आज रात्री जेव्हा
तू चंद्र बघशील ना रे
तेव्हा माझी आठवण काढ...
तो सुंदर दिसतो म्हणून नव्हे रे!
तर अशासाठी,
की जसा असंख्य तार्यांच्या
संगतीत असूनही तो एकलाच
तशीच सार्यांत असलेली
मी ही...
तुझ्याच अमर्याद मनोधैर्याच्या साथीने
जगते आहे रे
माझ्या अस्तित्वाची मालकी
तुझ्याकडे सोपवून
निर्धास्त....
तुझीच प्रभा
आसमंतात पसरवते आहे
लांबूनच रवीकिरणं झेलून
परावर्तित करणार्या
त्या चंद्रासारखीच
तरीही...
हा एकलेपणा संपवण्याची
भलती स्वप्नं
नको रे दाखवूस
आपल्यातलं अंतरच करेल
माझी राखण!
पण...
काहीही झालं तरी
माझं अस्तित्वच
तुझ्या 'असण्यावर' अवलंबून!!
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
क्लास!! अप्रतिम आहे कविता!
क्लास!!
अप्रतिम आहे कविता!
शारीरिक दूरत्व आणि मानसिक
शारीरिक दूरत्व आणि मानसिक जवळीक असा काहीसा भाव जाणवला.
"आपल्यातलं अंतरच करेल
माझी राखण!" ... हे आवडलं.
फारच सुंदर!! आवडली
फारच सुंदर!! आवडली
वाह! 'गुंतुनी गुंत्यात
वाह! 'गुंतुनी गुंत्यात सार्या, रंग माझा वेगळा' असा काहीसा सूर...! मस्त आहे.
आवडली.
आवडली.
खूप छान कविता. आवडली.
खूप छान कविता. आवडली.
सुंदर कविता... ! तुझीच
सुंदर कविता... !
तुझीच उर्जा
आसमंतात पसरवते आहे...?????
लांबूनच रवीकिरणं झेलून
परावर्तित करणार्या
त्या चंद्रासारखीच.......असंबध वाटले,
छानच उतरवल्या आहेत भावना....
छानच उतरवल्या आहेत भावना....
छान रे...
छान रे...
जबराट..!
जबराट..!
(No subject)
छान
छान
सर्वांना धन्यवाद @ शाम धन्स
सर्वांना धन्यवाद
@ शाम
धन्स रे. शब्द बदलून चूक दुरुस्त केली आहे.
आवडेश... खुप मस्त..
आवडेश... खुप मस्त..
(No subject)
(No subject)
मनापासनं आपल्या प्रियकरावर
मनापासनं आपल्या प्रियकरावर किंवा पतिवर प्रेम करणारी.... ती...आणि तिचे अस्तित्व
उत्तम रित्या मांडले .......
ही खरी मनातुन उतरलेली आहे...
ही खरी मनातुन उतरलेली आहे... (स्वगत)
आयुष्यात एकदा तरी कुणावर प्रेम बसले तर तो खरंच 'भाग्यवान'.
प्रगत परीपुर्ण प्रेमाची व्याख्या आहे ही रचना.
मंदार जोशी, तुम्ही शब्दांना कितीही बांधले तरी, काही तरी सुटल्या सारखेच वाटत राहील.
शब्दांना 'अर्थ' नाही येथे.
सुंदर.
सुंदर.
अतिशय सुंदर कविता....आवडलि
अतिशय सुंदर कविता....आवडलि
मंदार, जरा सुटला आहेस... पण
मंदार, जरा सुटला आहेस... पण छान आहे...
<<तुझ्या 'असण्यावर'
<<तुझ्या 'असण्यावर' अवलंबून!!<<
मस्त आशय!
मंदार, तुझ्यातला कवी बाहेर येतोय म्हणायचं!
मंदार, सहीच! मस्त
मंदार, सहीच! मस्त
(No subject)
प्रॉब्लेम काय आहे एक्झॅक्टली?
प्रॉब्लेम काय आहे एक्झॅक्टली?
प्रॉब्लेम काय आहे
प्रॉब्लेम काय आहे एक्झॅक्टली?>>>
सर्वांना धन्यवाद. चातक,
सर्वांना धन्यवाद.
चातक, आर्या, कौतुक - विशेष आभार
सुंदर कविता.
सुंदर कविता.
भन्नाट जमलीये..
भन्नाट जमलीये..
ह्म्म्म. छान आहे.
ह्म्म्म. छान आहे.
Pages