Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40
निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शक्य असेल तर १२ किमी
शक्य असेल तर १२ किमी धामापूरचे देवीचे मंदीर प्रसिद्ध आहे, ते पहा..
त्या मंदिरापेक्षा त्यालगतचा तलाव जास्त सुंदर आहे. तिथे बोटींगही करायला मिळते.
निवती , भोगवे पण छान आहे. तारकर्लीवरुन दिवसा समुद्रात फिरवुनही आणतात.
आणि mtdc च्या फक्त तारकर्ली बद्दलच मी चांगले लिहिलेय हा.. गणपतीपुळ्याच्या mtdc चे जेवण भंगार आहे. तसेही mtdc चे जेवण भंगारच आहे, पण तारकर्ली हा एक सुंदर अपवाद. ते लोक मासे अगदी प्रेमाने खाऊ घालतात. सुरमईची एक तुकडी आपल्या अख्ख्या तळहाताएवढी मोठ्ठी आणि १०० रुपयाच्या थाळीत अशा दोन मोठ्ठ्या तुकड्या म्हणजे बघ.. स्वर्ग हातात आल्यासारखा आल्यासारखा वाटतो.
प्रज्ञा, तू 'कास' ला जाऊन
प्रज्ञा, तू 'कास' ला जाऊन आलीस. आता मला नीट आठवून खरे सांग, की आपाण जी कोकणात फुले पाहात होतो. जवळ जवळ, तीच सर्व फुले तू 'कास' ला पहिलीस ना?
(म्हणजे मी जिप्सीला टुकटुक करणार आहे.)
धामापूर रोड वर मोगरणे गावाजवळ
धामापूर रोड वर मोगरणे गावाजवळ एमटीडीसीचे कृषी पर्यटन केंद्र आहे, तेही खुप छान आहे असे मी ऐकलेय..
तुला जर अगदी साधे घरगुती जेवण हवे असेल तर मालवणात, वझेंची खानावळ फेमस आहे, अगदी साधे पण खुप छान जेवण आहे.. संध्या. ७ वा. उघडते.. टीपीकल कोकणस्थ आहेत..
शोभा काढेन ग आठवण. साधना
शोभा काढेन ग आठवण.
साधना सारीका तुमच्या टिप्स मी प्रिन्ट काढून घेते आणि घरी जाऊन प्लॅन बनवते.
धन्स. अजुन असतील तर अजुन द्या.
ही फुलपाखरांची लिंक.
http://www.maayboli.com/node/29366
"/ >
(No subject)
हे हे हे, आज प्रथमच फोटो
हे हे हे, आज प्रथमच फोटो टाकता आला. मोबाईल फोटो आहे त्यामुळे खुप छान नाही आलाय पण अपलोड करता आला याचाच आनंद होतोय.
ससा काय फुल आलय जबरदस्त. किति
ससा काय फुल आलय जबरदस्त. किति छोत असत हे फुल.
स्निग्धा छान.
चला,-आम्हाला_दोन्_फोटोग्राफर्
चला,-आम्हाला_दोन्_फोटोग्राफर्स्_मिळाले.
सचिन, भन्नाट फोटो आहे
सचिन, भन्नाट फोटो आहे
<<<<<प्रज्ञा, ही फुले
<<<<<प्रज्ञा, ही फुले पाहिल्यापासून मला तेच आठवत होते. मी लिहिणारच होते. पण म्हटले तुला संधी द>>>>> धन्यवाद मला संधी दिल्याबद्द्ल. मी ऑफिसमधुन आल्यावर माबोवर येते त्यामुळे माझे प्रतिसाद नेहमीच सगळ्यात उशीरा.
पंद Pinda concanensis From
From कास
स_सा, फोटो छानच आहे.
स_सा, फोटो छानच आहे. पांढर्या फुलांचे एवढे स्पष्ट फोटो काढणे कौशल्याचेच काम आहे. पण तरीही हा फोटो थोडा क्रॉप केला असता तर आणखी छान दिसला असता.
धन्यवाद करतो क्रॉप ते फुल जरा
धन्यवाद करतो क्रॉप
ते फुल जरा रस्त्याच्या कडेलाच पण अवघड जागी होते आणि वहातुकीची कोंडी त्यामुळे त्याचा एकच फोटो घेतला गेलाय.
स्_सा धन्यवाद फोटो
स्_सा धन्यवाद फोटो टाकल्याबद्दल. ही फुले पाहिली नव्हती आधी.
कासचे फोटो ब-याच जणांनी टाकलेत पण बहुतेक तीच ती फुले दिसतात सगळीकडे.
सशा, त्या फुलांमध्ये ब्राऊन
सशा, त्या फुलांमध्ये ब्राऊन आणि पांढरे काय आहे?
ब्राऊन अगदी किड्यांसारखे
ब्राऊन अगदी किड्यांसारखे दिसताहेत.
अश्विनी त्या फुलामध्ये त्या
अश्विनी त्या फुलामध्ये त्या फुलांची बाळे आहेत. म्हणजे अगदी छोटिशी फुले आहेत.
सचिन, पिवळ्या आणि पांढर्या
सचिन, पिवळ्या आणि पांढर्या दोन्ही फुलांचे फोटो सुंदर!
व्वा! सचिन दोन्ही फुलांचे
व्वा! सचिन दोन्ही फुलांचे फोटो छानच!
