पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पावडर करून वापरा. थोडेसे असेल तर मेतकूटात, किंवा जास्त प्रमाणात असेल तर थालीपीठाच्या/पराठ्याच्या/दशमीच्या पीठात टाका. पौष्टिक असेल. Happy

आरती, ती पावडर कुठल्याही भाजी आमटीत मसाल्याबरोबर वापरता येते. त्याला थोडासा चिकटपणा असतो त्यामूळे अंड्यासारखा उपयोग करुन केक, पुडींग सारखे प्रकारही करता येतात.

जवस गरम करु नये अजिबात. तेव्हा ती पावडर नुसतीच खा. का करु नये आता आठवत नाही. कुणी तरी सांगा. बहुतेक स्वाती आंबोळे की दामले मास्तरांनी (वेगवेगळ्या बाफंवर) लिंक दिल्या होत्या.

जवस गरम करु नये अजिबात. >>> ह्याची लिंक कॄपया पुन्हा देणे. मध गरम करुन खाऊ नये ह्याबद्दल वाचलं होतं मायबोलीवर. आपल्याकडे पूर्वापार अळशीचा काढा करताना आधी ती तडतडवून घेऊन मगच पाणी घालतात ना त्यात ?

कधी कधी वाटतं जे लोकं वर्षानुवर्षं / शतकानुशतकं करत आले आहेत आणि तरीही एखाद्या गोष्टीमुळे अपाय होतो असं फारसं झालेलं दिसलं नाही ते बिनधास्त करत राहावं. आपल्याकडे आयुर्वेदात दूध आणि मीठ वर्ज्य मानतात. पण लोकं व्हाईट सॉस, सूप्स कित्येक वर्षं खात आले आहेत. तेच दूध आणि फळं किंवा दही-गूळ ह्याबद्दल. आपल्याला सोसत नाही असं वाटलं तर खाऊ नये नाहीतर जास्त विचार करु नये असं वाटू लागलंय हल्ली. अजून एक उदाहरण म्हणजे सर्दी-खोकला झाल्यावर किंवा घसा खराब असेल तर पाश्चिमात्य देशांत हमखास गार पाणी प्यायला सांगतात. मला स्वतःला ती कल्पना अजिबात सहन होत नाही पण त्यांत संस्कारांचा भाग जास्त आहे की खरंच गार पाणी घशासाठी वाईट हे सांगता येणार नाही. जगभरात सगळीकडेच सगळे आजारी पडतात आणि प्रत्येक संस्कॄतीत कधीकधी परस्परविरोधी उपचार / आहार-विहार असून बरेही होतात.
फार विषयांतर झालं. मागे मधावरुन झालेल्या चर्चेत ह्या संदर्भात वरील मुद्द्यांवर प्रश्न विचारला होता पण उत्तर मिळू शकलं नाही Happy

अति अवांतर मोड ऑन Proud

अ‍ॅलॉपॅथी व मॉडर्न मेडिसीनवर विश्वास असणार्‍यांनी व आयुर्वेदिय किंवा तत्सम पद्धती इ. इ. वर विश्वास नसणार्‍यांनी मध गरम करायला, दूध + मीठ किंवा आणखी तत्सम निषिद्ध सांगितलेली (दूध + मासे) कॉम्बोज खायला काहीच हरकत नाही! बिनधास्त खावे की! काही झालं तर मॉडर्न मेडिसीनमध्ये उपचार शोधायचे! Wink

अगो, आयुर्वेदात सांगितलं आहे असं आपण म्हणतो तेव्हा ते त्रिकालाबाधित सत्य असल्याचा भास होतो. खरंतर त्या 'गाइडलाइन्स' आहेत. अमुक प्रदेशात, अमुक काळात, अमुक प्रकृतीच्या लोकांना लागू पडणारे.. आडाखे म्हणू. तेव्हा ते आपल्या तारतम्याने पाळावेत.

>> प्रत्येक संस्कॄतीत कधीकधी परस्परविरोधी उपचार / आहार-विहार असून बरेही होतात.
कारण प्रत्येक प्रदेशातलं हवामान, ऋतुचक्र, पारंपारिक आहाराने घडलेली प्रकृती यात फरक असतो.

