कालचा आपला टी-शर्ट वाटपाचा कार्यक्रम अती पावसामुळे गैरसोय झाल्याने नाईलाजाने पुढे ढकलावा लागला आहे....गैरसोयीबद्दल संयोजक दिलगीर आहेत.
ज्यांना कोणास यायचे जमत नाही त्यांनी राम किंवा मल्लिनाथशी संपर्क साधुन टि-शर्ट घ्यावे.
आत्तापर्यंत तुम्हा सर्वानी आम्हाला खुप सहकार्य केले आहे आणी यापुढे सुद्धा असेच सहकार्य मिळावे ही नम्र विनंती..
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: २३ जुलै २०११, स. १०.३० ते १२.३०
(जर पाउस किंवा जागेची काही अडचण झाली तर तिथेच शेजारी बालगंधर्व हॉटेल मध्ये जमावे.)
धन्यवाद !
"आले आले..."
"अहो, आले आले काय ? आलो आलो म्हणा !"
"अगं मी नाही गं, 'मायबोली' टीशर्ट आले!"
"ते होय....."
"हॅ.... काय झालं ?"
"आहो, यंदा ना किनै थोडं बजेट वाढ्वुया का?"
"का ..... " (हि ना....., असं लाडे लाडे बोलुनच माझ्या बनियनची भोकं वाढलीयत. लाडात आली की झालं बोटाने कुरतडायला.)
"य़ंदा मायबोलीच्या टोप्याही आल्यात म्हणे......."
"म्हणजे तु मला टोपी घालणार.. :अओ:"
"अहो तसं नाही... हो"
"मग कसं.. ?"
"तुम्ही ना..... जा तिकडे..."
"हँ..... "
तर मंडळी, सालाबादप्रमाणे याही वर्षी मायबोलीकरांना 'मायबोली टीशर्ट' तसच टोप्या ही उपलब्ध करून देण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
यावर्षी आपली आवडती 'मायबोली' ही अक्षरं 'सुलेखन' करून घेण्यात आली आहेत प्राजक्ता थरथरे (पारीजातक)आणि पल्लवी देशपांडे(पल्ली) यांच्याकडुन .
टीशर्ट एकाच रंगात उपलब्ध आहेत- गड्द हिरवा (डार्क ऑलिव्ह ग्रिन). यामध्ये सुलेखन पुढे आणि मायबोलीचा लोगो आणि लिंक डाव्या बाहीवर येईल. टीशर्ट असा दिसेल-
वर चित्रात दर्शवल्याप्रमाणे यंदाचे टीशर्टस् राऊण्ड नेक परंतू लेडिज आणि युनिसेक्स अश्या दोन प्रकारात पुढील साईजेसमध्ये उपलब्ध आहेतः-
लहान मुलांचे टि शर्ट १४५ + २५** = १७०रु./-
२२"
२४"
२६"
२८"
३०"
३२"
मोठ्यांचे टि शर्ट १७५ + ५०**= २२५रु/-
टीशर्टची मापे पुढिलप्रमाणे:-
३६"==XS
३८"==S
४०"==M
४२"==L
४४"==XL
४६"==XXL
आणि अशी दिसेल बेस बॉल कॅप
क्याप ६० + २५** = ८५रु/-
** महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टि-शर्ट आणि कॅपच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.
यंदा टीशर्ट विक्रीतून उभी राहणारी रक्कम काश्मीरातल्या अनाथ मुलींसाठी काम करणार्या श्री. अधिक कदम व त्यांच्या ’बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेला देण्यात येणार आहे.
या संस्थेची माहिती http://www.bwfindia.org.in/index.php इथे उपलब्ध आहे.
टि-शर्टांची नोंदणी आणि पैसे ३ जुलै २०११ पर्यंत द्यायचे आहेत. तसंच, ज्यांना प्रत्यक्ष पैसे द्यायचे शक्य होणार नाही, त्यांना आपण 'ऑनलाईन पेमेन्ट ऑप्शन'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, ईमेलमध्ये तसे लिहा, मग पुढील डीटेल्स तुम्हाला कळवण्यात येतील.
