंध आज शतकोशतके एकजीवी असे एक महान् राष्ट्र बनवीत आले आहेत, त्या स्नेहसंबंधांनाच शक्यतो जोपासीत राहावे, यातच आपल्या सगळयांचे कल्याण आहे

त्यांच्यामते हिंदुस्थानात हिंदू ही 'जात' होऊ शकत नाही. हिंदुस्थानात आम्हांस एक जाती म्हणणे मूर्खपणाचे आहे. जर्मनीत 'जर्मन' हे राष्ट्र आहे आणि ज्यू एक जात आहे. तुर्कस्थानात तुर्क हे एक राष्ट्र आहे. व अरब वा आर्मेनियन अल्पसंख्य जाती आहेत. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात हिंदू एक राष्ट्र आहेत व अल्पसंख्य मुसलमान वा ख्रिश्चन या एक जाती आहेत

वैदिक काळापासून निदान पाच सहस्त्र वर्षे तरी आपले पूर्वज आपल्या लोकांचा धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक नि राजकीय दृष्टया एकात्म असा गट घडवून आणीत होते. त्या क्रियेला स्वाभाविकपणे विकास पावता जे फळ आले ते म्हणजेच वैदिक काळातील त्या सिंधूचेच आज सबंध हिंदुस्थानभर पसरलेले आणि हिंदुस्थानालाच आपली एकमेव पितृभू नि पुण्यभू मानीत असलेले असे हिंदुराष्ट्र होय. कदाचित चिनी राष्ट्र वर्ज्य केल्यास जगातील दुसर्‍या कोणत्याही राष्ट्राला आपल्या हिंदुराष्ट्रासारख्या आपल्या जीवनाच्या नि विकासाच्या अखंड सातत्यावर अधिकार सांगता येणार नाही. हिंदुराष्ट्र हे काही पावसाळयातल्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेले नाही. ते एखाद्या तहातून उत्पन्न झालेले नाही. ते निव्वळ कागदी खेळणे नाही. किंवा ते एखाद्या मागणीप्रमाणे घडविलेले नाही. अथवा ती एखादी चालचलाऊ सोय नाही. ते ह्याच भूमीतून वर आलेले आहे नि ह्या भूमीतच त्याची मुळे खोल नि दूरवर पसरलेली आहेत. मुसलमानांचा किंवा जगातील अन्य कोणाचा द्वेष करण्याकरिता म्हणून काही तरी लावलेला शोध नाही. तर आपली उत्तर सीमा सांभाळणार्‍या हिमालयाप्रमाणे ते एक भक्कम आणि प्रचंड सत्य आहे.

आपल्या आचारातुन, विचारातुन आपल्या साहित्यातुन स्वा. विनायक दामोदर सावरकर सर्वे हिंदुस्थानवासीयांना एक हृद्य आवाहन करतात.....

"आपल्या पितामहांनी मराठा व शीख हिंदु साम्राज्याच्या पतनाच्या वेळी जो तेथेच सोडून दिला तो आपल्या राष्ट्रीय जीवनाचा धागा आपण हिंदूंनी पुन्हा उचलून हाती धरावा. आत्मविस्मृतीमुळे क्षय झालेल्या आपल्या हिंदुराष्ट्राच्या जीवनाचे आणि विकासाचे आपण पुनरुज्जीवन केले पाहिजे, त्याला समाधीतून पुन्हा उठविले पाहिजे प्रामाणिक व भोळसट अशा हिंदूंच्या हे स्पष्ट ध्यानात आले पाहिजे की सर्वसामान्य राष्ट्रीय जीवनाशी मुसलमानांनी समरस होण्याचे नाकारले म्हणजे नकारात्मक दृष्टीने सुध्दा हिंदूंचे एक राष्ट्र उरते.

राष्ट्राचा मोठेपणा त्याच्या ध्येयातून व्यक्त होतो. राष्ट्राचे स्वरुप त्याने आपल्यापुढे ठेवलेल्या ध्येयावर अवलंबून असते. संकुचित ध्येयाच्या राष्ट्रांनी भूतकाळात चिरंतन मोठेपणा प्राप्त केलेला नाही. राष्ट्राला महानता व वैभव प्राप्त करुन देण्याकरिता उदात्त ध्येय असणे आवश्यक आहे...