आळशी भाजू नये असं सांगणारं आर्टिकल मीही (इथेच कोणीतरी लिंक दिली तेव्हा) वाचलं होतं, पण मी नेटवर शोधते आहे त्यात आळशीचं तेल आणि पीठ हे जास्त गरम करू नये असं म्हटलं आहे. (हे तेल हायली अनसॅच्युरेटेड असल्याने लवकर ऑक्सिडाइज होतं म्हणून.) अख्खे दाणे भाजायला हरकत नाही असं म्हटलं आहे.

सिंडरेला, चांगली कल्पना. थोडे तुला पाठवते आणि उरलले पावडर करुन कुटुंबातील इतर सदस्यांना देते Happy

सिंडरेला, धारा, दिनेश
धन्यवाद.

अगो >> मला पण असे प्रश्न नेहमी पडतात.
तरीही एखाद्या गोष्टीमुळे अपाय होतो असं फारसं झालेलं दिसलं नाही ते बिनधास्त करत राहावं >> आवड महत्वाची असे म्हणयचे आणि करायचे, अर्थात मानवते आहे हे तपासुनच. [मोहन रानडे होतोच शेवटी :)]

माझ्याकडे चुकुन मसुराची डाळ आणली गेली आहे ( नवर्‍याला मार्केटमधे पाठवलं कि असं होतं. ) अख्खे मसुर आम्ही नेहमी खातो, पण डाळ कधीच खाल्ली नाही. फो. वरण करुन बघितलं पण चव काही फार छान लागली नाही. आता हे १/२ किलोचं पॅक कसं संपवु? आमटी सोडुन दुसरी काही रेसिपी आहे का?

पीठ करून आंघोळीसाठी वापरणे. (खरंच सांगतेय.) बेसनासारखंच हेही वापरता येतं. किंवा चेहर्‍याला लावून थोड्या वेळाने चेहरा धुवायचा. त्वचेसाठी चांगलं असतं.
जेवणात वापरायचं तर रोजच्या तुरीच्या डाळीत शिजवताना १ चमचा मसूरडाळ घालायची.

प्रज्ञाला अनुमोदन. मी पण शाळेत असताना मसूरडाळ वाटून चेहर्‍याला लावायचे. मसूरीची फोडणी देऊन आमटी होते ना चांगली.

९ +१ Happy
मसूराचं पीठ लावून त्वचा डाळीच्या पीठामुळे जशी कोरडी होते तशी होत नाही.
बंगाली लोक, आपण मुगाच्या डाळीची करतो ताशी मसुराच्या डाळीची खिचडी पण करतात.

थँक्स, प्रज्ञा. Happy
रोजच्या तुरीच्या डाळीत शिजवताना १ चमचा मसूरडाळ घालायची >> हे ठीक राहील.
पीठ करून आंघोळीसाठी वापरणे. >>>> यानी स्कीन कोरडी नाही का होणार. थोडं करुन बघते आधी.

मनिमाऊ:

मसुराच्या डाळीची दाल फ्राय टॉप लागते!

मी अडई (डाळ्-तांदळाचे डोसे) मधे एक डाळ नेहमी मसूर वापरते.
भिजवून भरड वाटलेल्या मसूर डाळीची भजी पण मस्त कुरकुरीत होतात. कुटलेले मिरे, कुटलेली बडीशेप, कुटलेली लाल मिर्ची, तिळ, आणि किचींत खायचा सोडा घालून छोटी-छोटी भजी काढायची. अगदी मुगाच्या डाळीच्या भजीसारखी लागतात. दही-पकोडी चाट पण छान लागत ह्या भज्यांच!

माझी आई दहीवडे पण मिक्स डाळीचे करते आणि त्यात मसूर डाळ वापरते. मी कधी नाही ट्राय केला हा प्रकार.

मूगा ऐवजी मसूराची डाळ वापरून खिचडी चांगली आणि पटकन होते. खिचडीला अल्पनाची रेसिपी वापरली तर अजूनच छान.

नुसती लसूण आणि तिखटाची फोडणी घालून मसूराची डाळ चांगली होते. किंवा मसूराची डाळ भिजवून त्याला उपम्याचे सोपस्कार देऊन सकाळी ब्रेकफास्ट किंवा दुपारचा नाष्टा चांगला हेल्दी आणि चविष्ट होतो.