पुणे आणि मुंबई इथे ३ जुलै २०११ या एकाच दिवशी टिशर्टचे पैसे जमा केले जातील आणि १७ जुलै २०११ या दिवशी टिशर्ट आणि कॅप वितरण केले जातील.
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: ३ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ३ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
ऑर्डर कशी नोंदवाल? - tshirt@maayboli.com इथे ईमेल पाठवून.
ईमेल च्या सब्जेक्ट मध्ये 'टि-शर्ट/कॅप नोंदणी' असे नमुद करण्यास विसर नका.
ईमेलमध्ये काय लिहाल?
१. आपला मायबोली आयडी
२. आपले (खरे संपूर्ण) नाव
३. आपला चालू असलेला ईमेल पत्ता
४. संपर्क क्रमांक (शक्यतो मोबाईल नंबर)
५. टिशर्ट कुठून घेणार- मुंबई/ पुणे/ इतरत्र
६. पैसे कसे देणार? - प्रत्यक्ष/ ऑनलाईन
७. टिशर्ट कसा घेणार- प्रत्यक्ष/ मित्र/ नातेवाईकांमार्फत (त्यांना संपर्काचे डेटेल्स)
८. किती टिशर्ट? लहान मुलांचे-मोठ्यांचे
९. लेडीज-युनिसेक्स कोणत्या प्रकारचे?
१०. साईझ- यांपैकी कोणता-
११ क्याप हवी का? असल्यास किती-
चला तर मग ववि साठी आपले आपल्या कुटुंबियांचे मित्रांचे टि शर्ट आणि कॅप त्वरीत नोंदवा.
अधिक माहीतीसाठी संपर्क :-
पुणे -
मल्लीनाथ (MallinathK) फोन : ९९६०३६६५६६
राम चिंचलीकर(राम) फोन : ९८५०८८५४२५
मुंबई -
आनंद चव्हाण (आनंदमैत्री) फोन : ९७६९४५४४२९
* भारता बाहेर किंवा मुंबई-पुणे बाहेर टि-शर्ट पार्सल करण्याची सुवीधा सध्यातरी नाहीय. पण तुम्ही कोणी नातेवाईक-मित्र परिवार किंवा स्वतः कधी मुंबई-पुणे आल्यास कलेक्ट करु शकत असल्यास नोंदणी आवश्य करावी.
* जर पर्सल खर्च तुम्ही करु शकत असल्यास संयोजक पार्सलची सोय करता येईल का ते नक्कीच कळवतील.
श्यामलीजी, धन्यवाद. अपडेट
श्यामलीजी, धन्यवाद. अपडेट केलेय.
मल्लिनाथ, माझ्या
मल्लिनाथ, माझ्या माहितीप्रमाणे तुझ्या 'टीशर्ट न नेलेल्या लिस्ट'मधल्या हिम्सकुल, अरभाट, आशूडी, मयूरेश, अरूण या लोकांनी टीशर्ट नेले आहेत. बहुधा आणखीही काही तसे लोक असतील.
नंद्याचे नाव दोन्हीकडे आलेय
नंद्याचे नाव दोन्हीकडे आलेय मी घेतलेत त्याचे टीशर्ट. 'न नेलेल्यांमधले' त्याचे नाव काढावे.
तसेच, अरभाटानेही त्याचा टीशर्ट समक्ष नेलेला आहे. त्याचेही नाव 'न न' मधून काढून टाकावे.
साजीरा, राम ने दिलेल्या अपडेट
साजीरा, राम ने दिलेल्या अपडेट वरुन लिस्ट बनव्ल्या आहेत. त्यांनि नेल्या असतील तर कन्फर्म करुन हवे ते बदल करतो.
ढिसाळ संयोजणामुळे बोर्या
ढिसाळ संयोजणामुळे बोर्या वाजलेली एक चांगली संकल्पना म्हणुन या प्रकल्पाकडे बघता येईल.