माझा हा वारसा मी तुम्हांस देत आहे

वटवृक्षाचे बीज मोहरीहून लहान असते पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, जी वल्गना असते ती वाढता वाढता तिचा प्रचंड वटवृक्ष बनून त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात, उन्हाने श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो.

मलाही वल्गना करु द्या ! माझे गाणे मला गाऊ द्या !

या जगात आपणाला जर हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल तर तसा आपला अधिकार आहे आणि ते राष्ट्र हिंदुध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे. या नाही तरी पुढल्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल.

माझी वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन. माझी ही वल्गना खरी ठरली तर मी प्रॉफेट ठरेन. माझा हा वारसा मी तुम्हाला देत आहे!

त्या महान द्वेष्ट्या समाजसुधारकाला, महान तत्वचिंतकाला, हिंदुत्वाचा खरा खुरा अर्थ समजलेल्या त्या महान देशभक्ताला माझे लाखो प्रणाम!

जय हिंद !

विशाल कुलकर्णी

संदर्भ : १. सहा सोनेरी पाने : स्वा. सावरकर
२. हिंदुत्व : स्वा. सावरकर
३. Savarkar & Hindutva : The Godse Connection by A.G. Durrani
४. www.savarkar.org

Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

किंवा या व्यक्तीच्या वागणूकीस जशास तसे उत्तर दिलेले चालेल असे जाहीर करावे! मग इब्लिस कशाला म्हणतात ते समझवून सांगता येईल.
---- जशाच तसे उत्तर देणे हे गांधीभक्तांना, अनुयायांना शोभा देत नाही.

त्यांच्या भाषेत त्यांची संस्कृती दिसते. तुमच्या भाषा रचनेत आणि वापरलेल्या शब्दांत तुमची संस्कृती दिसते... Sad आणि या सर्व गदारोळांत गांभिर्य पुर्वक चर्चा लुप्त पावते.

वज्र३०० धन्यवाद.
इब्लिस हा माणूस कोण आहे ते आलं लक्षात माझ्या. या भेदरटाला याच सवयी आहेत. Biggrin

लोकहो वरची सर्व चर्चा ही फार गंभीर बाब असुन ती समाजाच्या बदलत्या विचारांची, मानसिकतेची प्रतिनिधी आहे.
पुढील काही वर्षांमधे (कदाचित ५० वर्षांच्या आत) खालील गोष्टींची शक्यता नाकारता येत नाही.

१) ब्राह्मण असलेले सर्वच्या सर्व लोक भारताबाहेर वेगवेगळ्या देशांमधे गेलेले असतील (ज्याचे प्रमाण आत्तासुद्धा जास्त आहे). यामधे विशेषत: मराठी लोकांचे प्रमाण जास्त असेल. बाकी राज्यांमधे स्थिती अजुनही एवढी ब्राह्मण विरोधी नाहीये.

२) आत्ता शाब्दिक चकमकी झडत आहेत, हे असेच चालू राहिले तर पर्यवसान प्रत्यक्ष चकमकी घडण्यात सुद्धा होऊ शकते. यामुळे आधीच अनेक समस्या आहेत त्यामधे भर पडेल.

३) वरील पैकी काहीच न होता शिक्षण आणि आधुनिकता यामुळे लोक जुने विषय सोडून देतील आणि एका चांगला समाज निर्माण होईल.

यातले काय काय घडेल माहित नाही पण आपण पुढच्या पिढ्यांना काय देतो यावर बरेच काही अवलंबुन असेल.

जिज्ञासूंनी डॉ. अरविंद गोडबोलेंचे "हिंदुत्व विचारः आक्षेप व वास्तव" हे पुस्तक वाचावे.
ह्यावरील सगळ्या चर्चेचे खंडन ह्यात केले आहे. खालील दुव्यावर हे पुस्तक सवलतीत घरपोच मिळेल
http://www.bookganga.com/eBooks/Book/4782498121635636379.htm?Book=Hindutva Vichar Akshep V Vastav

<<आणि या सर्व गदारोळांत गांभिर्य पुर्वक चर्चा लुप्त पावते.>>

१००% सहमत.

