Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केदार
केदार तुझ्या सिग्नेचरची कविता पुढील प्रमाणे आहे
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो...
सुंदर वेलींची सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी....
देवा तुझे
देवा तुझे किती सुन्दर आकाश
सुन्दर प्रकाश सूर्य देतो
सुन्दर हि झाडे चन्द्र हा सुन्दर
चान्दणे सुन्दर पडे त्याचे
देवा तुझे
देवा तुझे किती सुन्दर आकाश
सुन्दर प्रकाश सूर्य देतो
सुन्दर चांदण्या चन्द्र हा सुन्दर
चान्दणे सुन्दर पडे त्याचे
_______
इंडिया वर्क्स... द पीपल मेक इट वर्क...!!!
रॉबिन...
रॉबिन...
रॉबीन
रॉबीन धन्यवाद रे
.
'मेल्या तुला काही आया बहिणी आहेत की नाहीत? >>>
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
आमच्या
आमच्या शाळेत "देवा तुझे किती" ही प्रार्थना होती.
'मेल्या तुला काही आया बहिणी आहेत की नाहीत? >
च॑दाराणी
च॑दाराणी का ग॑ दिसतेस... ' टकल्यावाणी '.
"कुर्बानी"
"कुर्बानी" ह्या पिक्चरमध्ये "हम तुम्हे चाहते है ऐसे" हे गाणं आहे. त्यातलं "तुमको पा लू अगर" हे लहानपणी मी "तुमको पालू अगर" असं ऐकायचे आणि मग वाटायचं की शेळ्यामेंढ्या पाळतात तसलं हे काही आहे की काय
मला कोणी
मला कोणी "एक दिन बिक जायेगा" चे lyric सांगेल का?
एक दिन बिक जायेगा माटी के मोल
जग मे रह जायेंगे प्यारे तेरे बोल
दूजे के होठोंको देकर अपने गीत
कोइ निशानी छोड फिर दुनिया से....(याच्या पुढचा शब्द काय आहे मला कळला नाही) तो मला नेहमी डोल, किंवा गोम असा ऐकु येतो..आणि मग त्या गाण्याचा अर्थ काय होतो? "डोल" असेल तर गाण्याचा अर्थ मला लागला नाही.
ते ईक दिन
ते
ईक दिन बित जायेगा, माटी के मोल
जग मे रह जायेंगे, प्यारे तेरे बोल
दूजे के होठोंको देकर अपने गीत
कोई निशानी छोड, फिर दुनिया से बोल
असे असावे.
=== I m not miles away ... but just a mail away ===
ते डोल आहे.
ते डोल आहे. ( मला असे ऐकू येते ) गाण्यावर डोलणे, असा अर्थ असावा.
पद्मजा
पद्मजा फेणाणी - जोगळेकरांचं एक गाणं आहे - "सर्वस्व तुजला वाहुनी..." त्याची दुसरी ओळ काय आहे कुणाला माहीत आहे का?
मला ते असं ऐकु येतं -
सर्वस्व तुजला वाहुनी
माझ्या घरी मी राहुनी..
- सुरुचि
सर्वस्व
सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी
सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहुनी
घरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया ?
अंधार होतो बोलका, वेड्यापिशा स्वप्नांतुनी
माझ्या सभोती घालते, माझ्या जगाची भिंत मी
ठरते परी ती काच रे, दिसतोस मजला त्यातुनी
संसार मी करिते मुका, दाबून माझा हुंदका
दररोज मी जाते सती, आज्ञा तुझी ती मानुनी
वहिवाटलेली वाट ती, मी काटते दररोज रे
अन् प्राक्तनावर रेलते, छाती तुझी ती मानुनी
गीत - विं. दा. करंदीकर
संगीत - यशवंत देव
स्वर - पद्मजा फेणाणी-जोगळेकर
सौजन्य (http://www.marathikavitaa.blogspot.com)
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा
खुप खुप
खुप खुप आभार, सतिश.
- सुरुचि
कोइ निशानी
कोइ निशानी छोड फिर दुनिया से....(याच्या पुढचा शब्द काय आहे मला कळला नाही) तो मला नेहमी डोल, किंवा गोम असा ऐकु येतो..आणि मग त्या गाण्याचा अर्थ काय होतो? "डोल" असेल तर गाण्याचा अर्थ मला लागला नाही.
-----------------------------------------------------------------------------------
"कोई निशानी छोड फिर दुनिया से डोल" असेच बोल आहेत त्याचे. डोल म्हणजे निघून जाणे ह्या अर्थाने वापरलं गेलंय त्या गाण्यात. हिन्दी मधे खूपदा कुणी वारलं हे सांगायला "वो दुनिया से डोल गया" असं पण म्हणतात.
अरे वा, छान
अरे वा, छान अर्थ आहे हा. मुकेशच्या शेवटच्या काळातले हे गाणे.
हो,
हो, शेवतच्या काळातलं, पन शेवटचं गाण होतं' चंचल, कोमल, शीतल...' स.शि.सुं.
