हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुराष्ट्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकर !

Submitted by विशाल कुलकर्णी on 12 October, 2009 - 07:16

स्वा. सावरकरांचे आजवर वाचलेले साहित्य, आंतरजालावर उपलब्ध माहिती आणि इतरही काही संदर्भ वापरुन हा लेख संकलीत केला होता. अर्थात त्यामुळे हा लेख मी लिहीलाय असे म्हणता येइल की नाही कुणास ठाऊक. पण स्वातंत्र्यवीरांचे विचार संकलित करण्याची मेहनत मी जरुर घेतली आहे. हा लेख माबोच्या दिवाळी अंकासाठीदेखील पाठवला होता. पण कुठल्याशा कारणाने (नियमात बसत नसल्याने असेल कदाचित) तो तिथुन साभार परत आला. तेव्हा तो इथे टाकत आहे. धन्यवाद.

..............................................................................................................................................

"आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: I I "

सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू! सिंधुपासुन सिंधुपर्यंत, अर्थात सिंधुनदीपासुन ते सिंधु म्हणजे सागरापर्यंत पसरलेली ही भुमी म्हणजे हिंदुभुमी आहे आणि प्रत्येक व्यक्ती ,जो कुणी या भुमीला केवळ आपली पितृभुमीच नव्हे तर पुण्यभुमीही मानतो तो हिंदु!मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेना का! मुळात हिंदु हा केवळ एक धर्म नाहीच आहे, तर ती एक जिवनप्रणाली आहे. 'हिंदुधर्म' हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष नि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची नि पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी नि पुण्यभूमी आहे त्या सार्‍यांना समावेशिणार्‍या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे.!

हे आमचे एकजीवन आज ज्या एकाच शब्दात नवीन व्याख्येप्रमाणे व्यक्तविता येते तो अनन्य शब्द आहे 'हिंदू' ! या शब्दाच्या 'हिंदू' या दोन अक्षरांत अगस्तीच्या अंजलीत महासागर तसे तीस कोटी लोकांचे राष्ट्रचे राष्ट्र सामावलेले आहे.किती सार्थ आणि योग्य शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदु या शब्दाची महती, त्याचा योग्य अर्थ सांगितला आहे. हिंदु या संकल्पनेची व्यापकता, तिचा विस्तार केवढ्या समर्पक शब्दात मांडले गेल आहे इथे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते आपल्या वंशाच्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला व आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि जवळ जवळ पाळण्यातले नाव निवडले ते सप्तसिंधू अथवा हप्त हिंधू आहे. सिधु नदीच्या समृद्ध खोर्‍यात राहणारे ते सिंधू. आणि इतर जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे आपणांस ह्याच सिंधू किंवा हिंदू याच नावाने ओळखत असत. बर्‍याचदा असे म्हणले जाते की हिंदु हे नाव किंवा हा शब्द आपल्याला अरबांकडुन मिळाला. पण सावरकरांच्या मते हिंदू हा शब्द आपणांस अरबांनी दिलेला नाही. प्रेषित महंमदाच्या जन्मापूर्वी, नव्हे अरब हे एक 'लोक' म्हणून ओळखले जाण्यापूर्वीदेखील हे प्राचीन राष्ट्र आपणांकडून व इतरांकडून सिंधू वा हिंदू ह्या स्वाभिमानी नावाने ओळखले जात होते. अरबांनी सिंधू नदीचा शोध लावला हे म्हणणे जितके खरे तितके अरबांनी ह्या शब्दाचा शोध लावला हे म्हणणे आहे

हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्

हिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्‍या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो.

स्वातंत्र्यवीर अगदी ठामपणे प्रतिपादन करतात की हिंदुत्व हा केवळ एक शब्द नव्हे, तर तो इतिहास आहे. ते मनापासुन समग्र हिंदु बांधवाना आवाहन करतात की अग्निहोत्री ब्राह्मण ज्याप्रमाणे यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित ठेवतो त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करुन ठेवा. योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल

हिंदुत्व का हवे? त्याचा आपल्याला काय फायदा होवु शकेल हे विषद करताना स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात कीं असा एक दिवस जरुर उगवेल किं समग्र मनुष्यजातीस ह्या शक्तीस (हिंदुत्व) तोंड द्यावे लागेल .हिंदुस्थानाला पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे, असा इतिहास असणारे व समान रक्त व संस्कृती ह्यांनी बांधलेले कोट्यावधी लोक सर्व जगाला आपले म्हणणे अधिकारवाणीने सांगू शकतील. स्वातंत्र्यवीर एका आंतरिक अभिमानाने सांगतात की ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही हेही तितकेच खरे आहे. हिंदू जेव्हा हिंदू राहत नाही तेव्हा तो अत्यंत उत्कटपणे हिंदू असतो व शंकराप्रमाणे सर्व पृथ्वी वाराणसी मानतो. वाराणसी मेदिनी ! मानतो किंवा तुकारामाप्रमाणे 'आमुचा स्वदेश ! भुवनत्रयामध्ये वास ! ' असे उद्गारतो. हे बंधूंनो ! विश्वाच्या मर्यादा - तेथे माझ्या देशाच्या सीमा आहेत !

हिंदुस्थानात सुखाने नांदत असणार्‍या अनेक - नानाविध धर्मांविषयी बोलताना सावरकरांचा कंठ भरुन येत असे. त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर एक अलौकीक असे तेज, एक समाधान पाहायला मिळे. विश्व हिंदु परिषदेच्या एका सभेत बोलताना स्वातंत्र्यवीर म्हणाले होते.

"बहुसंख्य हिंदूंच्या धर्माला सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म अथवा वैदिक धर्म ह्या प्राचीन व मान्य संज्ञांनी संबोधिता येते. इतर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल. ह्यामुळे अर्थहानी होणार नाहीच, परंतु तो अधिक अचूक व नि:संदिग्ध होईल व आपल्या लहान समाजातील संशय व मोठया समाजातील राग दूर करुन आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्‍या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील..

इतर धर्मांप्रमाणे (उदा. मुस्लिम - कुराण, ईसाई- बायबल) हिंदुधर्माचे एक धर्मपुस्तक नाही हे चांगलेच आहे. कारण यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही. आमचे धर्मतत्वही कोणत्या पुस्तकाच्या दोन पुठ्ठयात सामावू शकणार नाही. ह्या विश्वाच्या दोन पुठ्ठयांमध्ये जितके सत्य नि ज्ञान विस्तृत पसरलेले आहे तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत होईल.

हिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाही. हिंदुधर्म नि:संशय सात्विक, क्षमाशील आहे. हिंदुधर्म क्रोधशीलही आहे. 'क्लैब्यं मा स्म गम: पार्थ' ही हिंदुधर्माची गर्जना आहे. 'अहिंसा परम धर्म:' ही ज्या हिंदुधर्माची व्याख्या आहे त्याच हिंदुधर्माची अगत्याची व तेजस्वी आज्ञा आहे की 'आततायिनमायान्तं हन्यादेवाविचारयन्' आणि त्या दोन्ही आज्ञांचा समन्वय, हिंदुधर्मच उत्तम प्रकारे लावू शकतो काही झाले तरी बुध्दिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय !"