यातले काय काय घडेल माहित नाही पण आपण पुढच्या पिढ्यांना काय देतो यावर बरेच काही अवलंबुन असेल.>>

महेशराव, पोस्ट आवडली. तसेच तिसरा पर्याय प्रत्यक्षात आला तर फारच सुंदर!

चर्चा मात्र कुठल्याकुठे गेली व मीही थांबतो म्हणून पुन्हा घुसलो (व त्याची कारणमीमांसा देत बसण्यात अर्थ नाही हेही जाणतोच).

काही मनात आलेले मुद्दे, जे बहुधा आधी एका वेगळ्याह्ह टोनमध्ये लिहिले असावेत.

१. सावरकर व त्यांचे कार्य महान होते यावर कोणाचाच वाद नसावा.

२. हिंदू ही संकल्पना भ्रामक आहे असेही नाहीच, पण हिंदुत्ववाद हा प्रकार अयोग्य आहे असे माझे मत आहे. कोणत्याही धर्मापेक्षा मानवता महत्वाची आहे हे पुस्तकी वाक्य खरोखरच योग्य आहे असे वाटते. हिंदूत्ववादाच्या बाजूने हिरीरीने चर्चा करणार्‍यांना परधर्मीयांचे काहीच चांगले अनुभव नसावेत किंवा मुळात अनुभवच नसावेत असे वाटायला लागले आहे. खरे तर मुसलमान सामान्य नाकागरिक हे स्वभावाने खूप म्हणजे खूपच दिलदार व चांगले असतात. तसेच कलाप्रेमी व रसिकही असतात. आपल्या संस्कृतीस व कला या क्षेत्रालाही त्यांचे प्रचंड योगदान आहेच. आपल्या संस्कृतीवर मुसलमानांचा खोलवर रुतलेला व बर्‍याच प्रमाणात चांगला ठसाही आहे. असेच ख्रिश्चन व बौद्धही असतात. मायबोलीवरील हा वाद म्हणजे कडव्या हिंदूत्ववाद्यांनी व त्यातल्या त्यात ब्राह्मणांनी (मी ब्राह्मण असूनही हे नोंदवू इच्छित आहे) माध्यम मिळाल्यामुळे व बहुसंख्य असल्याचा फायदा घेऊन टवाळी करत स्वतःची मते नोंदवणे इतकेच आहे. प्रत्यक्ष कर्तृत्व यांच्यापैकी कोणी गाजवले असेल असे वाटत नाही. मी मुसलमान वस्तीत अनेकदा वावरलो आहे व प्रत्येकवेळी त्यांच्यातील चांगुलपणा नजरेस आलेला आहे.

३. नरोडा (अहमदाबाद ) येथे असलेल्या पेप्सी प्लॅन्टला मी गेलेलो असताना एका रस्त्यावर दुतर्फा असलेल्या मुसलमानांच्या घरांची झालेली राखरांगोळी पाहून वेदना झाल्या. अर्थात, गोध्रा हत्याकांड वाचून तेच झाले होते. पण हे सगळे राजकारण्यांनी ट्रिगर केलेले वाद आहेत हे आपण सगळे जाणतोच. आपण ज्या धर्मात जन्माला आलो त्याचा अभिमान वाटणे साहजिक आहे इतकेच हे आहे असे मला तरी वाटते. इतर धर्मांच्या बाबतीत कडवे होण्यासाठी आपल्या धर्मात पुरेसा आधार देण्यासाठीचा इतिहास नाही. रामायण व महाभारतात अनेक व्यक्तीमत्वे चांगली चांगली म्हणता म्हणता वाईट वागलेली आहेत. त्यामुळे महेश यांचा तिसरा पर्याय - जुने विषय सोडून देणे - हा अप्रतिम वाटतो.

