लक्ष्मी अन अवदसा

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

लक्षुमी आन अवदसा या दोन बहिनी. दोनीस्ले शेजारशेजारना घरस्मा देयेल व्हतं.

लक्षुमीनं घर मोठं-शिरीमंत, एकत्र कुटुंब. मोठी शेतीवाडी, डाळिंबना बागं आन द्राक्षास्ना मळा. रामपारात उठीसन लक्षुमी कामले लागे. दारना आडे ठेयेल कुंचा काढीसन सरं घर झाडे. आंगनमा सडारांगोळी काढे. मंग सरास्ले न्ह्यारी आन पोर्‍यास्नी तयारी. मंग दुपारनं जेवण. मंग धान्य पाखडनं, निवडनं, सुनं. मंग सैसानले दळा-भयडाना-पाखडाना कामं. रातना सयपाक लगेच सुरू. रातपावत बिचारी दमे जाये. हाई सरं सासू-सासरा, देर-ननंदा, नवरा-सालदारं-गडीमान्सं.. सरास्ले समजे. घरनास्ना दोन गोड शब्द मिळनात, नवराकडतीन गोड इचारपूस व्हयनी, का मंग तिले कयेल कामनं काईच वाटेना. शांत झोप लागनी, का मंग दुसरा दिवस रामपारात उठाले बळ येये. इतला मानसं र्‍हाईसनबी या घरात भांडन-कजा व्हयेना. सरा आनंदीआनंद आन गोकूळनं राज्य.

अवदसानं सरंच उलटपाल्टं. कासराभर ऊन येयेस्तोवर झोपी र्‍हाये. काम करानी सवयच नव्हती. आन गंदाबुरा विचारस्मातून सवडबी नव्हती तिले. कुंचाबी हातमा धरता येयेना, ते काम कसाले सांगी कोन..? चुकीमाकी कोनी सांगंच, ते वाचाळ तोंड करे सर्रास्वर. तिले घाबरीसन कटकट नको, म्हनीसन सरा लोक आपापला कामं करी लेयेत. पन इतलं राबीसनबी त्यास्ले मळा फळेना, खडकू मिळनात.

लक्षुमीना घर पैसास्ना पाऊस, आन लक्षुमी दागिनास्नी मढेल. अवदसाले हाई काई बरं वाटेना. दिनभर लक्षुमीवर जळी र्‍हाये. डोकं चालाडी पार थकी गयी ती, पन यावर तिले इलाज सापडेना.

अवदसानासारखीच तिनी ननींद. एक दिन ननींद तिले बोलनी- लक्षुमीना घरमा भांडनकजा घालूत. हाऊ एकच रस्ता शे घर बिगाडाना. तिना घरमा घुसानं सादंसोपं नई. त्यानाकरता एक काम तुले करणं पडी. नीट आयक. लक्षुमीना घरना कुंचा कायम दरूजाना आड दडेल र्‍हास. तो कुंचा जवळ बाहेर पडेल दखायना, तवळ त्यावात तू जाय. आन सरं घर झाडीसन त्यास्ले उलटंपालटं करी टाक. तिना घरमा घुसाना, घरना पूरा बारा वाजाडाना हाऊ एकच रस्ता शे.

अवदसा दबा धरीसन बसनी. पन कुंचा मोकळा, भायेर पडेल सापडेना. लक्षुमीले कुंचा अशा उघडावाघडा टाकानी सवयच नव्हती. एक दिन काय व्हयनं, लक्षुमीनं एक वरीसनं पोरे खेळत खेळत मांगल दार गये. तवळ लक्षुमी वसरी झाडी र्‍हायंती, हाई पाईसन अवदसानी डाव सादा. मांगल्दार जाईसन पोर्‍याले तिनी चिमखोडा काढा जोरात. पोरे रडाले लागनं, तशी लक्षुमी बिचारी झाडानं काम अर्धं सोडीसन तशाच कुंचा खाल जमीनवर टाकीसन पोर्‍याले घेवाले गई. अवदसा तशीच पळीसन म्होरलादार वनी. कुंचा तशाच पडेल पाईसन तिले आनंद व्हयना, आन ती कुंचा मजार घुसनी.

बिचारी लक्षुमीनी त्या दिन गंज घर झाडाना प्रयत्न कया, पण वारा वाहीसन घान उलटीच पसरे घरमा. दिनभर बिचारीनं घर झाडायनंच नई. बिचारी पार दमी गई.

अवदसाले भयान आनंद व्हयना. आते ती लक्षुमीना घरमा व्हती, पन कोनले ती दिसतबी नव्हती. भांडनकजा घालानाकरता आते काय करवा, याना इचार ती करू लागनी. गंज इचार कया, आन मंग तिने काईतरी ठराये.

सैसानले लक्षुमी सयपाक करी र्‍हायंती, तवळ गुप्त रूपमा बशेल घरमा बशेल अवदसा गुपचूप तठे गई. भाजीना पातीलामा अख्खी गूळनी ढेप टाकी दिधी.