किमान ठरल्याप्रमाणे चॅरीटीच्या रक्कमा अदा केल्याचे तपशिल इथेच द्यावेत.
साकेत, पुढच्या वविला तुम्ही
साकेत, पुढच्या वविला तुम्ही टिशर्ट आणि टोप्या समितीचं संयोजन करा
साकेत, दिलेल्या शाल
साकेत, दिलेल्या शाल जोड्यांबद्दल धन्यवादच.
आणि पुणेकरांनी दिलेल्या प्रतिसाद आणि कोऑपरेशन बद्दलही धन्यवाद म्हणायला हवे.
मल्ली, मला टीशर्ट मिळालेले
मल्ली, मला टीशर्ट मिळालेले आहेत..
पण जर तुमच्याकडे अजूनही माझ्या नावाचे बाकी असतील तर घेऊन जातो परत.. त्याच किंमतीत डबल टी-शर्ट...
साकेत, पुढच्या वविला तुम्ही
साकेत, पुढच्या वविला तुम्ही टिशर्ट आणि टोप्या समितीचं संयोजन करा
जरुर. मी हे आव्हान स्वीकारतो. मी तर टिशर्ट्(मराठी शब्द???????) बरोबर छत्र्यांचेही वाटप करण्याचा मनोदय जाहीर करतो.
हे आव्हान वगैरे नाहिये. बरं
हे आव्हान वगैरे नाहिये. बरं असतं दुसरा कशातून जात असतो ते स्वतः अनुभवणं प्रत्येकाची संयोजनाची स्किल्स सारखी उत्तम नसतात ना? आधीच्यास ठेच पुढचा शहाणा या उक्तीप्रमाणे पुढची समिती आधीच्या चुका होऊ देणार नाही.
वविला छत्र्या कशाला वाटायच्या? ज्यांना भिजायचं नसतं ते आपापली घेऊन येतातच की.
साकेत, दिलेल्या शाल
साकेत, दिलेल्या शाल जोड्यांबद्दल धन्यवादच.
मल्ली, धन्यवादाबद्दल आभार.
ह्या विश्वात काही राम राहीला नाही. अनेक थापा मारण्याची मल्लिनाथी केली गेली. अण्णा आता आधार ह्या भारताला.
असो. संयोजकांनी याद्या इथे
असो. संयोजकांनी याद्या इथे दिलेल्या आहेत. सर्वांनी आपापले शर्ट्स लवकर घेऊन त्यांना सहकार्य करावे, ही विनंती.
संयोजक, ज्यांचे पैसे जमा झालेले नाहीत त्यांना २० किंवा २५ सप्टेंबरचा अल्टिमेटम देऊ या का? त्यानंतर त्यांची ऑर्डर रद्द करून, मग हिशेब करून चॅरिटीचा विषय संपवून टाकू या. तुमचे काय मत आहे?
जास्तीचे किती शर्ट्स उरले आहेत (किंवा उरतील) यावर त्यांचे काय करायचे- हे ठरेल बहुधा. हा आकडा मला अर्थातच माहिती नाही. यासंदर्भात तुम्हाला मेलही केलेली आहे.
साकेत, कॄपया नोंद घ्यावी की
साकेत,
कॄपया नोंद घ्यावी की मी संयोजक मंडळात नाहीये, मी त्यातल्या कोणालाही ओळखत नाही.पण तरी त्या लोकांना यातुन कसलाही आर्थिक मोबदला मिळत नसताना कोणीतरी स्वतःहुन जबाबदारी घेतलेय, स्वतःचे कामधंदे सांभाळुन ते करताहेत तर अशा प्रकारची अनावश्यक टिप्पणी कशाला करायची.
मला टीशर्ट अजुन मिळाला नाही पण यात माझाही थोडा दोष आहेच की. मी ठरवुन दिलेल्या वेळेत तिकडे जाउन पार्सल उचलले नाही. मला वेळेअभावी जमले नाही, तसा त्यांनाही नसेल जमले. सरळ ढिसाळ संयोजन वै बोलण्याची गरज नाही हे माझे वै. मत.
