Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....
नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गेल्या धाग्यात मला नियमितपणे
गेल्या धाग्यात मला नियमितपणे यायला जमले नव्हते, आता प्रयत्न करतो.
क्रमांक ३/००१ दिवाळीनिमित्त
क्रमांक ३/००१
दिवाळीनिमित्त कुंभाराच्या घरी पणत्या बनवायचे काम जोरात सुरु असते. अहो कुंभार पणत्या बनवण्यासाठी आळस करायचे, (ते नाजूक काम त्यांना जमायचेच नाही) पण कुंभारीण बाई त्यांना भाग पाडायच्या कारण मागणी मोठी होती. अहो कुंभार काहीतरी थातुर मातुर काम करुन ठेवायचे.. तर कुंभारीण बाई कुठले गाणे म्हणतील... क्लू --- बागेश्री.
हो दिनेशदा, मी ही आता इथे
हो दिनेशदा, मी ही आता इथे नियमित येईन. पण ही तरूण पोरं जामच कठीण कठीण कोडी विचारतात बुवा ......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेशदा, ते कोडं नं १ पण लिहा
दिनेशदा, ते कोडं नं १ पण लिहा ना.
ही मस्त स्टाईल आहे. पण उत्तर
ही मस्त स्टाईल आहे. पण उत्तर काय बरं???????
मामी या नव्या (म्हणजे
मामी या नव्या (म्हणजे स्वप्नाच्या पिढीतल्या ) लोकांना येणारच नाहीत, अशी गाणी शोधून काढणार आहे मी.
पण मग कोण सोडवणार ती कोडी?
सिनियर सिटीझन्स साठी वेगळा
सिनियर सिटीझन्स साठी वेगळा धागा निघालाच पाहिजे.
असो आता या वेळी कुणी असणार नाही, म्हणून उत्तर देऊन टाकतो.
क्रमांक ३/००१
दिवाळीनिमित्त कुंभाराच्या घरी पणत्या बनवायचे काम जोरात सुरु असते. अहो कुंभार पणत्या बनवण्यासाठी आळस करायचे, (ते नाजूक काम त्यांना जमायचेच नाही) पण कुंभारीण बाई त्यांना भाग पाडायच्या कारण मागणी मोठी होती. अहो कुंभार काहीतरी थातुर मातुर काम करुन ठेवायचे.. तर कुंभारीण बाई कुठले गाणे म्हणतील... क्लू --- बागेश्री.
हटो बनाओ बतिया अजि काहेको झूठी..
http://www.youtube.com/watch?v=E08cJy2kZjs
मंझिल चित्रपटातले हे सुंदर गाणे मन्ना डे ने गायलेय. (बागेश्री रागात आहे) वरच्या लिंकवर बघायला मिळेल.
मुद्राराक्षसाच्या तावडीतून
मुद्राराक्षसाच्या तावडीतून सुटलो की येईन इथे.
मामी आणि या धाग्यावरील सर्व
मामी आणि या धाग्यावरील सर्व सक्रीय सभासदांना
हा तिसरा भाग देखील तितक्याच जोमात सुरू ठेवण्यासाठी शुभेच्छा.
कोड्यांमधली गाणी ओळखणं "अपने बस की बात नहीं"![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे जरी मी समजून चुकलो असलो तरी
या धाग्याचा फॅन म्हणून इथे अधुन मधून डोकावणार आहे.
धन्यवाद उल्हास भिडे. ओ
धन्यवाद उल्हास भिडे.
ओ दिनेशदा, ही असली गाणी असतील तर तुम्ही उत्तरं लग्गेच कोड्याखाली दिलीत तरी चालेल.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
<<ओ दिनेशदा, ही असली गाणी
<<ओ दिनेशदा, ही असली गाणी असतील तर तुम्ही उत्तरं लग्गेच कोड्याखाली दिलीत तरी चालेल.<<![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अनुमोदन मामी!!
>>मामी या नव्या (म्हणजे
>>मामी या नव्या (म्हणजे स्वप्नाच्या पिढीतल्या ) लोकांना येणारच नाहीत, अशी गाणी शोधून काढणार आहे मी.
दिनेशदा, अहो आजकालची नवी पिढी म्हणजे आता कॉलजात जाणारी. मीही ह्या पिढीच्या दृष्टीने जुनी आहे आता.
पण तुम्ही जुनी गाणी शोधलीत तर आम्ही नवी गाणी टाकू बरं, सावधान ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पण तुम्ही जुनी गाणी शोधलीत तर
पण तुम्ही जुनी गाणी शोधलीत तर आम्ही नवी गाणी टाकू बरं, सावधान >> मग आम्ही पण म्हणू "उत्तरं लग्गेच कोड्याखाली दिलीत तरी चालेल"![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे पण अधी कोडी तर द्या ना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आधीच्या बीबीवर १९९७ मेसेजेस
आधीच्या बीबीवर १९९७ मेसेजेस झालेत. तिथे २००० पूर्ण करा की. म्हणजे अॅडमिनना तो धागा बंद करायला सांगता येईल.