आपल्या हिंदुत्वाच्या कल्पनेबाबतीत सावरकर अतिशय स्पष्ट आहेत. योग्य ते बदल स्विकारण्याची त्यांची तयारी आहे. त्यासाठी प्रसंगी आपली रुढी-परंपरा यांच्या चौकटी मोडायला देखील ते तयार असत हे त्यांच्या आचार विचारातुन ठामपणे स्पष्ट होत असे. रत्नागिरीतील पतित पावन मंदीर हे याचे स्पष्ट उदाहरण आहे. मानवाच्या, मानव्याच्या भल्यासाठी आपल्या रुढी परंपरा मोडायची, चौकटी तोडायची त्यांची नेहेमीच तयारी असे. धर्म आणि राष्ट्रधर्म या संकल्पना स्पष्ट करताना सावरकर सांगतात किं हिंदीधर्म हा कुठल्याही रुढी परंपरांमध्ये, तथाकथीत चौकटीत अडकुन राहणारा नाही. बदलत्या समाजाला पोषक होइल अशा पद्धतीने आपले स्वरुप बदलत राहणे हा हिंदुधर्माचा स्वभावच आहे. पण फक्त तुम्ही आमच्याकडुनच जर बदलण्याची अपेक्षा करत असाल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. जर मुस्लिम , ख्रिश्चन वा इतर बांधव त्यांची मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी 'त्वे' सोडीत असतील तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल.
अगदी याच पद्धतीने माझे राष्ट्रीयत्वही - हिंदीपणही मानवराष्ट्रात तेव्हा विलय पावेल जेव्हा इंग्लिशपण, जर्मनपण इत्यादीपणा लुप्त होऊन फक्त मानवता, मनुष्यपणा तेवढा जगात, मनुष्यमात्रात सुखेनैव नांदू लागेल ! आज देखील जो खरा मनुष्यवादी (humanitarian) असेल त्याच्यापुरते त्याच्याशी देखील मी सर्व भेदभाव सोडून वागेन.

स्वातंत्रवीर सावरकरांनी भविष्यकाळाचाही विचार करुन ठेवलेला आहे. ते म्हणतात कि एखाद्या भविष्यकाळी हिंदू हा शब्द केवळ हिंदुस्थानचा नागरिक वाचक होऊ शकेल. जेव्हा सर्व सांस्कृतिक व धार्मिक दुराग्रह आक्रमक गर्विष्ठपणाशी वचनबध्द असलेल्या शक्तीचे विसर्जन करतील व धर्म 'वाद' म्हणून न राहता ज्या समान पायावर मानवी राज्य ऐश्वर्याने व दृढपणे उभे राहील अशा पायाच्या मुळाशी असलेल्या चिरंतन तत्वांचा केवळ समान संचय म्हणून राहतील, तेव्हा हा दिवस उगवेल. भक्तिभावाने इच्छा करावी अशा ह्या सिध्दीची पहिली रेखासुध्दा क्षितिजावर दिसत नसताना कठोर वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल. जोपर्यंत धोकादायक युध्दघोषणांकडे झुकणार्‍या मतांचा त्याग इतर प्रत्येक वादाने केलेला नाही तोपर्यंत एकजीवता व सामर्थ्य निर्माण करणारी बंधने विशेषत: समान नाव व समान ध्वज ही बंधने शिथिल करणे कोणत्याही सांस्कृतिक वा राष्ट्रीय एकांकाला परवडणार नाही.

"हिंदुस्थान" या नावाबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांना अतिव आदर, अभिमान होता. ते अभिमानाने सांगत की आपल्या देशाचे सर्वात प्राचीन नाव, ज्याविषयी आपणापाशी आधार आहे, ते सप्तसिंधू वा सिंधू आहे. भारतवर्ष हे नावसुध्दा नंतरचे अभिधान आहे. आणि त्याचे आवाहन व्यक्तिविषयक आहे. मनुष्य कितीही महान् असो, जसजसा काळ जातो तसतसा त्याचा गौरव कमी कमी होत जातो.संस्कृतमधील सिंधू शब्दाने सिंधू नदीचाच नव्हे तर समुद्राचाही ,दक्षिण द्वीपकल्पाला परिवेष्टणार्‍या समुद्ररशनेचा बोध होत असल्यामुळे हा एक शब्द आपल्या देशाच्या जवळ जवळ सर्व सीमा दर्शवितो. हिंदुस्थान ह्या शब्दाने मुख्य राजकीय व सांस्कृतिक विधेय जितके वक्तृत्वपूर्णपणे प्रकट होते तितके आर्यावर्त, दक्षिणापथ, जंबुद्वीप आणि भारतवर्ष ह्या शब्दांनी होऊ शकत नव्हते.

आपल्या या पितृभुमीबद्दल सावरकर अतिव श्रद्धेने, आदराने स्पष्ट करतात की हिंदुस्थान आमची पितृभुमीच नव्हे तर पुण्यभूमी आहे. ही परम पावन भारतभूमी, हे सिंधुस्थान, सिंधूपासून सिंधूपर्यंतची ही भूमी आमची पुण्यभूमी आहे. ह्या भूमीत आमच्या धर्मविचारांच्या संस्थापकांना व ऋषींना वेदांचा साक्षात्कार झाला; वैदिक ऋषींपासून ते दयानंदापर्यंत, जिनापासून महावीरापर्यंत, बुध्दापासून नागसेनापर्यंत, नानकापासून गोविंदापर्यंत, बंदापासून बसवापर्यंत, चक्रधरापासून चैतन्यापर्यंत, रामदासापासून राममोहनापर्यंत आमच्या गुरुंनी व धार्मिक पुरुषांनी जन्म घेतला व ते वाढले. तिच्या मार्गातील धुळीत आमच्या प्रेषितांचे व गुरुंचे पदरव ऐकू येतात. तिच्या नद्या व तिची उपवने पवित्र आहेत. कारण चंद्रप्रकाशात त्यांच्या घाटावर किंवा सायंकाळच्या छायेत बुध्दाने किंवा शंकराने जीवन, मनुष्य, आत्मा, ईश्वर, ब्रह्म आणि माया ह्यांच्या गहन प्रश्नांवर वाद व चर्चा केली. प्रत्येक डोंगर व प्रत्येक वृक्षाच्छादित खोरे कपिलाच्या, व्यासाच्या, शंकराच्या व रामदासाच्या स्मृतीने भरलेले आहे. येथे भगीरथ राज्य करतो, येथे कुरुक्षेत्र आहे. वनवासाला जाताना रामचंद्राने पहिला विश्राम येथेच घेतला. तेथेच जानकीने सोनेरी हरिण पाहिला व त्याला मारण्याचा आपल्या प्रियकराशी प्रेमाने हट्ट घरला. ज्या बासरीने गोकुळातील प्रत्येक हृदय मोहनिद्रेत असल्याप्रमाणे एका लयीत नाचू लागेल अशी बासरी त्या दैवी गुराख्याने वाजविली. येथे बोधिवृक्ष आहे व येथे मृगवन आहे. येथेच महावीराला निर्वाण प्राप्त झाले. येथेच भक्तांच्या मेळाव्यात बसून 'गगन थाल रविचंद्र दीपक बने' ही नानकाने आपली आरती म्हटली. येथे गोपीचंद राजाने गोपीचंदजोगी होण्याची प्रतिज्ञा केली व भिक्षापात्र घेऊन मूठभर भिक्षेकरिता आपल्या बहिणीचे दार ठोठावले. येथेच हिंदू म्हणून मरण्याच्या अपराधाकरिता बंदा बहादुराच्या मुलाचे वडिलांच्या डोळयांसमोर तुकडे तुकडे करण्यात येऊन त्याचे हृदय वडीलांच्या तोंडात कोंबण्यात आले. येथील प्रत्येक दगड हौतात्म्याची कथा सांगू शकेल. हे माते ! तुझ्या भूमीचा प्रत्येक तसू यज्ञभूमी आहे. जेथे कृष्णसार सापडले तेथेच नव्हे तर काश्मीर ते सिंहल ही ज्ञानयज्ञाने पवित्र झालेली यज्ञीयभूमी आहे. म्हणून प्रत्येक हिंदूला, मग तो साधू असो वा संताळ ही भारतभूमी, हे हिंदुस्थान पितृभू आणि पुण्यभू आहे.