हा सावरकरांवरचा लेख येथे लिहिताना केवळ आणि केवळ आपण बहुसंख्य समविचारी लोकांमध्ये तो मांडत आहोत हे भान लेखकाला होते हे नोटिस केले पाहिजे. अन्यथा मुस्लिम बहुसख्यांमध्ये मांडण्यासारखा हा लेख नाही व भारतातील शासनप्रणाली असे विचार जर अती तीव्र होऊ लागले तर त्यावर अ‍ॅक्शन घेते हे नक्कीच!

-'बेफिकीर'!

<<आणखी एक माहिती.. बाबाराव सावरकरानी राष्ट्र् मिमांसा का अशाच कूथल्या तरी नावाचे एक पुस्तक लिहिले होते, मराठीत... त्याचेच गोळावलकर गुर्जीनी केलेले इंग्लिश भाषांतर म्हणजे वुई>>

ही अर्धवट माहिती आहे, 'WE' हे निव्वळ भाषांतर नाही त्यातील राष्ट्रवादासंबंधीचे विचार हे स्वतः गोळवलकरांचे आहेत, बाबारावांचे नाहीत. K Elst नी त्यांच्या लेखात ह्याचा बर्‍यापैकी परामर्श घेतला आहे.

मी ख्रिस्ताचे हिंदुत्व हे पुस्तक वाचले आहे, त्यात बाबारावांनी तर्क मांडले आहेत, २-३ प्रकारचे तर्क आहेत. उदा. ख्रिस्त भारतात काही वर्ष राहिला होता व त्याच्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव होता किंवा त्याचा जन्म भारतातलाच होता किंवा आई-वडिल हिंदू होते इ.
त्यांना जे पुरावे उपलब्ध झाले त्यावरून त्यांनी 'तर्क' मांडले आहेत, सिद्धांत नाही व त्यांनी जे तर्क मांडले ते सत्य आहेत असे ग्रुहित धरले तरी त्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्वाला बाधा येत नाही कारण ख्रिस्त जरी कोणीही असले तरी त्यांचे अनुयायी कसे मानतात/वागतात ह्यावर सगळे अवलंबून असते. शेवटी 'हिंदुत्व' इच्छेवर अवलंबून असते, असे सावरकरांनीही व ज्ञानकोशकार केतकरांनी त्यांच्या प्रबंधात सांगितले आहेच.
by d way ख्रिस्त हा जन्माने 'ज्यू' होता असे मी नाना पालकरांच्या "इस्रायलः छळाकडून बळाकडे" ह्या पुस्तकात वाचले आहे. विकिपिडियावर तो 'गॅलिलियन ज्यू' होता असे म्हटले आहे
http://en.wikipedia.org/wiki/Jesus

<<हा सावरकरांवरचा लेख येथे लिहिताना केवळ आणि केवळ आपण बहुसंख्य समविचारी लोकांमध्ये तो मांडत आहोत हे भान लेखकाला होते हे नोटिस केले पाहिजे. अन्यथा मुस्लिम बहुसख्यांमध्ये मांडण्यासारखा हा लेख नाही व भारतातील शासनप्रणाली असे विचार जर अती तीव्र होऊ लागले तर त्यावर अ‍ॅक्शन घेते हे नक्कीच!>>

असे म्हणजे नक्की कुठले विचार तुम्हाला म्हणायचे आहेत?? कारण सावरकरांने जे विचार मांडले आहेत जवळ जवळ तसेच विचार आंबेडकरांच्या 'पाकिस्तान' पुस्तकात व 'बहिष्क्रुत भारत' मधील लेखात आहेत. तसेच आज हिंदुत्वाला शासकीय मान्यता आहे कारण हिंदू कोड बिल केवळ सावरकरांनी प्रतिपादिलेल्या धर्म/पंथालाच लागू आहे.
राजकीय खेळ्या असतात हे मान्य आहे पण शेवटी त्यांना निवडून सामान्य माणूसच देतो म्हणजे सगळे दायित्व त्यांच्यावर येत नाही...मोदींची स्तुती केली म्हणून वस्तवानींना देवबंदचा राजीनामा द्यावा लागला तो तर राजकीय पक्ष नाहीये ना??

