टि-शर्ट आणि कॅप (ववि २०११) !!!

Submitted by ववि_संयोजक on 22 June, 2011 - 04:17

कालचा आपला टी-शर्ट वाटपाचा कार्यक्रम अती पावसामुळे गैरसोय झाल्याने नाईलाजाने पुढे ढकलावा लागला आहे....गैरसोयीबद्दल संयोजक दिलगीर आहेत.

ज्यांना कोणास यायचे जमत नाही त्यांनी राम किंवा मल्लिनाथशी संपर्क साधुन टि-शर्ट घ्यावे.

आत्तापर्यंत तुम्हा सर्वानी आम्हाला खुप सहकार्य केले आहे आणी यापुढे सुद्धा असेच सहकार्य मिळावे ही नम्र विनंती..

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: २३ जुलै २०११, स. १०.३० ते १२.३०

(जर पाउस किंवा जागेची काही अडचण झाली तर तिथेच शेजारी बालगंधर्व हॉटेल मध्ये जमावे.)

धन्यवाद !

"आले आले..."
"अहो, आले आले काय ? आलो आलो म्हणा !"
"अगं मी नाही गं, 'मायबोली' टीशर्ट आले!"
"ते होय....."
"हॅ.... काय झालं ?"
"आहो, यंदा ना किनै थोडं बजेट वाढ्वुया का?"
"का Angry ..... " (हि ना....., असं लाडे लाडे बोलुनच माझ्या बनियनची भोकं वाढलीयत. लाडात आली की झालं बोटाने कुरतडायला.)
"य़ंदा मायबोलीच्या टोप्याही आल्यात म्हणे......."
"म्हणजे तु मला टोपी घालणार.. :अओ:"
"अहो तसं नाही... हो"
"मग कसं.. ?"
"तुम्ही ना..... Blush जा तिकडे..."
"हँ..... "

तर मंडळी, सालाबादप्रमाणे याही वर्षी मायबोलीकरांना 'मायबोली टीशर्ट' तसच टोप्या ही उपलब्ध करून देण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

यावर्षी आपली आवडती 'मायबोली' ही अक्षरं 'सुलेखन' करून घेण्यात आली आहेत प्राजक्ता थरथरे (पारीजातक)आणि पल्लवी देशपांडे(पल्ली) यांच्याकडुन .

टीशर्ट एकाच रंगात उपलब्ध आहेत- गड्द हिरवा (डार्क ऑलिव्ह ग्रिन). यामध्ये सुलेखन पुढे आणि मायबोलीचा लोगो आणि लिंक डाव्या बाहीवर येईल. टीशर्ट असा दिसेल-

Green T copy.jpgMaayboli_Tshirt_2011.jpg

वर चित्रात दर्शवल्याप्रमाणे यंदाचे टीशर्टस् राऊण्ड नेक परंतू लेडिज आणि युनिसेक्स अश्या दोन प्रकारात पुढील साईजेसमध्ये उपलब्ध आहेतः-

लहान मुलांचे टि शर्ट १४५ + २५** = १७०रु./-
२२"
२४"
२६"
२८"
३०"
३२"

मोठ्यांचे टि शर्ट १७५ + ५०**= २२५रु/-
टीशर्टची मापे पुढिलप्रमाणे:-

३६"==XS
३८"==S
४०"==M
४२"==L
४४"==XL
४६"==XXL

आणि अशी दिसेल बेस बॉल कॅप

Maayboli_Cap_2011.jpg

क्याप ६० + २५** = ८५रु/-

** महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टि-शर्ट आणि कॅपच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.

यंदा टीशर्ट विक्रीतून उभी राहणारी रक्कम काश्मीरातल्या अनाथ मुलींसाठी काम करणार्या श्री. अधिक कदम व त्यांच्या ’बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेला देण्यात येणार आहे.
या संस्थेची माहिती http://www.bwfindia.org.in/index.php इथे उपलब्ध आहे.

टि-शर्टांची नोंदणी आणि पैसे ३ जुलै २०११ पर्यंत द्यायचे आहेत. तसंच, ज्यांना प्रत्यक्ष पैसे द्यायचे शक्य होणार नाही, त्यांना आपण 'ऑनलाईन पेमेन्ट ऑप्शन'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, ईमेलमध्ये तसे लिहा, मग पुढील डीटेल्स तुम्हाला कळवण्यात येतील.

पुणे आणि मुंबई इथे ३ जुलै २०११ या एकाच दिवशी टिशर्टचे पैसे जमा केले जातील आणि १७ जुलै २०११ या दिवशी टिशर्ट आणि कॅप वितरण केले जातील.

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: ३ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ३ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००

ऑर्डर कशी नोंदवाल? - tshirt@maayboli.com इथे ईमेल पाठवून.

ईमेल च्या सब्जेक्ट मध्ये 'टि-शर्ट/कॅप नोंदणी' असे नमुद करण्यास विसर नका.
ईमेलमध्ये काय लिहाल?