आपली हिंदुत्वाची व्यापक संकल्पना मांडल्यावर ते ठामपणे सांगतात की हिंदुस्थान हा हिंदूंचाच देश आहे. वस्तुत: जो समाज देशात बहुसंख्य असतो त्यांचाच तो देश मानला जाण्याची प्रथा सर्व जगात आहे. या नात्याने तर हिंदुस्थान हिंदूंचा आहेच; पण त्याशिवायही तो हिंदूंचा असल्याचे आणखी एक निश्चित गमक सांगता येईल. ते म्हणजे हिंदुस्थानच्या उध्दाराचा प्रयत्न कोणी केला ते पाहणे, हे होय. या देशाच्या स्वातंत्र्याच्या १८५७ पासून सुरु झालेल्या लढयात कोणी खरा त्याग केला ? - हिंदूंनी का मुसलमानांनी ?

ते पुढे स्पष्ट करतात की हिंदुस्थान ह्या नावाने अहिंदू बांधवांची मानहानी होत नाही, काही नुकसान होत नाही. चीनमध्ये कोटयावधी मुसलमान आहेत. ग्रीस, पॅलेस्टाईन इतकेच काय पण हंगेरी, पोलंडमध्येही त्यांच्या राष्ट्रघटकांत हजारो मुसलमान आहेत पण तेथे ते अल्पसंख्य, केवळ एक जाती आहेत. आणि त्या देशांना त्यांतील मोठया बहुसंख्येने असलेल्या वंशाची वसाहतस्थाने म्हणून रुढ असलेली प्राचीन नावे बदलण्यासाठी तेथे कोणी अल्पसंख्य जातीच्या अस्तित्वाचे कारण पुढे करीत नाही. तेथील मुसलमानांनी ही नावे विकृत केली नाहीत वा करण्यास धजले नाहीत. प्रसंग येताच पोलिश मुसलमान, ग्रीक मुसलमान , किंवा चिनी मुसलमान अशा नावांनी संबोधिले जाण्यात समाधान मानतात. त्याचप्रमाणे आपल्या मुसलमान देशबंधूंनी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक दृष्टया आपला निर्देश करताना हिंदुस्थानी मुसलमान म्हणून करावा. तसे करण्यात त्यांच्या धार्मिक वा सांस्कृतिक स्वतंत्र अस्तित्वास बाधा येत नाही.

हिंदुस्थान ह्या आपल्या मातृभूमीच्या रुढ नावाने ऋग्वेद काळातील सिंधूपासून आपल्या पिढीतील हिंदू शब्दापर्यंत जी अखंड परंपरा व्यक्त होते तिचा उच्छेद वा तिच्याशी प्रतारणा हिंदूंनी करु नये. जर्मनांचा देश जसा जर्मनी, इंग्रजांचा इंग्लंड, तुर्कांचा तुर्कस्थान नि अफगाणांचा अफगाणिस्थान, त्याचप्रमाणे हिंदूंचा देश म्हणून हिंदुस्थान ह्या नावानेच आपले स्थान जगाच्या नकाशात चिरंतन खोदून ठेविले पाहिजे

आपल्या साहित्यातुन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "राष्ट्र आणि हिंदुराष्ट्र" याबद्दलचे आपले विचारही खुप समर्पकपणे आणि पर्खडपणे मांडले आहेत. ते म्हणतात....

"जगातील मानवांनी एक व्हावे हीच आमची सदिच्छा आहे. जगातील मानवांनी एक होऊन त्यांचे एक मानवी राष्ट्र व्हावे असे आम्हांसही वाटते. आमचा वेदान्त तर याही पुढे जाऊन दगड नि मनुष्य हे सारखेच असल्याचे सांगतो. पण आपण परिस्थितीनुरुप व्यवहार केला पाहिजे. राष्ट्रवाद कालबाह्य नाही ,राष्ट्रवाद पाचशे वर्षे तरी जिवंत राहणार आहे. त्यानंतर काय होईल ते सांगता येत नाही. त्यानंतर पृथ्वी एक राष्ट्र होऊन मंगळ हे दुसरे राष्ट्र होईल. सिंधू ह्या शब्दाने व्यक्त होणारी कल्पना राष्ट्रवाचक आहे, केवळ भौगोलिक नाही

'हिंदू'शब्द मूलत: देशवाचक, राष्ट्रवाचक आहे. याचे मुख्य अधिष्ठान आसिंधु सिंधू अशी ही भारतभूमिका आहे. 'आसिंधु सिंधू' अशा त्या भारतभूमिकेत अत्यंत प्राचीन काळापासून ज्यांचे पूर्वज परंपरेने निवसत आले, ज्या राष्ट्रात प्रचलित असलेली सांघिक संस्कृती, घडलेला इतिहास, बोललेल्या भाषा, अनुसरलेले धर्म; ज्यांचे संस्कृती, इतिहास, भाषा, धर्म आहेत ते सारे हिंदु होत. त्या हिंदुराष्ट्राचे घटक होत. -

हिंदू हे केवळ एक राष्ट्र नसून ती एक जाती आहे. उत्पत्ती करणे ह्या अर्थाच्या जन धातूपासून जाती हा शब्द सिध्द झाला असून त्याचा अर्थ बंधुभाव, समान रक्त अंगात खेळत असलेला, एक उगम असलेला वंश असा होतो सप्तसिंधूतील लोक जसजसे हिंदुस्थानभर पसरत गेले तसतसे त्यांच्यात विविध वंशाचे मिश्रण, अनुलोम-प्रतिलोम विवाह इत्यादीमुळे झाले. जाती हा शब्द ह्या अर्थी वापरलेला आहे.राष्ट्रीय व वांशिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपली तीर्थे सर्व हिंदू जातीचा समान वारसा आहे आपले सण, उत्सव, संस्कार व आचार समान असहेत. हिंदु कोठेही असो मग तो शीख, जैन, ब्राह्मण वा पंचम असे तो दसरा, दिवाळी, रक्षाबंधन आणि होळी ह्यांचे स्वागत करतो.ज्या तीर्थांचे, पर्वतांचे, नगरांचे व नद्यांचे स्मरण हिंदू करतात ती कोणाही एक प्रांतातील नाहीत. तर ती अखिल हिंदुस्थानातील आहेत.शीखांचे अमृतसर, वैदिकांची काशी, बौध्दांची गया ही सारी आम्ही हिंदूंची सामायिक नि सारखीच पुण्यक्षेत्रे होत कलाकृती वा वास्तू, मग त्या वैदिक वा अवैदिक विचारांच्या प्रतिनिधी असोत, आपल्या वंशाचा समान वारसा आहे हिंदू निर्बंध व त्यांची आधारभूत तत्वे ह्यांतील तपशिलांत वा आदेशांत काही ठिकाणी परस्पर विरोध भासत असले तरी त्यांचा इतका एकावयवी विकास झालेला आहे की काल व देश ह्या स्थितीतून ही त्यांची वैशिष्टये टिकून राहिली आहेत

हिंदु धर्मामधील विविध समाजरचना, तसेच वैचित्र्यांबद्दल बोलताना ते विशद करतात......

कोणताही समाज वा राष्ट्र एकजीव होऊन जे जगते आणि त्यांच्याव्यतिरिक्त एतर समाजांशी होणार्‍या संघर्षातुनही तग धरते त्या लोकांमध्ये आपसात वैषम्य असे मुळीच नसते म्हणून नव्हे. कारण कुटुंब म्हटले की कुटुंबात व्यक्तिवैचित्र्य नि मतभिन्नता असतेच. मग कोटी कोटी व्यक्तींच्या एकजीवी समाजाची वा राष्ट्राची गोष्टच बोलणे नको. एका साच्यात पाडलेल्या गणपतीच्या मूर्तीप्रमाणे त्या कोटी कोटी व्यक्ती एकसाची असणे अशक्यच. परंतु त्या समाजातील पक्षोपक्षांची ही अंतर्गत विषमता इतर कोणत्याही समाजाशी असलेल्या त्यांच्या विषमतेहून अगदी कमी असते. आणि त्या समाजातील अनेक पक्षांना एकजीव करणारी महत्वाची बंधने दुसर्‍या समाजाशी असणार्‍या त्यांच्या संबंधांपेक्षा आत्यंतिक आकर्षक नि बळकट असतात म्हणून ते समाज वा राष्ट्र तसे पृथक नि एकजीव राहू शकते.