<<हा सावरकरांवरचा लेख येथे लिहिताना केवळ आणि केवळ आपण बहुसंख्य समविचारी लोकांमध्ये तो मांडत आहोत हे भान लेखकाला होते हे नोटिस केले पाहिजे.>>

समविचार अयोग्य असतो असे कोणी सांगितले? व असे विचार इतर ठिकाणी (प्रसिद्ध व्रुत्तपत्रे/मासिके)सावरकरवादी नक्की मांडतील पण त्यांनी परवानगी द्यायला हवी ना??

मानवता व हिंदुत्ववाद ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हिंदुत्ववादी लांगूलचालन करीत नाहीत म्हणून ते मानवतावादी नाहीत का? लांगूलचालन म्हणजे मानवता का?

हिंदुत्ववाद म्हणजे अहिंदूंचा द्वेष नव्हे, हिंदुत्ववाद म्हणजे राष्ट्रहित, मानवता, त्याच्याआड जे येतील त्याला विरोध करणारच त्याला व्देष कसा म्हणणार??

समविचार अयोग्य असतो असे कोणी सांगितले>> मी कुठे म्हणालो असे कोणी मला सांगितले म्हणून? Happy

मानवता व हिंदुत्ववाद ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हिंदुत्ववादी लांगूलचालन करीत नाहीत म्हणून ते मानवतावादी नाहीत का? लांगूलचालन म्हणजे मानवता का?>>>

हा लांगूलचालन शब्द ऐतिहासिक आहे. कोणाही हिम्दूत्ववाद्याला विचारले की तो म्हणतो काँग्रेसवाले लांगूलचालन करतात. आजच्या जगात त्याला फारसे महत्वही राहिलेले नाही.

<<हा लांगूलचालन शब्द ऐतिहासिक आहे. कोणाही हिम्दूत्ववाद्याला विचारले की तो म्हणतो काँग्रेसवाले लांगूलचालन करतात. आजच्या जगात त्याला फारसे महत्वही राहिलेले नाही.>>

सहमत....जगातील इतर देश बहुसंख्य सोडून इतरांचे लांगूलचालन करत नाही म्हणून जगात लांगूलचालनला महत्व नाही अपवाद भारत.

ह्यावरील सगळ्या चर्चेचे खंडन ह्यात केले आहे.

म्हणजे नेमक्या कुठल्या चर्चेचे? ख्रिस्ताचे हिंदुत्वपासून हे राम पर्यंत वर अनंत विषय येऊन गेलेत.

मानवता व हिंदूत्ववाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे विधान मजेशीर वाटले.

तसे असल्यास हिंदूत्ववाद हवा कशाला? आम्ही सगळे मानवतावादी आहोत असा एकही सूर मूळ लेखात व त्या बाजूने दिलेल्या प्रतिसादात दिसलेला नाही. हिंदू हा शब्दच कशाला पाहिजे मग?

तसेच आज हिंदुत्वाला शासकीय मान्यता आहे कारण हिंदू कोड बिल केवळ सावरकरांनी प्रतिपादिलेल्या धर्म/पंथालाच लागू आहे.

चुकीचं आहे. कायद्याच्या पुस्तकात कुठेही हिंदुत्व हा शब्द नाही.. आणि अशा प्रकारे एतद्देशीय धर्माना एकच कायदा लागू करणे हे मुघल>ब्रिटिश>आंबेडकर या पद्धतीने आलेले आहे.. यापैकी कुणीही सावरकरांची पुस्तकं वाचून कायदा लिहायला बसले नवहते.. त्यामुळे सावरकरांची व्याख्या कायद्याने घेतली किंवा त्याला मान्यता दिली याला काही अर्थ नाही. ( हे मागेही मी लिहिले होते.)