आधीच्या बीबीवर १९९७ मेसेजेस
आधीच्या बीबीवर १९९७ मेसेजेस झालेत. तिथे २००० पूर्ण करा की. म्हणजे अॅडमिनना तो धागा बंद करायला सांगता येईल.>>>>>अनुमोदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चला ३ प्रतिसाद देऊन टाका पट्टकन
माधव, भाग ३ वरचं शेवटचं कोडं
माधव, भाग ३ वरचं शेवटचं कोडं इथे टाक ना परत. मामी, अॅडमिनला सांगून भाग २ बंद करून टाका ना.
३/००२: कलीपूरला भूकंप होतो.
३/००२: कलीपूरला भूकंप होतो. राज्याचे मुख्यमंत्री नेहमीप्रमाणे पाहणी-पथक पाठवतात कलीपूरला. पथक दिवसभर पहाणी करते. सुदैवाने फारशी पडझड झालेली नसते. रात्री पथक प्रमुख श्रीकांत हेड-ऑफीसला फोन करून ही माहिती देतो पण एका गाण्यातूनच. कोणते ते गाणे ?
माधव, "हालचाल ठिकठाक है" हे
माधव, "हालचाल ठिकठाक है" हे आहे का उत्तर?
कली...वरुन गाणं असावं असं
कली...वरुन गाणं असावं असं वाटतय!
३/००२:>>>>>"रात कली एक ख्वाब"
३/००२:>>>>>"रात कली एक ख्वाब" असं काहिसं आहे का?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बाग मे कली खिली, बगियॉं
बाग मे कली खिली, बगियॉं महकी
पर हाय रे अभी, इधर भँवरा नही आया....
रच्याकने, मी वर जी लिंक दिलीय
रच्याकने, मी वर जी लिंक दिलीय त्यातला शेवटचा भाग ऐकाच. मन्ना डे ची जबरदस्त तान आहे आणि मेहमूदचा अभिनयही खास.
हे गाणे एका प्रसिद्ध दादर्यावर आधारीत आहे, न बनाओ बतिया अजि काहे को झुठी... असेच शब्द आहेत.
नाही ह्यातले कुठलेच नाही
नाही ह्यातले कुठलेच नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्लू: किशोर
ॐकारातुन दीप उजळले, ज्योत
ॐकारातुन दीप उजळले, ज्योत पेटली ज्योतीने,
![](https://lh5.googleusercontent.com/-83DfVU-9vhU/TqLCnNhK95I/AAAAAAAABFo/aAGhff5XYPo/s640/Deewali_Greet.jpg)
चला साजरी करू दिवाळी, तुमच्या आमच्या मैत्रीने
सगळ्यांना दिवाळीच्या खूप
सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा! सुट्टीसाठी गृहपाठ - कोडी योजून ठेवणे.
भेटूच पुढल्या आठवड्यात
वाह!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
वाह!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
पुन्हा एकदा बापुडवाणा चेहरा करून
मामी पार्टी
क्रमांक ०३/००३ भारताच्या
क्रमांक ०३/००३
भारताच्या सीमेवर काही संशयास्पद व्यक्ती पकडल्या जातात. त्यांच्याकडचे कागदपत्र बघितल्यावर त्या स्वाझिलँड, स्वित्झरलँड, पोलंड आदी देशातून आलेल्या दिसतात. कसून चौकशी केल्यावर देखील त्यांच्याकडे काहीच संशयास्पद आढळत नाही. पण ते मात्र सांगतात कि आम्ही शांततेचा प्रसार करत आहोत. सगळी धरा एकच आहे, आपण देशांच्या सीमा विसरुन जाऊ... तर ते कुठले गाणे म्हणतील..
हे कोडे खुपच कठीण आहे, याची मला कल्पना आहे.
हे गाणे खुपच कमी जणांनी ऐकलेले असेल, पण ते ऐकल्यावर मात्र खुपच ओळखीचे वाटेल (मी ऐकवणार आहेच.)
हा थोर गायक आज हयात नाही, पण तो आपल्या सर्वांचा आवडता होता, नव्हे आहेच.
>>हे गाणे खुपच कमी जणांनी
>>हे गाणे खुपच कमी जणांनी ऐकलेले असेल
आपुनने नही सुना होगा ये आपुनको पता है![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
क्रमांक ०३/००४: Weather
क्रमांक ०३/००४:
Weather Balloon बद्दल तुम्ही लोकांनी ऐकलं असेलच. त्याच्या खालच्या भागात मोजमाप करण्यासाठी जे उपकरण बसवलेलं असतं त्याला Radiosonde म्हणतात. तर असाच एक Weather Balloon आकाशात सोडला गेला तेव्हा त्याचं Radiosonde त्याला उद्देशून काय म्हणालं असेल?
क्लू: गाणं गोल्डन इरातलं आहे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
दिनेशदा, कोडं ३ बद्दलचा सूड मी फ्रीजमध्ये ठेवलाय. Revenge is best served cold.
Pages