हिंदुराष्ट्रातील विविध विभागांचे परस्पर धोरण काय असावे ? यावरही सावरकरांची मते खुप उद्बोधक आणि क्रांतिकारक आहेत.

संख्येचे, भौगोलिक किंवा वांशिक लाभ निसर्गत: व ऐतिहासिक दृष्टया ज्यांना लाभलेले नाहीत असे लोक इतरांबरोबर देवाण घेवाण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. जन्मसिध्द अधिकारांनी प्राप्त झालेले लाभ ज्यांना माहीत नाहीत व त्याहूनही वाईट म्हणजे त्यांचाच तिरस्कार करतात अशांचा सत्यानाश होवो ! कागदाच्या कपटयांतून किंवा अडचणीत उत्पन्न झालेल्या बंधंनांनी नव्हे तर रक्ताच्या, जातीच्या, संस्कृतीच्या बंधनांनी झालेल्या प्राचीन, नैसर्गिक व एकजीवी एकीकरणापासून फुटणे व त्यालाच नाशिणे हे तुमच्यापैकी जैन समाजी, सनातनी , शीख वा कोणत्याही उपविभागाला परवडणार आहे का? असलेले बंध दृढ करा. ज्या भिंतीची उपयुक्ततता संपली आहे अशा भिंती, जाती, रुढी, विभाग मोडून टाका.आमच्या वैदिक, जैन, बुध्द, शीख, लिंगायत प्रभृती यच्चयावत् हिंदू बंधूंनी आपले मतभेद धार्मिक क्षेत्रापुरते काय ते ठेवून आपणा सर्वांना जी अनेकविध सामाजिक जीवनाची प्रिय बंधने आणि नात्यागोत्याचे स्नेहसंबंध आज शतकोशतके एकजीवी असे एक महान् राष्ट्र बनवीत आले आहेत, त्या स्नेहसंबंधांनाच शक्यतो जोपासीत राहावे, यातच आपल्या सगळयांचे कल्याण आहे

त्यांच्यामते हिंदुस्थानात हिंदू ही 'जात' होऊ शकत नाही. हिंदुस्थानात आम्हांस एक जाती म्हणणे मूर्खपणाचे आहे. जर्मनीत 'जर्मन' हे राष्ट्र आहे आणि ज्यू एक जात आहे. तुर्कस्थानात तुर्क हे एक राष्ट्र आहे. व अरब वा आर्मेनियन अल्पसंख्य जाती आहेत. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात हिंदू एक राष्ट्र आहेत व अल्पसंख्य मुसलमान वा ख्रिश्चन या एक जाती आहेत

वैदिक काळापासून निदान पाच सहस्त्र वर्षे तरी आपले पूर्वज आपल्या लोकांचा धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक नि राजकीय दृष्टया एकात्म असा गट घडवून आणीत होते. त्या क्रियेला स्वाभाविकपणे विकास पावता जे फळ आले ते म्हणजेच वैदिक काळातील त्या सिंधूचेच आज सबंध हिंदुस्थानभर पसरलेले आणि हिंदुस्थानालाच आपली एकमेव पितृभू नि पुण्यभू मानीत असलेले असे हिंदुराष्ट्र होय. कदाचित चिनी राष्ट्र वर्ज्य केल्यास जगातील दुसर्‍या कोणत्याही राष्ट्राला आपल्या हिंदुराष्ट्रासारख्या आपल्या जीवनाच्या नि विकासाच्या अखंड सातत्यावर अधिकार सांगता येणार नाही. हिंदुराष्ट्र हे काही पावसाळयातल्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेले नाही. ते एखाद्या तहातून उत्पन्न झालेले नाही. ते निव्वळ कागदी खेळणे नाही. किंवा ते एखाद्या मागणीप्रमाणे घडविलेले नाही. अथवा ती एखादी चालचलाऊ सोय नाही. ते ह्याच भूमीतून वर आलेले आहे नि ह्या भूमीतच त्याची मुळे खोल नि दूरवर पसरलेली आहेत. मुसलमानांचा किंवा जगातील अन्य कोणाचा द्वेष करण्याकरिता म्हणून काही तरी लावलेला शोध नाही. तर आपली उत्तर सीमा सांभाळणार्‍या हिमालयाप्रमाणे ते एक भक्कम आणि प्रचंड सत्य आहे.

आपल्या आचारातुन, विचारातुन आपल्या साहित्यातुन स्वा. विनायक दामोदर सावरकर सर्वे हिंदुस्थानवासीयांना एक हृद्य आवाहन करतात.....

"आपल्या पितामहांनी मराठा व शीख हिंदु साम्राज्याच्या पतनाच्या वेळी जो तेथेच सोडून दिला तो आपल्या राष्ट्रीय जीवनाचा धागा आपण हिंदूंनी पुन्हा उचलून हाती धरावा. आत्मविस्मृतीमुळे क्षय झालेल्या आपल्या हिंदुराष्ट्राच्या जीवनाचे आणि विकासाचे आपण पुनरुज्जीवन केले पाहिजे, त्याला समाधीतून पुन्हा उठविले पाहिजे प्रामाणिक व भोळसट अशा हिंदूंच्या हे स्पष्ट ध्यानात आले पाहिजे की सर्वसामान्य राष्ट्रीय जीवनाशी मुसलमानांनी समरस होण्याचे नाकारले म्हणजे नकारात्मक दृष्टीने सुध्दा हिंदूंचे एक राष्ट्र उरते.

राष्ट्राचा मोठेपणा त्याच्या ध्येयातून व्यक्त होतो. राष्ट्राचे स्वरुप त्याने आपल्यापुढे ठेवलेल्या ध्येयावर अवलंबून असते. संकुचित ध्येयाच्या राष्ट्रांनी भूतकाळात चिरंतन मोठेपणा प्राप्त केलेला नाही. राष्ट्राला महानता व वैभव प्राप्त करुन देण्याकरिता उदात्त ध्येय असणे आवश्यक आहे...

माझा हा वारसा मी तुम्हांस देत आहे

वटवृक्षाचे बीज मोहरीहून लहान असते पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, जी वल्गना असते ती वाढता वाढता तिचा प्रचंड वटवृक्ष बनून त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात, उन्हाने श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो.

मलाही वल्गना करु द्या ! माझे गाणे मला गाऊ द्या !

या जगात आपणाला जर हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल तर तसा आपला अधिकार आहे आणि ते राष्ट्र हिंदुध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे. या नाही तरी पुढल्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल.

माझी वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन. माझी ही वल्गना खरी ठरली तर मी प्रॉफेट ठरेन. माझा हा वारसा मी तुम्हाला देत आहे!

त्या महान द्वेष्ट्या समाजसुधारकाला, महान तत्वचिंतकाला, हिंदुत्वाचा खरा खुरा अर्थ समजलेल्या त्या महान देशभक्ताला माझे लाखो प्रणाम!

जय हिंद !

विशाल कुलकर्णी

संदर्भ : १. सहा सोनेरी पाने : स्वा. सावरकर
२. हिंदुत्व : स्वा. सावरकर
३. Savarkar & Hindutva : The Godse Connection by A.G. Durrani
४. www.savarkar.org

Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

जो भारताचा नागरिक आहे, तो भारतीय आहे.. कायद्याची व्याख्या इतकी सोपी असताना ते आसिंधुसिंधु.. कशाला लागतं कुणास ठाऊक.

जो भारताचा नागरिक आहे, तो भारतीय आहे..
----- अनुमोदन. शंकाच नाही.

काही वर्षांपुर्वी मनमोहन सिंगांना (गमतीने) पत्रकारांनी प्रश्न विचारला होता " परवेझ मुशर्रफ चा जन्म दिल्ली मधे झाला आहे. ते भारताच्या OCI साठी अर्ज करण्यास ते पात्र असतील कां?" पत्रकारांना त्यांनी स्मित हास्य दिले.