साधना, या दिवसांत अंबोलीला
साधना, या दिवसांत अंबोलीला भीमाच्या वेलीवर मोठी फुले आलेली असतील. मी कधीच बघितली नाहीत, कारण या दिवसात अंबोलीला जाणे झाले नाही कधी. तेव्हा प्लीजच..
येस येस
येस येस
खुप दिवसांनी आलो तर २७ पान
खुप दिवसांनी आलो तर २७ पान झाल्येत?
मस्त फोटो आहेत संगळ्यांचे
भारीच
काही दिवस येता आलं नाही, आज
काही दिवस येता आलं नाही, आज सगळं वाचुन काढलं,सगळे फोटो पाहिले ....

सगळ्यांना फोटो बद्दल ,माहितीबद्दल धन्यवाद !
कास पठाराबद्दल वाचुन छान वाटलं,गावाकडे काही एकरांचे असेच पठार,माळावर अशीच उमललेली फुले डोंगराजवळची शेती खुप दिवसांनी पाहायची इच्छा आहे
झाडांविषयी प्रेम महत्वाचे - नाव माहित असणे / झाड ओळखता येणे फार महत्वाचे नाही - माझे वैयक्तिक मत.
सहमत ! आणि खुप बरं वाटलं,आधार वाटला, कारण आम्ही तर याच गटात मोडतो !
दिनेशदांसारखी झाडांबद्दल प्रेम आणि वर सगळी त्याबद्दल मुळासकट माहिती,अभ्यास असणारी माणसं म्हणजे दुधात साखरच की !

अनिल, बहुतेक गावांजवळ असा
अनिल, बहुतेक गावांजवळ असा एखादा पडीक जमिनीचा भाग असतोच नाही ?
कसण्याजोगी नसतेच ती जमीन. पण या दिवसांत फुले मात्र खुप असतात.
साधारण याच दिवसात, रत्नागिरीहून गणपतीपुळ्याला जायला जो रस्ता आहे,
त्याच्या दोन्ही बाजूला मी अगदी वीतभर उंचीची जांभळी फुलझाडे उगवलेली
बघितली आहेत.
तसेच कोल्हापूर शहरांत रस्त्याच्या कडेला असणार्या घरांच्या कौलावर हातभर
उंचीची आणि किरमीजी रंगाची फुलझाडे बघितली आहेत. पण हा बहर, काही
लोकांच्या कौतूकाचा झालेला दिसला नाही.(इंगळहाळीकरांनी मात्र याबद्दल लिहिले
होते.)
इंगळहाळीकरांनी त्यांच्या
इंगळहाळीकरांनी त्यांच्या 'आसमंत' पुस्तकात या वनस्पतीचा उल्लेख केला आहे. 'कापुर्ळी' ही वनस्पती अशी घरांच्या कौलांवर वाढते.
लोकांना कशाचं अप्रूप वाटेल ते काही सांगता येत नाही. त्याला 'पारखी-नजरच' पाहिजे.
श्री.पु.ल.देशपांडे म्हणतात तसं आहे; सौंदर्य हे बघणार्याच्या नजरेत असतं. कोणाला काय सुंदर दिसेल ते सांगता येत नाही. सर्जनला अपेंडिक्सही सुंदर दिसू शकतं.
Splendid. Maraathi typing ka
Splendid.
Maraathi typing ka yet naahi? kaLata naahi
मी परवा दादरला गेले होते.
मी परवा दादरला गेले होते. तेंव्हा मुद्दाम मॅजेस्टीक मध्ये गेले. तिथे मला डॉ. संदिप क्षोत्री ह्यांच पुष्पपठार कास हे पुस्तक मिळाल. धन्स शांकली पुस्तकाची माहीती दिल्याबद्दल. खुपच छान पुस्तक आहे.
जिप्सि तुही मॅजेस्टीक मधुन घे. आहेत तिथे.
अजुन मी मारुती चित्तमपल्लींच पाखरमायाही घेतल. एक होता कार्व्हर हे आही आमच्या घरात होत. ते हरवल म्हणून आता परत घेतल आणि कालपासुन वाचायला सुरुवात केली.
जागू, मी इथे लिहायचे विसरलो,
जागू, मी इथे लिहायचे विसरलो, चितमपल्लींचेच नवेगावबांधचे दिवस असे एक पुस्तक आहे.
ते पुस्तक वाचताना मला तूझी आठवण आली, कारण अख्खे एक प्रकरण निव्वळ माश्यांवर आहे.
शांकली, ती कौलावरची फूले खास कोल्हापूरलाच बघितली मी. सुकली तरी रंग तसाच असतो.
साधारण याच दिवसात,
साधारण याच दिवसात, रत्नागिरीहून गणपतीपुळ्याला जायला जो रस्ता आहे,
त्याच्या दोन्ही बाजूला मी अगदी वीतभर उंचीची जांभळी फुलझाडे उगवलेली
बघितली आहेत.
तसेच कोल्हापूर शहरांत रस्त्याच्या कडेला असणार्या घरांच्या कौलावर हातभर
उंचीची आणि किरमीजी रंगाची फुलझाडे बघितली आहेत. पण हा बहर, काही
लोकांच्या कौतूकाचा झालेला दिसला नाही.(इंगळहाळीकरांनी मात्र याबद्दल लिहिले
होते.)>>>>>>दिनेशदा, तुमच्या स्मरणशक्तीला माझा साष्टांग नमस्कार. मला लगेच कोकण डोळ्यासमोर उभं राहिल.
Pages