मनिमाऊ,मसूराची डाळ थोडावेळ भिजवून मेथी,पालक,कांद्याची पात वैगेरे पालेभाज्यांत टाकायची. पालेभाजी फोडणी देताना पानांवरच डाळ भुरभुरून फोडणिला टाकते मी. मऊ शिजवायची गरज नाही क्रंचि सुद्धा छान लागते.
मसूरडाळ खिचडी , गरम मसाला आणि कांद्या खोबर्‍याचे वाटण घालून उकडलेली मसूरडाळ आमटीही छान होते.

पाच वाट्या तांदूळ आणि प्रत्येकी एक वाटी मसूरडाळ, चणाडाळ, मूगडाळ, तूरडाळ, उडीदडाळ आणि मेथ्या या प्रमाणाचं घावनाचं पीठ खूप सुंदर होतं.

स्वाती, विचार करण्याजोगा मुद्दा. 'तारतम्य' हा शब्द कुठल्याही बाबतीत महत्वाचाच Happy
आरती Happy

हे तेल हायली अनसॅच्युरेटेड असल्याने लवकर ऑक्सिडाइज होतं म्हणून.>> जवसाची पावडर किंवा चटणी करताना पण ती थोड्या प्रमाणावर करायला हवी. एकाच वेळी जास्त करून ठेवू नये.

आरती, घरी ब्रेड करत असलीस तर त्यात पण तू जवस घालू शकते. सिंड्रेलाने सांगितल्याप्रमाणे दररोज सकाळी एक चमचा पावडर पाण्यासोबत पिणे बेस्ट, हवं तर त्यात जरासा लिंबूरस पण घालायचा.

मसुरडाळ तूरडाळीसोबत वरणात वापरते मी. चवीला तर छान लागतेच पण ज्यांना वरणाने पित्त वाढण्याचा त्रास होतो तसा ह्या वरणाने होत नाही.

मनिमाऊ >>
१-१-१ याप्रमाणात मसुर-मुग्-तांदुळ ची खिचडी बनवावी. हि एकदम पथ्यकारक असते. मसुरची डाळ अशि वेगळी लागतही नाही.
शिवाय डाल फ्रय मध्ये पण ढकलु शकतेस.

म्यॅउ, मसुरीच्या डाळिचा डाळकांदाही अफलातुन होतो.
साधारण अर्धी वाटी दाळ २०-३० मिनीट भिजत घालायची.
फोडणीत जीरे, मोहरी, कडिपत्ता, २ बारीक चिरलेले कांदे टाकुन परतले की लसुन पेस्ट, काळा मसाला घालुन भिजवलेली डाळ घालुन, मीट। घालुन शिजवायची, शेवटी कोथीबीर टाकुन चपाती / भाकरी बरोबर मस्त...

मला तरी हा प्रकार ड्राय , डाळ जरा कमीच शिजलेली असा आवडतो .

चुकुन हिरवे वाटाणे जास्त ( अर्धा किलो ) भिजवल्या गेलेत. आज भाजी झालीये करुन अजुन काय करता येइल ?

भिजवलेले वाटाणे आलं -हिरवी मिरची-कोथिंबीर यांबरोबर वाटून घ्यायचे. धणे-जिरे पावडर, तिखट, मीठ, आणि तांदळाचं पीठ घालून मिसळायचं. खरपूस धिरडी होतात.

पुलाव कर,

वाटाणे शिजवुन मॅश करुन त्यात आले लसुण हिमि पेस्ट घालुन स्टफ्ड पराठे कर.

करंज्या कर

समोसे कर

जो पराठे ठीक. समोसे करंज्या विकडेज मधे अवघड आहे.
मृण्मयी धिरडी करण्यासाठी वाटाणा शिजवुन घ्यायचा की कच्चाच मिक्सरमधुन वाटायचा Uhoh

भिजवलेले वाटाणे कच्चेच, शक्य तितके बारिक वाटून घ्यायचे.

एकदा वाटाणे शिजवून घेतले आणि मग धिरडी केली. ती फार तेलकट झाली.

Pages