हाच नियम लावायचा म्हटला तर लालकृष्ण अडवानींचा जन्म कराचीला झाला आहे, त्यांचं काय करायचं? Proud

जामोप्या, तुमच्या पोस्ट आता हास्यास्पद होऊ लागल्या आहेत. पुरे करा आणि इलाज करुन घ्या स्वतःचा एखाद्या सेक्युलर क्लिनिक मधे.

>>> मुस्लिम आणि ख्रिश्चन धार्मिक शाळेत सर्व मुस्लिम ख्रिश्चनाना सारखा प्रवेश असतो.. पण हिंदुंच्या धर्म -शाळेत फक्त ब्राहमणाना प्रवेश असतो, ज्यांची लोक्संख्या ३ टक्केही नाही...

अशा हिंदूंच्या कोणत्या धार्मिक शाळेत तुम्ही गेला होता आणि तिथे तुम्हाला किंवा (अब्राह्मणांना) प्रवेश नाकारण्यात आला? अशा ४-५ शाळांची नावे व पत्ता सांगाल का? तिथे तुम्ही कधी गेला होता? तिथे तुम्ही स्वत: प्रवेशासाठी गेला होता? की निव्वळ ऐकीव माहितीवर विसंबून किंवा स्वत:च्या कल्पनाविलासात रममाण होऊन हिंदूद्वेषाच्या वावड्या हवेत उडवत आहात?

>>> पण हिंदुत्वाच्या नावाने इतर धर्मिअयाना नाकारणे आणि कारण नसताना त्या धर्मांच्या नावाने खडी फोडणे, याला माझा विरोध आहे.

पण इथे कोणीच कारणाशिवाय इतर धर्मांच्या नावाने खडी फोडत नाहीये. जे खडी फोडत आहेत ते सकारण व सोदाहरण तसे करत आहेत.

>>> भारतातले मुसलमान हे स्वतःला भारतीय म्हणवून घेतातच...
>>>>>> ----- यातिलच काही भारतीय लोकं जळगांवी (याच धाग्यावर असा वर उल्लेख आलेला आहे) श्री. मोहम्मद अजमल आमिर इमान ऊर्फ अजमल कसाब यांना आशिर्वाद मिळावा म्हणुन चादर वहाण्यासाठी प्रार्थना करतात. असेच काही भारतीय लोकं भारत क्रिकेट सामना हरल्यावरच फटाके फोडतांना दिसतांत... आता आनंद व्यक्त करायची आणि भारत हरायची वेळ एकच येते जो निव्वळ योगायोग समजावा....

आणि काही भारतीय पॅलेस्टाईन, चेचन्या, इराक इ. देशांमधल्या आपल्या बांधवांचे सुतक पाळतात, पण काश्मिर व उर्वरीत भारतातल्या व योगायोगाने याच भूमीत राहणार्‍या बांधवांच्या अतिरेकी हल्ल्यात होणार्‍या मृत्युबद्दल किंवा त्यांच्यावर होणार्‍या अत्याचाराबद्दल ते निर्विकार असतात.

बरं ते जाऊ दे, तुम्हीच जी लिंक दिली ती पूर्ण वाचली का? आता तरी प.पू. गोळवलकर गुरूंजीच्या संदर्भ सोडून दिलेल्या २-३ वाक्यांनी तुमचे जे गैरसमज झाले होते, ते दूर झाले असतील अशी इच्छा व अपेक्षा आहे!

>>> जामोप्या, तुमच्या पोस्ट आता हास्यास्पद होऊ लागल्या आहेत. पुरे करा आणि इलाज करुन घ्या स्वतःचा एखाद्या सेक्युलर क्लिनिक मधे.

अहो, तुम्हाला व इतर काही जणांना ते पेशंट वाटत असले तरी ते मूळचे डॉक्टर आहेत म्हणे

-*-

गोळवलकर गुर्जींचं बंच ऑफ थॉट्स नावाचं पुस्तक वाचा..... त्यातली वाक्यं कुणी फारशी सिरियसली घेत नाहीत म्हणून, नाहीतर कधीच कुणीतरी त्याना आत टाकलं असतं.. ! Proud तुम्हीच वाचा त्यांची पुस्तकं ! हिंदु वगळता इतर धर्माचे लोक हे या देशात पाहुणे आहेत, असे त्यानी म्हटले आहे.. ( जणू काही बापाच्या पैशातून हे अहिंदुंची सरबराई करत असतात.. Happy )

काही भारतीय लोकं भारत क्रिकेट सामना हरल्यावरच फटाके फोडतांना दिसतांत...

मला तरी असे कुणी आजवर दिसले नाहीत.. जे अहिंदु भेटले ते रादर हिंदुंपेक्षा जास्तच प्रेमळ भेटले आणि भारत जिंकल्यावरच फटाके फोडतानाब्दिसले... तुम्ही हिंदुत्ववाले अशा अ‍ॅबनॉर्मल फटाके फोडणार्‍यांच्या मागावर वगैरे असता की काय? तुम्हालाच बरं असले फटाके फोडनारे आणि कसाबसाठी चादरी घालणारे , पॅलेस्टिनींची सुतकं घालणारे वगैरे गाठ पडतात.. . Proud पिंडे पिंडे मतीर्भिन्ना... ( पिंड म्हणजे व्यक्ती.. नाही तर कावळ्याचा संदर्भ घेऊन घाटावर जाऊन बसाल ! Proud )

हास्यास्पद... हो. ते ख्रिस्त म्हणजे कृष्ण, तमिली ब्राहमण वगैरे वाचून मलाही जाम हसू फुटले होते. म्हणून तर तुम्हा सगळ्यांबरोबर ते सगळे शेअर केले. ख्रिस्ताला क्रुसावर लटकवले तेंव्हा म्हणे त्याने तमिळी स्टाइल लुंगी आणि जानवे घातले होते आणि मरताना म्हणे तो तमिळी बोलला ! .. एक भाऊ ख्रिस्ताला हिंदु धर्मात घेतो, पण दुसरा भाऊ ख्रिश्चनाना भारतीय म्हणायला तयार नाही.. सगळ्च हास्यास्पद आहे. सावरकर बंधु एकुण ३ होते.. तिसरे डॉक्टर होते म्हणे... तरीही .......... Proud Proud Proud

गुरांचे का हो?

नाही तेवढी आमची बुध्धीमत्ता नाही... गुरांचं डॉक्टर व्हायला जास्त अक्कल लागते... नुसतं हम्मा हम्मा, म्याव म्याव वरुन आजार वळखायचं म्हणजे चेष्टा नाही.

-*-

मला तरी असे कुणी आजवर दिसले नाहीत.. जे अहिंदु भेटले ते रादर हिंदुंपेक्षा जास्तच प्रेमळ भेटले आणि
----- तुम्ही बापुजींच्या तिन माकडांसारखे अनुकरण करत असाल त्यामुळे तुम्हाला तसे दिसले नसेल... तुम्हाला ते (म्हणजे भारतीय !!) तसे दिसले वा भेटले नाही म्हणजे तशा घटना घडतच नाहीत असे नाही. आता तुम्ही ताज किंवा CST (VT) स्टेशवर श्री. कसाब यांचा गोळ्यांचा वर्षाव बघितला नाही म्हणजे तसे घडले नाहीच असे होत नाही.

जे अहिंदु भेटले ते रादर हिंदुंपेक्षा जास्तच प्रेमळ भेटले आणि भारत जिंकल्यावरच फटाके फोडतानाब्दिसले..
----- तुम्ही प्रत्येकाला भेटल्यावर जात आणि धर्म विचारतात का? सच्चा भारतीय म्हणुन तुम्ही प्रत्येकाला नाही का स्विकारु शकत....

>>> गोळवलकर गुर्जींचं बंच ऑफ थॉट्स नावाचं पुस्तक वाचा..... त्यातली वाक्यं कुणी फारशी सिरियसली घेत नाहीत म्हणून, नाहीतर कधीच कुणीतरी त्याना आत टाकलं असतं.. !