>>> same goes for the id called 'मास्तुरे'

जामोप्या यांनी सर्वात प्रथम "अजून वर मला निर्लज्जपणे विचारताय" आणि "तुमचा मेंदू किती सडलेला आहे" असे माझ्याबद्दल २ वेगवेगळ्या प्रतिसादात लिहिले. ही विधाने तुम्हाला व्यक्तिगत टीका वाटली नाही, याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. तसं वाटलं असतं तर तुम्ही याही २ वाक्यांचा उल्लेख करून त्यांनाही नावे ठेवली असती. शेवटी, "समान शीलेषु व्यसनेषु सख्यम्" हेच खरं!

>>> हिडन अजेंडा कसा असतो अन हिंदुत्व नक्की काय याचे पर्फेक्ट नमुने आहेत दोघे

हिंदूद्वेष्ट्या निधर्मांधांचा कसा गोबेल्सच्या तंत्राने प्रचार चालतो, पुस्तकातली एकही ओळ न वाचता व डोळ्यांवर व मेंदूवर झापडे लावून स्वतःच्या कल्पनेच्या साम्राज्यात रममाण होऊन हिंदूंना कसे झोडपून काढता येते आणि सर्वधर्मसमभाव व निधर्मीपणा नक्की काय याचे परफेक्ट नमुने आहात तुम्ही दोघे जण!

>>> ही अर्धवट माहिती आहे, 'WE' हे निव्वळ भाषांतर नाही त्यातील राष्ट्रवादासंबंधीचे विचार हे स्वतः गोळवलकरांचे आहेत, बाबारावांचे नाहीत.

त्यांची सर्वच माहिती अर्धवट आहे!

मास्तुरे Biggrin

ही अर्धवट माहिती आहे, 'WE' हे निव्वळ भाषांतर नाही त्यातील राष्ट्रवादासंबंधीचे विचार हे स्वतः गोळवलकरांचे आहेत, बाबारावांचे नाहीत.

http://www.cscsarchive.org:8081/MediaArchive/audience.nsf/(docid)/07C38DDC46B93FFFE5256BD5002A0B46

So brutally candid is We or Our Nationhood Defined that a desperate attempt was made by the RSS to distance itself from it - the RSS claimed that the book was merely an English translation of the Marathi work Rashtra Meemansa by Babarao G.D. Savarkar, brother of V. D. Savarkar. However, in his Preface to We or Our Nationhood Defined dated March 22, 1939, Golwalkar described Rashtra Meemansa as 'one of my chief sources of inspiration and help. An English translation of this is due to be shortly out {sic],

आता नेमके काय खरे हे हिंदुत्ववाल्याना माहीत. Proud पुस्तकावर बंदी आली, तेंव्हा हे सगळे कन्फ्युजन वर आले.. पुस्तक आपले म्हणायचे की त्यांच्या पुस्तकाचे भाषांतर म्हणायचे ते! Proud १९४७ नंतर बहुदा या पुस्तकाची आवृत्ती निघालेली नाही.

वैयक्तिक पातळीवर उतरून लिखाण करणार्‍या या मंदार जोशी नामक माणसाला आवरणे मायबोली प्रशासनाच्या आवाक्या बाहेरील आहे काय? >>>>

Rofl

तसे नसावे. त्यांनी प्रशासनाकडे केलेल्या अनंत तक्रारींचे निवारण करण्यातच प्रशासनाला आपला सारा बहुमूल्य वेळ घालावा लागत असावा, त्यामुळे इतरत्र दुर्लक्ष होत असावे. Lol (दिवा)

मुद्दे खोडून काढता येत नाहीत म्हणून ते 'गुरांचे डॉक्टर आहेत' 'मनोरुग्ण' आहेत हे सगळे आरोप सभ्य शब्दांच्या बुरख्याखाली या विकृत माणसाने श्री जागोमोहनप्यारे याम्चेवर केलेले आहेत>>>>

Rofl

आयला हे आत्ताच वाचलं! डेंजर लिहिलं आहे.