तुम्ही दिलेले स्पष्टीकरण अगदी
तुम्ही दिलेले स्पष्टीकरण अगदी म्हंजी अगदीच बिनबुडाचे आहे. चिंगीबै याविषयी लिहीले तर खूप म्होठ्ठा निबध्द होईल त्यामुळे आवरते घेत आहे. कुणी काय बोलावे नि कुणी काय लिहावे हे सांगणार्या तुम्ही कोण?????????????
ढिसाळ संयोजणाबाबतीत माझे मत पक्के आहे. आणि ते मी वारंवार मांडत रहाणार. इथे विषयांतर होत आहे. त्यामुळे इथेच थांबतो.
कुणी काय बोलावे नि कुणी काय
कुणी काय बोलावे नि कुणी काय लिहावे हे सांगणार्या तुम्ही कोण?????????????>>>>>>> मी तुम्हाला काहीही लिहा व लिहु नका असे सांगितले नाहीये. मी लिहीलंय की तुमची टिप्पणी ही अनावश्यक आहे असं माझं मत आहे.
हेमाशेपो.
तुम्हाला विषय माहीत नाही
तुम्हाला विषय माहीत नाही क्रुपया मधे मधे झामल झामल करु नये.
मल्लिनाथ... अरे, तुला २-३
मल्लिनाथ...
अरे, तुला २-३ वेळा फोन केलेला मी-टोप्यांच्या चौकशी साठी... प्रत्येक वेळी रिंग पूर्ण-पणे वाजून 'आपण संपर्क करु ईच्छीत असलेला क्रमांक प्रतिसाद देत नाही...' हे ध्वनी-मुद्रीत उत्तर ऐकावे लागल्यामुळे, तुझा भ्रमणध्वनी क्रमांक बदलला की काय? अशी शंका निर्माण झाली...
बरं आता तुला मी कधी फोन करु ते सांग, म्हणजे 'टोप्यां'चा विषय संपवता येईल... ...
प्लीज कळव, वाट बघतोय... ...
आत्ताही करु शकता.
आत्ताही करु शकता.
>>>ढिसाळ संयोजणामुळे बोर्या
>>>ढिसाळ संयोजणामुळे बोर्या वाजलेली एक चांगली संकल्पना म्हणुन या प्रकल्पाकडे बघता येईल.
किमान ठरल्याप्रमाणे चॅरीटीच्या रक्कमा अदा केल्याचे तपशिल इथेच द्यावेत.
कारणं काहीही असोत,पण हा झालेला गोंधळ योग्य नाही असे माझेही मत आहे.
फायदा-नुकसान वगैरे जाऊ द्या पण किमान ज्या उदात्त कारणासाठी ज्यादा आकार घेण्यात आला होता ते पैसे लवकरात लवकर ठरलेल्या संस्थेला देणे हे सर्वप्रथम कर्तव्य आहे आणि त्यात हयगय होता कामा नये. अंगावर घेतलेले काम सुनिश्चित वेळेत तडीस न नेण्याने मग अशा शंका-कुशंकांचा जन्म होत असतो हे भविष्यात अशी जबाबदारी अंगावर घेणारे लक्षात ठेवतील अशी आशा आहे.
देवसाहेब बरोबर. असेच म्हणायचे
देवसाहेब बरोबर. असेच म्हणायचे होते पण आपल्याला ती "शिष्ट" भाषा येत नाय.
(No subject)
मल्ली, जेंव्हा टी शर्ट वाटप
मल्ली, जेंव्हा टी शर्ट वाटप झालं बालगंधर्व ला तेव्हा टोप्या नव्हत्याच तूमच्याकडे.
एकुण टिशर्ट - ४०० नग. (
एकुण टिशर्ट - ४०० नग. ( मोठ्यांचे ३३६, आणि लहानांचे ६४).
एकुण टोप्या - ८८ नग.