तुम्ही आधी "We" या पुस्तकातली २-३ इकडतिकडची वाक्ये टाकून त्यांच्याबद्दल गरळ ओकलीत. ते तुमचे (अविचार) समूळ व सोदाहरण खोडून काढल्यावर आता बंच ऑफ थॉट्स या पुस्तकाचा संदर्भ देत आहात व पुन्हा नव्याने गरळ ओकत आहात. प्रत्यक्षात ही दोन्ही पुस्तके तुम्ही वाचलेली नाहीत, पण निव्वळ पूर्वग्रह व द्वेष यामुळे तुम्ही गरळ ओकत आहात.

>>> मला तरी असे कुणी आजवर दिसले नाहीत.. जे अहिंदु भेटले ते रादर हिंदुंपेक्षा जास्तच प्रेमळ भेटले आणि भारत जिंकल्यावरच फटाके फोडतानाब्दिसले...

Rofl

>>> हास्यास्पद... हो. ते ख्रिस्त म्हणजे कृष्ण, तमिली ब्राहमण वगैरे वाचून मलाही जाम हसू फुटले होते. म्हणून तर तुम्हा सगळ्यांबरोबर ते सगळे शेअर केले. ख्रिस्ताला क्रुसावर लटकवले तेंव्हा म्हणे त्याने तमिळी स्टाइल लुंगी आणि जानवे घातले होते आणि मरताना म्हणे तो तमिळी बोलला ! .. ख्रिस्ताला हिंदु धर्मात घेतले,

या असल्या हास्यास्पद गोष्टी जगात तुम्हाला एकट्यालाच कशा माहित असतात हो? कट्टर सावरकरद्वेष्ट्या येचुरी, मणि अय्यर इ. नगांना सुध्दा हे कसे माहिती नाही? का हा तुमचा निव्वळ कल्पनाविलास? जरा जमिनीवर या. द्वेषामुळे निव्वळ कल्पनेच्या साम्राज्यात किती काळ राहणार?

विचारायला कशाला लागते, नावावरुन समजते... पण नाव काहीही असले तरी ते भारतीय्च आहेत, हे नक्की..

या असल्या हास्यास्पद गोष्टी जगात तुम्हाला एकट्यालाच कशा माहित असतात हो

सगळ्या हास्यास्पद गोष्टींच्या लिंका वर दिल्या आहेत.. त्या वाचा... त्यातूनही नाही समाधान झाले तर ख्रिस्ताचे हिंदुत्व की कुठले ते सावरकरांचे पुस्तक मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत उपलब्ध आहे... ( असल्या विनोदी पुस्तकावर बंदी कशाला घालायची म्हणून सरकारने बंदीही घातलेली नाही ! Proud ) त्यामुळे बिअनधास्त वाचा ..

पुस्तक इथून मागवू शकता...

http://www.theindianbooks.com/books.php?id=39266

k.JPG

गुगलवर jesus the christ was a hindu असा सर्च करा.. लगेच मिळेल.. मराठी पुस्तकाचे नाव.. ख्रिस्तपरिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व

kk.JPG

मराठ्जी पुस्तकाचे इंग्लुश भाषांतर डॉ. पी व्ही वर्तक यानी केले आहे. ते हिंदु धर्माचे गाढे अभ्यासक आहेत. ही त्यांची वेब साईट... http://www.drpvvartak.com/photogallery.asp त्यात अदर फोटोग्राफीमध्ये त्यांच्या सगळ्या पुस्तकांची यादी आहे. डॉ. वर्तक देखील माणसाम्चेच डॉक्टर आहेत.. Proud

मंदार, मी आत्ता अगदी हाच विचार करत होतो, मला अशी जाम शंका आहे की हे मधुकरचा डुआय तर नाहीत ना ? Uhoh
हिंदूंनी जरासुद्धा स्वाभिमानाने रहायचेच नाही का ? केवळ दुसर्‍या धर्माच्या लोकांना सतत मान देत रहायचे ?
शिवाजी, गुरू गोविंदसिंह, बंदा बैरागी, इ. लोक नसते ना तर हिंदू धर्मातला ह म्हणायची पण सोय राहिली नसती.

नस्ती शंका घेऊ नका.... माझा आय डी मधुकरपेक्षा कितीतरी जुना आहे.. आणि मी मधुकर असेन नाहीतर आणखी कुणी... त्या येशू ख्रिस्ताच्या पुस्तकावर सावरकरांचेच नाव आहे.

(मी येथे व्यक्तीश: कुणालाही ओळखत नाही) जागोमों आणि मधुकर या दोन व्यक्ती आहेत कारण त्यांचे अक्षर Happy वेगळे आहे. दोघांच्या विचारसणी मधे काही साम्यता जरुर आहे...

लोकं असा विचार का करतात हे मुळाशी जाऊन बघायला हवे. तशी विचारसरणी तयार झालीच कशी? थोडे कठोर आत्मपरिक्षण होणे गरजेचे आहे. प्रश्न विचारतो आहे म्हणुन घालवल्याने प्रश्न नाहिसा होणार वा सुटणारा नाही.

मंदारराव,

जा.मो.प्या. यांना गुराचे डॉक्टर म्हणेपर्यंत मजल मारू नयेत अशी अत्यंत नम्र विनंती!

हिंदू हिंदू म्हणजे काय म्हणे? कोणाचा कोणत्या धर्मात जन्म घेण्याचा अधिकार आहे? आणि खरे तर जा.मो.प्या. यांना गुरांचे डॉक्टरच म्हणण्यात अर्थ आहे असे वाटणे शक्य होत आहे.

मी (दुर्दैवाने, कौटुंबिक संस्कारांप्रमाणे व शिकविल्याप्रमाणे) 'भाजपीय' व 'संघीय' असूनही असे म्हणावेसे वाटते की संघ व भाजप हे बिनडोक म्हातार्‍यांचे पक्ष आहेत. त्यांच्यात कोणीही तरुण नाहीत व जे स्वतःला तरुण समजत असूनही संघात जाऊ इच्छितात असे त्यांत कोणीही नाही. 'तरुण' या शब्दाचा अर्थ 'सद्यकालात वयाने तरुण' असा घ्यावा.

पुन्हा दुर्दैवाने कॉम्ग्रेस हा एकमेव मूलभूत पर्याय (किंवा पर्यायहीन पर्याय) उपलब्ध आहे व आपण ज्याला भारत म्हणतो ती केवळ राजकीय सीमा असून तीही केवळ ६४ वर्षे अस्तित्वात आहे. 'व्हेअरअ‍ॅज' भारत / हिंदुस्तान / प्रामुख्याने हिंदू असलेल्या प्रदेशाचा इतिहास हिंदूच्या अखत्यारीतला नाहीच. सावरकरांना कोण हिंदू अभिप्रेत होते हे त्यांचे त्यांनाच माहीत!

मुळात सावरकरांचे कार्य हे नेताजी किंवा पटेलांसारखे नव्हेच!

तसेच, मुळात संघ या संस्थेला कधीही ब्राह्मणेतर होता आले नाही. काय कारण म्हणे?? (आता स्टॅटिस्टिक्स देऊ नयेत अशी विनंती, की किती मराठा व इतर जातीय संघात आहेत, कारण ते फसवे आहे हे वाचणार्‍या प्रत्येकाला ज्ञात आहे.) हे कोण म्हणे गोळविलकर गुरुजी अन कोण हेडगेवार? यांनी समाजसेवा केली म्हणजे ते काय भारताच्या राजकीय व भौगोलिक सीमा 'वाचवू' शकतात????

कंप्लीट भंकस!

आज आपण जे जगत आहोत ते जगत आहोत. आपल्याला काय माहीत की पुर्वी रस्त्यावर उपडे पाडून सर्वांदेखत एखाद्याचे डोळे काढतानाचे छायचित्रे घेतले जायचे आणि एखाद्याची विटंबना व्हायची?