<<तसे असल्यास हिंदूत्ववाद हवा कशाला? आम्ही सगळे मानवतावादी आहोत असा एकही सूर मूळ लेखात व त्या बाजूने दिलेल्या प्रतिसादात दिसलेला नाही. हिंदू हा शब्दच कशाला पाहिजे मग?>>

सावरकरांचे लेख नीट वाचा त्यात अंतिम उद्दीष्ट मानवतावादच दिले आहे, पण जोपर्यंत हिंदूंना हिंदू म्हणून झोडपल जात आहे तोपर्यंत हिंदूहिताची बाजू घेणारे कोणी तरी हवेच ना.
हिंदूत्ववादी मानवता असेच म्हणतात पण विरोधकच त्यांना हिंदूत्ववादी म्हणून झोडपतात व मानवता व हिंदूत्ववाद वेगळा करतात.

<<चुकीचं आहे. कायद्याच्या पुस्तकात कुठेही हिंदुत्व हा शब्द नाही..>>

मी सुद्धा मागे लिहिल होत की 'हिंदुत्व' नावाखाली जरी मान्य केलेले नसले तरी त्यातील गाभा नकळत/अप्रत्यक्षरित्या मान्य केलाय. मी हिंदुत्व शब्द निर्बंधात असे म्हणालो नाही पण त्यातील गाभा/content मान्य केला आहे "हिंदू कोड बिल"नावाखाली.

<<आणि अशा प्रकारे एतद्देशीय धर्माना एकच कायदा लागू करणे हे मुघल>ब्रिटिश>आंबेडकर या पद्धतीने आलेले आहे.. यापैकी कुणीही सावरकरांची पुस्तकं वाचून कायदा लिहायला बसले नवहते.. त्यामुळे सावरकरांची व्याख्या कायद्याने घेतली किंवा त्याला मान्यता दिली याला काही अर्थ नाही. ( हे मागेही मी लिहिले होते.)>>

आहो मग सावरकरांनी सांगितल आहे ते अर्वाचीन एतिहासिक सत्यच आहे. 'हिंदुत्व' हे एतिहासिक सत्य आहे हे सावरकरांनी त्या प्रबंधातच सांगितले आहे. मग तुम्ही का त्यांच्यावर टिका करता की त्यांनी अहिंदूंना ह्यातून वगळले वगैरे.
अहिंदूंनी ह्या देशातून चालते व्हावे असे ते कधीही म्हणाले नाहीत तसेच हिंदूमहासभेच्या घोषणापत्रात अहिंदूंना स्थान होते, त्यांचे धर्मपालनही संमत होते. मग का सावरकरांना झोडपता???
म्हणजे हिंदुत्वावरील टिकेसाठी सावरकर त्याचे निर्माते व स्तुतीसाठी/निर्बंधासाठी मुघल/ब्रिटिश निर्माते का??
थोडक्यात काय दोन्हीकडून बोलायच..उद्देश एकच सावरकर्-संघवाले-हिंदूत्ववाद्यांना झोडपणे.

सावरकरांचे लेख नीट वाचा त्यात अंतिम उद्दीष्ट मानवतावादच दिले आहे, पण जोपर्यंत हिंदूंना हिंदू म्हणून झोडपल जात आहे तोपर्यंत हिंदूहिताची बाजू घेणारे कोणी तरी हवेच ना.
हिंदूत्ववादी मानवता असेच म्हणतात पण विरोधकच त्यांना हिंदूत्ववादी म्हणून झोडपतात व मानवता व हिंदूत्ववाद वेगळा करतात.>>

हिंदूंना हिंदू म्हणुन हल्ली सारखे झोडपले जाते असे विभाग १९४७ नंतरच्या भारतात कोठे आहेत ते कृपया सांगावेत.

माझ्यामते आता हिंदूंना झोडपले जातच नाही. झोडपले गेले तरी ते अपवादात्मकरीत्या!

http://cdn.cloudfiles.mosso.com/c114762/3581248b-21b4-495d-92f3-f763af06...

बाबारावांचे पुस्तक + गुर्जींचे स्वतःचेही विचार असे एकंदर त्या पुस्तकाचे स्वरुप वाटते. पण आक्षेपार्ह वाक्ये मात्र गुर्जींचीच असावीत असे वाटते. संघाने स्वतःला त्या पुस्तकापासून १९४७ नंतर दूरच ठेवले आहे..