ओह.. मला पण
ओह.. मला पण डोल चा हा अर्थ माहिती नव्हता... आता त्या गाण्याचे बोल निरर्थक नाहीत याबद्दल बरे वाटले
दिल्ली-६
दिल्ली-६ मधल गाण...मस्सकल्ली.. त्यात ओळ आहे ना 'जरा पंख झटक गयी धुल अटक' हे मला अगदी काल परवा पर्यंत 'जरा बम्प (:अओ:) को झटक गयी धुल अटक' असच ऐकु येत होत.. नंतर जेव्हा विडीयो बघितला तेव्हा कळल...
To the world you may be the one person, but for one you are the world !!!
मैने प्यार
मैने प्यार किया मधले 'तु चल मै आयी' गाण्यातल्या '....... करदो सब को तुम गुड्बाय' या ओळी मला या काल पर्यंत '........... करदो सबको कुंकुड्बाय' असे ऐकु येत होते.. काही जणांन विचारले हि होते कि हे 'कुंकुड्बाय' काय असते ते. काल गाणे निट समजल्यावर एकटाच हसत होतो...
माझ्या
माझ्या गाण्याच्या क्लास मध्ये मी जेव्हा नविन होते, तेव्हा बाई गाण शिकवीत होत्या-
मनमनास उमगत नाही, आधार कसा शोधावा
स्वप्नातिल पदर धुक्याचा, हातास कसा लागावा?
तर मी कित्येक दिवस ऐकत होते कि-
मनमनास उमगत नाही, आधार कसा शोधावा
स्वप्नातिल पदर धुण्याचा, हातास कसा लागावा?
- श्रुती
"कोई
"कोई निशानी छोड फिर दुनिया से डोल" असेच बोल आहेत त्याचे. डोल म्हणजे निघून जाणे ह्या अर्थाने वापरलं गेलंय त्या गाण्यात. हिन्दी मधे खूपदा कुणी वारलं हे सांगायला "वो दुनिया से डोल गया" असं पण म्हणतात.
------------------------------------
अक्ष्री,
डोल चा हा अर्थ मला माहीत नव्हता. (आमचे हिंदी 'उंच जीने उपर से धाडकन पड्या' इथ पर्यतच राहिले:)))
धन्यवाद.
akshree,
akshree, धन्यवाद! मला सुध्द्दा "बोल" असंच ऐकायला यायचं, "डोल"चा हा अर्थ नवीन
एक जुनं
एक जुनं गाणं - ऐ दिल मुझे बता दे, तु किसपें आ गया है
या गाण्याच्या एका कडव्यात ओळी आहेत....
" भिगी हुई हवाए, मौसम भी है गुलाबी
क्या चाँद क्या सितारे, हर चिज है शराबी "
या ओळी मला बरेच दिवस अशा ऐकू यायच्या...
" भिगी हुई हवाए, मौसम भी है गुलाबी
क्या चाँद क्या सितारे, हर चिज में खराबी "
तसंच आणखी एक गाणं, सरगम मधलं - रामजी की निकली सवारी
त्यात ओळी आहेत, " धोखेंसें हर ली रावण नें सिता, रावण को मारा, लंका को जिता "
या ओळी " धोखेंसें हर ली रावण नें सिता, रावण को मारा, सिता को पिटा "
अशा ऐकायचो मी. शेवटी युद्धामध्ये शत्रु कोण, मित्र कोण हे ओळखणं कठिण असतं. त्या रणधुमाळीमध्ये असं घडणं अगदीच अशक्य नाही, हा आपला माझ्या मनातला युक्तीवाद !
. त्या
. त्या रणधुमाळीमध्ये असं घडणं अगदीच अशक्य नाही, हा आपला माझ्या मनातला युक्तीवाद !
(No subject)
:d
एक मराठी
एक मराठी लावणी आहे...
पड्दा लाजेचा ,पड्दा लाजेचा ,पड्दा लाजेचा,......फेकला.
मला ते सुरवातीला 'मुड्दा लाजेचा' .....असे कहि ऐकू यायचे ...आनि प्रश्न पडायचा कि मुड्दा कसा काय लाजत असेल? का हि कुणाला शिवी देते आहे असे वाटायचे.
नाम
नाम चित्रपटातिल चिठ्ठी आई है मधले एक कडवे मला असे वाटायचे -
तेरी बिबी करती है सेवा
सुरत से लगती है मेवा
बेवा शब्द मला नन्तर कळाला
शेवटी
शेवटी युद्धामध्ये शत्रु कोण, मित्र कोण हे ओळखणं कठिण असतं. त्या रणधुमाळीमध्ये असं घडणं अगदीच अशक्य नाही, हा आपला माझ्या मनातला युक्तीवाद ! >> ... ह. ह . पु. वा.
आयला... ती
आयला... ती लावणी
मी आता आतापर्यंत ," पडदा लागता , पडदा लागता ...लागता पेटला' अस ऐकत होते..!
( अन मग ते स्टेजवरचा पडदा लागता लागता पेटला असं मी गृहीत धरलं होतं) आज कळला खरा अर्थ..!
Pages