थॅक गॉड वुई आर इन निधर्मी राष्ट्र!

-'बेफिकीर'!

संघ व भाजप हे बिनडोक म्हातार्‍यांचे पक्ष आहेत

अगदी सहमत आहे.. आणि यातले तरुणही म्हातरचळ लागलेलेच आहेत... Happy

-*-

हिंदुत्व का हवे? त्याचा आपल्याला काय फायदा होवु शकेल हे विषद करताना स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात कीं असा एक दिवस जरुर उगवेल किं समग्र मनुष्यजातीस ह्या शक्तीस (हिंदुत्व) तोंड द्यावे लागेल .>>>>

समग्र मनुष्यजातीस हिंदुत्वाला तोंड द्यावे लागणे हा हिंदुत्वाचा फायदा आहे का?

हिंदुस्थानाला पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे, असा इतिहास असणारे व समान रक्त व संस्कृती ह्यांनी बांधलेले कोट्यावधी लोक सर्व जगाला आपले म्हणणे अधिकारवाणीने सांगू शकतील.>>>>

सर्वच धर्मीय आपले म्हणणे अधिकारवाणीने सांगत नाहीत का?

स्वातंत्र्यवीर एका आंतरिक अभिमानाने सांगतात>>>>

कसला?

की ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही हेही तितकेच खरे आहे.>>>>

गीतेप्रमाणे वागणार्‍या हिंदूंची संख्या सध्या बहुधा ०.००००००००१% असू शकेल. (अर्थात, संख्याशास्त्राच्या आधारे वागण्यात धन्यत्व नाहीच). हिंदू जगाला काहीही सांगण्याच्या स्थितीत कधी होते व कधी असतील?? भूतकाळात अतिशय अल्प प्रमाणात होते. भविष्यात धर्म या संकल्पनेला काही अर्थ राहील असे वाटत नाही दुर्दैवाने!

हिंदू जेव्हा हिंदू राहत नाही तेव्हा तो अत्यंत उत्कटपणे हिंदू असतो>>>>

हे विधान समजले नाही.

व शंकराप्रमाणे सर्व पृथ्वी वाराणसी मानतो. वाराणसी मेदिनी ! मानतो किंवा तुकारामाप्रमाणे 'आमुचा स्वदेश ! भुवनत्रयामध्ये वास ! ' असे उद्गारतो. हे बंधूंनो ! विश्वाच्या मर्यादा - तेथे माझ्या देशाच्या सीमा आहेत !>>>>

विश्वाच्या सीमांपर्यंत 'देशाच्या' सीमा नेण्याचे स्वप्न सत्यात आणणे हिंदू धर्माला शक्य होईल असे वाटत नाही व हिंदू धर्माला त्यात काही स्वारस्य असेल असे वाटत नाही.

हिंदुस्थानात सुखाने नांदत असणार्‍या अनेक - नानाविध धर्मांविषयी बोलताना सावरकरांचा कंठ भरुन येत असे. त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर एक अलौकीक असे तेज, एक समाधान पाहायला मिळे. >>>>

कशावरून?

आमचे धर्मतत्वही कोणत्या पुस्तकाच्या दोन पुठ्ठयात सामावू शकणार नाही. ह्या विश्वाच्या दोन पुठ्ठयांमध्ये जितके सत्य नि ज्ञान विस्तृत पसरलेले आहे तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत होईल.>>>>

ही वल्गना कशावरून नाही?

पण फक्त तुम्ही आमच्याकडुनच जर बदलण्याची अपेक्षा करत असाल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. जर मुस्लिम , ख्रिश्चन वा इतर बांधव त्यांची मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी 'त्वे' सोडीत असतील तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल.>>>>

हे प्रत्येकच धर्म म्हणू शकत नाही काय?

ते म्हणतात कि एखाद्या भविष्यकाळी हिंदू हा शब्द केवळ हिंदुस्थानचा नागरिक वाचक होऊ शकेल. जेव्हा सर्व सांस्कृतिक व धार्मिक दुराग्रह आक्रमक गर्विष्ठपणाशी वचनबध्द असलेल्या शक्तीचे विसर्जन करतील व धर्म 'वाद' म्हणून न राहता ज्या समान पायावर मानवी राज्य ऐश्वर्याने व दृढपणे उभे राहील अशा पायाच्या मुळाशी असलेल्या चिरंतन तत्वांचा केवळ समान संचय म्हणून राहतील, तेव्हा हा दिवस उगवेल. >>>>

हिंदूंनी हिंदुत्वाचा गर्विष्ठपणा का विसर्जीत करू नये? हिंदूंमध्ये समान पायावर मानवी राज्य कोणत्या साली (निदान एकदा तरी) होते?

येथेच हिंदू म्हणून मरण्याच्या अपराधाकरिता बंदा बहादुराच्या मुलाचे वडिलांच्या डोळयांसमोर तुकडे तुकडे करण्यात येऊन त्याचे हृदय वडीलांच्या तोंडात कोंबण्यात आले>>>>>

????????????

कोण 'बहादूर'????

(बहादूर शहा जफरला त्याच्या मुलांच्या मांसाचे तुकडे नाश्त्याच्या थाळीत सर्व्ह करण्यात आले. पण बहादूर शहा जफरला यत्किंचितपणेही हिंदू व्हायचे नव्हते. इतर कोणी बहादूर आहे का?)

हिंदुस्थान हा हिंदूंचाच देश आहे.>>>>

कसा काय? अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश व इतर अनेक प्रदेश होते. तेथे हिंदवेतर लोक होते. हिंदुस्तान हिंदूंनी काही वेळा (म्हणजे दिल्ली) जिंकला ते मराठे व काही इतरांच्या जोरावर इतकेच! शिवाजी महाराजांच्या काळात हिंदुस्तान हिंदूंचा कोठे होता?

या देशाच्या स्वातंत्र्याच्या १८५७ पासून सुरु झालेल्या लढयात कोणी खरा त्याग केला ? - हिंदूंनी का मुसलमानांनी ?>>>>

१८५७ च्या देशाच्या भौगोलिक सीमा ऑफिशियल कशावरून?

प्रसंग येताच पोलिश मुसलमान, ग्रीक मुसलमान , किंवा चिनी मुसलमान अशा नावांनी संबोधिले जाण्यात समाधान मानतात. त्याचप्रमाणे आपल्या मुसलमान देशबंधूंनी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक दृष्टया आपला निर्देश करताना हिंदुस्थानी मुसलमान म्हणून करावा. तसे करण्यात त्यांच्या धार्मिक वा सांस्कृतिक स्वतंत्र अस्तित्वास बाधा येत नाही.

>>>>

पोलंड, ग्रीस व चीन ही 'देशांची' नावे असून 'हिंदू' (व त्यामुळे हिंदुस्तान) हे धर्माचे नांव आहे. पोलिश मुसलमान आणि हिंदू मुसलमान (हिंदुस्तानी मुसलमान) यात प्रचंड फरक आहे. ही अपेक्षाच चुकीची आहे.

जर्मनांचा देश जसा जर्मनी, इंग्रजांचा इंग्लंड, तुर्कांचा तुर्कस्थान नि अफगाणांचा अफगाणिस्थान, त्याचप्रमाणे हिंदूंचा देश म्हणून हिंदुस्थान ह्या नावानेच आपले स्थान जगाच्या नकाशात चिरंतन खोदून ठेविले पाहिजे>>>>

हे सांगणारे सावरकर कोण?

आमचा वेदान्त तर याही पुढे जाऊन दगड नि मनुष्य हे सारखेच असल्याचे सांगतो.>>>>

सहमत व्हावे लागत आहे.

पण आपण परिस्थितीनुरुप व्यवहार केला पाहिजे. राष्ट्रवाद कालबाह्य नाही ,राष्ट्रवाद पाचशे वर्षे तरी जिवंत राहणार आहे. त्यानंतर काय होईल ते सांगता येत नाही. त्यानंतर पृथ्वी एक राष्ट्र होऊन मंगळ हे दुसरे राष्ट्र होईल>>>>

मग तेव्हा काय? हिंदू आणि मंगळू का?