-*-

-*-

<<आता नेमके काय खरे हे हिंदुत्ववाल्याना माहीत. पुस्तकावर बंदी आली, तेंव्हा हे सगळे कन्फ्युजन वर आले.. पुस्तक आपले म्हणायचे की त्यांच्या पुस्तकाचे भाषांतर म्हणायचे ते! १९४७ नंतर बहुदा या पुस्तकाची आवृत्ती निघालेली नाही.>>

दोन्ही पुस्तक वाचा म्हणजे तुम्हालाच खर काय ते कळेल. स्वतः गुरूजींनी ते माझे विचार असे म्हटलेले आहे व केवळ स्फूर्ती बाबारावांच्या पुस्तकाची आहे. कारण ते राष्ट्र्वादावर लिहिलेले व गाजलेले पहिले हिंदू लेखक लिखित पुस्तक होते. स्फूर्ती म्हणजे सगळे विचार त्यांचे असा अर्थ होते नाही.

<<मुद्दे खोडून काढता येत नाहीत>>

सगळे मुद्दे खोडून काढले आहेत, शब्दछल व मुद्दे ह्यात भेद आहे. वैयक्तिक टिपण्णी करणे मलाही संमत नाही.

घ्या......यांची इथपासून सुरवात आहे>>>

हिंदूंना १९४७ नंतरच्या भारतात कोठे सातत्याने झोडपले जाते हे कृपया माहीत असल्यास सांगावेत.

चार पुस्तके वाचुन माणुस शहाणा होते असे म्हणतात, येथे तर सगळेच चार पुस्तके वाचुन गांधी आणी सावरकरावर चिखलफेक करतायेत.
मर्यादेची पातळी ओलांडली तरी कोणी माघार घ्यायला तयार नाही. लोकांना समजले आहे तुम्ही काय आहे ते. उगाच आपले अमुल्य ज्ञान अजुन पाजळु नका आणी थोर देशभक्तांना आपल्या लेखणीचा प्रसाद देवु नका
आपण महान आहात.

अहिंदूंनी ह्या देशातून चालते व्हावे असे ते कधीही म्हणाले नाहीत तसेच हिंदूमहासभेच्या घोषणापत्रात अहिंदूंना स्थान होते, त्यांचे धर्मपालनही संमत होते. मग का सावरकरांना झोडपता???

सावरकराना जर त्यांचे धर्मपालन मान्य होते, तर आज कायदाही तेच मान्य करतोय ना? मग तुम्ही कायद्याला का झोडपता ? ज्याने त्याने भारतीय रहावे आणि आपापला धर्म व्यवस्थीत पाळावा, हेच कायदाही सांगतो.. मग पुन्हा कुणीतरी हिंदुत्वाची व्याख्या करायची गरजच काय?

<<हिंदूंना हिंदू म्हणुन हल्ली सारखे झोडपले जाते असे विभाग १९४७ नंतरच्या भारतात कोठे आहेत ते कृपया सांगावेत.>>

हे म्हणजे रामायण झाल्यावर राम कोण असे विचारण्यासारखेच झाले...आहो ४७ नंतरचा इतिहास वाचा सगळे विभाग-प्रभाग कळतील.

हे म्हणजे रामायण झाल्यावर राम कोण असे विचारण्यासारखेच झाले...आहो ४७ नंतरचा इतिहास वाचा सगळे विभाग-प्रभाग कळतील.>>

अहो तुम्ही पहिल्यांदा हे वाचा ते वाचा म्हणणे थांबवून नेमके कोठे झोडपले जाते इतकेच सांगा!

सगळे यांना वाटते

मला नाही, तो लेख लिहिणारे गोडबोले की कोण त्याना तसे वाटते... गोडबोले आडनाव आहे, म्हणजे हिंदुत्ववाल्यानी त्यांचे मत स्वीकारायला हरकत नसावी.. ( तसे आमचेही आडनाव कागलकरच आहे.. पण आमचा संघाला काही उपयोग नाही. ! ) Proud

Pages