टि-शर्ट* विक्रीमधुन जमवलेली रक्कम - (३३६ * ५० ) = रुपये १६,८०० /-
टोप्यां विक्रीमधुन जमवलेली रक्कम - (८८ * २५) = रुपये २२०० /-
(* लहान मुलांच्या टि-शर्ट किमतीमध्ये जादा रक्कम आकारण्यात आलेली नाहीय.)
त्यातुन एकुण समाजसेवेसाठी जमवलेली रक्कम - १९००० /-
आणि आधीच ठरल्याप्रमाणे संयोजकांकडुन काही रक्कम आधीक करुन एकुण २१,०००/- रुपये या महिनाखेर पर्यंत संस्थेला पोचवण्यात येईल. आणि मिळालेली पावती सालाबादाप्रमाणे माबोवर पोस्टन्यात येइल.
मल्ली, जेंव्हा टी शर्ट वाटप
मल्ली, जेंव्हा टी शर्ट वाटप झालं बालगंधर्व ला तेव्हा टोप्या नव्हत्याच तूमच्याकडे.
हो, तेव्हा नव्हत्याच. आणी जेव्हा आल्या तेव्हा इथे पोस्ट टाकलेली.
पुणेकरांसाठी
पुणेकरांसाठी निवेदन.....
टोप्या आल्या आहेत. ज्यांची टोप्यांची ऑर्डर आहे त्यांनी कृपया संपर्क साधुन टोप्या घेउन जावेत.
ज्यांचे ज्यांचे टि-शर्ट राहीलेत त्यांनी ही संपर्क साधुन लवकरात लवकर घेउन जावे. >> ३० ऑगस्ट.
साजिरा कडून,
संयोजक,
कुणाकुणाचे टी-शर्ट द्यायचे राहिले आहेत, त्याची यादी टाकू शकता का कृपया? >> ही माहिती आधीच अपेक्षीत होता टोप्या/टिशर्ट साठी, जेणेकरून पून्हा गडबड झाली नसती.
असो. शनिवारी फोन करू का? कधी आणी कुठे द्यायला जमेल.
ज्यांनी ज्यांनी यावर्षी
ज्यांनी ज्यांनी यावर्षी संयोजनाला "ढिसाळ" म्हटले आहे, त्यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी एखाद्या वर्षी हे काम घेऊन आम्हाला उपकृत करावे.
आयला दक्षे माझी वरची पोष्ट
आयला दक्षे माझी वरची पोष्ट वाच आधी. मी
ते आव्हान ऑलरेडी स्विकारलेले आहे.
टिशर्ट एक्स्ट्रा उरत असेल तर
टिशर्ट एक्स्ट्रा उरत असेल तर मला 'जेन्टस एम (४४)' साईझचा हवा आहे...
ते पैसे लवकरात लवकर ठरलेल्या
ते पैसे लवकरात लवकर ठरलेल्या संस्थेला देणे हे सर्वप्रथम कर्तव्य आहे आणि त्यात हयगय होता कामा नये >> मला नाही वाटत त्यात यावर्षी वा आधीही कधी हयगय झाली आहे. दरवर्षी सर्व हिशोब, संस्थेचे आभाराचे पत्र इत्यादी व्यवस्थित पोस्ट केले जाते. लष्करच्या भाकर्या इतक्या चिकाटीने, जिद्दिने, निगुतीने भाजतात संयोजक मंडळ ते कौतुकास्पद आहे.
सारी माहिती इथे लिहिल्याबद्दल
सारी माहिती इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद संयोजक.
आता फक्त टोप्यांसाठी या किंवा पुढच्या वीकेंडला बालगंधर्वसारख्या ठिकाणी वितरित करण्याची वेळ ठरवता येईल का? त्याबद्दल कृपया इथे लिहा ही विनंती.
संयोजकांनी दिलेल्या वेळेत आपापल्या टोप्या (तसेच घ्यायचे राहिलेले टीशर्ट्स) घेऊन संयोजकांना सहकार्य करावे, ही सर्वांना विनंती.
Pages