परंतु त्या समाजातील पक्षोपक्षांची ही अंतर्गत विषमता इतर कोणत्याही समाजाशी असलेल्या त्यांच्या विषमतेहून अगदी कमी असते. आणि त्या समाजातील अनेक पक्षांना एकजीव करणारी महत्वाची बंधने दुसर्‍या समाजाशी असणार्‍या त्यांच्या संबंधांपेक्षा आत्यंतिक आकर्षक नि बळकट असतात म्हणून ते समाज वा राष्ट्र तसे पृथक नि एकजीव राहू शकते.>>>>

कशावरून???????

-'बेफिकीर'!

मंदार_जोशी | 21 October, 2011 - 01:22 नवीन
बेफी, THAT's BULLSHIT>>>>

Mandar,

What do you expect after so much of it?

हिंदू धर्म ही संकल्पना त्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे जे हिंदू म्हणून जन्माला आले आहेत. मदर टेरेसा यांनी कृपाळूपणे का होईना सहाय्य करून काहींना ख्रिश्चन व्हायचा आग्रह केला हे खरे आहे. इस्लामिक तर हिंदूंना काफिरच म्हणतात. मानवता ही सर्व धर्मांच्या पलीकडे आहे.

खालील वाक्यातील गाळलेला शब्द भरा.

मी सगळे धर्म आणि धर्मिय सारखेच -------- आहेत असं म्हणतोय
१. निरर्थक
२. निरुपयोगी
३. कालबाह्य
४. त्याज्य

ही माझी मते. तुमची मते लिहा.

प्रथम हे नोट करु इच्छिते की ते पुस्तक विनायक दामोदर सावरकरांचे नसुन त्यांचे वडिल बंधु
बाबाराव सावरकरांचे आहेत.

दुसरी गोष्ट, गोळवलकर गुरुजींनी हिटलरबद्दल चांगले उद्गार काढलेत, असतील, पण कधी १९३८ साली.
बर्याच जणांना ठाउक नसेल पण
१) १९३८ पर्यंत ब्रिटन, फ्रान्स हे देखिल हिटलर कडे रशियाला (कमयुनिझमला) शह देणारा माणुस
म्हणुन पहात असत. चेम्बरलेनने हिटलरला ब्रिटनचा सच्चा मित्र असे म्हटले होते.
२) १९३९ मध्ये चेम्बरलेनला नोबेल प्राइझ मिळु नये म्हणुन स्विडिश पार्लमेंटने हिटलरला शांततेच्या
नोबेल प्राइझ साठी नॉमिनेट केले होते.
३) नेताजींनी तर जर्मनीला जाउन हिटलरला मिठ्या मारुन मदत मागितली होती.
या सर्वांचे काहिच चुकले नाही कारण राष्ट्रीय अस्मिता जागी करुन हिटलरने जर्मनीला १९३९ पर्यंत
कर्जातुन बाहेर काढुन वैभवाच्या शिखरावर नेले होते. यापुढे त्याचे वर्तन अस्मितापुर्ण पासुन अतिरेकीपणाचे झाले.
शत्रुचा शत्रु तो मित्र या न्यायाने बरेचसे नेते हिटलर कडे ओढले गेले. ज्युंवरच्या अत्याचारांची वास्तव कल्पना त्याकाळात कुणाला असणे शक्यच नव्हते, यामुळे गुरुजींवरची टीका व्यर्थ आहे आणि समजा काही चुका झाल्या असतील तर आपण त्या बदलणार नाही का १९३८ साली RSS ने काय केले म्हणत राहुन त्यांनी लातुर भुकंप, सुनामीच्या वेळी जे अचाट कार्य केले ते नाकारणार का?

तिसरी गोष्ट,
बाबारावांनी पुस्तकात काय लिहिले हे मला माहित नाही पण इथियोपियन आणि द्रविड लोकांची
लिन्क ही मानववंश शास्त्रात एकदम मान्यता मिळालेली आहे. वरदा याबाबत जास्त सांगु शकेल पण काहि आश्चर्य कारक खरी माहिती. (ही बाबारावांच्या पुस्तकातली नसुन डॉ इटन http://history.arizona.edu/node/696१ व अन्य अमेरिकन तज्ञांच्या लेक्चर्स मध्ये ऐकलेली )

१)हिन्दुकुश यामधील कुश हा काशाइट लोकांचा उल्लेख करणारा शब्द . या काशाइट लोकांनी एलामाइट लोकांचा पराभव करुन रेड सी च्या भागात BC 1000 ते BC 500 राज्य केले. यांच्या राज्यावरुनच आखात हा शब्द उगम पावला.
२) अनेक इथियोपियन राजांनी महाराष्ट्रात राज्य केले आहे.
अ)जन्जिर्याचा सिद्दी इथिओपिअन हबशी
ब) गुरिला पद्धत वापरुन मुघलांना महाराष्ट्रात नामोहरम करणारा मलिक अम्बर हा इथिओपिअनच.
http://en.wikipedia.org/wiki/Malik_Ambar
विकिपेडियातुन मलिक अम्बर बद्दल
A noted historian Dr. Beni Prasad notes: "The chief importance of the Deccan campaigns of the Mughals lies in the opportunities of military training and political power which they afforded to the Marathas. Malik Ambar, who was a great master of the art of guerilla warfare as Shivaji himself, stands as the head of the builders of the Maratha nationality. His primary object was to serve the interest of his own master, but unconsciously he nourished into strength a power which more than avenged the injuries of the South on the Northern power."

क) अदिलशहा हा पण अल्बानियन म्हणजे याच भागातला.
ड) इथियोपियन आणि भारतीय द्रविड यातले साधर्म्य अलेक्झांडर्च्या काळात ग्रीकांनी पाहिलेले.
http://www.essaysbyekowa.com/dravidians_sudanese.htm

आता हिन्दुत्ववाद्यांसाठी
बरेचसे मुसलमान हे स्वतःला भारतीय मानतात हा माझा चांगलाच अनुभव आहे.
१) पार्ल्याला आमच्या सोसाइटीत २ मुसलमान कुटुम्ब रहात. दर इद्ला आम्हाला खीर कुर्मा न चुकता मिळे. यातिल एकाची बेकरी टेलिफोन एक्स्चेंज्च्या आधिची १९९२ च्या दंगलीत जाळली गेली पण यांच्या वागण्यात कोणताही बदल वा कटुता कधिच जाणवली नाही. जाणवली ती नेहेमी प्रचंड माया.
२) ५ वर्षापुर्वी माझी आई रस्त्यावरुन जाताना तिला रिक्षाने धक्का दिला. डोक्याला खोक पडली आणि तिला उभेही रहाता येइना. कोणी बराच वेळ मदतीस आले नाही. थोड्यावेळाने एक मुस्लिम ग्रुहस्थ. पांढरे कपडे आणि डोक्यावर कापड त्यांनी आईला स्कुटरवर बसवुन दवाखान्यात नेले नंतर परत घरी आणुन सोडले. आई म्हणाली देव कधी कसा भटेल सांगता येत नाही.

असे असले तरी एखादे राष्ट्र चालवण्यासाठी त्यात लोकांची फुट पाडायची, मुस्लिम लोकांसाठी वेगळे कायदे करायचे या कॉन्ग्रेसी तंत्राचाही मला तिटकारा आहेच. कायदा सर्वांसाठी एक हवा धार्मिक स्वातंत्र्य
म्हणजे मते मिळवण्या साठी केलेली तडजोड नाही.

तर असे हे एकुण माझे विचार आहेत. बरे वाटतील ते घ्या बाकीचे सोडुन द्या.

>>ही माझी मते. तुमची मते लिहा <<
५. अक्करमाशी
६. हेकेखोर
७. प्रगतीरोधक
८. सहन होत नाही, सांगताही येत नाही

Pages