सरा जेवाले बसनात. लक्षुमीना सासरानी इचार कया, इले आज काय व्हयनं? भाजी आज इतली गोडभनक कशी लागी र्‍हायनी? तोंडमा जाई नई र्‍हायनी.. आते जेवा कशे?

लक्षुमी कितली गुन्नी शे, हाई त्याले चांगलंच ठाऊक. व्हयनी व्हई काईतरी गल्ती, म्हनीसन तो भला मानूस काईच बोलना नई. तशाच जवाले लागना.

लक्षुमीना जेठलेबी तोंडमा जेवन जाईना. पन बाप काईच न बोलता जी र्‍हायना, म्हनीसन जेठबी बिचारा गप जेवना. मोठा भाऊ काई बोलेना म्हनीसन लक्षुमीना नवरा, आन धाकला दोनीबी गप जेवनात पोटभर, आन हात धोईसन निजी गयात.

बाया जेवाले बसन्यात, ते सासूलेबी ती गोडभनक भाजी तोंडमा जाईना. नवरा कशा काईच बोलना नै, यानं तिले नवल वाटनं. पन त्यानी खाई घिदी, म्हनीसन आपूनबी हाई खावालेच पायजे- अशे म्हनीसन सासूबी गप जेवनी. सासू काई बोलनी नई, म्हनजे ते बरोबरच व्हई, अशे म्हनीसन लक्षुमीनी जेठानी अन देरानी गपचूप जेवन्यात. लक्षुमीनी घास घिदा, तवळ तिले समजेना, इतला गूळ कथाईन वना?! ती रडाले लागनी- सरान-सरा कशा गपचूप जेवनात.. मनाकडतीन अशे कशे व्हई गये, म्हनीसन. सासूनी, जेठानीनी, देरानी तिनी समजूत काढी.

अवदसाले भयान नवल वाटनं. आपला सरा उपराळा वाया गया, हाई पाईसन तिनं डोकं फिरनं. पन ती घरमातीन भायेर निंघनी नई. दुसरा दिवस तिनी आनखी दुसराच खोडा कया. गुपचूप जाईसन भाजीना पातीलामा परातभर मीठ टाकी दिधं. आन खुसुखुसु दात काढीसन गुप्त रूपमा गादीनी घडवंचीवर बशी र्‍हायनी.

सरा जेवाले बसनात. सासरानी घास घिदा ते वकारी येवानी पाळी! हाई काय चालू शे, त्याले समजेना. त्यानी लक्षुमीले इचारं, 'पोरी, तब्येत बरी शे ना तुनी? काई दुखी र्‍हायनं का? मनले खाई र्‍हाईनीस का तू कसाले?' लक्षुमी बावरीसन 'नई, नई. काई नई' म्हननी. मंग सासरानी शांततामा जेवाले सुरूवात कई, आन सरं ताट साफ करी टाकं. जेठ, नवरा आन देरनी बी तीच खारीभडक भाजी खाई टाकी. नवरानी खादी म्हनीसन सर्‍या बायास्नीबी जेवन संपाडी टाकं. लक्षुमीना तोंडमा भाजी जायेना. हाई माले काय अवदसा सुची र्‍हायनी आजकाल- अशे म्हनीसन ती फिरीसन रडाले लागनी. पयला दिवसना माळेक सरास्नी तिनी समजूत काढी.

अवदसाना डोळा उघडनात. ती समोर ईसन लक्ष्मीना पाय पडनी. रडाले लागनी. मनी चूक व्हयनी, तुमना घरमा भांडनकजा घुसाडाना मना बेत व्हता- हाईबी कबूल करी टाकं. सासू बोलनी, 'सुखनी र्‍हाय माय, नि आमना घरमातून जाय. हाई लक्षुमीनं घर शे. आठे भांडनकजा आन वाईटवंगाळ काई व्हनार नई!'

अवदसा भायेर पडनी. फिरीसन कधीच ती लक्षुमीना दारे वनी नै. तवळपशीन लक्षुमी सुखनी नांदनी.

***

(अहिराणी लोककथा. आमच्या मावशीने सांगितली तशी, आणि त्याच भाषेत.)

***
***

प्रकार: 

वा वा वा काय सुंदर कथा आणि काय गोड "अहिराणी" बोली.........
वाचत गेलो तसतशी समजत गेली ही भाषा...
सरस्वती कन्या - बहिणाबाईंची आठवण आल्याशिवाय रहात नाही.

सुरुवातीला गोंधळ झाला. पण पुढे पुढे कळत गेली भाषा.>> हो सहमत. बरेच शब्द संदर्भावरूनच कळाले.

उदा:
घरनास्ना दोन गोड शब्द मिळनात, नवराकडतीन गोड इचारपूस व्हयनी,>>> म्हणजे गोड शब्द मिळाले (ऐकले) का मिळनात म्हणजे मिळेनात हे पटकन कळाले नाही. पण संदर्भ बघितला तर लक्षात आले Happy

अहीराणी भाषा ऐकली होती, वाचायला जरा अवघड गेले सवय नसल्याने. सगळे शब्द कळले नाहीत तरी बहुतांश गोष्ट कळली.

Pages