१. आपला मायबोली आयडी
२. आपले (खरे संपूर्ण) नाव
३. आपला चालू असलेला ईमेल पत्ता
४. संपर्क क्रमांक (शक्यतो मोबाईल नंबर)
५. टिशर्ट कुठून घेणार- मुंबई/ पुणे/ इतरत्र
६. पैसे कसे देणार? - प्रत्यक्ष/ ऑनलाईन
७. टिशर्ट कसा घेणार- प्रत्यक्ष/ मित्र/ नातेवाईकांमार्फत (त्यांना संपर्काचे डेटेल्स)
८. किती टिशर्ट? लहान मुलांचे-मोठ्यांचे
९. लेडीज-युनिसेक्स कोणत्या प्रकारचे?
१०. साईझ- यांपैकी कोणता-
११ क्याप हवी का? असल्यास किती-

चला तर मग ववि साठी आपले आपल्या कुटुंबियांचे मित्रांचे टि शर्ट आणि कॅप त्वरीत नोंदवा.

अधिक माहीतीसाठी संपर्क :-

पुणे -

मल्लीनाथ (MallinathK) फोन : ९९६०३६६५६६
राम चिंचलीकर(राम) फोन : ९८५०८८५४२५

मुंबई -

आनंद चव्हाण (आनंदमैत्री) फोन : ९७६९४५४४२९

* भारता बाहेर किंवा मुंबई-पुणे बाहेर टि-शर्ट पार्सल करण्याची सुवीधा सध्यातरी नाहीय. पण तुम्ही कोणी नातेवाईक-मित्र परिवार किंवा स्वतः कधी मुंबई-पुणे आल्यास कलेक्ट करु शकत असल्यास नोंदणी आवश्य करावी.
* जर पर्सल खर्च तुम्ही करु शकत असल्यास संयोजक पार्सलची सोय करता येईल का ते नक्कीच कळवतील.

मल्लीनाथ...
अरे, एक काय ती तारीख निश्चीत दे... संपर्कातून तू मला 2 oct 2011, sakali 10.00 te 11.00 balgandharva. असं कळवलं आहेस. ऊगाच आता गोंधळ वाढवू नकोस...

१ ऑक्टोंबर २०११ सकाळी १०.०० ते ११.०० च्या दरम्यान, बालगंधर्वला टोप्या वाटप करण्यात येईल. ज्यांचे टि-शर्टस/टोप्या न्यायचे राहीलेत, त्यांनी त्या दिवशी येउन घेउन जावे.

घारुअण्णानी कळवल्याप्रमाणे माझे टीशर्ट्स गेल्या वीकेंडला मंजुकडे दिले जाणार होते.. अजुन पोहोचले नाहीयेत.. प्लीज ते काम करणार का?

मल्ल्या , आम्ही शनिवर्किंग वाल्यांनी काय रजा टाकुन यायच का टोप्या न्यायला??? २ ऑक्टोबर ठीक होती की तारिख परत का बदलली म्हणे??

अरे मुंबईकरांच्या टी-शर्ट्स-टोप्यांचं काय? प्लीज त्याची पण काहीतरी तारीख नक्की करा ना .

चिंगी , अल्पना, नमस्कार , उशीरबद्दल दिलगीरी... आज संध्याकाळपर्यंत मंजुडीकडे टीशर्ट पोहोचवतो

@ अमृता, काल आपल्याला सांगितल्याप्रमाणे टि-शर्ट मंजुडि कडे पाठवले कि फोन करतो.
@सुमेनिष, आपले टि-शर्ट घारुअण्णांकडुन collect करावेत
मुंबई मधुन टि शर्ट संदर्भात काहि अडचण असेल तर मझ्याशी प्रत्यक्ष ९७६९४५४४२९ या क्रमांकावर संवाद साधावा

मदतनिधीची रक्कम येत्या ४-५ दिवसांमध्ये नियोजित संस्थेला देण्यात येईल. पावती घेऊन ती या बीबी वर अपलोड करण्यात येईल.

ठरल्याप्रमाणे संयोजकांनी रु. २१००० ची देणगी 'बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन'कडे सुपूर्त केली आहे.
त्याची ही पावती.
maayboli donation receipt.jpg

धन्यवाद संयोजक.

बर, उद्या सकाळी १० ते ११ मध्ये टोप्या मिळणार आहेत का पुण्यात? मल्लीनाथ, प्लीज कन्फर्म.

१ ऑक्टोंबर २०११ सकाळी १०.०० ते ११.०० च्या दरम्यान, बालगंधर्वला टोप्या वाटप करण्यात येईल. ज्यांचे टि-शर्टस/टोप्या न्यायचे राहीलेत, त्यांनी त्या दिवशी येउन घेउन जावे.

१ ऑक्टोंबर २०११ सकाळी १०.०० ते ११.०० च्या दरम्यान, बालगंधर्वला टोप्या वाटप करण्यात येईल. >>> १०.२० झाले तरी बालगंधर्वला कोणीच नाही.. 'अम्मि' हा माबोकर तिथे वाट पहात आहे. Sad

सर्व-प्रथम संयोजकांचे अभिनंदन आणी संयोजकांना धन्यवाद!!!...

आत्ताच मल्लिनाथ सोबत भ्रमणध्वनी वर बोललो- अती-महत्वाच्या कार्यालयीन जबाबदारी मुळे, मी 'टोप्या' घ्यायला येऊ शकत नाहीय... आता 'टोप्या' मिळवण्याची माझी जबाबदारी राहील...

पुनश्च धन्यवाद!!!...

Pages